हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
लोक हरिद्वारला गंगा आरतीकरिता तेथे जात असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हरिद्वारमध्ये अशी अनेक मंदिरे आहेत जी एकदा तरी भेट दिली पाहिजेत चला तर मग हरिद्वारच्या त्या मंदिरांबद्दल आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

उत्तराखंड मधील धार्मिक शहर असलेले हरिद्वार हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर आत्म्याला शांती देणारे ठिकाण आहे. गंगेच्या काठावर वसलेले हे शहर हिंदू धर्मात मोक्षाचे प्रवेशद्वार मानले जाते, जिथे दरवर्षी लाखो भाविक स्नान करण्यासाठी येत असतात. अशातच हरिद्वारचा उल्लेख होताच, हर की पौडी आणि गंगा आरती प्रथम लक्षात येते. परंतु हे पवित्र शहर केवळ गंगेत स्नान करण्यापुरते मर्यादित नाही.
हरिद्वार आणि त्याच्या आसपास अनेक प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरे आहेत, जिथे दर्शन घेतल्याने जीवनातील समस्या दूर होतात आणि आत्म्याला शांती मिळते. जर तुम्हीही हरिद्वारला जात असाल तर फक्त हर की पौडी येथेच थांबू नका. तर त्याच्या जवळील काही मंदिरांनाही भेट द्या. चला तर आजच्या या लेखात आपण हरिद्वारला गेल्यावर कोणती मंदिरे आहेत आणि ती कुठे आहेत. ते आजच्या लेखात जाणून घेऊयात…
मनसा देवी मंदिराला भेट द्या
मनसा देवी मंदिर खूप लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की येथे तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते. हे मंदिर शिवालिक टेकड्यांवर वसलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी रोपवे ने जावे लागते. तर तेथील दृश्य खूपच अद्भुत आहे, जे तुमचा प्रवास आणखी संस्मरणीय बनवेल.
View this post on Instagram
चंडी देवी मंदिराला द्या भेट
हे मंदिर नीलकंठाच्या दिशेने नील पर्वतावर स्थित देवी चंडीला समर्पित आहे. असे म्हटले जाते की देवी चंडीने येथे शुंभ-निशुंभ या राक्षसांचा वध केला. येथे अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचावर असल्याने येथे पोहोचण्यासाठी रोपवे ने जावे लागते. त्यामुळे येथून तुम्हाला संपूर्ण हरिद्वार पाहता येते.
View this post on Instagram
दक्ष महादेव मंदिर
दक्ष महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर हरिद्वारच्या कंखल परिसरात आहे. असे म्हटले जाते की येथील यज्ञात सतीने स्वतःला अग्नीला समर्पित केले होते. येथे शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा नेहमीच असतात. हे मंदिर भोलेनाथच्या भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे.
View this post on Instagram
भारत माता मंदिर खास आहे
भारत माता मंदिर देखील खूप खास आहे. हे मंदिर 8 मजल्याचे बांधलेले आहे. त्याची खासियत अशी आहे की ही मंदिरे वेगवेगळ्या धर्मांना, महापुरुषांना आणि भारताच्या शूर पुत्रांना समर्पित आहेत, जिथे त्यांचे पुतळे देखील ठेवलेले आहेत. हे मंदिर देशभक्ती आणि धर्माचा एक अनोखा संगम आहे.
View this post on Instagram
माया देवी मंदिर
हरिद्वारचे हे एक प्राचीन शक्तीपीठ आहे, जे सती देवीच्या तीन प्रमुख पीठांपैकी एक मानले जाते. माया देवीला हरिद्वारची अधिष्ठात्री देवता देखील म्हटले जाते. नवरात्र आणि कुंभमेळ्यादरम्यान हे मंदिर विशेषतः भाविकांनी भरलेले असते.
