AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hunger Strike: अन्नपाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? ओढावू शकतो मृत्यू ?

Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांचे दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा 19 वा दिवस आहे. हायकोर्टापासून ते अनेक नामवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. अन्नपाण्याविना माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो?

Hunger Strike: अन्नपाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? ओढावू शकतो मृत्यू ?
अन्नपाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो?
| Updated on: Jul 16, 2026 | 4:38 PM
Share

Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांचे दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण सुरू आहे. NEET पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाच्या आरक्षणादरम्यान आमरण उपोषण केलेले आहे. अन्नपाण्याविना किती दिवस मनुष्य राहू शकतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काही जण 20 ते 30 दिवस केवळ पाणी पित तंदुरुस्त राहत असल्याचा दावा करतात. अन्न आणि पाण्याविना मनुष्य किती दिवस जगू शकतो? अशा उपोषणाचा शरीरावर कोणता आणि कसा परिणाम होतो?

उपोषणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काय होते?

उपोषणाच्या पहिल्या दिवशी फारसे काही जाणवत नाही. पण दुसऱ्या दिवशी शरीराला ऊर्जेची गरज पडते अशावेळी शरीर आधी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजनचा आणि त्यानंतर चरबीचा वापर करते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तहान लागते. ग्लानी येते. उपोषणकर्त्याला पडून राहावे वाटते. त्याच्यातील त्रास कमी होतो. ऊर्जा कमी होते. डोकेदुखी वा इतर असह्य त्रास सुरू होतो. त्याला उठताना आणि बसताना त्रास होतो. कोणतीही शीघ्रकृती करताना मोठा त्रास होतो.

उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला थकवा येतो. त्याला घेरी येण्याची शक्यता वाढते. घाम येण्याचे प्रमाण कमी होते. त्याच्या लघवीचा रंग गडद होतो. शरीराचे तापमान वाढते. रक्त घट्ट होऊ लागते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ नये यासाठी हृदयावर ताण येतो. बीपी कमी होतो. चक्कर येण्याची शक्यता वाढते.

शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी शरीर पुढे स्वतःच्या स्नायूंचे आणि उतींचे विघटन सुरू करते. यामुळे शरीराचे वजन कमालीचे घटायला लागते. शरीरात ऑक्सिजन ओढला जातो. डिहायड्रेशनचा त्रास होतो. व्यक्ती केवळ पाण्यावर उपोषण करत असेल तर काही दिवसांनी परिस्थिती गंभीर होते. ओआरएस अथवा इतर ज्यूस दिल्यास काही प्रमाणात शरीराला पोषण मिळते. वयोमानाचाही उपोषणकर्त्यावर मोठा परिणाम होतो. तरुणांनी उपोषण केल्यास शरिरारवर परिणाम दिसण्यास कालावधी लागतो. पण 40 नंतर उपोषण केल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो. जर व्यक्ती निरोगी असेल तर तज्ज्ञांच्या दाव्यानुसार केवळ पाण्यावर एक महिनाच नाही तर त्यापेक्षा अधिक काळही व्यक्ती जिवंत राहू शकते. पण शरीरात सोडियमच्या कमतरतेचा मोठा परिणाम शरीरावर होतो. मेंदूला ऊर्जा मिळत नाही. जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Follow Us
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ