LIVE | मी स्वत: दिल्लीला जाणार, राज्यातील शेतकऱ्यांनाही माहिती देणार : नाना पटोले

| Updated on: Feb 04, 2021 | 11:53 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | मी स्वत: दिल्लीला जाणार, राज्यातील शेतकऱ्यांनाही माहिती देणार : नाना पटोले

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Feb 2021 06:22 PM (IST)

    साधा बूथ कार्यकर्ता बनवलं तरीही काम करेन : नाना पटोले

    मी त्या खुर्चीवर बसून पक्षाला न्याय देण्याचे काम केलं आहे. साधा बूथ कार्यकर्ता जरी बनवलं तरी त्यालाही चांगलं करेन – नाना पटोले

  • 04 Feb 2021 06:18 PM (IST)

    मी स्वत: दिल्लीला जाणार, राज्यातील शेतकऱ्यांनाही माहिती देणार : नाना पटोले

    मुंबई : महाराष्ट्रातील सरकार तीन पक्षांचे मिळून बनलेले सरकार आहे. या पदाबद्दल जी काही चर्चा असेल, त्याबद्दल वरिष्ठ निर्णय घेतली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या कायद्याची माहिती देणार आहे : नाना पटोले

  • 04 Feb 2021 05:08 PM (IST)

    नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

    नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

  • 04 Feb 2021 04:26 PM (IST)

    औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसे आक्रमक, कार्यकर्त्यांनी चंद्रकांत खैरेंची गाडी अडवून जाब विचारला

    औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून मनसे आक्रमक, क्रांती चौकात मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना नामांतराबाबत जाब विचारला.

  • 04 Feb 2021 04:24 PM (IST)

    औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसे आक्रमक, कार्यकर्ते चंद्रकांत खैरेंची गाडी अडवणार

    औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून मनसे आक्रमक, क्रांती चौकात अडवणार चंद्रकांत खैरे यांची गाडी, गाडी अडवून चंद्रकांत खैरे यांना विचारणार जाब, शिवसेनेच्या निषेधाची पत्रके फेकणार चंद्रकांत खैरेंच्या अंगावर, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मनसेचा औरंगाबादेत राडा, झेंडे घेऊन आणि पत्रके घेऊन कार्यकर्ते चौकात दाखल.

  • 04 Feb 2021 04:11 PM (IST)

    देशातील लोकांच्या मनात लोकशाहीचा विचार रुजलाय; शरद पवार

    जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात समाजवादी विचारांची शक्ती देशामसमोर आली होती. त्यानंतर कित्येक वर्ष त्या विचारांवर चालणारे लाखो लोक तयार झाले. त्यांनी देशाच्या हितासाठी काम केले. समाजवादी विचाराच्या कामगार संघटना देशभरात निर्माण झाल्या. आणीबाणीमध्ये देशात हजारो लोकांना अटक करण्यात आली. देशात विचीत्र परिस्थिती निर्माण झाली. मात्र या देशातील लोकांच्या मनामध्ये लोकशाहीचा विचार रुजलेला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले.

  • 04 Feb 2021 03:30 PM (IST)

    नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

    विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सह्याद्रीला पोहचले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आभार मानणार, आजच राजीनामा देण्याची शक्यता, नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद निश्चित

  • 04 Feb 2021 12:52 PM (IST)

    मुंबईत 24 ठिकाणी मियावाकी वनं बहरली, आदित्य ठाकरेंकडून पाहणी

    मुंबईत 24 ठिकाणी मियावाकी वनं बहरली, आदित्य ठाकरेंकडून चेंबुरच्या मियावाकी वनाची पाहणी, जपानी पद्धतीने मुंबईत उभारलं वन, ६२ हजार ३९८ झाडं मुंबईला प्राणवायू देण्यास सज्ज

  • 04 Feb 2021 12:41 PM (IST)

    निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलेला अर्थसंकल्प - अजित पवार

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीह मिळालं नाही, महाराष्ट्राला मेट्रोसाठी निधी मिळाला, मात्र, जिथे दाट लोकवस्ती आहे तिथल्या मेट्रोसाठीही द्यायला हवं होत, ते मिळालं नाही, उलट, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांना जास्त निधी दिला, कारण तिथे निवडणुका आहेत, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलेला अर्थसंकल्प, जिथे निवडणुका झाल्या तिथे तेवढ्याप्रमामात निधी नाही

  • 04 Feb 2021 12:37 PM (IST)

    बोटचेपी भूमिका सरकार घेणार नाही, एल्गार परिषदेवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    बोटचेपी भूमिका सरकार घेणार नाही, एल्गार परिषदेवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे,

  • 04 Feb 2021 12:34 PM (IST)

    कृषीपंपाचे 30 हजार कोटी रुपये माफ केले - अजित पवार

    वीजबिलाबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, कृषीपंपाचे तब्बल ३० हजार कोटी रुपये माफ केले आहेत, शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे,

  • 04 Feb 2021 12:32 PM (IST)

    पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती - अजित पवार

    पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती, देशातल्या आणि राज्यातल्या लोकांनी जर केंद्र सरकारने उद्या पेट्रोल १०० रुपये लीटर केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नये, स्वत:चं अपयश करण्यासाठी हे वक्तव्य केलं असावं, उपमुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना उत्तर

  • 04 Feb 2021 12:27 PM (IST)

    शरजीलवर सामनात अग्रलेख लिहायला वेळ मिळत नाही का? - देवेंद्र फडणवीस

    आम्ही आंदोलन केले तेव्हा थातुरमातुर कारवाई केली, राम मंदिरासाठी निधी गोळा केला जातोय त्यावर सामना मध्ये लेख लिहायला वेळ आहे, मात्र शेरजीलवर सामनात अग्रलेख लिहायला वेळ मिळत नाही का? - देवेंद्र फडणवीस

  • 04 Feb 2021 12:10 PM (IST)

    पुण्यात ऐल्गारला परमिशन दिली, तेच चुकीचं आहे - देवेंद्र फडणवीस

    शरजीलवर सामनात अग्रलेख लिहायला वेळ मिळत नाही,  पुण्यात ऐल्गारला परमिशन दिली, तेच चुकीचं आहे - देवेंद्र फडणवीस

  • 04 Feb 2021 12:10 PM (IST)

    खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर नेहमीच लागले - देवेंद्र फडणवीस

    मनसेनं काय आरोप केला हे माहित नाही, पण खंडणीखोरीचे आरोप त्यांच्यावर नेहमीच लागल्या - देवेंद्र फडणवीस

  • 04 Feb 2021 12:09 PM (IST)

    हिंदूत्त्व कुणाचीच मक्तेदारी नाही - देवेंद्र फडणवीस

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे होतात, तेव्हा हे बोलावं लागते, हिंदूत्व त्यांनी का सोडले हे त्यांनी सांगावं,  हिंदूत्त्व कुणाचीच मक्तेदारी नाही, हिंदूत्त्व जगावं लागतंय - देवेंद्र फडणवीस

  • 04 Feb 2021 12:08 PM (IST)

    शिवसेनेनं पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्याचे टॅक्स कमी करावे - फडणवीस

    शिवसेनेनं पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्याचे टॅक्स कमी करावे, शिवसेनेने मोर्चा काढण्यापेक्षा टेक्स कमी करावे,आमचे सरकार असताना टेक्स कमी केले होते, दोन रुपयांनी पेट्रोल-डिझेल चे दर कमी झाले होते,त्यामुळं राज्य सरकारने टॅक्स कमी करावे,मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये

  • 04 Feb 2021 12:01 PM (IST)

    द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेले निफाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सक्तीच्या कर्ज वसुली नोटीसीची शेतकऱ्यांनी केली होळी

    द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेले निफाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सक्तीच्या कर्ज वसुली नोटीसीची शेतकऱ्यांनी केली होळी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाठवल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या अंतिम नोटिसा,  नोटीस मागे घेत इतर बँकेप्रमाणे तडजोडीने कर्जाचे हप्ते घेण्याची मागणी, मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येसारखे तीव्र आंदोलनाचा थेट जिल्हा बँक संचालक व प्रशासनास इशारा

  • 04 Feb 2021 11:25 AM (IST)

    शिवसेनेकडून कटाचं राजकारण, तुम्हाला काम करुन घ्यायचं असेल तर आम्हाला कट द्या - संदीप देशपांडे

    चोरी छुपे नाही तर बाळासाहेबांचे फोटो लावून, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्र्यांचे, आमदारांचे फोटो लावून खंडणी उकळल्याचं काम होत आहे, फेरिवाल्यांना सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला पैशे द्या, महापालिका तुमच्या गाडीला हात लावणार नाही, पोलिसांना आम्ही मॅनेज करु, यातील काही कट उद्धव ठाकरेंना जातो का? असा प्रश्न पडतोय शिवसेनेकडून कटाचं राजकारण, तुम्हाला काम करुन घ्यायचं असेल तर आम्हाला कट द्या - संदीप देशपांडे

  • 04 Feb 2021 11:22 AM (IST)

    खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे - संदीप देशपांडे 

    आमची मागणी आहे की खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे, खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे, महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का, याची उच्चपदस्थ झाली पाहिजे - संदीप देशपांडे

  • 04 Feb 2021 11:17 AM (IST)

    ...तर शिवसेनेला बाळासाहेबांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, संदीप देशपांडेंचे डोळे पाणावले

    सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या होणारा उपद्रव कमी करणयासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा कर, असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे, सगळ्यात जास्त दुख याचं वाटतंय की या पावतीवर बाळआसाहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांच्या नावावनर खंडणी उकळणार असाल तर तुम्हाला त्यांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही  ,असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांच्याा डोळ्यात पाणी

  • 04 Feb 2021 11:11 AM (IST)

    फेरीवाल्यांकडून खंडणी उकळण्याचं काम शिवसेना करत आहे - संदीप देशपांडे

    मी विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार असे ट्वीट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते, आज मी आपल्यासमोर पुरावे घेऊन आलो आहे, महापालिकेने काही वर्षांपूर्वी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी सर्व्हे केला होता, मात्र अजूनही ते झालेले नाहीत, या फेरीवाल्यांकडून खंडणी उकळण्याचं काम शिवसेना करत आहे - संदीप देशपांडे

  • 04 Feb 2021 11:06 AM (IST)

    मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे लपवाछपवी ते बनवाबनवी, शेलारांचा हल्लाबोल

    मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे लपवाछपवी ते बनवाबनवी, असं म्हणत आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरुन सरकारवर हल्लाबोल केला

  • 04 Feb 2021 11:04 AM (IST)

    ...मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा, शेलारांची सुप्रिया सुळेंवर सडकून टीका

    सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, आपल्या बारामतीमध्ये, बारामती अॅग्रोच्या माध्यमातूुन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत आपण का अवलंबताय?, या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा

  • 04 Feb 2021 11:03 AM (IST)

    लाल किल्ल्यावरील तिरंगा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचं समर्थन आहे का?, संजय राऊतांना शेलारांचा सवाल

    लाल किल्ल्ल्यावरचा तिरंगा उतरवून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचं समर्थन आहे का?, संजय राऊतांना शेलारांचा सवाल

  • 04 Feb 2021 11:02 AM (IST)

    एल्गार परिषदेला परवानगीच का दिली? - आशिष शेलार

    एल्गार परिषदेला परवानगीच का दिली?, हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शरजीलला आधी पळून का जाऊ दिलं खाली डोकं वर पाय अश्या प्रकारची अवस्था शिवसेनेची, भाजपने आंदोलन केल्यानेच सरकारने कारवाईचं आश्वासन दिलं - आशिष शेलार

  • 04 Feb 2021 11:02 AM (IST)

    अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन : आशिष शेलार

    आशिष शेलार यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

    एल्गार परिषदेला परवानगीच का दिली? हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शरजीलला आधी पळून का जाऊ दिलं खाली डोकं वर पाय अश्या प्रकारची अवस्था शिवसेनेची

    भाजपने आंदोलन केल्यानेच सरकारने कारवाईचं आश्वासन दिलं

    लाल किल्ल्ल्यावरचा तिरंगा उतरवून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचं समर्थन आहे का?, संजय राऊतांना शएलारांचा सवाल सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की आपल्या बारामतीमध्ये, बारामती अॅग्रोच्या माध्यमातूुन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत आपण का अवलंबताय? या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा

    देशावर टीका झाली की संजय राऊतांना आनंद होतो,

    मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे लपवाछपवी ते बनवाबनवी, शेलारांचा हल्लाबोल

  • 04 Feb 2021 10:10 AM (IST)

    एचआयव्ही ग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडच्या पाली गावातील संतापजनक प्रकार

    बीड : एचआयव्ही ग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडच्या पाली गावातील संतापजनक प्रकार, मुलांकडून संसर्ग होईल म्हणून पीडित मुलांना शाळेबाहेर काढले, पाली येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार, इनफंट इंडिया या संस्थेत होतेय एचआयव्ही ग्रस्त अनाथ मुलांचे संगोपन, संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारागजे यांची जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी

  • 04 Feb 2021 09:28 AM (IST)

    प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, उत्तर प्रदेश दौऱ्यात हापूर रोडवरील घटना

    प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, उत्तर प्रदेश दौऱ्यात हापूर रोडवरील घटना

  • 04 Feb 2021 08:57 AM (IST)

    सोलापुरात कोरोनामुळे महापालिका आणि नगरपालिका हद्दीत मालमत्ता कराची वसुली मंदावली

    सोलापुर - कोरोनामुळे महापालिका आणि नगरपालिका हद्दीत मालमत्ता कराची वसुली मंदावली, तर निवडणुकांमुळे ग्रामपंचायतीतील कर वसुली वाढली, जिल्ह्यातील नगरपंचायतकडे 43. 40 कोटी मालमत्ता कर तर 29 कोटीची पाणीपट्टी थकीत, पैकी नगरपंचायतीने 11 कोटी मालमत्ता कर , सहा कोटींची केली पाणीपट्टी वसुली, दोन्ही करांची वसुली 30 टक्क्यांच्या आत, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कर वसुलीची आकडेवारी वाढली

  • 04 Feb 2021 08:57 AM (IST)

    देवीच्या जागराच्या बहाण्याने लातूरमधील नऊ जणांना कोल्हापूर मध्ये बोलावून लुटले, कोल्हापुरातील प्रकार

    कोल्हापूर : देवीच्या जागराच्या बहाण्याने लातूरमधील नऊ जणांना कोल्हापूर मध्ये बोलावून लुटले, जेवणातून गुंगीचे औषध देत अज्ञाताचे कृत्य, बिंदू चौक परिसरातील एका लॉज मध्ये घडली घटना, नऊ जणांचे दागिने आणि पैसे घेऊन संशयित पसार, घटनेतील पीडितांना बेशुद्ध आणि अत्यवस्थ अवस्थेत सिपीआर रुग्णलयात केले दाखल, लुटीच्या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ, पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू

  • 04 Feb 2021 08:56 AM (IST)

    बीडमध्ये पहिल्यांदाच धनंजय मुंडेंचा जनता दरबार

    बीड : धनंजय मुंडे उद्या घेणार जनता दरबार, बीडमध्ये पहिल्यांदाच घेणार जनता दरबार, बीडच्या राष्ट्रवादी भवनात जनता दरबाराचे आयोजन, दुपारी अडीच वाजता दरबाराला सुरुवात, दर महिन्याला बीडच्या जनतेसाठी भरणार दरबार

  • 04 Feb 2021 08:55 AM (IST)

    नाशकात 10 महिन्यांच्या कालावधी नंतर बोटॅनिकल गार्डन मधील लेझर शो सुरु

    नाशिक - तब्बल 10 महिन्यांच्या कालावधी नंतर बोटॅनिकल गार्डन मधील लेझर शो सुरु, आधी तांत्रिक अडचणी आणि नंतर लॉक डाऊन मूळे बंद होतं बोटॅनिकल गार्डन, नाशिकमधल्या राज ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक, बंद असलेला लेझर शो मनसे च्या दणक्यांनंतर सुरू

  • 04 Feb 2021 08:54 AM (IST)

    पेट्रोल दरवाढीवरुन नाशकात शिवसेना आक्रमक, शहरातील महत्वाच्या ठिकाणी सेनेने लावले होर्डिंग

    नाशिक - पेट्रोल दरवाढीवरुन सेना शहरात आक्रमक, शहरातील महत्वाच्या ठिकाणी सेनेने लावले होर्डिंग, पेट्रोलच्या दर वाढीवरून भाजपावर टीका करणारे होर्डिंग, सेना भाजपाचा वाद सभागृहातून आता रस्त्यावर, सेना नेते बाळासाहेब कोकणे यांनी लावले फलक

  • 04 Feb 2021 08:53 AM (IST)

    नाशकात शहरातील बेकायदेशीर टॉवर महापालिकेच्या रडारवर

    नाशिक - शहरातील बेकायदेशीर टॉवर महापालिकेच्या रडारवर, खाजगी संस्थेच्या मदतीने महापालिका सुरू करणार मोहीम, मोठ्या इमारतींवरील अनधिकृत मोबाईल टॉवर ला आकरणार दंड, 12 ते 13 कोटी दंड वसूल होण्याची शक्यता

  • 04 Feb 2021 07:43 AM (IST)

    नागपुरातील अंबाझरी उद्यानाला लागलेल्या आगीत 100 हेक्टर जंगल जळून खाक

    नागपुरातील अंबाझरी उद्यानाला लागलेल्या आगीत 100 हेक्टर जंगल जळून खाक, जंगलाला लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचंही मोठं नुकसान, आगीवर नियंत्रणासाठी लागले तब्बल सात तास, विद्यापीठ परिसरातून आग लागल्याचा अंदाज

  • 04 Feb 2021 07:41 AM (IST)

    रत्नागिरीत निष्काळजीपणाने वणवा लावल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल

    रत्नागिरी - निष्काळजीपणाने वणवा लावल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल, शेतात भाजावळ करताना घडली घटना,  रत्नागिरी ग्रामिण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल, रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावातील घटना, या वणव्यात काजुची 650 झालं, आंब्याची 35 कलमे जळून झाली होती खाक

  • 04 Feb 2021 07:36 AM (IST)

    चिपळूण तालुक्यातील कोसंबी पाणी योजना कागदावर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तीन अभियंत्यांना नोटीस

    रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील कोसंबी पाणी योजना कागदावर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तीन अभियंत्यांना नोटीस, पाणी पुरवठ्या तत्कालीन उपअभियंता, शाखा अभियंता आणि रत्नागिरीतील कार्यकारी अभियंत्यांना नोटीस, कोसंबी येथील 8 वाड्यांसाठी 40 लाखाहून अधिकची पाणी योजना 12 वर्षापुर्वी झाली होती मंजूर, गेल्या आठवड्यात ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावाचा केला होता दौरा

  • 04 Feb 2021 07:26 AM (IST)

    नागपूर विद्यापीठात ॲानलाईन आणि ॲाफलाईन अशा मिक्स मोडमध्ये होणार परिक्षा

    नागपूर : विद्यापीठात मिक्स मोडमध्ये होणार हिवाळी परिक्षा, ॲानलाईन आणि ॲाफलाईन अशा मिक्स मोडमध्ये होणार परिक्षा, कोरोनामुळे उन्हाळी परिक्षा लांबल्या, आता हिवाळी परिक्षेची तयारी, हिवाळी परिक्षेचे पेपर्स शनिवार आणि रविवारीही होणार

  • 04 Feb 2021 06:45 AM (IST)

    शर्जीलला बेड्या पडतील निश्चिन्त रहा - सामना

    शर्जीलसारखे कित्येक किडे-मकोडे आले गेले महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही, समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे, शर्जीलसारखे साप अलिगडच्या बिळातच काय ,तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणन्याची हिम्मत महाराष्ट्र पोलिसात आहे हे काय श्री फडणवीस यांना माहित नाही ? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिन्त रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदु शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले !

  • 04 Feb 2021 06:34 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय धावपटूला राज्य सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर काहीतरी गडबड आहे, राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका

    आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली, विशेष म्हणजे आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतय? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Published On - Feb 04,2021 6:22 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.