AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : “पुण्यात विधानसभेच्या 6 जागा शरद पवार गटाकडे मागणार”

| Edited By: | Updated on: Jun 16, 2024 | 8:11 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : पुण्यात विधानसभेच्या 6 जागा शरद पवार गटाकडे मागणार

शासनाच्या विजेचे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या धोरणाविरोधात आप आदमी पक्षातर्फे शास्त्रीनगर कार्यालयाबाहेर आंदोलन केलय. शासन काही ठराविक उद्योगपतींच्या हितासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर लावून नागरिकांची फसवणूक करत आहे. शहरात अनेकदा तासनतास वीज जाण्याच्या घटना होत असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी नागरिकांची लूट कशाप्रकारे करता येईल याचाच विचार शासन आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचे शासनाच्या भूमिकेवरून दिसते अशी टीका आपने केली. पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार. पुणे सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना मिळून मिळणार 21 कोटी रुपयांचा पालखी निधी. पालखी साठी येणाऱ्या भाविकांसाठी पाणीपुरवठा, वीज, तात्पुरती स्वच्छतागृह अशा सुविधांसाठी वापरण्यात येणार निधी. तिन्ही जिल्हा परिषदांना योग्य नियोजन करण्याचे राज्य सरकारचे आदेश. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2024 05:52 PM (IST)

    राहुल गांधींनी रायबरेलीचे खासदार राहावे : अजय राय

    उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय म्हणाले की, राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. रायबरेलीशी कौटुंबिक नातं आहे. वडिलोपार्जित नाते आहे आणि ते अबाधित राहिले पाहिजे. त्यांनी उत्तर प्रदेशात काम केले तर भविष्यात उत्तर प्रदेश मजबूत राहील.

  • 15 Jun 2024 05:37 PM (IST)

    नितीश कुमार यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मेदांता रुग्णालयात यशस्वी हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हातात दुखू लागल्याने नितीश कुमार हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताचे ऑपरेशन मेदांता हॉस्पिटलच्या ऑर्थो विभागात झाले.

  • 15 Jun 2024 05:25 PM (IST)

    हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपची केंद्रीय टीम बंगालमध्ये जाणार

    पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय पथक पश्चिम बंगालला भेट देणार आहे. यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • 15 Jun 2024 05:10 PM (IST)

    एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाले, पंतप्रधान मोदींना जनादेश नाही – खर्गे

    एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना जनादेश नाही. हे सरकार कधीही पडू शकते. देशाला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. परंतु आपल्या पंतप्रधानांची सवय आहे की ते योग्यरित्या काम करत असलेल्या गोष्टी चालू ठेवू देत नाहीत.

  • 15 Jun 2024 04:17 PM (IST)

    प्रशांत जगताप यांची माहिती

    पुण्यात विधानसभेच्या 6 जागा शरद पवार गटाकडे मागणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी ४ जागा लढवल्या होत्या. आता 6 जागांची मागणी पक्षाकडे करणार आहे. पुण्यात आज शरद पवार गटाची बैठक पार पडली. विधानसभेच्या आधीच शरद पवार गट 6 जागांची मागणी करणार असल्याचं प्रशांत जगताप म्हणाले.

  • 15 Jun 2024 02:35 PM (IST)

    उदय सामंत आणि संजय शिरसाट घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट

    मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येत आहेत.

  • 15 Jun 2024 02:34 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा

    मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा होणार आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी बाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराजे मांडणार आहेत. जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा.

  • 15 Jun 2024 02:32 PM (IST)

    महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ, संजय शिरसाठ यांच्यानंतर देसाईंची प्रतिक्रिया

    महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत. राज्यात आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. संजय शिरसाठ यांच्यानंतर शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया.

  • 15 Jun 2024 02:29 PM (IST)

    भुजबळ हे स्वतः त्या षडयंत्राचा एक व्यापक भाग होते – संदीप देशपांडे

    राज साहेबांच्या विरोधात षडयंत्र रचलं भुजबळ साहेबांना माहित नाही का काय षडयंत्र रचलं. भुजबळ हे स्वतः त्या षडयंत्राचा एक व्यापक भाग होते भुजबळ साहेब हे विसरले असतील. त्यामुळे राज साहेबांनी शिवसेना का सोडली हे भुजबळ साहेबांनी बोलू नये. त्यावेळेला काय घडलं आम्ही सर्व सांगितलं तर ते अडचणी येतील. असं संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

  • 15 Jun 2024 02:27 PM (IST)

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दहिसर विधानसभेत कार्यकर्त्यांची भेट घेतली

    उत्तर मुंबईतील ऐतिहासिक विजयानंतर मोदी मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री बनलेले पीयूष गोयल यांनी दहिसर विधानसभेत कार्यकर्त्यांची भेट घेतली. उत्तर मुंबई आणखी स्वच्छ कशी केली जाईल याबाबत बीएमसी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

  • 15 Jun 2024 02:21 PM (IST)

    बद्रीनाथ महामार्गावरील नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला, 8 भाविकांचा मृत्यू

    उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला. अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू, तर 15 जण जखमी. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 23 भाविक असल्याची प्रथमदर्शनी माहिती. सर्व भाविक बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे सर्व भाविक दिल्लीचे असल्याची माहिती. प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू.

  • 15 Jun 2024 02:00 PM (IST)

    एकनाथ खडसे भुजबळांच्या पाठिशी

    छगन भुजबळ यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, असा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे भुजबळ हे वरिष्ठ असून गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात चांगले काम करत आहेत. त्यामुळे राज्यसभेत जाण्याची इच्छा असणे यात काही गैर नाहीय मात्र यात पक्षाचा जो काही निर्णय तो अंतिम असतो, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भुजबळांचे समर्थन केले.

  • 15 Jun 2024 01:50 PM (IST)

    किशोर दराडे महायुतीचे उमेदवार -दादा भुसे

    किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर महायुतीचे सर्व नेते त्यांच्यासाठी काम करतील असे मत दादा भुसे यांनी व्यक्त केले. छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत, असे पण ते म्हणाले.

  • 15 Jun 2024 01:40 PM (IST)

    शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी विस्थापित नको

    शक्तीपीठ महामार्ग बनवत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. समृद्धी मार्ग बनवताना ज्या पद्धतीने लोकांना मोबदला दिला त्याच पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे.. या महामार्गामुळे सांगली कोल्हापूर येथील काही शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन दिली पाहिजे शेतकरी भूमीहिन होता कामा नये, अशी भूमिका भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांनी मांडली.

  • 15 Jun 2024 01:30 PM (IST)

    निवडणूक लढवणारच – दिनकर पाटील यांचा बैठकीत निर्धार

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते दिनकर पाटील आक्रमक झाले आहेत. पश्चिम मतदार संघातील व्यापारी संघटनांची बैठक त्यांनी बैठक घेतली. बैठकीत दिनकर पाटील यांनी उमेदवारी करण्याचा ठराव एकमताने घेतला. निवडणूक लढवणारच, असे दिनकर पाटील यांनी या बैठकीत निर्धार व्यक्त केला.

  • 15 Jun 2024 01:20 PM (IST)

    पाऊस झाला नाही तर दुष्काळसदृश्य परिस्थिती

    उत्तर भारतात मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यांमध्ये मान्सून लांबणीवर जाण्याची भीती आहे. ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला आहे. उत्तर भारतात पाऊस झाला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 15 Jun 2024 01:10 PM (IST)

    अनिल परब यांना किरीट सोमय्या यांचे आव्हान

    अनिल परब माझ्यावर 100 कोटी मानहानीचा दावा टाकत आहे, त्यांना माझं चैलेंज आहे त्यांनी कोर्टात दावा करावा, असे किरीट सोमय्या म्हणाले.अनिल परब हे रिसॉर्ट प्रकरणबाबत जनतेची माफी मागणार का, असा सवाल त्यांनी केला.

  • 15 Jun 2024 01:00 PM (IST)

    हिंदू जनजागृती समिती आक्रमक

    तुळजाभवानी देवीचा मंदिरात सोने चांदीत भ्रष्टाचार झाल्याचा सीआयडीने लेखी अहवाल दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. अधिकारी यांना वाचावण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टात जात असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीचे तुळजाभवानी मंदीरसमोर घंटानाद आंदोलन, न्यायालयांच्या आदेशाचा अवमान केल्याने अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.

  • 15 Jun 2024 12:53 PM (IST)

    पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    नाशिक शिक्षक विभाग मतदार संघासाठी आज महायुतीचे बैठक. बैठकीला महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित.

  • 15 Jun 2024 12:38 PM (IST)

    नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री शहरात दाखल

    पुण्यातील एसएसपीएमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोहोळ करणार पुष्पहार अर्पण. महायुतीचे पुण्यातील नेते स्वागतासाठी दाखल

  • 15 Jun 2024 12:24 PM (IST)

    उत्तर भारतात मान्सून रेंगाळण्याची शक्यता

    मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यांमध्ये मान्सून लांबणीवर जाणार. ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल. मात्र, उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम

  • 15 Jun 2024 12:07 PM (IST)

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते दिनकर पाटील आक्रमक

    पश्चिम मतदार संघातील व्यापारी संघटनांची बैठक. बैठकीत दिनकर पाटील यांनी उमेदवारी करण्याचा एकमताने ठराव

  • 15 Jun 2024 11:51 AM (IST)

    Maharashtra News : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शहरात विविध ठिकाणी जंगी स्वागत

    केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं शहरात विविध ठिकाणी जंगी स्वागत… मुरलीधर मोहोळ विमानतळावरून निघताच मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी नागरिकांकडून मोहोळ यांचे स्वागत… महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात मोठ्या रॅलीचे आयोजन…. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज प्रथमच पुण्यात

  • 15 Jun 2024 10:59 AM (IST)

    ठाणे – अति धोकादायक इमारतींचे वीज पाणी तोडण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

    पावसाळी संकटाशी सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे.  अती धोकादायक इमारतींचे वीज पाणी तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

    महापालिका क्षेत्रात एकूण 96 अति धोकादायक इमारती आहेत. तसेच पाणी साठणाऱ्या सकल भागातील 14 मोक्याच्या ठिकाणी 63 पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.  महापालिका हद्दीत कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो 24 तासाच्या आत भरला गेला पाहिजे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

  • 15 Jun 2024 10:52 AM (IST)

    भुजबळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले – मनसे नेत्याची टीका

    छगन भुजबळ राज ठाकरे यांच्या वरती का घसरले हे मला कळलं नाही.  भुजबळ यांना मानसिक त्रास झालेला आहे.  राज ठाकरे बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले.  भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत.  शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ आहेत, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली

  • 15 Jun 2024 10:31 AM (IST)

    18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा

    नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आपल्या लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत.  18 जून रोजी नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा असून विजयानंतर मतदार संघातील जनतेचे ते आभार मानणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी काल रात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहणी केली .  नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी मध्ये भाजपकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 15 Jun 2024 10:26 AM (IST)

    नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर बाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर बाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार. जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थिती बाबतचा आढावा शाह घेणार. गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काश्मीर बाबत पहिलीच बैठक असेल.

  • 15 Jun 2024 10:10 AM (IST)

    मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी महायुतीचे स्थानिक नेते पुणे विमानतळावर दाखल

    पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा पुण्यात येणार आहे.  मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी महायुतीचे सर्व स्थानिक नेते पुणे विमानतळावर दाखल झाले असून ढोल ताशांच्या गजरात मोहोळ यांचं स्वागत केलं जाणार आहे.  चंद्रकांत पाटील देखील पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत.

  • 15 Jun 2024 09:56 AM (IST)

    Maharashtra News : मुंबईत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

    मुंबईतल्या वडाळा अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या अँटॉप हिल भागातल्या विजय नगर येथील पंजा गल्लीतील ही घटना आहे.

  • 15 Jun 2024 09:43 AM (IST)

    Maharashtra News : विधिमंडळाचे गुरुवारपासून अधिवेशन

    राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून ते शुक्रवार १२ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या उभय सभागृहात मांडण्यात येणार आहेत.

  • 15 Jun 2024 09:26 AM (IST)

    Maharashtra News : महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद

    लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 15 Jun 2024 09:09 AM (IST)

    Maharashtra News : शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत

    राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. धाराशिवमधील नूतन प्राथमिक शाळेने पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केले. दारावरती तोरण, स्वागताची सुबक रांगोळी अशी रांगोळी मुलांचे स्वागत झाले. मुले शाळेत येताच गोड जिलेबी खाऊ घालून पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन शिक्षकांनी मुलांचे स्वागत केले. या स्वागताने मुलं भारावून गेली शाळेत साकारलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांनी गर्दी केली.

  • 15 Jun 2024 08:57 AM (IST)

    Maharashtra News : पुणे ड्रग्स प्रकरणाचा तपास आता NCB कडे

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करणार पुणे ड्रग्स प्रकरणाचा तपास. पुणे पोलिसांकडून 10 जून रोजी NCB कडे तपास करण्यात आला वर्ग. पुणे पोलिसांकडून पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी करत पकडण्यात आले होते 3 हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन. ड्र्क्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून एकूण 7 जणांना करण्यात आली होती अटक.

  • 15 Jun 2024 08:54 AM (IST)

    Maharashtra News : मावळसह पिंपरी चिंचवडवर जलसंकट

    पवना धरणात अवघा 20 टक्के पाणीसाठा. मावळात पावसाने ओढ दिलीये. तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. मावळसह; औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 15 जुलै पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. पवना धरणात केवळ 20.28 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्याचे मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे

  • 15 Jun 2024 08:28 AM (IST)

    National News : संसदेच्या आगामी अधिवेशनात भाजपची भूमिका बदलणार?

    संसदेच्या आगामी अधिवेशनात भाजपची भूमिका बदलणार?. मतदारसंघांची फेररचना, एक देश एक निवडणूक विधेयक बाजूला ठेवण्याची शक्यता. भाजप पक्षाकडून याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार. समान नागरी कायदा, एन आर सी विधेयकही भाजप लांबणीवर टाकण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि आगामी राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजप घेणार निर्णय.

  • 15 Jun 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता

    लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी बदलले जाणार आहेत. आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस मोठे फेरबदल करणार. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश. या राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार नाहीत , सूत्रांची माहिती.

Published On - Jun 15,2024 8:26 AM

Follow us
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.