AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकला घडवली अद्दल, आता बांगलादेशाचा वाजेल बँड, शेजार्‍याला धडा शिकवणार भारत

Pakistan Bangladesh India : भारताने पाकला चांगलीच अद्दल घडवली. ऑपरेशन सिंदूरचा मोठा फटका पाकड्यांना बसला आहे. तर दुसरीकडे खुमखुमी असणाऱ्या बांग्लादेश सरकारचा पण आता बँड वाजणार आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत भारताला घेरण्याचा प्रयत्नात बांग्लादेशचे युनूस सरकार आहे, त्याला दणका देण्यात येईल.

पाकला घडवली अद्दल, आता बांगलादेशाचा वाजेल बँड, शेजार्‍याला धडा शिकवणार भारत
ऑपरेशन सिंदूर, बांगलादेश, पाकिस्तानImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 18, 2025 | 9:05 AM
Share

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले. अवघ्या चार दिवसातच पाकडे गयावया करू लागले. जागतिक देशांकडे मदतीची त्यांनी याचना केली. भारताला युद्धविरामासाठी फोन केला. त्यानंतर संघर्ष थांबला. पाकला धडकी भरवल्यानंतर आता भारत बांगलादेशाची खुमखुमी जिरवणार आहे. बांगलादेशाचा बँड वाजवण्याची पूर्ण तयारी सुरू झाली आहे. भारताच्या नवीन निर्णयामुळे युनूस सरकार चिंतेत सापडले आहे. शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर नवीन गठीत सरकारसोबत भारताचे संबंध तणावपूर्ण आहेत. त्याचा परिणाम व्यापारावर दिसून आला आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संबंध वाढवत भारताला घेरण्याचा प्रयत्न मोहम्मद युनूस करत आहे. युनूस याचा पूर्वीपासूनच भारतावर राग आहे. सत्ता हातात आल्यापासून तो भारताविरोधी कुटनीतीचा वापर करत आहे. त्यामुळे युनूसचे नाक ठेचण्याची मोठी संधी भारतकडे चालून आली आहे. युनूसला त्याची जागा दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बांगलादेशातील वस्तूंवर प्रतिबंध

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातंर्गत परदेश व्यापार महासंचालनालयाने शनिवारी बांगलादेशातील काही वस्तूंवर प्रतिबंध जाहीर केला. या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. याची माहिती तात्काळ विविध बंदरांना देण्यात आली. आता कापड केवळ न्हावा शेवा आणि कोलकत्ता बंदरामार्फतच देशात येतील. इतर ठिकाणाहून त्या देशात येणार नाहीत. तर प्रोसेस्ड फूड, फळ आणि कार्बोनेटेड पेय, कापसाच्या गाठी आणि सुती धाग्याचा कच्चा माल, प्लास्टिक आणि पीव्हीसी माल, फर्निचरसह इतर श्रेणीतील माल केवळ ठराविक बंदरातूनच भारतात येईल. इतर ठिकाणाहून येणार नाही.

हा निर्णय का घेतला ?

भारतामुळे बांग्लादेश अस्तित्वात आला आहे. बांग्लादेश मुक्तीवाहिनाला भारतीय लष्कराने मोठी मदत केली. स्वातंत्र्यानंतर भारताने बांगलादेशला अनेक सवलती दिल्या. पण कट्टरतावाद्यांनी गेल्या वर्षीपासून बांगलादेशावर कब्जा मिळवल्यापासून येथे धार्मिक गट आणि भारत विरोधी युनूस सक्रिय झाले आहेत. युनूसला पूर्वीपासूनच भारताचा द्वेष आहे. विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्याने शेख हसीना यांचे सरकार उलथवले. कोणी त्यासाठी अमेरिकेला सुद्धा जबाबदार धरत आहे. पण त्यानंतर बांग्लादेश सातत्याने भारताविरोधात कुरापती करत आहे. चीनमध्ये जाऊन युनूसने भारताचा पूर्वांचल प्रदेश ताब्यात घेण्याचे विधान केले होते. भारताच्या सेव्हन सिस्टर राज्यावर चीनने ताबा मिळवावा, त्यासाठी बांगलादेशातील लष्करी हवाई पट्ट्यांचा वापर करावा अशी शिष्टाई मोहम्मद युनूस याने केली. तेव्हापासून भारत बांग्लादेश सरकारविरोधात सक्रिय झाले आहे

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.