PHOTO : कोरोनाची लस घेतल्यानंतर दारु प्यायल्यास त्याचा शरीराला धोका? वैज्ञानिक म्हणतात….

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत. अनेकांच्या मनात लसीबाबत अनेक शंका आहे. त्यांच्या शंकेचं काही प्रमाणात सध्या निरसनही होत आहे. काही लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या साईड इफेक्टची भीती वाटत आहे. त्यातच काही लोकांना जाणून घ्यायचं आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर दारु पिऊ शकतो की नाही? लस घेतल्यानंतर दारु पिल्यास शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होतील का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या प्रश्नावर काही वैज्ञानिकांनी आपलं मत मांडलं आहे.

1/6
दारुबंदीचं अभियान राबवणारी ड्रिंकावेयर या संस्थेने तीन महिन्यांपूर्वी दावा केला होत की, जास्त दारु पिल्यास कोरोनाची लस घेतल्यानंतरही त्याचा शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. याशिवाय याचे पुरावे देखील समोर आल्याचं या संस्थेने म्हटलं होतं.

2/6
मात्र, या दाव्यांचं ब्रिटनच्या एका एजन्सीने खंडण केलं होतं. दारु पिल्यानंतर लसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असं या संस्थेने म्हटलं होतं.

3/6
अल्कोहोल किंवा दारुचा लसीच्या कार्यक्षमतेवर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही दारु पीत असाल तरी लस तिचं काम करेल, असं मत ब्रिटिश वैज्ञानिकांनी मांडलं आहे.

4/6
ब्रिटनमध्ये औषधांच्या सुरक्षिततेसंबंधित पॉलिसी बनवणाऱ्या MHRA संस्थेनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबतच्या अधिक माहितीसाठी हेल्थकेअरच्या तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.

5/6

ड्रिंकावेयरने लस घेतल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत दारुचं सेवन न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या या दाव्यावर कोणतंही वैज्ञानिक तथ्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

6/6
मात्र, तरीही जास्त दारु पिल्याने शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर खरंच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीर कोणत्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाही. मात्र, दारु घेतल्यानंतर लसीची कार्यक्षमता कमी होते, असं कोणतंही संशोधन अद्यापतरी समोर आलेलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI