Maharashtra News LIVE Update | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या शहरातील उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

| Updated on: Sep 21, 2021 | 12:21 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या शहरातील उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Sep 2021 07:50 PM (IST)

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या शहरातील उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

    पुणे :

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी शहरातील उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

    लोहगाव, विमाननगर,वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्नांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी तसेच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार

    भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असणार

    बुधवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार

  • 20 Sep 2021 07:07 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    वाशिम :

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सायंकाळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा काढणीस आलेल्या उडीद पिकाला फटका बसणार असून ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबिनचंही या मुसळधार पावसामुळं नुकसान होण्याची शक्यता आहे.असाच सलग जर पाऊस पडत राहला तर खरिपाच्या पिकांचं अतोनात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

  • 20 Sep 2021 07:04 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 86 नवे कोरोनाबाधित, 3 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात ८६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २३७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०० - १७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९४५९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५७१. - एकूण मृत्यू -९००४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८८८४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०११.

  • 20 Sep 2021 06:24 PM (IST)

    माझ्यासाठी काम महत्त्वाचं, इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

    इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया :

    माझ्यासाठी काम महत्त्वाचं मी माझं काम करत राहणार रुग्णालय उघडण्याची माझी इच्छा आहे मला कोणतंही सरकार बोलवत असेल तर मी काम करण्यासाठी जाईन

  • 20 Sep 2021 05:28 PM (IST)

    पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामीन मंजूर

    मुंबई :

    पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामीन मंजूर

    महानगर दंडाधिकारी कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आला आहै

  • 20 Sep 2021 05:21 PM (IST)

    किरीट सोमय्या यांचं मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    किरीट सोमय्या यांचं मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    ही लढाई क्रांतीची लढाई, ती सुरुच ठेवू, राज्याला घोटाळामुक्त करु, सोमय्यांचे बोल

    सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका, तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही घणाघात

    भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू, सोमय्या यांचा दावा

    सोमय्या काय-काय म्हणाले?

    ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र बनविला कोरोनाकाळात सरकारकडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार रेमडेसिव्हीर, औषधांमध्ये घोटाळे केले सरकारने मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं कोरोना काळात ठाकरे सरकारने स्वतचे खिसे भरले मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे पण आम्ही महाराष्ट्र घोटाळेमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करुन दाखवू

  • 20 Sep 2021 04:27 PM (IST)

    अहमदनगरमध्ये तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

    अहमदनगर :

    तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

    दोन सख्ख्या भावांसह एकाचा मृत्यू

    अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील घटना

    शेततळ्याजवळ खेळत असताना पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह एकाचा शेतळ्यात बुडून मृत्यू

    चैतन्य अनिल माळी ( वय 10 वर्ष ), दत्ता अनिल माळी ( वय 7 वर्ष ), चैतन्य शाम बर्डे ( वय 8 वर्षे ) असे मृत झालेल्या मुलांचे नाव

  • 20 Sep 2021 04:26 PM (IST)

    महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललंय : आशिष शेलार

    भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    सरकारी पक्षाकडून काही घटना घडतायत, महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललंय

    समाज माध्यमांवर कोणी व्यक्त झालं आणि ते सरकार विरोधात असेल, तर एखाद्याचं मुंडन केलं जातं, अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो, पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो, अधिकाऱ्याला अटक होते.

    केंद्रीय मंत्र्यांना अटक होते, राज्यात दहशतवादी कारवाया होत असताना एटीएस, पोलीस थंड असतात. गृहमंत्री पदावर बसले होते ते वॉन्टेड आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ते सापडत नाहीत.

    समोर बसलेल्या पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा नाही हे कळल्यावर लुकआउट नोटीस दिली जाते. याचं चित्र अराजकतेकडे चालललंय असं दिसतंय.

    करुणा शर्मा नावाची महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जातेय, म्हणून तिला अटकाव करायला तिच्यावर आरोप करून रोखलं जातंय. खोटा गुन्हा दाखल केला जातो.

    लखोबा लोखंडे नावाच्या व्यक्तीला पुण्यात शिवसैनिकांकडून न्यायालयाच्या दरवाजावर मारलं जातं. आमचे नेते कोल्हापुरात तक्रार दाखल करायला जातायत तर त्यांना स्थानबद्ध केलं जातं

    तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गावगुंडांना मुक्तता, किरीट सौमय्या कायदा हातात घेणार होते, की तिथे असणारे गावगुंड घेणार होते?

    मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मी मागणी करतो

  • 20 Sep 2021 03:50 PM (IST)

    करुणा शर्मा यांचा निकाल कोर्टाने राखून ठेवला

    करुणा शर्मा वकील जयंत भारजकर यांची प्रतिक्रिया :

    - करुणा शर्मा यांचा निकाल कोर्टाने आज ठेवला राखून - दोन्ही पक्षांचा युक्तिवाद कोर्टाने घेतला ऐकून - करुणा शर्मा यांच्या वकिलांनी बेल मिळण्याची केलीये मागणी - या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसल्याची दिली माहिती

  • 20 Sep 2021 03:48 PM (IST)

    पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा तर्फे मेट्रोपोलिटन कोर्टात जामिनसाठी अर्ज

    पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा तर्फे मेट्रोपोलिटन कोर्टात जामिनसाठी अर्ज

    या प्रकरणात चार्जशीट दाखल झाली असून चार्जशीटमधील आरोपांवरुन जामिनासाठी युक्तिवाद केला जाणार

    राज कुंद्रा सध्या न्यायलयीन कोठडीमध्ये आहेत

    मॅजिस्ट्रेट कोर्टात ( किल्ला कोर्ट ) काही वेळात राज कुंद्राच्या जामीन अर्जवर होणार सुनावणी

  • 20 Sep 2021 03:46 PM (IST)

    मनोहर मामा उर्फ मनोहर भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी

    सोलापूर : मनोहर मामा उर्फ मनोहर भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी

    करमाळा न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

    येत्या 27 तारखेपर्यंत मनोहर भोसले राहणार पोलिसांच्या पोलीस कोठडीत

    बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणी मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांनी केली अटक

  • 20 Sep 2021 07:28 AM (IST)

    कोरोना निर्बंधांचे पालन करत पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याची सात तासात सांगता

    पुणे -

    - कोरोना निर्बंधांचे पालन करत पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याची सात तासात सांगता,

    - सकाळी साडे अकरा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन सुरू झाले,

    - सायंकाळी साडे सहा वाजे पर्यंत शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशास निरोप,

    - सर्व गणेश मंडळांचे पुणे पोलिसांकडून आभार.

  • 20 Sep 2021 07:27 AM (IST)

    नागपुरातील दोन लाख घरं आणि भूखंड होणार वैध

    - नागपुरातील दोन लाख घरं आणि भूखंड होणार वैध

    - गुंठेवारी कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित करण्याला परवानगी

    - नागपूरातील चार ते पाच लाख भुखंडधारक आणि घरमालकांना होणार फायदा

    - ऑनलाइन पद्धतीने पार पाडणार प्रक्रिया

    - ऑक्टोबरमध्ये NIT स्वीकारणार ॲानलाईन अर्ज

    - नागपूर सुधार प्रण्यासने सुरु केली भुखंड आणि घरं वैध करण्याची प्रक्रिया

  • 20 Sep 2021 07:02 AM (IST)

    नागपुरात गेल्या 24 तासांत चार नव्या कोरोना रुग्णांची भर

    - नागपुरात गेल्या 24 तासांत चार नव्या कोरोना रुग्णांची भर

    - ५३८५ जणांच्या तपासणीनंतर ४ जण कोरोना पॅाझीटीव्ह

    - नागपूर ग्रामीणमघ्ये गेल्या २४ तासांत शुण्य कोरोना रुग्णांची नोंद

    - गेल्या २४ तासांत जिल्हयात शुण्य कोरोना मृत्यूची नोंद

    - जिल्ह्यात शनिवारच्या रुग्णवाढीनंतर रविवारी मोठा दिलासा

  • 20 Sep 2021 06:34 AM (IST)

    तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणारा तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अखेर अटकेत

    उस्मानाबाद

    तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणारा तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अखेर अटकेत

    तब्बल 1 वर्षांनंतर नाईकवाडी तुळजापूर पोलिसांच्या जाळ्यात

    सोने चांदीसह 71 पुरातन नाणी गायब केल्याचे प्रकरण

    तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग केला

    भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने ( 35 तोळे सोने ) व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या ( 71 किलो चांदी) वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांची चोरी

    नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला होता

    तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती या नाण्याची नोद १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये गायब

    नाईकवाडी याला अटक केल्यानंतर खरा सूत्रधार समोर येण्याची शक्यता

Published On - Sep 20,2021 6:23 AM

Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.