Maharashtra Breaking News LIVE : सुनेत्रा पवार खासदार म्हणून नक्कीच चांगली भूमिका बजावतील, रुपाली चाकणकर यांना विश्वास

| Updated on: Jun 14, 2024 | 6:53 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : सुनेत्रा पवार खासदार म्हणून नक्कीच चांगली भूमिका बजावतील, रुपाली चाकणकर यांना विश्वास

राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भात चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये एकत्र तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाचे नाव निश्चित होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना रात्री 1 वाजता बार्शी पोलिसांनी नोटीस देऊन सोडले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर उत्तरेकडे सरकण्याची गती मंदावली आहे. त्यामुळे उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुणे शहरात पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीची अडीच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 13 Jun 2024 06:50 PM (IST)

  भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला ‘जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्ण पदक

  नागपूर : भारताची बुद्धिबळपटू आणि आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने ‘जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’ मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित केलेल्या चॅम्पियनशीपमध्ये दिव्या देशमुखने आज टायटल जिंकले. 18 वर्षीय दिव्या देशमुखने ग्रँड मास्टर बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्तेवाचा पराभव केला. दिव्या देशमुख ही नागपूरची असून तिने 2023 मध्ये ‘इंटरनॅशनल मास्टर’ आणि 2021 मध्ये ‘महिला ग्रँड मास्टर’ टायटल जिंकले आहे

 • 13 Jun 2024 05:52 PM (IST)

  आतिशी आणि राघव चढ्ढा यांनी तिहार तुरुंगात केजरीवाल यांची भेट घेतली

  दिल्लीत सुरू असलेल्या पाणी आणि विजेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आतिशी आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, केजरीवाल यांनी त्यांना या समस्येवर लवकरात लवकर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

 • 13 Jun 2024 05:37 PM (IST)

  ‘हमारे बाराह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी

  चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा टीझर अतिशय आक्षेपार्ह असल्याचे त्याने म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती राहील. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.

 • 13 Jun 2024 05:25 PM (IST)

  22 जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटची काउन्सिलची बैठक

  22 जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक होणार आहे. “जीएसटी कॉन्सिलची 53 वी बैठक 22 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे,” असे जीएसटी कॉन्सिलची सचिवालयाने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. परिषदेच्या सदस्यांमध्ये अद्याप बैठकीचा अजेंडा प्रसारित झालेला नाही.

 • 13 Jun 2024 05:07 PM (IST)

  जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर पंतप्रधानांची बैठक, सुरक्षा दलांच्या तैनातीवर चर्चा

  पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी एनएसए आणि इतर अधिकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात आली. बैठकीत पंतप्रधानांनी दहशतवादविरोधी क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 • 13 Jun 2024 04:40 PM (IST)

  “त्या मुरब्बी राजकारणी जरी नसल्या तरी मुरब्बी राजकीय घराण्यातून आहेत”

  सुनित्रा पवार यांनी राज्येसभेसाठी आज अर्ज भरला. त्या खासदार म्हणून नक्कीच चांगली भूमिका बजावतील. त्या मुरब्बी राजकारणी जरी नसल्या तरी मुरब्बी राजकीय घराण्यातून आहेत. त्यामुळे त्या चांगलं काम करतील यात शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

 • 13 Jun 2024 04:14 PM (IST)

  मुख्यमंत्री शिंदे सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला

  सुपरमॅक्स कंपनी गेल्या 2 वर्षांपासून बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे हाल झाले आहेत.त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मासिक वेतनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

 • 13 Jun 2024 02:59 PM (IST)

  सांगलीत जत तालुक्यातील अंकले येथे एकाच कुटुंबातील 15 जणांना विषबाधा

  सांगलीत जत तालुक्यातील अंकले येथे एकाच कुटुंबातील 15 जणांना विषबाधा झालीये. गावातील एका कुटुंबात आयोजित कार्यक्रमादरम्यान आमरस खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार. सुवासिनीच्या कार्यक्रमा निमित्ताने आयोजित जेवणाचा कार्यक्रम दरम्यान विषबाधा झाल्याचा प्रकार. विषबाधा झालेले सर्व एकच कुटुंबातील. कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 • 13 Jun 2024 02:58 PM (IST)

  22 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत येण्याची शक्यता

  22 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत येण्याची शक्यता आहे. GST परिषदेच्या 53 वी बैठकीचं आयोजन 22 जून रोजी करण्यात आलंय. त्यासाठी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आगे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर होणारी ही पहिलीच बैठक आहे.

 • 13 Jun 2024 02:57 PM (IST)

  मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाच्या श्रेय घेण्यावरून भाजपात कुरघोडी

  मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाच्या श्रेय घेण्यावरून भाजपात कुरघोडी सुरु आहे. मुरलीधर मोहोळ यांना माझ्यामुळे मताधिक्य मिळाले याची पुणे भाजपात स्पर्धा सुरु आहे. पुणे भाजपच्या होणाऱ्या बॅनर्सबाजी आणि जाहिरात बाजीवर गौरव बापटांची टीका. स्वतःची टिमकी वाजवून घेणे म्हणजे कार्यकर्त्यांना अपमानित करणे आहे.  फेसबुक पोस्ट करत गौरव बापटांनी पक्षातील नेत्यांना सुनावलेत खडेबोल.

 • 13 Jun 2024 02:56 PM (IST)

  प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे स्वताची भूमिका बदलतात – संजय निरुपम

  प्रत्येक निवडणुकीत ते स्वताची भूमिका बदलतात. यापुढे पण बदलू शकतात त्यांचा पक्ष आहे. ते नेते आहेत ते निर्णय घेऊ शकतात. – संजय निरुपम

 • 13 Jun 2024 02:41 PM (IST)

  येत्या 22 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची शक्यता

  GST परिषदेची 53 वी बैठक येत्या 22 जून रोजी दिल्लीत आहे. त्यासाठी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 • 13 Jun 2024 02:32 PM (IST)

  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग खचला

  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ठाकूर बुवा येथे रिंगण सोहळ्याच्या मैदानापासून फक्त 500 फुट अंतरावर रस्ता खचल्याची घटना घडली आहे. आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्ता खचल्याने लवकरात लवकर वारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली आहे.

 • 13 Jun 2024 02:23 PM (IST)

  शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

  नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन झाले आहे. शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेची होळी केली आहे.

 • 13 Jun 2024 02:09 PM (IST)

  सांगलीत आमरसातून 15 जणांना विषबाधा

  सांगलीतील जत तालुक्यातील अंकले येथे एकाच कुटुंबातील 15 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमरस खाल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 • 13 Jun 2024 01:57 PM (IST)

  प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन  

  खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. शेतकऱ्यांच्या आयुष्यातली संकट दूर कर आणि लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे त्यासाठी मला बळ दे असे श्री विठ्ठलाला घातले साकडे.

 • 13 Jun 2024 01:28 PM (IST)

  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अंतरवाली सराटीमध्ये दाखल

  अंबादास दानवे यांच्याकडून जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस

 • 13 Jun 2024 01:18 PM (IST)

  आरक्षणाच्या मुद्यावरून सोलापुरात सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक

  सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हाबंदी करून नेत्यांचे सार्वजनिक कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सोलापुरात सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

 • 13 Jun 2024 12:43 PM (IST)

  ‘हमारे 12’ या चित्रपटावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली

  ‘हमारे 12’ या चित्रपटावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने बदलला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आपत्तीजनक असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. मुंबई हायकोर्ट निर्णय घेईपर्यंत चित्रपटावर बंदी असेल. जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस संदीप मेहता यांच्या वेकेशन बेंचने मुंबई हायकोर्टाने चित्रपट रिलीज करण्याच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिला. 14 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

 • 13 Jun 2024 12:34 PM (IST)

  मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत काय म्हणाले अंबादास दानवे?

  “मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. याचा आदर करायलाच पाहिजे. वाशी येथे आंदोलनादरम्यान मोठा गुलाल उधळून जो आदेश दिला होता, त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगे पाटील यांचा आहे. म्हणजे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे धुळफेक केली का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मनोज जरांगे पाटील हे एक लढाऊ नेतृत्व असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी चाललो आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

 • 13 Jun 2024 12:16 PM (IST)

  पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

  पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारो समर्थक सहभागी झाले आहेत. संतप्त समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला. समर्थकांनी रस्ता जाम करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपमानजनक विधान करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.

 • 13 Jun 2024 11:50 AM (IST)

  ‘ऑर्गनाइजर’मध्ये भाजपला खडेबोल सुनावण्याबद्दल सदस्य रतन शारदा यांची प्रतिक्रिया

  संघाच्या ‘ऑर्गनाइजर’ या नियतकालिकेतून भाजपला खडेबोल सुनावण्यात आले. त्यावर संघाचे सदस्य रतन शारदा यांनी प्रतिक्रिया दिली. “मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 2 एनसीपी, 2 शिवसेना अशी विचित्र परिस्थिती होती. लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न पक्षांनी केला पाहिजे,” असं ते म्हणाले.

 • 13 Jun 2024 11:40 AM (IST)

  शिक्षक निवडणूक राडा प्रकरणी महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

  नाशिक- शिक्षक निवडणूक राडा प्रकरणी महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. किशोर दराडे यांच्याकडून उमेदवाराला मारहाण झाल्याच्या विरोधात ही तक्रार करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात झालेला राडा महायुतीला महागात पडणार आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करणं गरजेचं होतं, मात्र पोलिसांची पण भूमिका संशयास्पद असल्याचं शिवसेना नेते सुधाकर बडगुजर म्हणाले.

 • 13 Jun 2024 11:30 AM (IST)

  NEET परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

  फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल. 23 जून रोजी 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होईल. 30 जूनपूर्वी निकाल लावला जावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 1563 विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जातील. NTA ने दिलेली माहिती कोर्टाने नाकारली आहे. बाकी 2 याचिकांवर पुढील 2 आठवड्यांनी सुनावणी होईल.

 • 13 Jun 2024 11:20 AM (IST)

  कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी ते भेटीसाठी पोहोचले आहेत. कोकण पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 • 13 Jun 2024 11:10 AM (IST)

  शंभूराज देसाई मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार

  शंभूराजे देसाई हे मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांच्यासह आमदार राजेंद्र राऊतसुद्धा जरांगेंची भेट घेणार आहेत. खासदार संदीपान भुमरे हेदेखील जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत.

 • 13 Jun 2024 10:47 AM (IST)

  Maharashtra News : चार महिन्यानंतर वंदन सूर्यवंशी कुठे जाणार? – संजय राऊत

  “चोर असतो तो सीसीटीव्ही फुटेज गायब करतो. तिथल्या अधिकारी वंदना सूर्यवंशी महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांचा इतिहास तुम्ही पाहा. अमोल किर्तीकरांबाबत जो निर्णय झाला, मुख्यमंत्री शिंदेंच्या दबावात दिला. रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मोबाइल घेऊन आत फिरत होते. हा सर्व घोटाळा वंदना सूर्यवंशी यांनी केलाय. चार महिन्यात परिवर्तन होणार. त्यानंतर वंदन सूर्यवंशी कुठे जाणार?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

 • 13 Jun 2024 10:43 AM (IST)

  Maharashtra News : वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी – संजय राऊत

  “वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी. वंदना सूर्यवंशी कर्तव्याला जागलेल्या नाहीत. अमोल किर्तीकर विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही न्यायालयात जाणार” असं संजय राऊत म्हणाले.

 • 13 Jun 2024 10:40 AM (IST)

  Maharashtra News : मोहन भागवत मणिपूर, काश्मीरमध्ये गेलेत का? – संजय राऊत

  “मोहन भागवत मणिपूर, काश्मीरमध्ये गेलेत का? मोदी-शाह जात नसतील, तर भागवत यांनी जावं तिथे. आम्ही तुमच्यासोबत येऊ. बोलून काय होणार? भरपूर वर्ष तुमच ऐकतोय” असं संजय राऊत म्हणाले.

 • 13 Jun 2024 10:38 AM (IST)

  Maharashtra News : अहंकाराची सर्व मर्यादा मोदी-शाहंनी तोडली- संजय राऊत

  “अहंकाराची सर्व मर्यादा मोदी-शाहंनी तोडली. मोदी-शाहंविरोधात बंड करणार का? आरएसएसने काय कराव, काय करु नये हे मी बोलणार नाही. गडकरी, राजनाथ सिंह गप्प बसले आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

 • 13 Jun 2024 10:36 AM (IST)

  Maharashtra News : भाजपाकडून आरएसएसला संपवायच काम – संजय राऊत

  RSS ने भाजपाला वाढवलं. आरएसएसने भाजपाला ताकद दिली. पण भाजपाकडून आरएसएसला संपवायच काम सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

 • 13 Jun 2024 10:13 AM (IST)

  Maharashtra News : छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज का?

  छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन भुजळ नाराज असल्याची चर्चा.

 • 13 Jun 2024 10:10 AM (IST)

  Maharashtra News : सरकारच नेमकं म्हणण आज कळेल – मनोज जरांगे पाटील

  “सरकारने चर्चा केल्यानंतर समाजासोबत बोलून ठरवू. उद्या संध्याकाळी 5 वाजता आंदोलनाची दिशा ठरवू. सरकारच नेमकं म्हणण काय आहे, हे आज कळेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 • 13 Jun 2024 10:08 AM (IST)

  Maharashtra News : सरकारला वारंवार काय सांगायचं – मनोज जरांगे पाटील

  “मराठा समाजाकडे दुर्लक्ष करु नका. मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं, तर तुमच्याकडे दुर्लक्ष करु. आज दुर्लक्ष केलं, तर उद्या मराठे तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. सरकारला वारंवार काय सांगायचं. मला बोलता येत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 • 13 Jun 2024 10:00 AM (IST)

  अनिल देशमुखांचा अपघात प्रकरणात धक्कादायक आरोप

  पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

 • 13 Jun 2024 09:50 AM (IST)

  मुख्याध्यापिकेला लाच घेताना पकडले रंगेहात

  श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेला ४५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले. फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी मुख्याध्यापिकेने मोबदला मागितला होता. अहमदनगर लाचलुचपत विभागानी श्रीरामपूरात ही कारवाई केली आहे. वेतनश्रेणीच्या फरकाच्या १ लाख ६३ हजारांसाठी मागितली होती. ४५ हजारांची लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेस लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. संगिता नंदलाल पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

 • 13 Jun 2024 09:40 AM (IST)

  शरद पवार बारामती-दौंड दौऱ्यावर

  शरद पवार सलग तिसऱ्या दिवशी बारामती आणि दौंड दौऱ्यावर आले आहेत. बारामती आणि दौंड येथील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार गोविंद बागेतून रवाना झाले आहेत.बारामतीमधील शिरसुफळ ,उंडवडी सुपे आणि सुपे येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधतील. तर दौंड तालुक्यातील खोर ,पडवी आणि सुपा येथील दुष्काळाची पाहणी करून शरद पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

 • 13 Jun 2024 09:30 AM (IST)

  कोल्हापुरातील बॅनर वॉर तापलं

  विनापरवाना होर्डिंग लावल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटील आणि सरचिटणीस विश्वविक्रम कांबळे सोमराज सावंत यांच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसापूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलं होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर लावले होते.

 • 13 Jun 2024 09:20 AM (IST)

  सीपीआर रुग्णालयाला लवकरच नवीन कर्मचारी

  कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाला नवीन पाचशे कर्मचारी मिळणार आहेत. वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची लवकरच भरती होणार आहे.मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 • 13 Jun 2024 09:10 AM (IST)

  अंतरवाली सराटीत मंत्र्यांची मांदियाळी

  सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची आज शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई भेट घेणार आहेत, तसेच त्यांच्या सोबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे असण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई, तानाजी सावंत दुपारी साडे बारा वाजता जरांगे पाटील यांची ते भेट घेणार आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारमधील मंत्री पहिल्यांदा जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याने सरकार पातळीवरील आज जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यांदा चर्चा होईल.

 • 13 Jun 2024 09:00 AM (IST)

  15 उमेदवारांची माघार

  नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत 36 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे. अहमदनगर जिल्हयातील चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. टिडीएफचे नेते भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे , रणजित बोठे हे शिक्षक नेते तसेच संस्था चालक विवेक कोल्हे निवडणूक लढणार आहेत. जिल्हयात 15 हजार मतदार आहेत.

 • 13 Jun 2024 08:57 AM (IST)

  Marathi News: महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अंतरवाली सराटीचे दौरे वाढले

  महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अंतरवाली सराटीचे दौरे वाढले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज अंतरवाली सराटीला जाणार आहेत. जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, ऊबाठाचे धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यापूर्वीच जरांगे पाटील यांची भेट आहे.

 • 13 Jun 2024 08:42 AM (IST)

  Marathi News: बच्चू कडू यांनी बोलवली बैठक

  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बच्चू कडू यांनी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच राहायचं किंवा महाविकास आघाडीसोबत जायच की स्वतंत्र लढायचे या संदर्भात बच्चू कडू त्यांनी ही बैठक बोलावली आहे.

 • 13 Jun 2024 08:29 AM (IST)

  Marathi News: नाशिकमध्ये पुन्हा एकदा डेंग्यूचा फैलाव

  नाशिकमध्ये पुन्हा एकदा डेंग्यूचा फैलाव झाला आहे. गेल्या आठ दिवसांत 17 डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांत 17 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.

 • 13 Jun 2024 08:13 AM (IST)

  Marathi News: पुणे विभागातून यंदा 280 जादा बसेस

  आषाढी वारीसाठी एसटी प्रशासनाचा पुणे विभाग सज्ज झाला आहे. पुणे विभागातून यंदा 280 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या जादा बसेस पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या करणार आहे. एसटी महामंडळातर्फे यंदा गाव ते पंढरपूर अशी बससेवा राबविण्यात येणार आहे.

Published On - Jun 13,2024 8:11 AM

Follow us
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.