PHOTO | इस्त्राईलमध्ये आता मास्क वापरण्याची सक्ती नाही, ‘मास्क मुक्ती’ देणारा जगातील पहिला देश!

इस्रायलमधील प्रशासनाने लोकांना मास्क न घालण्याचे आदेश दिले आहेत. इस्राईलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोनाची लस दिली गेली असून, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय दिला आहे.

1/6
चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) आज जगात खळबळ उडाली आहे. 2019च्या शेवटी, कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाला होता. हा धोकादायक संसर्ग इतक्या वेगाने पसरला की, त्याने कोट्यावधी लोकांना आपल्या विळख्यात अडकवले आणि या संसर्गाने कोट्यावधी लोक मरण पावले.
2/6
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना टाळण्यासाठी लसीकरण करण्यापूर्वी, मास्क परिधान करणे हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगितले होते. सध्याचा काळ असा आहे की, प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु, इस्राईल (Isarel) हा जगातील पहिला असा देश बनला आहे, जिथे आता मास्क घालण्याची सक्ती नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
3/6
होय, इस्रायलमधील प्रशासनाने लोकांना मास्क न घालण्याचे आदेश दिले आहेत. इस्राईलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोनाची लस दिली गेली असून, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय दिला आहे. शासनाच्या या आदेशानंतर लोकांनी त्यांच्या चेहर्‍यांवरुन मास्क काढून सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
4/6
इस्त्राईलमध्ये 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 81 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. त्याचबरोबर येथे कोरोना संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही तीव्र घट झाली आहे. तथापि, इस्राईलमध्ये अजूनही काही निर्बंध लागू आहे. परदेशी लोकांचा प्रवेश आणि लसीशिवाय लोकांचा वावर मर्यादित आहे.
5/6
इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोनाच्या नवीन भारतीय प्रकारची सात प्रकरणे आढळली असून, त्यांचा तपास सुरू आहे. पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, या क्षणी आपण कोरोना विषाणू विरुद्धची लढाई जिंकण्याच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करत आहोत. परंतु, ते पुढे म्हणाले की, कोरोनाशी असलेला हा लढा अद्याप संपलेला नाही आणि तो पुन्हा परत येऊ शकतो.
6/6
इस्रायलची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे आणि आतापर्यंत येथे आठ लाखाहून अधिक कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर कोरोनामुळे सहा हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI