Photo : डोमिनिका जेलमधून मेहुल चोक्सीचा पहिला फोटो समोर, हातावर दुखापतीचे व्रण!

Akshay Adhav

|

Updated on: May 30, 2021 | 7:16 AM

पीएनबी घोटाळ्यातील मु्ख्य आरोपी आणि डोमिनिकामध्ये पकडलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याचं कारागृहातून पहिला फोटो समोर आला आहे. मेहुल चोकसी सध्या डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात असून तो तुरुंगात आहे. (First photo of Mehul Choksi in police custody in Dominica)

May 30, 2021 | 7:16 AM
पीएनबी घोटाळ्यातील मु्ख्य आरोपी आणि डोमिनिकामध्ये पकडलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याचं कारागृहातून पहिला फोटो समोर आला आहे. मेहुल चोकसी सध्या डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात असून तो तुरुंगात आहे. (photo - Antigua News Room, ANI)

1 / 6
चोकसीच्या समोर आलेल्या फोटोत तो खूप आजारी असल्यासारखा दिसत आहे. कैद्यांच्या कपड्यात त्याच्या हाताला शाई लागल्यासारखी त्याचे हात एकदम काळे निळे दिसत आहेत. तसंच डोळेही अगदी लाल दिसत आहेत. (photo - Antigua News Room, ANI)

2 / 6
डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मेहुल चोक्सीला पकडले. मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. (photo - Antigua News Room, ANI)

3 / 6
मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलाय. तो अँटिग्वाचा नागरिक असल्यानं तिथे मिळणारे सर्व हक्क त्याच्याकडे आहेत. अँटिग्वा एक कॅरिबियन देश आहे. ज्या देशात मेहुल चोक्सीला अटक केली गेली, तो अँटिग्वाच्या आसपासच्या भागातच येतो. परंतु मेहुल चोक्सी डोमिनिकाला का गेला हे अद्याप अस्पष्ट आहे. (photo - Antigua News Room, ANI)

4 / 6
Mehul Choksi India Dominica

Mehul Choksi India Dominica

5 / 6
यापूर्वी, डोमिनिकामधील चोकसीचे वकील वेन मार्श यांनी मेहुलच्या जीवाला धोका असल्याचे म्हचलं होते. चोक्सी हे भारताचे नागरिक नसून अँटिगा एंड बारबुडाचे नागरिक आहेत, म्हणून त्यांना तिथे परत पाठवावे. (photo - Antigua News Room, ANI)

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI