AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीनं पुतिन यांना दिली चिठ्ठी, मेलानिया यांनी काय लिहिलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये अमेरिकेमधील अलास्का येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन, ट्रम्प भेटीदरम्यान एक काळजाला भिडणारी बातमी समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीनं पुतिन यांना दिली चिठ्ठी, मेलानिया यांनी काय लिहिलं?
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 16, 2025 | 2:21 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये अमेरिकेमधील अलास्का येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन, ट्रम्प भेटीदरम्यान एक काळजाला भिडणारी बातमी समोर आली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार जेव्हा ही बैठक पार पडली तेव्हा ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नव्हत्या, मात्र तरी देखील त्यांना पुतिन यांना काहीतरी सांगायचं होतं. त्यामुळे मग मेलानिया यांनी पुतिन यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहून डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ दिली. या बैठकीवेळी ट्रम्प यांनी आपल्या खिशातून ही चिठ्ठी काढून स्वत: पुतिन यांना दिली. आता या चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं? मेलानिया यांना पुतिन यांना काय सांगायचं होतं? हे आता समोर आलं आहे.

मेलानिया यांनी पुतिन यांना लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रशिया आणि युक्रेनमधील मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांची भेट घेतली तेव्हा या भेटीवेळी तिथे मेलानिया उपस्थित नव्हत्या, मात्र त्यांनी एका चिठ्ठीच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाबाबत, त्यांना वाटणारी चिंता पुतिन यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. पत्रात नेमकं काय लिहिलं होतं, हे व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं नाही, मात्र त्यांनी रशिया आणि युक्रेनमधील मुलांबाबत चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

युक्रेनने रशियावर असा आरोप केला आहे की, युद्ध सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत रशियाकडून हजारो मुलांचं अपहरण करण्यात आलं आहे, या मुलांना रशियानं आपल्या ताब्यात ठेवलं आहे, रशियानं युक्रेनच्या ज्या भूमीवर कब्जा केला आहे, तिथे या मुलांना ठेवण्यात आलं आहे, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं युक्रेननं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. 2022 पासून युक्रेनमधील मुलांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे.

दरम्यान याच मुद्द्यावर मेलानिया यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना एक चिठ्ठी लिहिली, ज्यामध्ये या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र रशियाकडून यावर असा दावा केला जात आहे की, युद्धामुळे हे मुलं अनाथ झाले आहेत. त्यांचं भविष्य सुरक्षित असावं, या उद्देशानं आम्ही त्यांना त्या क्षेत्रात ठेवत आहोत, आता आंतरराष्ट्रीय स्थरावर देखील हा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...