PHOTOS : चीनच्या Zhurong रोव्हरचंही मंगळावर दमदार पाऊल, धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी

चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो जारी केलेत.

1/5
चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो जारी केलेत. यात मंगळ ग्रहावरील धुळ आणि डोंगराळ भागात चीनचा राष्ट्रीय ध्वज लावलेला हा चीनचा रोव्हर दिसत आहे (China MARS Mission Latest News).
2/5
सीएनएसएने मंगल ग्रहावरील 4 फोटो शेअर केलेत. यात झुरोंग रोव्हरचा वरचा भाग दिसत आहे. प्लॅटफॉर्ममधून बाहेर निघण्याआधीचंही दृष्य यात पाहायला मिळतं आहे.
3/5
जुरोंग रोव्हरने जवळपास 10 मीटर अंतरावर आपला रिमोट कॅमेरा लावला आणि अनेक फोटो काढले (China MARS Mission in Marathi).
4/5
चीनने मागील महिन्यात मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हरसोबत तियानवेन-1 अंतराळ यान उतरवलं होतं. याआधी हे यान जवळपास 3 महिने मंगळाच्या कक्षेत होतं.
5/5
अमेरिकेनंतर मंगळावर अंतराळ यान पाठवणारा चीन जगातील दुसरा देश आहे. यानाच्या ऑर्बिटर आणि लँडर दोन्हींवर चीनचा राष्ट्रध्वज आहे. 6 पायांचं चीनच रोव्हर मंगळावरील युटोपिया प्लानिशिया या भागाची पाहणी करत आहे.