…तर राजकारणातून संन्यास घेईल, प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा; कारण काय?

Praful Patel : अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यांचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे.

...तर राजकारणातून संन्यास घेईल, प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा; कारण काय?
प्रफुल्ल पटेल राजकारणातून संन्यासाची का घोषणा
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 5:12 PM

आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार, पदाचा आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल, असं गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं. या देशात आरक्षण, हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला. लोकं बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत ते असं होऊ देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आमचं सरकार ठाम…

काँग्रेस, आमची पूर्वीची राष्ट्रवादी आणि सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले. त्यांनी काहीच केलं नाही. निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा विरोधक पुढे करत असल्याची टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. आमची सरकार ठाम आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षण दिला आहे. आता ज्यांना तेही पटत नाही, ते विरोधाभास करतात.

हे सुद्धा वाचा

मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही. आणि आता चुका काढत बसायचं. एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा हा एकच मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर केली.

राज्यात महायुतीचे सरकार

महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहोत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं. अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी अधिक बोलण्याच टाळलं.

त्यांना विधान परिषदेची जागा हवी होती

बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घरवापसी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की बाबाजानी पूर्वीपासून आमचे सहकारी होते. आता विधानसभा निवडणूक आली की, विधानसभाचे निवडणूक वेळी लोकं इकडेतिकडे जात असतात. बाबाजानी जे विधानपरिषदची सीटिंग जागा होती. त्यांना परत पाहिजे होती, आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो. हे वेगळ काही म्हणन्याच कारण नाही. आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहे. आपली आपली प्रगती करण्याच्या अधिकार सर्वांना आहे, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.