PHOTOS : कोरोनाने या 10 देशांमधील पर्यटन उद्योगाचं कंबरडं मोडलं, आतापर्यंत अब्जावधी डॉलरचं नुकसान

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायाचं मोठं नुकसान झालंय. ज्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती त्यांच्यासमोरील आव्हानं खूपच वाढलीत. अशाच जगातील 10 देशांचा हा खास आढावा.

1/11
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायाचं मोठं नुकसान झालंय. विमान सेवा बंद आहे आणि हॉटेल्सचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये झाल्यानं पर्यटन व्यवसाय कोसळला आहे. त्यामुळे ज्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती त्यांच्यासमोरील आव्हानं खूपच वाढलीत. अशाच जगातील 10 देशांचा हा खास आढावा.

2/11
अमेरिका: जगात कोरोनाने प्रभावित देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. कोरोना काळात अमेरिकेत पर्यटनामुळे होणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झालेली पाहायला मिळाली. 2020 च्या सुरुवातीला 10 महिन्यात अमेरिकेचं 147 बिलियन डॉलरचं नुकसान झालंय. हे नुकसान अजूनही सुरुच आहे.

3/11
स्पेन : ESTA च्या अधिकृत आकेडवारीनुसार, 2020 मध्ये स्पेनमध्ये 2 कोटी परदेशी पर्यटक पोहचले होते. स्पेनच्या पर्यटन इतिहासातील हा सर्वात कमी पर्यटकांनी भेट देण्याचा आकडा आहे. त्यामुळे स्पेनला 46 बिलियन डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं.

4/11
फ्रांस : जगात सर्वाधिक पर्यटक फिरण्यासाठी फ्रांसमध्ये जातात. दरवर्षी फ्रांसमध्ये 8.9 कोटी पर्यटक जातात. कोरोना काळात यात मोठी घट झालीय. त्यामुळे फ्रांसच्या पर्यटन उद्योगाला जवळपास 42 बिलियन डॉलर नुकसान झालंय.

5/11
थायलंड : थायलंडमधील पर्यटन उद्योगाला आतापर्यंत 37 बिलियन डॉलरचा फटका बसलाय. हा आकडा आशियातील कोणत्याही इतर देशाच्या नुकसानीपेक्षा मोठा आहे.

6/11
जर्मनी : जानेवारी ते ऑक्टोबर 2020 पर्यंत जर्मनीच्या पर्यटन उद्योगाला 34 बिलियन डॉलरचं नुकसान झालंय. नुकसानीच्या बाबतीत जर्मनीचा जगात पाचवा क्रमांक लागतो आहे.

7/11
इटली : इटलीला 29 बिलियन डॉलरचा तोटा सहन करावा लागलाय.

8/11
ब्रिटन : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे ब्रिटनच्या पर्यटन उद्योगाला 27 बिलियन डॉलरचा तोटा झालाय.

9/11
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन उद्योगाचं 27 बिलियन डॉलरचं नुकसान झालंय. मात्र, सध्या परिस्थिती अधिक चांगली होताना दिसत आहे.

10/11
जपान: कोरोनामुळे जपानच्या पर्यटनालाही मोठा फटका बसलाय. कोरोना काळात जपानच्या पर्यटन व्यवसायाला 26 बिलियन डॉलरचा तोटा झालाय.

11/11
हाँगकाँग : हाँगकाँगच्या पर्यटनाला कोरोनाने 24 बिलियन डॉलरचा तोटा झालाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI