LIVE : सीएसटीहून हैदराबादला जाणारे दोन डब्बे रुळावरुन घसरले

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE : सीएसटीहून हैदराबादला जाणारे दोन डब्बे रुळावरुन घसरले

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Jan 2021 23:35 PM (IST)

  सीएसटीहून हैदराबादला जाणारे दोन डब्बे रुळावरुन घसरले

  सीएसटीहून हैदराबादला जाणाऱ्या सागर एक्सप्रेसचे दोन डब्बे रुळावरुन घसरले, सुदैवाने जिवीतहानी नाही, पूर्ववत होण्यासाठी एक ते दोन तास लागण्याची शक्यता

 • 31 Jan 2021 21:59 PM (IST)

  राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला उद्धव ठाकरेंची हजेरी, फडणवीस-राऊतांची गळाभेट

 • 31 Jan 2021 21:53 PM (IST)

  संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी

  शिवसेना खासदार संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  आदित्य ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली

 • 31 Jan 2021 14:52 PM (IST)

  मुंबई-दिल्ली हायवेचं काम 50 टक्के पूर्ण, 10 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार : गडकरी

  मुंबई ते दिल्ली हायवेचं काम 50 टक्के पूर्ण झालं आहे, अशी माहित केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच या प्रोजेक्टमुळे 10 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल असेही ते म्हणाले. “हा प्रोजेक्ट 200 एकर जमीन आहे. त्यात आणखी जमीन जोडली जाणार आहे. पुढच्या निवडणुकीच्या आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे,” असे गडकरी म्हणाले.

 • 31 Jan 2021 12:48 PM (IST)

  सांगलीत सराफाचे 15 तोळ्यांचे दागिने लंपास, गुन्हा दाखल

  माधवनगर येथे दुकानात झाटलोट करणार्‍या सराफाला पैसे पडल्याचे सांगून चोरट्यांनी त्याची 15 तोळे सोने ठेवलेली बॅग लंपास केली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे सोने पळवल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

 • 31 Jan 2021 11:14 AM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मादी यांची मन की बात LIVE

  पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची माहिती वाचा. त्यांच्याविषयी घरात चर्चा करा

  26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाला. हे पाहून देश दुखील झाला.

  आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचे आहे.

  आल्याला कोरोना विरोधात लढायचं आहे.

  आपण राबवलेल्या लसीकरणाकडे जग आदर्श म्हणून पाहत आहे.

  मेड ईन इंडिया व्हॅक्सीन देशाच्या अत्मसन्मानाचं प्रतिक आहे.

  ब्राझीलला  लस दिल्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतींनी आपले धन्यवाद मानले.

  भारत लसीच्या बाबतीत सक्षम आहे.

  देश जेवढा सक्षम असेल ,तेवढा फायदा समस्त विश्वाला होईल.

  देश स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहे.

  मी देशाच्या स्वतंत्र्य सैनिकांना नमन करतो.

  देशात स्वातंत्र्य लढा मोठ्या हिमतीने लढवला गेला.

  मी युवकांना आवाहन करतो की त्यांनी स्वतंत्र्य सैनिकांविषयी लिहावं . देशातील युवकांनी आपल्या  स्वातंत्र्यसैनिकांविषयी पुस्तकं लिहावित.

  मला मन की बातच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळतं.

 • 31 Jan 2021 10:17 AM (IST)

  निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव रद्द, ठराविक भाविकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा होणार

  नाशिक : त्रंबकेश्वर येथील 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी रोजी होणारा निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या काळात येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठराविक भाविकांच्या उपस्थितीत येथे नित्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

 • 31 Jan 2021 09:18 AM (IST)

  कोल्हापूर विमानतळाचे नामकरण होणार, नवं नाव छत्रपती राजाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

  कोल्हापूर : येथील कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण होणार आहे. त्यासाठी नागरी खात्याकडून नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाला सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब या नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत देशातील 13 तर महाराष्ट्रातील तीन विमानतळांच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूरबरोबरच औरंगाबाद आणि शिर्डी विमानतळाच्या नावांचाही समावेश आहे.

 • 31 Jan 2021 09:00 AM (IST)

  इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द, आर्थिक स्थिती बिघडल्याने कारवाई

  कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आर्थिक स्थिती बिघडल्याने कारवाई रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी 24 कोटी 40 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांतनर आता रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

 • 31 Jan 2021 08:45 AM (IST)

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर बंदुकीचा धाक दाखवनाऱ्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात बंदुकीचा धाक दाखवनाऱ्यांना आज खालापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींना कोल्हापुरातून करण्यात आली अटक होते.

 • 31 Jan 2021 08:03 AM (IST)

  नागपुरात पोलीस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या, 23 वर्षानंतर नागपुरात महिला ठाणेदार

  नागपूर : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील कार्यरत 21 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या बदल्यांतर्गेत 23 वर्षानंतर आता नागपूरला एक महिला ठाणेदार मिळणार आहेत. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये वैजनती मंडवधरे यांच्या रूपाने महिला ठाणेदार मिळणार आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या अंतर्गत बदल्यांमुळे नागपुरात गुन्हेगारांवर वचक बसेल का?, असे विचारले जात आहे.

 • 31 Jan 2021 08:00 AM (IST)

  सीरमने उत्पादित केलेली कोव्होव्हॅक्स लस जून महिन्यात बाजारात, लस 89.3 टक्के प्रभावी

  सीरमने उत्पादित केलेली कोव्होव्हॅक्स ही कोरोनावरील दुसरी लस जून महिन्यात बाजारात येणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेल्या या लशीच्या भारतातील चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिट्यूटने या आधीच परवानगीही मागितलेली आहे.

 • 31 Jan 2021 07:52 AM (IST)

  उसाचा फड पेटवताना शेतकऱ्यांचा होरपळून मृत्यू, माणिक शिंगटे असं शेतकऱ्याचं नाव

  कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील केखले गावात उसाचा फड पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. माणिक शिंगटे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेची कोडोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे

 • 31 Jan 2021 07:47 AM (IST)

  पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, 2 जणांना अटक

  पुणे : तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करीत असलेले पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांच्यावर चाकणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून करवंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. रोहित साळवी आणि हर्षदीप कांबळे असे आरोपीची नावं आहेत. हे दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत.

 • 31 Jan 2021 07:41 AM (IST)

  नाशिक शहरात अनलॉकनंतर गुन्हेगारी फोफावली, 12 खून,78 लुटीचे गुन्हे

  नाशिक : नाशिक शहरात अनलॉकनंतर गुन्हेगारी फोफावली आहे. मागील चार महिन्यात एकूण 12 खून झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात 78 जबरी लुटीचे प्रकार घडले आहेत. या वाढत्या गुन्ह्यामुळे पोलिसांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 • 31 Jan 2021 07:37 AM (IST)

  नाशिकमध्ये 24 तासात 234 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

  नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात नवे 234 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. 24 तासांत 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल एकूण 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जणांचा 2049 मृत्यू झाला आहे.

 • 31 Jan 2021 06:31 AM (IST)

  हिंगोलीत भूगर्भातून गूढ आवाज, रात्री जमीन हादरली

  हिंगोली : येथे भूगर्भातून गूढ आवाज येण्याचं सत्र सुरूच आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह कळमनुरी, औंढानागनाथ या तालुक्यातसुद्धा अनेक गावांत जमिनीतून गूढ आवाज आला. या भागात रात्री जमीन हादरण्याच्याही घटना घडल्या आहेत.

Published On - 11:35 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI