Corona Cases And Lockdown News LIVE : नाशिक शहरात संचारबंदी लागू, शहरातल्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases And Lockdown News LIVE : नाशिक शहरात संचारबंदी लागू, शहरातल्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Apr 2021 22:14 PM (IST)

  नाशिक शहरात संचारबंदी लागू, शहरातल्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त

  नाशिक – शहरात संचारबंदी लागू

  शहरातल्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त

  अनेक ठिकाणी पोलिसांकडून रस्त्यांवर बॅरिकेटिंग

  संचारबंदी आणि लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये मात्र संभ्रम

  पोलिसांकडून सध्या नागरिकांना दिली जातोय समज

 • 05 Apr 2021 21:36 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 4077 कोरोना रुग्णांची वाढ

  पुणे कोरोना अपडेट

  – दिवसभरात 4077 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात  3240 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधित 46 रुग्णांचा मृत्यू. 10 रूग्ण पुण्याबाहेरील

  – 919 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या  294121 वर.

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 42741

  – एकूण मृत्यू -5488

  आतापर्यंत एकूण डिस्चार्ज रुग्ण 245892 वर

 • 05 Apr 2021 20:37 PM (IST)

  सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 360 नवे कोरोना रुग्ण

  सांगली कोरोना अपडेट

  जिल्ह्यात आज दिवसभरात 360 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1817 वर

  सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2697 वर

  उपचार घेणारे 229 जण आज कोरोनामुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 48626 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 53140 वर

 • 05 Apr 2021 20:35 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 423 नवे रुग्ण

  उस्मानाबाद कोरोना अपडेट

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 423 नवे रुग्ण

  दिवसभरात दोघांचा मृत्यू तर 197 जणांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुक्यात 262, तुळजापूरमध्ये 32 तर उमरगा तालुक्यात 37 रुग्ण

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 2522 सक्रिय रुग्ण

  उस्मानाबाद – 1 लाख 64 हजार 172 नमुने तपासले त्यापैकी 22 हजार 128 रुग्ण सापडले

  रुग्ण सापडण्याचे प्रमाण 17.15 टक्के

  18 हजार 947 रुग्ण बरे , रुग्ण बरे होण्याचा दर 85.62 टक्के

  604 रुग्णांचा मृत्यू , 2.73 टक्के मृत्यू दर

 • 05 Apr 2021 20:13 PM (IST)

  चंद्रपुरात गेल्या 24 तासात 265 नव्या रुग्णांची नोंद

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात 265 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासांत 5 जणांचा मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 29371

  एकूण कोरोनामुक्त : 26153

  सक्रिय रुग्ण : 2778

  एकूण मृत्यू : 440

  एकूण नमूने तपासणी : 282692

 • 05 Apr 2021 19:45 PM (IST)

  नागपुरातील दहा झोन अंतर्गत 51 नवे लसीकरण केंद्र होणार सुरू होणार

  नागपुरातील दहा झोन अंतर्गत 51 नवे लसीकरण केंद्र होणार सुरू होणार

  शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

  जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकूण 51  नवे लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत.

  यापैकी 10 लसीकरण केंद्र सोमवारपासून सुरू करण्यात आले आहेत.

  26 केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री ऑपरेटर तसेच अन्य सोयीसुविधांची व्यूवस्था पुर्ण झाली आहे.

 • 05 Apr 2021 19:43 PM (IST)

  नांदेडमध्ये 24 तासांत 25 जणांचा मृत्यू

  नांदेड – कोरोना अपडेट

  24 तासात 25 मृत्यू

  आतापर्यंत एकूण 921 मृत्यू

  आज 906 जण कोरोना पॉझिटिव्ह

  एकूण 48575 जण कोरोनाग्रस्त

  सध्या 10756 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार  सुरु

  204 रुग्णांची प्रकृती गंभीर

 • 05 Apr 2021 19:23 PM (IST)

  नाशिकमध्ये 30 एप्रिलपर्यंत वाईन शॉप बंद, शहरातील वाईन शॉप्सवर तुफान गर्दी

  नाशिक – 30 एप्रिलपर्यंत वाईन शॉप बंद

  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आदेश

  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर शहरातील वाइन शॉप्सवर तुफान गर्दी

  अनेक ठिकाणी पोलिसांना केलं पाचारण

 • 05 Apr 2021 19:02 PM (IST)

  वसई विरार महापालिकेत कोरोनाचा उद्रेक, 517 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  वसई विरार महापालिकेत कोरोनाचा उद्रेक सुरू

  दिवसागणिक कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ

  मागच्या 24 तासांत 517 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  आज दिवसभरात 03 जणांचा मृत्यू

  तर 200 जणांनी केली कोरोनावर मात

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35,149 वर

  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 31,019 वर

  आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 921 वर

  सध्या कोरोनावर 3209 बाधितांचा मृत्यू

 • 05 Apr 2021 18:48 PM (IST)

  सोलपुरात 650 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 11 जणांचा मृत्यू

  सोलापुरात -आज 650 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 11 जणांचा मृत्यू

  शहरात आज 202 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 6जणांचा मृत्यू

  ग्रामीण भागात 448 जणांचे अहवाल पॉसिटिव्ह तर 5 जणांचा मृत्यू

 • 05 Apr 2021 18:39 PM (IST)

  नागपुरात आज कोरोनामुळे 57 जणांचा मृत्यू, 3519 नव्या रुग्णांची नोंद

  नागपुरात आज कोरोनामुळे 57 जणांचा मृत्यू

  3519 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  3703 जणांची दिवसभरात कोरोनावर मात

  एकूण रुग्णसंख्या – 245125

  बरे होणाऱ्यांची संख्या – 198611

  एकूण मृत्यूसंख्या – 5384

 • 05 Apr 2021 17:56 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात आढळले 160 कोरोना रुग्ण, एकूण 194 जणांचा मृत्यू

  वाशिम जिल्ह्यात आज कोरोनामूळ दोघांचा मृत्यू

  मागील तीन दिवसांपासून रूग्ण संख्येत होत आहे घट

  वाशिम जिल्ह्यात आज आढळले 160 कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज 377 जण कोरोनामुक्त

  जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 02 रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यात मागील एका महिन्यात 38 जणांचा मृत्यू

  जिल्ह्यात मागील सात दिवसात आढळले 1866 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 17355

  सध्या 2311 सक्रिय रुग्णांवर उपचार

  आतापर्यंत 14849 जणांना डिस्चार्ज

  आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू

 • 05 Apr 2021 14:18 PM (IST)

  कोल्हापुरात सगळी दुकाने सुरु राहणार, कडक निर्बंधाविरोधात व्यापारी आक्रमक

  कोल्हापूर :

  कडक निर्बंधाविरोधात व्यापारी आक्रमक

  सरकारचे कुठलेही नियम लावून घेणार नाही

  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चा इशारा

  उद्यापासून जिल्ह्यातील सगळी दुकाने सुरू राहणार

  प्रशासन येऊन कुलूप घालू देत पण आम्ही दुकान बंद करणार नाही

  करवाई केल्यास केमिस्ट असोसिएशनशी चर्चा करून मेडिकल सेवा ही बंद ठेवू

  कडक निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

 • 05 Apr 2021 12:48 PM (IST)

  राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

  मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (५ एप्रिल) मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. दिनांक 5 मार्च रोजी राज्यपालांनी याचे शासकीय रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता.

  कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.

 • 05 Apr 2021 12:27 PM (IST)

  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हा, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

  कोरोनाची दुसरी लाट दुर्दैवाने वेगाने पसरत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. लोकांना बेड मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाला पुढाकार घ्यावा लागेल. आपण या कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेत पुढे आहोत. येत्या 2 महिन्यात आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. रक्तदान शिबीर आयोजित करावे, देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

 • 05 Apr 2021 12:19 PM (IST)

  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद –

  कोरोनाची दुसरी लाट दुर्दैवाने वेगाने पसरत आहे

  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल

  बेड्स लोकांना मिळत नाहीये

  त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाने सुद्धा पुढाकार घ्यावा लागेल

  पराग शाह यां नि आता दुसरे कोविड सेंटर उभे केले आहे आणि पुढे पण सेंटर उभारणार आहेत

 • 05 Apr 2021 11:54 AM (IST)

  नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून सुरु

  मनमाड :- मार्च अखेरीस आणि विविध सुट्ट्यांमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेल्या मनमाड ,नांदगाव मालेगाव सह

  नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून सुरु

  मनमाड बाजार समिती कांद्याची मोठया प्रमाणात झाली आवक

  आवक जास्त असल्याने कांद्याच्या सरासरी भावात घसरण

  कांद्याला मिळाला सरासरी 7 ते 8 रुपये प्रति किलो भाव

  कांद्याच्या भावत घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत

 • 05 Apr 2021 11:52 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात ॲाक्सीजनचा तुटवडा कमी करण्याचे प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  नागपूर जिल्ह्यात ॲाक्सीजनचा तुटवडा कमी करण्याचे प्रयत्न

  – छत्तीसगड मधील भिलईवरुन नागपुरात आणणार ॲाक्सीजन

  – जिल्हयातील रुग्णालयातील ॲाक्सीजनचं ॲाडीट सुरु

  – नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती

  – वैद्यकिय उपयोगासाठीच ॲाक्सीजनचा पुरवठा करण्याचे निर्देश

  – नागपूरात कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

  – कोरोना रुग्णांच्या कॅान्टॅक्ट ट्रेसिंगवर भर

  – लसीकरण वाढवण्याचे प्रयत्न

 • 05 Apr 2021 11:45 AM (IST)

  पुण्यातील नायडू रुग्णालयातील कोरोना चाचणी बंद

  पुण्यातील नायडू रुग्णालयातील कोरोना चाचणी केली बंद,

  – रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त ताण येत असल्यानं व्यवस्थापन विभागानं घेतला निर्णय,

  – रुग्णांच्या तक्रारींकडे महापालिकेचं दुर्लक्ष,

  – ऑक्सिजनवरील रुग्णांची सेवा सुरू असल्याचं आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण,

  – शहरात आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला,

  – रुग्णांना मिळेना ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर बेड …

  – चाचणी केंद्र वाढवण्याची नागरिकांची मागणी …..

 • 05 Apr 2021 11:02 AM (IST)

  अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील कोरोना पॉझिटिव्ह

  जळगाव –

  अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील कोरोना पॉझिटिव्ह

  काही दिवसांपासून घेत होते तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

  जवळच्या कार्यकर्त्यांनी आणि संपर्कातील लोकांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

 • 05 Apr 2021 10:06 AM (IST)

  सरकारने घातलेल्या निर्बंधांचा पुण्यातील हॉटेल असोसिएशन करणार निषेध

  – सरकारने घातलेल्या निर्बंधांचा पुण्यातील हॉटेल असोसिएशन करणार निषेध,

  – शहरातील हॉटेलबाहेर लावणार निषेधाचे बॅनर,

  – सरकारने हॉटेल व्यवसायिकांवर घातलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी

 • 05 Apr 2021 09:47 AM (IST)

  नागपुरातील काही परप्रांतीय मजूर निघाले गावाला

  – नागपुरातील काही परप्रांतीय मजूर निघाले गावाला

  – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारी निर्बंधामुळे मजुरांचं स्थलांतर सुरु

  – काही भागात काम बंद, मंजुरांवर उपासमारीची वेळ

  – कामं बंद झाल्याने मजुरांचं स्थलांतर सुरु

  – नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजूर

 • 05 Apr 2021 09:45 AM (IST)

  सांगली जिल्ह्यात रक्ताची टंचाई, रक्तदान शिबीर बंदचा परिणाम

  सांगली –

  जिल्ह्यात रक्ताची टंचाई

  रक्तदान शिबीर बंद चा परिणाम

  6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

  जिल्ह्यात 2 शासकीय 16 खाजगी अशा 18 रक्तपेढ्या

  रोज 200 ते 250 पिशव्या ची मागणी

  सर्वांनी च पुढाकार घेणेची गरज

 • 05 Apr 2021 09:31 AM (IST)

  सोलापूर ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण पूर्णपणे बंद

  सोलापूर– ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार

  ग्रामीण भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

  आजपासून ग्रामीण भागात जास्त रुग्ण संख्या असलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा

  प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण पूर्णपणे बंद राहणार

  आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार

  प्रतिबंधित क्षेत्रात कडक पोलिस बंदोबस्त राहणार

 • 05 Apr 2021 09:30 AM (IST)

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारी निर्बंधामुळे मजुरांचं स्थलांतर

  – नागपुरातील काही परप्रांतीय मजूर निघाले गावाला

  – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारी निर्बंधामुळे मजुरांचं स्थलांतर सुरु

  – काही भागात काम बंद, मंजुरांवर उपासमारीची वेळ

  – कामं बंद झाल्याने मजुरांचं स्थलांतर सुरु

  – नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजूर

 • 05 Apr 2021 09:29 AM (IST)

  कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता कर्नाटक सरकार गंभीर, 500 हून अधिक गाड्या परत पाठवल्या

  सोलापूर — कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता कर्नाटक शासन गंभीर

  कर्नाटक शासनाने सीमा हद्दीतील सहा ठिकाणी केले चेक पोस्ट

  महसूल, आरोग्य ,पोलीस यांचे पथक केलेत तैनात

  गेल्या 40 दिवसापासून कर्नाटक सरकार कडून चेक पोस्टवर प्रभावी अंमलबजावणी सुरू

  आतापर्यंत 800 हून अधिक महाराष्ट्र हद्दीतील तर कर्नाटक हद्दीतील पाचशेहुन गाड्या परत पाठवल्या

  उलट महाराष्ट्र सीमा हद्दीतील चेक पोस्टवर कसलीच अंमलबजावणी होत नाही

 • 05 Apr 2021 08:43 AM (IST)

  अक्षय कुमारनंतर 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

  अक्षय कुमार नंतर 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

  राम सेतू या सिनेमाच्या शुटिंग आधी 100 कलाकारांनी केली टेस्ट

  कोरोना टेस्टमध्ये 45 कलाकारांचा रिपोर्ट आला पाँझिटीव्ह

  राम सेतूची मडला 5 एप्रिलपासून सुरू होणार होती शुटिंग

  शुटिंग आधी सर्व कलाकाराच्या करण्यात आल्या होत्या चाचण्य़ा

 • 05 Apr 2021 08:42 AM (IST)

  मुंबईच्या एलटीटी स्टेशनला ऊत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी प्रवाश्यांची गर्दी

  – मुंबईच्या एलटीटी स्टेशनला ऊत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी प्रवाश्यांची गर्दी

  – काही आपल्या खाजगी कामासाठी गावाकडे निघाले तर काही लाॅकडाऊनच्या भितीने…

  – हाताला काम नाही म्हणून गावीच थांबण्याचा या मजूरांचा निर्धार…

  – जाणं आधीच ठरलेलं पण येणं ठरलेलं नाही, परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच मुंबई गाठू अशीही प्रतिक्रिया…

  – सोशल डिस्टेंसिंग सगळ्यात मोठा टास्क

 • 05 Apr 2021 08:20 AM (IST)

  औरंगाबादेत 1,508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

  औरंगाबाद –

  दिवसभरात एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 वर

  कोरोनामुळे दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू

  आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू

  जिल्ह्यात रुग्ण 71340 कोरोनामुक्त

  15361 रुग्णांवर उपचार सुरू

 • 05 Apr 2021 08:19 AM (IST)

  औरंगाबादेत दिवसभरात एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

  औरंगाबाद

  दिवसभरात एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 वर

  कोरोनामुळे दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू

  आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू

  जिल्ह्यात रुग्ण 71340 कोरोनामुक्त

  15361 रुग्णांवर उपचार सुरू

 • 05 Apr 2021 08:00 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर कोरोनाचा कहर शहरात नवीन 3 हजार 382 रुग्णांची भर

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर कोरोनाचा कहर शहरात नवीन 3 हजार 382 रुग्णांची भर,18 जणांचा मृत्यू

  -तर दिवसभरात 1 हजार 791 रुग्ण कोरोना मुक्त

  -कोरोना सुरू झाल्यापासून ही रुग्ण संख्या जास्त

 • 05 Apr 2021 08:00 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मास्क न वापरल्या प्रकरणी 336 जणांवर केली कारवाई

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मास्क न वापरल्या प्रकरणी 336 जणांवर केली कारवाई

  -शहरात करोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत

  -अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे त्यामुळे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम पोलिसांकडून सुरु

 • 05 Apr 2021 08:00 AM (IST)

  पनवेल पालिका हद्दीत आरटीपीसीआर तपासणी करता लॅबची गरज

  पनवेल पालिका हद्दीत आरटीपीसीआर तपासणी करता लॅबची गरज

  कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी तीन ते चार दिवसाचा अवधी

  पनवेल पालिका प्रशासनाकडे स्वतःची आरटीपीसीआर तपासणी करता लॅब नाही

  पनवेल पालिका हद्दीतील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ

  पालिका हद्दीतून दिवसाला टेस्टसाठी 400 ते 450 नमुने सिव्हिल रुग्णालयात

  अहवाल वेळेत न मिळाल्याने आरोग्यावर ताण पडून रुग्ण दगवण्याची शक्यता

 • 05 Apr 2021 07:57 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा, तीनचं दिवस पुरेल एवढा रक्तसाठा

  पुणे जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा

  अवघ्या साडे तीन हजार रक्त पिशव्या शिल्लक ,तीनचं दिवस पुरेल एवढा रक्तसाठा

  रक्तदानाची संख्या घटल्यानं आता पुण्यावर आता कोरोनानंतर रक्तसंकट,

  पुणे जिल्ह्यातील रक्तपेढी चालकांनी आणि सामाजिक संस्थांनी बोलावली बैठक,

  सरसकट व्यक्तींना लस दिली तर मग मात्र रक्ताचा पडणार मोठा तुटवडा !

  दिवसाला 60 पिशव्यांची मागणी, रक्त आणायचं कुठून ?

  रक्त पिशव्या शिल्लक नसल्यानं चार दिवसानंतर मिळणार नाही रक्तपिशवी

  कोरोनानंतर आता रक्ताच्या तुटवड्याचं मोठं संकट

 • 05 Apr 2021 07:50 AM (IST)

  पुणे शहरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन बेडची तथा व्हेंटिलेटर बेडची कमतरता

  पुणे –

  – शहरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन बेडची तथा व्हेंटिलेटर बेडची कमतरता

  – ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग पद्धत सुरू

  – महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये अथवा जम्बो रूग्णालयात संपर्क साधण्याचा खाजगी रुग्णालयांचा सल्ला,

  – शहरातील वाढती रूग्णसंख्या व ४० हजारांपर्यत पोहचलेली रूग्णसंख्या यामुळे दिवसेंदिवस बेड मिळविण्याची समस्या वाढू लागली आहे.

 • 05 Apr 2021 07:49 AM (IST)

  कोरोना लसीकरणामूळे कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

  कोल्हापूर

  कोरोना लसीकरणामूळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

  जिल्ह्यात पुढचे चार दिवस पुरेल इतका रक्तसाठा

  कोरोना लसीकरणात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर मात्र लसीकरणानंतर दोन महीने रक्तदान करता येत नसल्यानं उद्भवतेय समस्या

  दरम्यान आज जिल्हा काँग्रेस कडून रक्तदान शिबिराच आयोजन

  पालकमंत्री सतेज पाटील करणार रक्तदान

 • 05 Apr 2021 07:34 AM (IST)

  कोल्हापुरात पुन्हा सेंट उभारण्याच्या हालचाली सुरू, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी

  कोल्हापूर

  कोल्हापुरात पुन्हा सेंट उभारण्याच्या हालचाली सुरू

  राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी

  शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे वसतिगृहे पुन्हा ताब्यात घेणार

  ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यावर ही प्रशासनाचे लक्ष

  खाजगी हॉस्पिटल आणि पक्ष-संघटना, सेवा संस्थांच्या रुग्णवाहिका सुद्धा लवकरच ताब्यात घेतल्या जाणार

 • 05 Apr 2021 07:12 AM (IST)

  पुण्यात गेल्या 24 तासात 6 हजार 225 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

  पुण्यात गेल्या 24 तासात 6 हजार 225 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

  3 हजार 762 जण पूर्णपणे कोरोनामुक्त

  पुण्यात आज दिवसभरात 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  पुण्यात सध्या 21 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु

  नव्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 90 हजार 44 वर पोहोचलीय

  2 लाख 42 हजार 652 जण पूर्णपणे कोरोनामुक्त

  पुण्यात आतापर्यंत 5 हजार 452 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला

 • 05 Apr 2021 07:09 AM (IST)

  मुंबईत गेल्या 24 तासात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

  मुंबईत गेल्या 24 तासात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

  5 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले

  मुंबईत दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

  मृतांपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार

  मृतांमध्ये 13 पुरुष तर 12 महिलांचा समावेश

  मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे 82 टक्के

  मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचं प्रमाण 42 दिवसांवर येऊन ठेपलंय

 • 05 Apr 2021 07:08 AM (IST)

  राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 जणांचा मृत्यू

  राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 जणांचा मृत्यू

  27 हजार 508 जण पूर्णपणे कोरोनामुक्त

  राज्यात आज तब्बल 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

  राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597

  25 लाख 22 हजार 823 जण पूर्णपणे कोरोनामुक्त

 • 05 Apr 2021 06:57 AM (IST)

  रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या तोंडावर, दिवसभरात आढळले तब्बल 944 रुग्ण

  रायगड –

  रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या तोंडावर, दिवसभरात आढळले तब्बल 944 रुग्ण

  पनवेल महानगरपालीका सर्वाधिक 538 नवीन रुगणांची नोंद.

  रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्णसख्यां वाढत असून कर्जत तालुक्र्यात आढळले 72 रुग्ण

  खालापूर येथे 42, अलिबाग 39, माणगाव 34, उरण 27, महाड 27, पेण 26, रोहा 24 रुग्ण आढळले

  रायगड जिल्ह्यातील एकूण ५ हजार १० ऍक्टिव्ह रुगणांची नोंद.

 • 05 Apr 2021 06:53 AM (IST)

  नागपुरात कोरोनाची भयावह स्थिती, 24 तासांत 4120 नवे रुग्ण

  – नागपुरात कोरोनाची भयावह स्थिती, 24 तासांत 4120 नवे रुग्ण

  – जिल्ह्यात २४ तासांत ६२ कोरोना मृत्यूने हादरलं प्रशासन

  – जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अपुरी, मेडीकलमध्ये एकाच बेडवर दोन रुग्ण

  – मेडीकल मधील बेड फुल्ल, प्रशासनाचे दावे ठरत आहेत फोल

  – कोवीड रुग्णांसाठी मेडीकलमध्ये स्वतंत्र ओपीडी नाही

 • 05 Apr 2021 06:53 AM (IST)

  नागपूर ग्रामीणमघ्ये वाढतोय कोरोनाचा धोका

  – नागपूर ग्रामीणमघ्ये वाढतोय कोरोनाचा धोका

  – ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत तब्बल २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

  – २४ तासांत नागपूरच्या ग्रामीण भागात १२०० नवे कोरोना रुग्ण

  – ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था अपूरी

  – उपचाराची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाढत आहेत मृत्यूची संख्या

 • 05 Apr 2021 06:52 AM (IST)

  नागपूरच्या मनोरुग्णालयात पुन्हा कोरोनाचा स्फोट, मनोरुग्णालयात 15 जणांना कोरोनाची लागण

  नागपूर –

  – नागपूरच्या मनोरुग्णालयात पुन्हा कोरोनाचा स्फोट

  – मनोरुग्णालयात 15 जणांना कोरोनाची लागण

  – महिनाभरात 45 जणांना झाली कोरोनाची लागण

  – प्रशासनाची चिंता वाढली

 • 05 Apr 2021 06:51 AM (IST)

  वैद्यकिय उपयोगासाठीच ॲाक्सीजनचा पुरवठा करा, नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे आदेश

  नागपूर –

  – वैद्यकिय उपयोगासाठीच ॲाक्सीजनचा पुरवठा करा

  – नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे आदेश

  – मागणी वाढल्याने सरकारी रुग्णालयात ॲाक्सीजनचा तुटवडा

  – जिल्ह्यात जास्तीत जास्त ॲाक्सीजन उत्पादनाचेही निर्देश

  – नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती

Published On - 10:14 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI