AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार… सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला

युगांडातील बुंडिबुग्यो जिल्ह्यात "डिंगा-डिंगा" नावाचा एक रहस्यमय आजार पसरला आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना अनियंत्रित कंप, ताप आणि कमजोरी येते. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, अँटीबायोटिक्सने उपचार केले जातात, आणि हा आजार प्रामुख्याने महिला आणि मुलांना प्रभावित करतो. या आजाराचा मूळ स्रोत अद्याप शोधला जात आहे. स्वच्छता आणि संसर्गापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार... सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 4:23 PM
Share

कोरोनापेक्षाही अत्यंत महाभयंकर आजार आला आहे. पूर्व आफ्रिकन देश युगांडामधील बुंडिबुग्यो जिल्ह्यात हा अतिशय रहस्यमयी आजार फैलावला आहे. स्थानिक भाषेत या आजाराला डिंगा-डिंगा (Dinga Dinga) म्हटलं जातं. या आजारामुळे शरीरात अनियंत्रित कंप निर्माण होतो. म्हणजे हा आजार झालेला माणूस सतत थरथरत असतो. लकवा झालेल्या पेशंट सारखा तो थरथरत असतो. त्याचं पूर्ण शरीर थरथरत असतं. त्यामुळे लकवा मारण्याची शक्यताही असते. युगांडातील 300 लोकांना या आजाराने घेरलं आहे. यात महिला आणि मुलींचा अधिक समावेश आहे. महिला आणि मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याने संपूर्ण देशच हादरून गेला आहे.

डिंगा डिंगाची लक्षणं काय?

डिंगा डिंगा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या शरीरात कंपन, ताप आणि अत्याधिक कमजोरी निर्माण करतो. या लक्षणावरून त्या व्यक्तीला डिंगा डिंगा आजार झाल्याचं स्पष्ट होतं. या आजारामुळे चालणंही कठिण होतं. कारण शरीर सातत्याने थरथरत असतं. त्यामुळेच या व्हायरसचं नाव डिंगा डिंगा पडलं. काही प्रकरणात रुग्णांना शरीर आखडणं आणि लकव्यालाही सामोरे जावं लागत आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या आजाराने अद्याप पर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

आरोग्य अधिकारी काय म्हणत आहेत?

आजाराचं गांभीर्य समजून यूगांडाचे आरोग्य अधिकारी तात्काळ उपचार करत आहेत. बुंडिबुग्यो जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर म्हणाले की, रुग्णांना साधारणपणे एका आठवड्याच्या उपचारानंतर आराम मिळतो. उपचारादरम्यान अँटीबायोटिक्सचा प्रयोग केला जातो. त्यांनी हर्बल उपचारांवर लक्ष देऊ नका, असं आवाहन केलं आहे. अजूनपर्यंत या आजारावर कोणत्याही हर्बल औषधाचा शोध लागलेला नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.

आजार कसा फैलावतो?

हा आजार पसरू नये म्हणून स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. नवीन रुग्ण आढळल्यास आरोग्य टीमला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या तरी हा व्हायरल बुंडिबुग्यो जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. इतर जिल्ह्यात हा आजार पसरल्याची कोणतीही बातमी नाहीये.

आजार कसा ओळखायचा?

या आजाराचा स्त्रोत अद्याप कळलेला नाही. यूगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या रक्ताचे नमूने चाचणीसाठी पाठवले आहेत. मात्र, आजाराचं निदान अद्याप झालेलं नाही. हा आजार कशामुळे होतो हे शोधून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतंही सटिक कारण सापडलेलं नाही, असं अधिकार म्हणतात.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.