AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून… देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्येच सुनावलं

PCMC Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या सभेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावला आहे.

जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून... देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्येच सुनावलं
Fadnavis and pawarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 5:58 PM
Share

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज भाजपची प्रचारसभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केले. या महापालिकेत गेल्या काही काळापासून भाजत आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात शा‍ब्दिक युद्ध रंगलेले आहे. या प्रकणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आमदार महेश लांडगे यांचा आरोप

पिंपरी चिंचवडमधील सभेत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘काही लोक एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी नागरिकांना धमकी देतायेत. जणू हे स्वतःच्या जागेवर घरं बांधत आहेत. हे सगळं इथला एक नेता आहे, त्याला वाटतं तो एसआरए चा बाप आहे. तो जे करतोय ते चुकीचं आहे. तो स्वतःला बाप समजतात, त्यांना जागा दाखवायला हवी. जे एसआरए मध्ये जे घुसलेत त्यांना खूप माज आहे. देवा भाऊ त्यांचा बंदोबस्त लावावा लागेल.’

पुढे बोलताना आमदार लांडगे यांनी, ‘ज्यांनी (अजित पवार) आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, त्यांना दोन दिवसांत उत्तर दिलय. भाऊ युतीत फक्त भाजपने इतरांचा सन्मान करायचा का? देवा भाऊ हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहे. माझी त्यांच्या इतकी उंची नाही. माझी तेवढी कुवत नाही. माझ्यावर शिंतोडे उडवत आहे. याद्वारे भाजपला बदनाम करत आहेत. आम्हाला म्हणतात की माझे राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांशी माझे संबंध आहेत, त्यांच्याशी चांगलं जमतं असं सांगतायेत आणि स्वतःचे आरोप लपवून ठेवतायेत. देवा भाऊ आज पिंपरी चिंचवड करांना स्पष्ट कळू द्या.

काय म्हणाले CM फडणवीस ?

आमदार महेश लांडगेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटले की, ‘आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. अनेक जण आरोप करतायेत. मात्र मी सांगू इच्छितो की…. परिंदे में मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुवे पंख बोलते है. ओर वही लोग खामोश रहते है अखसर, जमाने मे जिनके हुनर बोलते है.’

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘आपलं काम बोलतयं, त्यामुळं हा वैताग आहे. हा त्रागा आहे, हा राग राग आहे. जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. त्यामुळं त्यांना आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे. पण आपण विकासाच्या मुद्यावर बोलत रहायला हवं. म्हणजे आरोप-प्रत्यारोप करत बसण्याची वेळ येणार नाही असं अजित दादांना सुनावलं आहे.’

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....