सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर बांगलादेशी असल्याची शक्यता? मोठी माहिती समोर
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणाला नवं वळण..., ठाण्यातून आरोपीला अटक, हल्लेखोर बांगलादेशी असल्याची शक्यता? मोठी माहिती समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा...

Saif Ali Khan Attack Case: सध्या सर्वत्र अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे. सैफ अली खान हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोहम्मद आलियान उर्फ मोहम्मद एलियास ऊर्फ BJ उर्फ विजय दास याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना आलेल्या संशयानंतर पोलीस आरोपीच्या कागदपत्रांची पडताळणी करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
तीन दिवसानंतर सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल आहे. ठाण्याच्या कासरवाडी येथील हिरानंदानी इस्टेटच्या पाठी असलेल्या झुडपातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आरोपी विजय दास याला खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं.
शनिवारी रात्री तीन वाजता आरोपीला ठाण्याहून मुंबईत आणण्यात आले. सध्या आरोपीला खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आरोपीला ठाण्यातून अटक करून मुंबईतील खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. रात्री तीनच्या सुमारास आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून येथेच आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.
View this post on Instagram
मुंबई पोलिसांचे अनेक अधिकारी सध्या आरोपींकडून सैफ अली खानशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ठाणे परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने दिलेली माहिती
आरोपीने पोलिसांना स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं. ठाण्यातून आरोपीला अटक करण्यात असून त्याची चौकशी पोलीस करत आहेत. बनावट भारतीय ओळखपत्र वापरणारा तो बांगलादेशी नागरिक असावा, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, त्याने स्वत: पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचं कबूल केल्याचं पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे.
रिपोर्टनुसार, सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. तपासा दरम्यान पोलिसांना सैफच्या घरातून आणखी एक चाकूचा तुकडा आढळला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री एका अधिकाऱ्याने संबंधित माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.