Maharashtra Breaking News in Marathi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा, लोकसभेआधी जोरदार फिल्डिंग

| Updated on: Feb 26, 2024 | 7:10 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 25 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा, लोकसभेआधी जोरदार फिल्डिंग

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. मराठा आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी आज दुपारी बैठक होणार आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम 1963 मध्ये राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील बाजार समित्या उद्या बंद राहणार आहेत. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 25 Feb 2024 05:59 PM (IST)

  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार

  पिंपरी चिंचवड | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा खासदार आहे. शिवसेना फुटीनंतर खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडे गेले होते. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा पुन्हा खेचून आणण्यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कबर कसली आहे.

 • 25 Feb 2024 05:30 PM (IST)

  संत निरंकारी मिशनकडून कुर्ल्यात जलाशयाची स्वच्छता

  मुंबई | संत निरंकारी मिशन आध्यात्मिक क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे. संत निरंकारी मिशनच्या वतीने यंदा ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या सामाजिक उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी जलाशयांची स्वच्छता करण्यात येत आहे. कुर्ला पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी प्रमुख विजय भगत, संचालक उमाशंकर, प्रताप चव्हाण, नारायण हत्ते, संदीप येजरे आणि रियाझ मुल्ला उपस्थित होते.

 • 25 Feb 2024 05:10 PM (IST)

  जरांगे पाटील आक्रमक, सागर बंगल्याच्या दिशेने रवाना, असा आहे मार्ग

  जालना | मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट मुंबईत धडकणार असल्याचं मंचावरुन जाहीर केलं आहे. फडणवीसांकडून मला संपवण्याचा कट करण्यात आला आहे. फडणवीस तु मला गोळ्या घाल, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. जरांगे पाटील हे पैठण बिडकीन गंगापूर वैजापूर येवला नाशिक ठाणे मार्गे मुंबईत येणार आहेत.

 • 25 Feb 2024 04:55 PM (IST)

  मनोज जरांगेचा मुंबईत यायला असा असणार मार्ग

  मनोज जरांगे पाटील यांनी आपण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. जरांहे हे पैठण बिडकीन गंगापूर वैजापूर येवला नाशिक ठाणे मार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती समजत आहे.

 • 25 Feb 2024 04:45 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त यवतमाळ शहरात येणाऱ्या वाहन मार्गामध्ये बदल

  यवतमाळ-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त यवतमाळ शहरात येणाऱ्या वाहन मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. नागपूरमार्गे येणारे सर्व वाहने कळंब या ठिकाणी रोखून बाबुळगाव मार्गे त्यांना शहरात प्रवेश दिला जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने 28 फेब्रुवारीला वाहतूक वळवली आहे.

 • 25 Feb 2024 04:30 PM (IST)

   महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू- गुणरत्न सदावर्ते

  महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असतील तर तसा त्याबाजूने तपास होणं आवश्यक असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

 • 25 Feb 2024 04:15 PM (IST)

  दहा टक्के आरक्षण हा पंतांचा डाव- संभाजी ब्रिगेड

  दहा टक्के आरक्षण ही तात्पुरती तडजोड आहे, पंतांचा हा डाव आहे. आरक्षण मिळू नये हे षडयंत्र आहे हे आज परत स्पष्ट झाले. फडणवीस साहेबांसोबतचे मराठे, भाजप मधील मराठे हे गप्प का आहेत, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केला आहेत.

 • 25 Feb 2024 03:55 PM (IST)

  आरक्षण आंदोलन हाणून पाडण्याचे सरकारचे षडयंत्र... संभाजी ब्रिगेडचा आरोप

  पुणे : आरक्षण द्यायचंच नाही हा बामणी कावा मनोज जरांगे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जाहीर झाला. सरकारकडे मराठा समाज जे ओबीसीतून आरक्षण मागत आहे, सरकारकडे धनगर समाज जे एसटीतून आरक्षण मागत आहे याला बरोबर छेद देण्याचं काम, टोलवाटोलवी करण्याचं काम किंवा बदनाम करण्याचं काम सरकारकडून, शिंदे-फडणवीस-पवार कडून होत आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असेच वाद लावून आरक्षण आंदोलकांना बदनाम करण्याचं काम सरकारकडून होत आहे अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता संतोष शिंदे यांनी केलीय.

 • 25 Feb 2024 03:41 PM (IST)

  शेवटी देवेंद्र यांची जात आठवलीच ना! हिंदू महासंघाचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल

  पुणे : जरांगे विकृत होत चालले आहेत. फसवे का असेना! पण, मराठा समाजाला पहिले आरक्षण त्यांनीच दिले होते. याच ब्राह्मण उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारकडेच तुम्ही मागण्या करत आहात... होतात आणि आज बदललात... मुस्लिम आरक्षणाची मागणी करताना तुम्हाला ब्राह्मण मात्र नकोय... लोकांना फसवण बंद करा. शेवटी देवेंद्र यांची जात आठवलीच ना! अशा शब्दात हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.

 • 25 Feb 2024 03:18 PM (IST)

  मी ऐकलेच नाही आणि मी कशा कशाला उत्तर देऊ, फडणवीस यांचे प्रत्युत्तर

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, त्यांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणे टाळले. ते जे काही बोलले ते मी ऐकलेच नाही आणि मी कशा कशाला उत्तर देऊ असे फडणवीस म्हणाले.

 • 25 Feb 2024 03:01 PM (IST)

  जरांगे पाटील यांनी दुकान बंद करावं, भाजप नेते संतापले

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जहरी टीका केलीय. फडणवीस यांचे मराठा समाजावरती अनेक उपकार आहेत. जरांगे पाटील यांनी आता हे दुकान बंद करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागे शरद पवार आहेत की जालन्यातील भैय्या कुटूंब हे सुद्धा त्यांनी लवकरात लवकर सांगावे असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.

 • 25 Feb 2024 12:55 PM (IST)

  आमदार रोहित पवार यांचे जोरदार स्वागत

  आमदार रोहित पवार यांचे सोलापूर माढा येथे जोरदार स्वागत करण्यात आलंय. रोहित पवार यांच्या समोर तुतारी वाजवत स्वागत करण्यात आले आहे.

 • 25 Feb 2024 12:51 PM (IST)

  छत्रपती संभाजीनगर शहरातील गरुड झेप अकॅडमीत विद्यार्थ्यांचा छळ

  विद्यार्थ्यांना दांड्याने आणि बेल्टने बेदम मारहाण. कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने घातली जात होती अंघोळ. ट्रेनिंगच्या नावाखाली केली जात होती बेदम मारहाण. फिससाठीही विद्यार्थ्यांना केलं जातं होतं टॉर्चर. गरुड झेप अकॅडमीत क्रूर व्हिडीओ आला समोर

 • 25 Feb 2024 12:22 PM (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलमंदिर पॅलेस या ठिकाणी आगमन

  खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

 • 25 Feb 2024 12:08 PM (IST)

  राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान

  हा वरळीकरांसाठी सोन्याचा दिवस आहे. वरळीतील लोकांना जनतेच मंदिर मिळालं. मनात कितीही खदखद असली तरी मी आता आरोप प्रत्यारोप करणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले.

 • 25 Feb 2024 11:54 AM (IST)

  Live Update | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलमंदिर पॅलेस या ठिकाणी आगमन...

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलमंदिर पॅलेस या ठिकाणी आगमन... खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट...काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या भेटीला... काल झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात

 • 25 Feb 2024 11:32 AM (IST)

  Live Update | छत्रपती संभाजीनगर शहरातील गरुड झेप अकॅडमीत विद्यार्थ्यांचे अतोनात छळ

  विद्यार्थ्यांना दांड्याने आणि बेल्टने बेदम मारहाण... कडकाच्या थंडीत थंड पाण्याने घातली जात होती अंघोळ... ट्रेनिंगच्या नावाखाली केली जात होती बेदम मारहाण... फिसाठीही विद्यार्थ्यांना केलं जातं होतं टॉर्चर... गरुड झेप अकॅडमीत क्रूर व्हिडीओ समोर

 • 25 Feb 2024 11:13 AM (IST)

  Live Update | रेती माफियाची तलाठी आणि कोतवाला मारहाण

  हिंगोली | रेती माफियाची तलाठी आणि कोतवाला मारहाण... उचलून ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करतांनाचा व्हिडीओ व्हायरल... पाच जणांन विरोधात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल... कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारातील घटना

 • 25 Feb 2024 11:00 AM (IST)

  पंतप्रधानांचे आश्वासन फोल, गावकऱ्यांनी झळकावले बॅनर

  यवतमाळच्या दाभडी इथे चाय पे चर्चा चे बॅनर झळकले. 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदींनी येथे कार्यक्रम घेतल होता. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन फोल ठरल्याचे सांगत गावकऱ्यांनी पोस्टरबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहे.

 • 25 Feb 2024 10:52 AM (IST)

  पाणी कपातीचे संकट

  औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पावना धरणात केवळ 56 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी मध्ये वाढ झाली आहे.त्यातच पवना धरणांतील साठा घटल्यामुळे एप्रिलमध्ये पाणी कपातीचा संकट येऊ शकते.

 • 25 Feb 2024 10:42 AM (IST)

  मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाने कसली कंबर

  मावळ लोकसभेची जागा पुन्हा खेचून आणण्यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कबर कसली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ताथवडेत आढावा बैठक घेतील. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.

 • 25 Feb 2024 10:32 AM (IST)

  जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 16 वा दिवस

  सग्या सोयऱ्या मागणीवर मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. आज जरांगे पाटील मराठा समाजाची महत्वाची बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

 • 25 Feb 2024 10:22 AM (IST)

  खडकवासला मतदार संघात पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन

  खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन होईल. खडकवासला मतदार संघात असलेल्या पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल.

 • 25 Feb 2024 10:12 AM (IST)

  टस्कर हत्तीचे दर्शन

  कोल्हापूरच्या चंदगड परिसरात पुन्हा एकदा टस्कर हत्तीचे दर्शन झाले. कुदनुर, किटवाड, कालकुंद्री भागात हत्ती कडून ऊस आणि कडधान्य पिकाचं नुकसान झाले.अचानक हत्तीच्या आगमनाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टस्कर हत्तीला अधिवासात पाठवलं.

 • 25 Feb 2024 10:02 AM (IST)

  संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा

  महायुतीकडून कोल्हापुरात पुन्हा एकदा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. काही दिवसापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी अहमदाबाद मध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीकडून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच मंडलिकांनी अमित शहांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 • 25 Feb 2024 09:47 AM (IST)

  उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

  उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची आज बैठक होणार आहे.

 • 25 Feb 2024 09:40 AM (IST)

  संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच

  संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून सावेंच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.

 • 25 Feb 2024 09:36 AM (IST)

  नागपूर मतदार संघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित- सूत्र

  भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदार संघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष नेतृत्त्वाकडून गडकरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 • 25 Feb 2024 09:28 AM (IST)

  जरांगे आणि बारसकर आज महत्त्वाचे खुलासे करणार

  मनोज जरांगे आणि अजय बारसकर आज महत्त्वाचे खुलासे करणार आहेत. मनोज जरांगेंनी दुपारी 12 वाजता मराठा समाजाची एक निर्णायक बैठक बोलावली आहे. तर 11 वाजता अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.

 • 25 Feb 2024 09:20 AM (IST)

  उत्तरेतील बर्फवृष्टीचा राज्यातील तापमाणावर परिणाम

  उत्तरेतील बर्फवृष्टीचा राज्यातील तापमाणावर परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईत पहाटेच्या वेळी कमाल तापमाणात सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 • 25 Feb 2024 09:18 AM (IST)

  महायुतीत काही जागांवर अदलाबदल होऊ शकते- गजानन किर्तीकर

  महायुतीत काही जागांवर अदलाबदल होऊ शकते असे मत गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केले आहे.

 • 25 Feb 2024 08:57 AM (IST)

  मुंबईकरांवर पाणी संकट...

  1 मार्चपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात होण्याची शक्यता आहे. मुंबई ची तहान भागविणाऱ्या 7 ही धरणात केवळ 45.43 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी पाणी साठा असल्यामुळे हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणारा नाही. उधर्व, वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्ये वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो. मात्र या सात धरणात केवळ 6 लाख 57 हजार 536 दशलक्ष लिटर म्हणजेच 45.43 एवढा पाणीसाठा असल्याने पाणी कपातीचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहीती आहे.

  -

 • 25 Feb 2024 08:45 AM (IST)

  इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन योजना

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. पर्यावरणपूरक शहरी वाहतुकीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा अवलंब करण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक तीनचाकी वाहन मालकांना प्रती वाहन 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी रेट्रोफिटींग करणाऱ्या पहिल्या 1000 अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी 750 अर्जदार आणि शहरी मालवाहतूक करणाऱ्या तीन-चाकी वाहनांसाठी 250 अर्जदार निश्चित केले जाणार आहेत.

 • 25 Feb 2024 08:30 AM (IST)

  निफाडमध्ये थंडी वाढली

  निफाडचा पारा घसरला. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा शेकोट्या पेटल्या. थंडीमुळे भगवणीला आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांची चिंतेत वाढ झालीय.

 • 25 Feb 2024 08:15 AM (IST)

  गिरजा मातेच्या यात्रा उत्सव निमित्त शोभा यात्रा

  इगतपुरी शहरातील जागृत देवस्थान असलेल्या गिरजा मातेच्या यात्रा उत्सव निमित्ताने मातेच्या प्रतिमेची, मुखवट्याची रथावरून शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत महिलांनी डोक्यावर मंगल कलश हातात भगवा ध्वज घेत सहभाग नोंदविला. यात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो लोक दर्शनासाठी दाखल होत असून हवन, नामजप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 • 25 Feb 2024 07:55 AM (IST)

  Marathi News | शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जल्लोष

  तुतारी चिन्ह मिळाल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धुळ्यात सायंकाळी एकच जल्लोष करण्यात आला. जुन्या महापालिकेसमोर तुतारी वाजवत - एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक आयोगाने आमचा पक्ष व चिन्ह गद्दार गटाला दिला अशी टीका देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली.

 • 25 Feb 2024 07:44 AM (IST)

  Marathi News | उद्या बाजार समित्या बंद

  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी बंद असणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ एक दिवसाचा संप बाजार समितीकडून पुकारला गेला आहे. सोमवारी बाजार समिती मधील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

 • 25 Feb 2024 07:30 AM (IST)

  Marathi News | दिव्यांगाना सायकल वाटप

  जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाचशे दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलच वाटप करण्यात आलं. इलेक्ट्रिकल सायकल मिळाल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

 • 25 Feb 2024 07:16 AM (IST)

  Marathi News | अधिवेशनात २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.२६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील.

Published On - Feb 25,2024 7:14 AM

Follow us
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.