रश्मी ठाकरेवरील टीका सहन करणार नाही, चंद्रकांत पाटलांची किव येते : किशोरी पेडणेकर
रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत.
रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत. अमृता फडणवीसांना विरोधीपक्ष नेत्या करणार का, असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. चंद्रकांत दादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.
