Photo : ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये समांथा अक्किनेनीची हटके भूमिका, दिसणार नव्या अवतारात

‘द फॅमिली मॅन’मधील समांथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. (Samantha Akkineni's amazing role in 'The Family Man 2', you'll be amazed)

1/7
Samantha Akkineni
समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ही तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रस्थापित अभिनेत्री आहे. आपली सुंदरता, उत्कृष्ट अभिनय कौशल्य, स्क्रीन प्रेजेन्स आणि प्रतिभा यामुळे तिनं दक्षिणेत प्रत्येकाची मनं जिंकली आहेत.
2/7
Samantha Akkineni
आता, मुख्य प्रवाहातील ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनमध्ये ती आपला डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. नव्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीचा सूड घेणारी राजीची भूमिका समांथा अक्किनेनी साकारणार आहे.
3/7
समांथा एक उत्कृष्ट कलाकार असण्यासोबतच एक एनजीओ देखील चालवते ज्याची सुरुवात तिनं 2012मध्ये केली होती. ही एक स्वयंसेवी संस्था असून स्त्रिया आणि लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. समंथाचा मानवतेवर विश्वास असून समाजाला उत्तम बनवण्यासाठी ती कार्य करत आहे. ती आपली संस्था चालवण्यासोबतच स्त्रिया आणि मुलांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या अन्य स्वयंसेवी संस्थांना देखील मदत करते. यासोबतच, रस्त्यावरील भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या एनजीओंना देखील सहकार्य करते.
4/7
Samantha Akkineni
‘द फॅमिली मॅन’मधील नव्या सीजनमध्ये समांथा पार पाडत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव राजी आहे. जी श्रीकांतची प्रतिद्वंद्वी असून एका गारमेंट फॅक्ट्रीमध्ये काम करते. भूमिकेला यथासंभव वास्तववादी बनवण्यासाठी तिने एका खऱ्याखुऱ्या गारमेंट फॅक्ट्रीमध्ये शिवणकला शिकली असून आपली भूमिका निभावण्यासाठी तिथल्या कारागिरांची देखील मदत घेतली.
5/7
समांथानं ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी आणि ती खरी वाटण्यासाठी गहन आणि कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतले आहेत आणि एका कठीण ट्रांसफॉर्मेशनमधून ती गेली आहे. तिनं प्रत्येक दिवशी कितीतरी तास फिजिकल ट्रेनिंग घेतलं आहे आणि या सिरीजमधील या भूमिकेसाठी खरोखरच आपला घाम गाळला आहे.
6/7
Samantha Akkineni
‘राजी’च्या व्यक्तिरेखेला समजण्यासाठी आणि ती प्रामाणिकपणे आपल्यात उतरवण्यासाठी, समांथानं खूप रिसर्च केला. तिनं तीन दिवस स्वत:ला खोलीत बंद करून घेतले आणि राजी च्या व्यक्तिरेखेत मिसळण्यासाठी अनेक माहितीपट पाहिले.
7/7
Samantha Akkineni
‘द फॅमिली मॅन’मधील समांथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. ही तिची पहिली ग्लॅमर नसलेली भूमिका असून यात ती हार्डकोर अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि आपल्या शत्रूशी लढण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसणार आहे. समांथाच्या अभिनय कारकीर्दीत प्रथमच ती बंदूक हाताळताना दिसणार आहे.