AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचे सरकारला ओपन चॅलेंज, काय दिला इशारा?

CJP Abhijeet Dipke on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज आंतरवाली सराटीत उपोषणस्थळाला भेट दिली. तेव्हा सरकारवर सडकून टीका केली.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांना हात लावाल तर... अभिजीत दिपकेंचे सरकारला ओपन चॅलेंज, काय दिला इशारा?
मनोज जरांगे पाटील, अभिजीत दिपके Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 12:37 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : हा महाराष्ट्र आहे मनोज सरांना हात लावला तर महाराष्ट्र इथं येईल, असा खणखणीत इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज सरकारला दिला. आंतरवाली सराटीत आज त्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली. दिपके यांच्या या वक्तव्याने आता आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा सरकारवर सडकून टीका केली. तुम्ही कितीही दिवस बसून राहा, सरकारला काही फरक पडत नाही, असेही ते जरांगे यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने म्हणाले.

जरांगे यांचं उपोषण कशासाठी?

हे सरकार इतकं निर्दयी आहे की त्यांना काही फरक पडत नाही. एक माणूस इथं उपोषणाला बसला आहे, तो स्वतःसाठी उपोषणाला बसलेला नाही. समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. रोजगार भेटावा, यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं, रोजगार दिला असता तर यांना काय गरज पडली असती उपोषणाला बसायची? असा सवाल सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विचारला.

सरकारवर जोरदार टीका

हे सरकारचं अपयश आहे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून देण्यात आलं होतं. लोकांची जी कामं करून देण्यासाठी निवडून देण्यात आलं होतं. ते तुम्ही केलेलं नाही. लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं आहे. काल प्रथमेश देशमुख यांच्या घरी मी गेलो होतो. 27 वर्षांचा मुलगा अडीच लाखांच्या उधारीसाठी आत्महत्या करतो. या मुलांनी आत्महत्या करू नयेत. त्यांना सवलती मिळाव्यात. त्यांना रोजगार मिळावे यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत ना. ते प्रथमेश सारख्या मुलांनी आत्महत्या करू नये यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. मग ज्यांना आपण निवडून दिले, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत आहेत. तुमचे मुलं शिकून तुम्ही परदेशात पाठवता. इथं या ग्रामीण भागातील मुलांचं काय, त्यांच्यासाठी धड चांगल्या शाळा नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शहरात शिक्षण घेताना अडचण येते. या मुलांनी करायचं काय? असा सवाल दिपेक यांनी केला.

जरांगे यांना 26 दिवस उपाशी ठेवणार का?

सरकारला माझी विनंती आहे की, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. सोनम वांगचूक हे दिल्लीत उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांना 26 दिवस उपाशी ठेवलं होतं. तुम्हाला जरांगे पाटील यांच्यासोबतही तसंच करायचं का? तुम्ही यांनाही 26 दिवस उपाशी ठेवणार आहेत का? का इतका वेळ लागत आहे. इथं येऊन बोलायला सरकारला काय अडचण आहे? जे समाजासाठी झटत आहे त्यांच्या सोबत सरकार बोलायला तयार नाही. कॉमेडियनला बोलावून त्याला बिस्कीट द्यायला तयार आहे, असा टोलाही अभिजीत दिपके यांनी लगावला.

Follow Us
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?