Maharashtra Breaking Marathi News Live | ‘माझ्यावर टीका केल्याशिवाय काही जणांना भाकरच मिळत नाही’, उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

| Updated on: May 07, 2023 | 7:08 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live |  'माझ्यावर टीका केल्याशिवाय काही जणांना भाकरच मिळत नाही', उद्धव ठाकरे यांची खोचक टीका
Image Credit source: tv9

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसू येथे येणार आहेत. यावेळी ते कातळशिल्पाची पाहणी करतील. बारसूतील ग्रामस्थांशी चर्चा करतील. त्यानंतर ते एका सभेलाही संबोधित करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीत दाखल. रत्नागिरीत सभेला संबोधित करणार. शिंदे गटाकडून शेतकरी सेनेची स्थापना. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे दहशतवाद्यांशी चकमक, 5 जवान शहीद. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 May 2023 11:40 PM (IST)

    उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे ; रामदास कदम यांची जहरी टीका

    उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात

    बारसू हे देखील तुम्हीच सुचवले आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प वागायला जाता

    तुम्हाला थोडी शरम असती तर तिकडे गेला नसता

    हा माणूस किती विश्वासघातकी आहे फक्त एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद कसे घालवता येईल एवढच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला

    तू सर्व आमदार खासदाराना भेटला असता फंड आणून दिला असता तर तुझ्यावर ही वेळ आली नसती

    तू अडीच वर्षे मातोश्रीमध्ये कोंबड्यासारखा बसून राहिला

  • 06 May 2023 11:21 PM (IST)

    महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल; श्रीकांत शिंदे यांची टीका

    मुंबईः

    महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल!

    आधी आमच्यावर टीकाटिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करतायत!

    महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खासदार श्रीकांत शिंदेंची टीका

    संजय राऊत यांच्यावर बोलण्यास मात्र नकार

  • 06 May 2023 08:44 PM (IST)

    रत्नागिरीमधील राज ठाकरेंच्या सभेतील मुद्दे

    शरद पवारांच्या तोंडातून कधी शिवरायांचं नाव निघायचं नाही

    पुतळे उभारण्याऐवजी गडकिल्ले नीट करा

    राजकीय स्वार्थासाठी महापुरूषांना जातीत वाटून घेतलं

    बारसू प्रकल्प सुरु झाल्यानंतर मला संताप झाला

    कोकणातल्या लोकांच्या पायाखालून जमीन निसटून जातेय

  • 06 May 2023 08:23 PM (IST)

    प्रतिभासंपन्न कोकणास मूर्ख बनविण्याच काम सुरु : राज ठाकरे

    नेत्यांकडून कोकणी जनतेचा अपमान

    लोकप्रतिनीधींकडून कवडीमोल भावात जमिनींची खरेदी

    प्रकल्प अपूर्ण राहण्याला जनताच जबाबदार

    16 वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं

  • 06 May 2023 08:18 PM (IST)

    राज ठाकरेंची अजित पवार यांच्यावर टीका

    अजित पवार उद्या कसे वागतील याचा भरोसा नाही

    शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांना उकळ्या फुटल्या

    रत्नागिरीमधून राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका

  • 06 May 2023 08:13 PM (IST)

    नवीन बारसू कुठून आलं? राज ठाकरे यांचा सवाल

    राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे : 

    मी त्यादिवशी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की काकांकडे लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील सांगता येत नाही. असो तो त्यांता पक्षातील विषय आहे. आज कोकणात आलोय. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण ते प्रलंबित राहण्याची कारणं किंवा उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधी, पक्षांना निवडून देऊन तुम्ही आहे तसेच आहात. तीच तीच माणसं निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनाही किंमत नाही. पण त्यांची त्यांची किंमत झालेलीच आहे.

    २००७ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. पण अजून काम सुरु झालं नाही. काय करताय तुमचे आमदार, खासदार, काय करताय तुमचे लोकप्रतिनिधी? कारण त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात. त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, काम केलं किंवा नाही केलं काय, ही माणसं निवडून देणारच आहेत. खाचखळग्यातून जाणारे तुम्ही, तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शुन्य आहे. २००७ ला सुरु झालेला हा प्रकल्प १६ वर्षानंतरही तयाप झालेला नाही.

    मी जेव्हा या रस्त्यावरुन गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याचं एकदा बघा. मला बोलले तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का, मी बोललो त्यांच्याशी. नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण होत नाही. त्यावर म्हणाले, त्याचे कंत्राटदार पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत निवडून दिले त्यांनी एकदा तरी विचारलं का, का पळून गेले? कारण या लोकांना फक्त तुमच्याशी मतदानाचा संबंध आहे.

    तोच समृद्ध महामार्ग बघा, नागपूर पासून मुंबईपर्यंत, आता नाशिक, शिर्डीपर्यंत आला, सुरुही झाला ते सुद्धा चार वर्षात. नागपूर ते शिर्डी पुढचं काम सुरु आहे. पण आमच्याकडे १६ वर्ष कोकणात रस्ते होत नाहीयत. मी नेहमी सांगत आलो ना, तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. मतदानाचा दिवशी जीवंत राहा, म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतं कोण? आम्ही त्याच त्याच गोष्टींवर कोकण बोलतोय. पण आम्हाला त्या गोष्टीचा राग येत नाही. आम्हाला वाईट वाटत नाही. आज राज ठाकरे बोलून गेला. उद्या विसरुन जाणार आहात. मनाला लागतही नाही की अरे ते मनाला लागेल असा अपमान करत आहेत. पण आम्हाला त्याचं काही नाही.

    आज आम्ही इथे भांडतोय, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार की बारसूला होणार? आता नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं. हे होताहेत कुठून? मला कोकणातल्या लोकांबद्दल आश्चर्य वाटतं. तुमच्या पायाखालून जागा निघून जाते, शंभर एकरची जमीन निघून जाते, पायाखालचे हजारो एकराचे पॅचेस निघून जातात तुम्हाला समजत नाही? कळत नाही कोणीतरी विकत घेत आहे म्हणून? सगळ्या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की प्रकल्प येत आहेत. ते कवडीमोल भावात तुमच्याकडून जमिनी खिशात घालतात, ज्यावेळी प्रकल्प जाहीर होतो तेव्हा हजारपट मोबदला घेऊन मोकळे होतात. नुसता व्यापार चालू आहे.

    नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते. विरोध झाला, आता नाणारला आणला. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, त्यांना विचारलं बारसूला किती जमीन हातात आली? ते म्हणाले 1000 एकर आली. कशी आली? मुंबईहून गणपतीला कोकणाला येता, तेव्हा चर्चा करता तेव्हा तुमची जमीन गेलीय ते समजत नाही? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्यासमोर फिरत असतात. कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतात. मग सरकारला बड्या दामात विकतात.

    प्रत्येक राज्याला भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला आठ आहेत. आता आठवं मिळालं आहे. या आठमधील सहा भारतरत्न ही कोकणातील आहेत. इतका प्रतिभासंपन्न कोकण आहे आणि हे तुम्हाला मुर्ख बनवत आहेत. ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की, आपला शत्रू समूद्र मार्गाने येईल आणि आपली जमिनी घेईल आणि राज्य करेल. त्यामुळे महाराजांनी आरमार उभं केलं. कोकणच्या दोन भावांनी शिवछत्रपतींचं आरमार उभं केलं आणि सांभाळलं.

    मराठ्यांनी महाराष्ट्राचा भगवा अटकेपार घडवला. पाकिस्तानील किल्ल्यावर भगवा लागला गेला. आम्ही जमीन ताब्यात घेतल्या. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे राज्य आहे. अरे तुम्ही तुमच्या पायाखालची जमिनी काढत आहेत आणि अमराठी व्यापाऱ्याला विकत आहात. आपण कोणासाठी जमीन सोडत आहोत, काय करत आहोत याचं भान नाही?  आमच्या जमिनी पायाखाली जात आहेत पण आम्हाला कळत नाहीय की, आम्ही कोणाच्या घशात जमीन घालतोय.

  • 06 May 2023 07:57 PM (IST)

    संपूर्ण राज्याचं पोलीस दल बारसूमध्ये उतरवलंय - उद्धव ठाकरे

    एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर चीन देशात घुसला नसता

    बारसूत गोरगरीब जनतेवर लाठ्या चावताय

    प्रकल्प एवढा चांगला असेल तर लाठ्या का चालवता

    जनतेत जाऊन सांगत का नाही हा प्रकल्प तुमच्या हिताचा

  • 06 May 2023 07:49 PM (IST)

    'माझ्यावर टीका केल्याशिवाय काही जणांना भाकरच मिळत नाही', उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

    उद्धव ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं :

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, बघिनी, मातांनो, मगाशी गिते साहेब रंगले होते, त्यांनी उल्लेख करुन साधारणपणे मविआच्या सभेचा उल्लेख केला. मैदाने आता अपूरे पडत आहेत. अनेकांना वाटलं शिवसेना संपली, संपवली पाहिजे, असंही काही जणांना वाटत आहे. तर काही जणांना स्वत: म्हणजे शिवसेना वाटते. पण सर्व माणसं माझ्यासोबत आले आहेत.

    काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही. एक समाधान आहे, माझ्यावर आरोप केल्याने भाकरी मिळते हेही नसे थोडकं, आज जगताप कुटुंब आपल्यासोबत आले आहेत. मी सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. मी असं म्हणत होतो की, मातोश्रीत प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि महाडमध्ये सभा घेऊ. पण ऐकतील ते जगताप कुटुंबिय कसले? त्यांनी हट्टच धरला. इथेच या ऐतिहासिक मैदानात सभा घेणार म्हणून इथे आलो

    स्नेहल ताई आणि जगताप कुटुंबिय काँग्रेसमधून आल्या. काही जणांच्या भुवया उंचावल्या. काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला. तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत.

    मला नेहमनी आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं, सत्तेकडे सगळे जातात. आज तर माझ्याकडे सत्ता नाहीय. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं आणि स्वत: तिकडे बसले. ज्यांनी त्यांना फूस लावली, म्हणडे भाजपने, जाऊदे शब्द कमी पडतील. कारण मी मध्ये बोललो होतो त्याने वाद झाला होता.

    भाजपने एवढा नीच डाव केला की आपलं चिन्ह आणि धनुष्यबाण चोरलं आणि ते त्यांच्या खोक्यावर मारलं. मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात, जगताप कुटुंबिय आले आहेत, अद्वय हिरे आले. आणखी काही जण येणार आहेत. पण असं आश्चर्य याआधी पाहिलं नव्हतं.

    महाविकास आघाडी म्हणून मी पुढे जातोय मग मी काँग्रेस फोडतोय का? तसं नाहीय. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला, शिवसैनिकांनी मेहनत घेतली. नुसती जिंकून आणण्यासाठी मेहनत घेतली नाही. तर आपला उमेदवार लिंगाडे आपला शिवसैनिक तिकडे दिला आणि तिकडे तो आमदार झाला. कारण एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकूमशाही वृत्ती उभी आहे तिचा पराभव करणार आहोत

    महाड मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही. मी कागदावर लिहून ठेवलं आहे की एकही मतदारसंघ सुटता कामा नये. फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे एकदा पेटले तर ऐकत नाहीत. म्हणून कोणी शिवसैनिकाला पेटवायचा प्रयत्न करु नये. कारण मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजण्याशिवाय राहणार नाहीत.

    तळीयागावात दरड कोसळली. किती जणांना घरे मिळाली? दोन वर्ष झाली. माझ्याकडे नावं आहेत. तळीया गावात 71 घरं स्थलांतरीत झाली, त्यातील 66 नष्ट झाली. जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त 15 घरं तयार आहेत.

  • 06 May 2023 07:30 PM (IST)

    काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    महाड :

    काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश

    स्नेहल जगताप यांच्या भाषणातील मुद्दे :

    शिवसेना परिवरात आम्हाला सहभागी करुन घेण्यासाठी आपण स्वत: आलात, मला आणि सहकाऱ्यांना सहभागी करुन घेतले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते

    महाडची भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शीने पावन झालीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे समतेचा विचार दिला

    या सभेला ऐतिहासिक महत्त्व आहे

    साहेब, मी वडिलांचा हात धरुन राजरकारणात आले, आज त्यांची उणीव जाणवते

    साहेब, आपण कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक होतं

    कोरोनाने माझ्या वडिलां हिरावून घेतला, त्यांनी महाडमध्ये कोविड सेंटर सुरु केलं. रुग्णांची काळजी घेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं

    साहेब, आम्ही शहर पुन्हा उभं केलं. नगराध्यक्ष म्हणून सर्व काही केलं.

    आज आपण मला पक्षात घेतलं, माझे सगळे सहकारी माझ्या पाठीमागे उभे राहतात, ते देखील आज माझ्यासोबत शिवसेनेत प्रवेश करत आहेत

    महाडने शिवसेनेवर प्रेम केलं आहे

    या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून येईल

    शहराने नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मी 90 ते 95 टक्के काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला

    पाच वर्षात तीन वेळा नगरपालिकेला स्वच्छतेसाठी राष्ट्राीय पुरस्कार मिळाला माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे

    आता जिकेपर्यंत लढायचं आहे

  • 06 May 2023 07:20 PM (IST)

    उद्धव ठाकरे महाडमध्ये सभास्थळी दाखल

    रायगड : 

    उद्धव ठाकरे महाडमध्ये सभास्थळी दाखल

    उद्धव ठाकरे लवकरच भाषणाला सुरुवात करणार

  • 06 May 2023 06:44 PM (IST)

    रत्नागिरी : स्नेहल जगताप यांचा आज पक्ष प्रवेश

    उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात करणार प्रवेश

    सुषमा अंधारे यांनी दिली माहिती

    स्नेहल या माणिकराव जगताप यांच्या कन्या

    जिथे ठाकरे उभे असतात तिथे बालेकिल्ला असतो

  • 06 May 2023 06:20 PM (IST)

    बेळगाव : अमित शाह यांची जाहीर सभा

    यमकनमर्डीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा

    भाजप उमेदवार बसवराज हुंदरी यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा

    अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन

    राहुल गांधी यांच्यानंतर अवघ्या दोन तासांत अमित शहा यमकनमर्डीमध्ये

  • 06 May 2023 06:09 PM (IST)

    रत्नागिरीत राज ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी

    राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा

    रत्नागिरीत महाराष्ट्र सैनिकांकडून बॅनरबाजी

    रिफायनरीवरून भूमिका जाहीर करणार

    राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार

  • 06 May 2023 05:53 PM (IST)

    राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे

    सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला अंदाज

    11 ते 13 मे या काळात काही तरी मोठं घडेल

    सुषमा अंधारे यांनी वर्तविला अंदाज

    राज्यपालांसोबतची डिनर डिप्लोमसी त्यासाठीच

    काहीतरी राजकीय खलबत होत असल्याचे मांडले मत

  • 06 May 2023 05:50 PM (IST)

    Narayan Rane Live : कोरोना काळात औषधांचा घोटाळा केला

    उद्धव ठाकरे यांच्या आमदार, खासदारांनी एखादं विकासाचं काम केलं का?

    कोकणी माणसाला भावनिक गुंतत्यात अडकवले

    कोकणाच्या विकासात उद्धव ठाकरे हे अडथळे आणत आहेत

    उद्धव ठाकरे हे भडकविण्याची भाषा करत आहेत-राणे

  • 06 May 2023 05:47 PM (IST)

    Narayan Rane Live : मला नाहक डिवचायचं काम करु नका

    कोकणाच्या विकासावर जर कोणी येईल तर सोडणार नाही

    इतिहासात ठाकरे सर्वात निकामी मुख्यमंत्री-नारायण राणे

    दोन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे

    हजारो नोकऱ्या तयार होतील, अनेक विकासाची कामे होतील

  • 06 May 2023 05:42 PM (IST)

    Narayan Rane Live : उद्धव ठाकरे हे बिनकामाचे मुख्यमंत्री

    अडीच वर्षांत केवळ दोन वेळा मंत्रालयात आले

    त्यांना अर्थसंकल्प समजत नाही, त्यांना काहीही माहिती नाही

    उद्धव ठाकरे यांनी घरीच थांबावे - राणे

  • 06 May 2023 05:40 PM (IST)

    Narayan Rane Live : कोकणावर उद्धव ठाकरे यांचा रोष आहे का?

    नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    मातोश्रीवर केवळ इनकमी, आऊटगोईंग नाही

    उद्धव ठाकरे हे मला 250 कोटी कशाला देतील

    मानसिक संतलून ढळल्याने त्यांची बेताल वक्तव्य सुरु आहेत

    राऊत दारु पिल्यासारखं काहीही बडबडतात -राणे

  • 06 May 2023 05:37 PM (IST)

    Narayan Rane Live : कोणताच प्रकल्प कोकणात आणला नाही

    कोकणाच्या विकासात काहीच योगदान नाही

    सिंधुदुर्गात 35,000 दरडोई उत्पन्न होते आता ते वाढले

    महाराष्ट्रातील सर्वात कमी ताकदीचा उद्धव ठाकरे यांचा पक्ष

    उद्धव ठाकरे यांचा कोकणातील प्रत्येक विकास कामांना विरोध

  • 06 May 2023 05:34 PM (IST)

    Narayan Rane Live : शिवसेना राज्यातील सर्वात कमी ताकदीचा पक्ष

    नारायण राणे यांचा जोरदार पलटवार

    उद्धव ठाकरेंनी सरकारला बारसूत धमक्या दिल्या

    उद्धवस्त ठाकरे म्हणत चढविला हल्ला

    कोकणातील प्रत्येक प्रकल्पाला विरोध

  • 06 May 2023 05:32 PM (IST)

    Narayan Rane Live : रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना आमचा विरोध

    उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांची घणाघाती टीका

    बारसू येथील रिफायनरीविरोधात उद्धव ठाकरे

    कोकणातील रिफायनरीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांना आमचा विरोध

    उद्धव ठाकरे बडबडले- नारायण राणे

  • 06 May 2023 05:11 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद

    राज्यातील सर्व सभांना अभुतपूर्व प्रतिसाद

    लोकांना कपट कारस्थानांच्याविरोधात लोक

    विकास गोगावले यांनी एमआयडीसीत गोंधळ घातला

    सुषमा अंधारे यांनी केला आरोप

  • 06 May 2023 05:10 PM (IST)

    महाविकास आघाडी संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत- आदित्य ठाकरे

    शी शी त्यांना उत्तर मी देतच नाही,त्या पातळीवर मी जाणार नाही, नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर

    महाविकास आघाडी संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत- आदित्य ठाकरे

    उन्हाळा असल्यामुळे सभा होत नाहीय, मात्र यापूढे सभा होतील

    महाविकास आघाडी भक्कमपणे काम करत आहे- आदित्य ठाकरे

    कुणी काही ट्विट करतील त्यावर विश्वास ठेवायचा का? रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे मुख्यमंत्री शिंदे भेटीवर प्रतिक्रिया

  • 06 May 2023 05:07 PM (IST)

    कोकणात आज ठाकरेंची तोफ धडाडणार

    महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा

    तर रत्नागिरीत राज ठाकरे यांची गर्जना

    राज ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी

    रिफायनरीबाबत दोघांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

    राज ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार

  • 06 May 2023 05:01 PM (IST)

    Manipur : मणिपूर हिंसेमुळे अनेक परीक्षा रद्द

    मणिपूरमध्ये NEET-UG ची परीक्षा रद्द

    परीक्षेची नवीन तारीख लवकरच होणार जाहीर

    मणिपूरमध्ये दोन समूहात हिंसा

    हिंसेमुळे मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब

  • 06 May 2023 05:00 PM (IST)

    विकासाच्या नावाखाली भष्ट्राचार आणि अनियमता आहे- आदित्य ठाकरे 

    राज्यात लोकशाही , संविधान आहे की नाही,ठाण्यात रोशनी शिंदेवर लाठी काठ्या मारण्यात आल्या आणि तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले

    विकासाच्या नावाखाली भष्ट्राचार आणि अनियमता आहे

    सगळीकडे जनता विरुद्ध हुकूमशाही दिसत आहे

    पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार योजनेबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या, नदी सुधारसाठी स्वछता महत्वाची आहे, नदीवर कॉंक्रीटीकरणं करणे चुकीचे आहे

    जे योग्य त्यावर विचार करणे गरजेचे आहे

    मेट्रो होताना गाडया कमी होतील असे सांगण्यात आलं होतं, त्याच आता काय झालं

    बारसु आमच्यासाठी राजकीय प्रश्न नाहीय

    बारसुचा जो प्रकल्प आहे त्याचे प्रेझेंटेंशन जनतेला द्यावं

    लोकांशी संवाद साधून विकास केला पाहिजे

  • 06 May 2023 04:52 PM (IST)

    विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    नाणार संदर्भात त्यांची भुमिका त्या काळात होती

    प्रत्येकवेळी उद्धव ठाकरेंची भुमिका बदलत गेलीय बारसू येथील भुमिपत्रांच्या भावना काय आहेत त्याबाबत सरकारने चर्चा करण्याची भुमिका

    प्रत्येक घटनेला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रयत्न उद्धवजी करतायत

    विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

  • 06 May 2023 04:48 PM (IST)

    अहमदनगर: महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

    शरद पवारांनी सांगितल होत की भाकरी फिरली पाहिजे

    त्यांनी सवयी प्रमाणे आपला निर्णय फिरवला

    पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो अधिकार प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना आहेत

  • 06 May 2023 04:45 PM (IST)

    फलटण: शेतकरी व ग्रामस्थांकडून होतंय शरद पवार यांचं स्वागत..

    वाठार निंबाळकर येथे शरद पवार यांनी केली डाळींब बागेची पाहणी

    चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळींब बागेला दिली भेट

  • 06 May 2023 04:38 PM (IST)

    कर्जत: प्रसार माध्यमांसमोर येण्याचे अजित पवारांनी टाळले....

    विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथे

    कर्जत येथील अंबालिका कारखाना येथे अजित पवार

    कारखाना कामकाजाची पाहणी करत कारखान्याच्या वरिष्ठ अधिका-यांची घेतली बैठक

    प्रसार माध्यमांसमोर येण्याचे अजित पवारांनी टाळले....

  • 06 May 2023 03:50 PM (IST)

    वेताळ टेकडीवर बेताल विकास सुरू आहे - आदित्य ठाकरे

    विकासाच्या नावाखाली लाठी काठी सुरू आहे

    सर्वच ठिकाणी जनतेविरुद्ध हुकूमशाही सुरू आहे

    यासंदर्भात सर्वांनी विचार करावा, शाश्वत विकास झाला पाहिजे

  • 06 May 2023 03:45 PM (IST)

    काही लोकांच्या कामाच्या पद्धती वेगळी असतात - शरद पवार

    अजित पवार फार मिडीया फ्रेंडली नाही, ते फिल्डवर काम करतात

    काही लोक वृत्तपत्रात नाव यावं म्हणून काम करणारे असतात

    अजित पवार हातात काम घेतलं की ते पूर्ण करतात

    अजित पवारांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत

    अजित पवार राष्ट्रवादीसाठी चांगलं काम करत आहेत

  • 06 May 2023 03:44 PM (IST)

    56 वर्षे मी निवडणून आल्यापासून काम करत होतो - शरद पवार

    आपण आतापासून पर्यायी नेत्वृवाची टीम निर्माण करायची होती

    मी बाजूला होऊन नव्यानं नेत्वृवाला संधी मिळावी असा निश्चय

    माझं असासमेंट चुकलं

    कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया आली

    विरोधी पक्षांची युनिटी होत असताना मी बाजूला होणं योग्य नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली

  • 06 May 2023 03:36 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी पुणे दौऱ्यावर

    चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कसबा मतदारसंघातील बुथ प्रमुखांचा महामेळावा

    सोमवारी सकाळी 10:30 वाजता मेळाव्याचे आयोजन

    कसब्यातील पराभवानंतर कसब्यात शहर भाजप अॅक्शन मोडवर

  • 06 May 2023 03:34 PM (IST)

    दिल्लीतील विद्यापीठांत भारत के तुकडे होंगे हजार अशा नाऱ्यांचं समर्थन राहुल गांधी करतात - फडवणवीस

    काँग्रेसचे लोक म्हणतात बजरंग दलवर बंदी आणू, काय चुकी केली बजरंग दलाने
    जय श्रीराम म्हणणं गुन्हा असेल, तर हा गुन्हा ते रोज करणार
    काँग्रेसचे नेते मतांसाठी एका विशिष्ट समुदायाचे तळवे चाटतात
    बजरंगबली की ताकद काँग्रेसला दाखवूया
    आपल्यातील बजरंगबलीला जागृत करुन काँग्रेसच्या लंकेला 10 तारखेला मतदानाच्या दिवशी आग लावा
  • 06 May 2023 03:32 PM (IST)

    काही दिवसात मतदान होणार आहे, तुम्हाला नवीन सरकार बनवायचं आहे - राहुल गांधी

    तीन वर्षापूर्वी इथं सरकार आलं ते भाजपने चोरलं

    पैसे देऊन आमदार पळवले

    देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कोणतं असेल तर ते कर्नाटकमधील सरकार आहे

    चोरी करून आलेलं सरकार चोरीचं करणार

    कर्नाटकमध्ये प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला

    पंतप्रधान येतात, भाषण करतात मात्र भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही काढत नाहीत

    गेल्या तीन वर्षात कर्नाटकात जो भ्रष्टाचार झाला त्यावेळी तुम्ही काय केलं?

    किती जणांवर कारवाई झाली? किती जणांना जेलमध्ये टाकलं?

    मोदीजी महागाई, बेरोजगारी बद्दल तुम्ही काय केलं ते सांगा

    कर्नाटकमध्ये पूर आला तेव्हा तुम्ही काय केलं?

    कर्नाटक आणि शेजारच्या राज्यांमध्ये पाण्यावरून वाद झाला तेव्हा तुम्ही कर्नाटकच्या बाजूने काय केलं?

    मोदीजी भाषणात सांगतात काँग्रेसने 91 वेळा शिव्या दिल्या

    ते बहाणे करत आहेत

    काँग्रेस जे बोलते ते करते

    15 लाख देण्यासारखं आश्वासन आम्ही देणार नाही

    नोटबंदी सारखी कारवाई करणार नाही

    आम्ही 5 आश्वासन पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करून दाखवू

    भाजपने तुमचे पैसे लुटले

    आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देऊ

    हजारो करोड रुपये जनतेला आणि शेतकऱ्यांना परत देऊ

    गृहलक्षमी योजनेतून महिलांना महिन्यला दोन हजार रुपये देऊ

    सखी योजनेतून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत प्रवास

    अन्नभाग्य योजनेतून 10 किलो तांदूळ प्रत्येक कुटुंबाला देणार

    गृहज्योती योजनेतून 200 युनिट वीज प्रत्येक कुटुंबाला मोफत मिळणार

    युवा निधी योजनेतून 3 हजार रुपये दर महिन्याला पदविधरांना देणार दोन वर्षासाठी

    डिप्लोमासाठी 1500 रुपये दर महिन्याला 2 वर्षासाठी देणार

    दर वर्षी अडीच लाख अशा 10 लाख नोकऱ्या देणार

    महागाई बेरोजगार यावर बोलण्यापेक्षा पंतप्रधान आतंकवादावर बोलत आहेत

    पण त्यांच्यापेक्षा मी जास्त यावर बोलू शकतो

    पंतप्रधानांपेक्षा जास्त मी समजू शकतो आतंकवाद काय करू शकतो

    भाजपला 40 हा आकडा आवडतो त्यामुळे त्यांचे तेवढेच निवडून द्या

    चाळीस टक्के कमिशन मागणाऱ्यांना 40 ची आठवण करून द्या

  • 06 May 2023 03:28 PM (IST)

    सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या पोलीस पथकावर हिंगोलीच्या ब्राह्मणवाडा तांडा येथे हल्ला

    आरोपींसह नातेेवाईकांनी केला हल्ला

    फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला करत धक्काबुक्की

    पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांच्या तक्रारीवरून 26 जणांविरोधात औंढा नागनाथ पोलिसांत गुन्हा दाखल

    खाजगी वाहनाच्या काचाही फोडल्या

  • 06 May 2023 03:19 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राहणं अंत्यत महत्वाचं - संजय शिरसाट

    त्यांच्या काळात भाजपची भरभराट झालेली आहे
    ते पुन्हा आल्यास आमची खुर्ची मजबूत राहील
    आमच्या राजकीय आत्महत्येचा विचार त्यांनी करू नये
    देवेंद्रजींना केंद्रात पाठवू नका, ते महाराष्ट्रातच राहतील
    जयंत पाटील यांच्या राजकीय आत्महत्येला प्रत्युत्तर
    टोमणे बाजीच्या स्टेटमेंटला लोक वैतागले
    रिफायनरी कुठे नेऊन जायचं याचं अधिकार तुम्हाला नाही
    उद्धव ठाकरेंना टोला
    ठाकरे यांचं दिशाभूल वक्तव्य
    दिशाभूल झाली हे मनाला न पटणारं स्टेटमेंट
    संजय राऊत रोज दिशाभूल करतातं ते कळत नाही
  • 06 May 2023 03:12 PM (IST)

    कोणत्या परिस्थितीमध्ये योग्य वेळी काय निर्णय घेतला पाहिजे कसं पुढे गेलं पाहिजे

    हे नॉलेज शरद पवारांना आहे
    शरद पवारांनी राजीनामा का दिला अंतर्गत काही वाद होता का हा संशोधनाचा विषय आहे
    पण संशोधन होणं कठीण आहे
    अजित दादा म्हणत होते वयानुसार राजीनामा दिला तर हकरत नाही
    बाकीचे म्हणत होते राजीनामा देऊ नका यावरून लक्षात येते
  • 06 May 2023 03:09 PM (IST)

    शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झालं - जयंत पाटील

    काही जण पवारांच्या निवृत्तीसाठी देव पाण्यात ठेवून बसले होते

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य

    जे होतंय ते तसंच व्हावं

  • 06 May 2023 02:37 PM (IST)

    या भागात प्यायला शेतीला पाणी नव्हतं - शरद पवार

    शरद पवार १९६६-६७ साली आम्ही हा प्रकल्प सुरु केला. - या भागात प्यायला शेतीला पाणी नव्हतं.. - त्या काळात दुष्काळ निवारण हा एकच कार्यक्रम असायचा.. - भुगर्भाची पाणी पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला.. - आता एक वेगळं चित्र निर्माण झालं.. - शेती, शिक्षण, संशोधन यावर येथे भर देण्यात आला.. - नवनवीन प्रयोग आणून दाखवण्यचं अखंड काम इथे चालतं.. - कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जातंय.. - प्रदर्शनातून शेतकरी शिकतायत.. - ज्ञानदान देणारा परिसर.. -वैज्ञानिक क्षेत्रातलं काही होत असेल तर त्याची माहिती घ्या.. आनंद घ्या..

  • 06 May 2023 02:36 PM (IST)

    वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची विरारमध्ये रेती बंदरावर मोठी कारवाई

    विरार:- वसई चे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची विरार मध्ये रेती बंदरावर आज मोठी कारवाही..

    आज सकाळ पासून सुरू असणाऱ्या कारवाहित नारंगी, शिरगाव, वैतरणा रेतीबंदरावरील 9 सक्शन पंप, 7 बोटी जिलेटीनच्या स्फोटाने केल्या उधवस्थ

    समुद्रातील बोटी आणि सक्शन उडवितानाची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद

    वसई तालुक्यात रेती बंदरावर अनाधिकृत रेती उपसा करून वाहतूक करण्यावर बंदी असतानाही रेती माफिया करत होते अनाधिकृत रेतीचे उत्खनन

    महसूल प्रशासनाच्या या धडक कारवाहिने रेती माफियांचे दणाणले धाबे..

  • 06 May 2023 02:31 PM (IST)

    थोड्याच वेळात आदित्य ठाकरे पुण्यातील वेताळ टेकडीला भेट देणार

    - थोड्याच वेळात आदित्य ठाकरे पुण्यातील वेताळ टेकडीला भेट देणार,

    - वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध,

    - यासंदर्भात पर्यावरण प्रेमींनीही आंदोलनही केलं होतं,

    - लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 06 May 2023 02:20 PM (IST)

    कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे

    कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे

    काँग्रेस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे

    मुंबईचे एड संतोष दुबे यांनी पाठविली आहे नोटीस

    भारतीय राष्ट्रीय कांग्रेस , मल्लिकार्जुन खर्गे , डी के शिवकुमार आणि इतरांना पाठविली आहे कायदेशीर नोटीस

    ज्यामध्ये काँग्रेसने बजरंग दलावर जाणीवपूर्वक बंदी घालण्याची मागणी केली आहे

    कांग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना पीएफआय सारख्या बंदी असलेल्या संघटनेशी  केली आहे

    कोणत्याही राज्य सरकारला  UAPA अंतर्गत बंदी घालन्याचा अधिकार नाही

    बजरंग दलावर बंदी घालण्याची चर्चा हे  निवडणुकीचा स्टंट असून जनतेची फसवणूक करणारा हा खोटा जाहीरनामा

    असा जाहीरनामा प्रसिद्ध करून काँग्रेसने मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे

    या कायदेशीर नोटीसची प्रत कर्नाटक राज्य निवडणूक आयोग आणि भारताच्या मुख्य निवडणूक आयोगालाही दखल घेण्यासाठी पाठवण्यात आली आहे.

  • 06 May 2023 02:14 PM (IST)

    समर कॅम्पचा सांगता समारंभाला शरद पवार यांची हजेरी

    बारामती : शरद पवार सायन्स पार्कमध्ये दाखल..

    - समर कॅम्पचा सांगता समारंभाला शरद पवार यांची हजेरी

  • 06 May 2023 02:14 PM (IST)

    अजित पवार यांना व्हीलन ठरविण्याचे राजकारण सुरु आहे

    आमदार संजय शिरसाट -

    संजय शिरसाट यांच्याकडून अजित पवारांची पाठराखण

    अजित पवार यांना व्हीलन ठरविण्याचे राजकारण सुरु आहे

  • 06 May 2023 02:08 PM (IST)

    : आता राजीनाम्याचा विषय संपला, आता कामावर लक्ष - शरद पवार

    बारामती : आता राजीनाम्याचा विषय संपला..

    - आता कामावर लक्ष..

    - शरद पवार यांची प्रतिक्रिया..

  • 06 May 2023 02:01 PM (IST)

    त्यांची दिशाभूल कोण करत उद्धव ठाकरेंना कळायला हवं - शिवसेना आमदार संजय शिरसाट

    शिवसेना आमदार संजय शिरसाट बाईट -

    ऑन उद्धव ठाकरे बरसू दौरा -

    बारसू प्रकल्पासंदर्भात सर्व एकमेकांशी समन्वय साधून आहेत, आपण जायच चार लोकांच ऐकायच आणि आपलं मत बनवायच अस त्यांच सुरू आहे

    त्यांची दिशाभूल कोण करत उद्धव ठाकरेंना कळायला हवं

    एखादा प्रकल्प येत असेल तर त्याला विरोध करायचा अशी स्टॅटीजी सध्या सुरू आहे

    समृद्धी महामार्गालाही असाच विरोध केला, परंतु आज तो आमची लाईफ लाईन झालाय

    आपल राजकारण तिथे जाऊन करण्यात काही हरकत नाही, ही भुमिका त्यांची योग्य नाही

    अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे त्यांची आग विझून जाईल; राज्य पेटवायची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही

    टीका करताना विचार करा, जो मुख्यमंत्री सर्वांना भेटतो, याला जर हुकुमशाही म्हणता ? मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सारख लॉक लावून वर्षामध्ये बसायचं का ?

    या मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही हुकुमशाही म्हणत असाल तर‌ लोकशाहीचा अपमान

    कायदा व सुव्यवस्था बिघडवायला काही लोक चालले, जर आम्ही त्यांना अडवल असत, त्यांनी मला जाऊ दिल नाही अस त्यांनी बोलले असते, हे सरकार लोकशाही पद्धतीने सुरू आहे, हीच त्यांची पोटदुखी

    ऑन महाड सभा -

    महाडच्या सभेला परवानगी नाकारली नाही, त्यांना सांगितले घेतली नाही तर बरे होईल

    आमचा पक्ष चोरला, बाप चोरला, गद्दारांना धडा शिकवायचा हे पुन्हा बोलायला आम्ही त्यांना तिथे सभेला परवानगी दिली आहे, उपरोधिक टोला

    ऑन शरद पवार राजीनामा _

    शरद पवार जे बोलतात त्याच्या उलटं होत त्यांनी काल म्हणाले महाविकास आघाडी टिकेल याचा अर्थ ति तुटेल

    मुख्यमंत्री कर्नाटकात गेले तर काय झालं, शिवसेना भाजपची युती आहे, युतीची सत्ता आहे त्यामुळे एकमेकांना सहकार्य करावं लागतं

    ऑन संजय राऊत -

    संजय राऊत घाणेरड्या राजकरणाताला किडा आहे, त्यांना त्यांची जागा नाना पाटोळे यांशी दाखवली आता त्यांना फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायच बाकी आहे

    महाविकास आघाडी आता राहिली का ? लोकांच्या घरी मुलगा जन्मला म्हणून तुम्ही पेढे का वाटता, तुमाच्या घरी जन्मल्यावर वाटा

    आता महाविकास आघाडीची सभा होणार नाही, उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, त्यांना संजय राऊत सांगतील युद्धभूमीवर काय सुरू आहे

    ऑन अजित पवार -

    अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, ते त्यांच्या पक्षाला सांभाळत होते मी एकदा निधी मागायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही आमच्या पक्षाचे नाही, मग उद्धव ठाकरे यांना भेटायला जाण म्हणजे साता समुद्रापार जाण आहे

  • 06 May 2023 01:59 PM (IST)

    राज्यातील सरकार कधीही कोसळू शकते - उद्धव ठाकरे

    रत्नागिरी : रिफायनरी वरून हल्लाबोल करत असतांना उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेवर टीका

    संपूर्ण देशात एकनाथ शिंदे यांची गद्दार म्हणून ओळख, तीन जिल्ह्यात त्यांना कोणी ओळखत नव्हते

    राज्यातील सरकार जर रिफायनरी ला विरोध करणार नसेल तर त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगणार

    राज्यातील सरकार कधीही कोसळू शकते असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

  • 06 May 2023 01:51 PM (IST)

    बारसूच्या विरोधावरून अनिल बोंडे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    अमरावती : काही लोक असे असतात की कोणताही प्रकल्प आला तरी त्याला विरोध करतात

    राजकारणासाठी विरोध करतात विरोध करून स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्न करतात

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होत

    अमरावती मधील इंडियाबुल्स प्रकल्पाला ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांनी माल जमवला

    ब्लॅकमेलिंग करून माल जमा करण्यासाठी कधी कधी विरोध केला जातो

    अनिल बोंडें यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

  • 06 May 2023 01:42 PM (IST)

    उपऱ्या लोकांची सुपारी घेऊन दलाल हा प्रकल्प लादत आहे - उद्धव ठाकरे

    रत्नागिरी : मलिदा मिळाला असेल म्हणून हा प्रकल्प लादत आहे

    उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

    माझ्या काळात आलेला फॉक्सकॉन परत आणून द्या

    समृद्धी महामार्गाला विरोध झाल्यावर मी स्वतः गेलो होती

    तेव्हा विरोध समजावून घेतला आणि मार्ग काढून रस्ता झाला

    आणीबाणी याच्यापेक्षा वेगळी काय असते? - उद्धव ठाकरे यांचा सवाल

  • 06 May 2023 01:29 PM (IST)

    प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता म्हणून आम्ही पाठिंबा दिला

    रत्नागिरी : आशिष देशमुख यांनी आम्हाला प्रकल्प द्या अशी मागणी केली होती

    रिफायनरी प्रकल्प हा पाण्याच्या बाजूला होऊ शकेल

    नाणारच्या वेळेला जो आक्षेप होता तोच आक्षेप आत्ताही आहे

    रिफायनरी होऊ शकते की नाही याबाबत चाचपणी करायला पाहिजे होती

    मी मुख्यमंत्री असतो तर सादरीकरण करून विचारलं असतं हा प्रकल्प हवा की नको

    सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांनी इथं येऊन सांगितलं पाहिजे

    लोकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या सोबत असणार

    गुजरातला गेलेला प्रकल्प परत आणून द्या हा प्रकल्प घेऊन जा

  • 06 May 2023 01:24 PM (IST)

    रत्नागिरी येथील आंदोलकांना तडीपारीच्या नोटिसा

    रत्नागिरी : 37 आंदोलकांची पोलिसांकडून तडीपारी

    ज्यांची त्यातून सुटका झाली त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अडकविले

    लोकांचा रिफायनरीला विरोध कायम आहे - विनायक राऊत

  • 06 May 2023 01:20 PM (IST)

    शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते - जयंत पाटील

    सांगली : राष्ट्रवादी पासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते.

    राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधान.

    बारसु रिफायनरी वादावरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सरकारवर टीका

    स्थानिकांचा विरोध होत असताना, त्यांचे समाधान करण्याचे तारतम्य सरकारने बाळगायला पाहिजे.

    लोकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होतं,मात्र ते झालं नाही..

    विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं,ते टाळून,रेटा रेटी करत असेल तर प्रश्न तयार होतात..

    देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब.

    एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या त्या चाळीस आमदारांनी राजकीय आत्महत्या केली.

    पुढील निवडणुकां मध्ये निवडून येत नसल्याने भाजपाकडून राज्यातले इतर पक्ष फोडण्याचे कारस्थान गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

  • 06 May 2023 01:13 PM (IST)

    गोंदियातील 'त्या' शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

    गोंदिया : गोंदियातील बंद झालेल्या मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्यांच्या पगाराच्या मुद्दा निघाला निकाली

    65 कोटि रुपयाची देय रक्कम देण्याचे ठरले, कर्मचारी झाले आनंदी

    सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने मिळणार पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट रक्कम

    राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या मालकीची कॉलेज

  • 06 May 2023 01:05 PM (IST)

    जेलमध्ये असतांना मी अनेक पुस्तके वाचली - छगन भुजबळ

    नाशिक : छगन भुजबळ यांनी कुसूमाग्रज प्रतिष्ठान कार्यक्रमात सांगितले जूने किस्से

    प्रभु रामचंद्र सारखी नाशिक भूमी प्रसिद्ध तशी लेखकांसाठी देखील ही भूमी महत्वाची / प्रसिद्ध

    तीन वेळा नाशिकला साहित्य संमेलन झाले

    नाशिकला साहित्यप्रेमी आहेत त्यामुळे प्रकाशन संमेलन असे अनेक कार्यक्रम होतात

    राजकिय लोकांपेक्षा इकडे जास्त गडबड

    आता चार दिवसांच्या घडामोडींवर एखादे पुस्तक आले तर नवल नको वाटायला

    दोन अडीच वर्ष जेल मध्ये राहिलो त्यावेळी अनेक पुस्तके वाचायची सवय झाली

    आम्ही जेलच्या वातावरणात देखील पुस्तकांमुळे पोहून आलो , जेल मध्ये अनेक पुस्तके वाचली ,

  • 06 May 2023 12:53 PM (IST)

    शरद पवार यांचा राजीनामा मागे, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष

    - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याबद्दल नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोष साजरा केला.

    - डीजेच्या तालावर आणि राष्ट्रवादीच्या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला.

    - कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष केला.

    - राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्यासह अनेक कार्यकर्ते या जल्लोषात सामील झाले होते.

  • 06 May 2023 12:41 PM (IST)

    शरद पवार बारामतीत दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    - अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामतीत दाखल झाले आहेत.

    - बारामतीमधील गोविंद बाग निवासस्थानी आज शरद पवार मुक्काम करणार असून उद्या ते सोलापूर दौऱ्यावर निघणार आहेत.

    - शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

  • 06 May 2023 12:26 PM (IST)

    राणेंना लोक हाकलून लावतील - वैभव नाईक

    - नारायण राणे यांनी बारसूमध्ये गेले पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांची किमंत कळेल

    - राणे बारसूमध्ये गेले तर तेथील लोक त्यांना हाकलून लावतील

    - राणे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी तिथे गेले पाहिजे असा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

  • 06 May 2023 12:16 PM (IST)

    पर्यटक, डल्ला, धन की बात, रिफायनरी समर्थकांचा मोर्चामध्ये ठाकरेंवर नितेश राणे यांची टीका

    - ग्रीन रिफायनरी होत आहे त्याचे सार्थक करण्यासाठी आलो आहोत.

    - कोणी तरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे.

    - त्याचे हेलीकॉपर बारसूमध्ये उतरू दिले नाही म्हणून जैतापूरला उतरवले.

    - मुंबईचा दलाल बारसूमध्ये आला आहे.

    - मोदी मन की बात करतात पण उद्धव ठाकरे धन की बात करतात.

    - उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले त्याची किमंत १०० कोटी होती.

    - १०० कोटी मातोश्रीवर पोहोचले असा त्यांचा प्लॅन होता.

  • 06 May 2023 12:03 PM (IST)

    कातळशिल्प हा जागतिक वारसा, तो जपला गेला पाहिजे - उद्धव ठाकरे

    - बारसू गावातील कातळशिल्पांची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी

    - कातळशिल्पांची जागा वादग्रस्त प्रकल्पात येते

    - युनोस्कोकडे प्रस्ताव दिला आहे. जागतिक वारसा जाहीर करावा असे पत्र दिले आहे.

    - हा पुरातन खजिना आहे. जागतिक वारसा आहे. तो जपला गेला पाहिजे.

    - महाराष्ट्रातही हा खजिना जगासमोर आणावा.

  • 06 May 2023 12:01 PM (IST)

    कातळशिल्पाची जागा वादग्रस्त रिफायनरीमध्ये - उध्दव ठाकरे

    कातळशिल्पाच्या जागेची उध्दव ठाकरेंकडून पाहणी

    उध्दव ठाकरेंनी अभ्यासकांकडून कातळशिल्पाच्या जागेची माहिती जाणून घेतली

  • 06 May 2023 11:53 AM (IST)

    भाजप सेनेचा आज रत्नागिरीत मोर्चा

    बारसू रिफायनरी समर्थनात भाजप शक्तिप्रदर्शन करणार

    दोन ते तीन हजार कार्यकर्ते बारसू रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार

  • 06 May 2023 11:36 AM (IST)

    कातळशिल्पाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे घटनास्थळी पोहचले

    पोलीसांकडून उध्दव ठाकरेंच्या दौऱ्याचे पोलीसांकडून चित्रीकरण

    घटनास्थळी मिडीयाला जाण्यासाठी परवानगी नाकारली

  • 06 May 2023 11:30 AM (IST)

    उध्दव ठाकरे सोलगावमधून बारसूकडे रवाना

    बारसूतील कातळशिल्पाची उद्धव ठाकरे पाहणी करणार

    स्थानिकांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेणार

  • 06 May 2023 11:23 AM (IST)

    ठाकरेंचा ग्रामस्थांशी संवाद पाहायला नारायण राणे हवे होते - संजय राऊत

    ज्यांना जेलमध्ये नाही जायचेय ते भाजपत जातात- संजय राऊत

    नारायण राणेंनी उद्धव ठकरेंच्या स्वागतासाठी असायला हवे होते- संजय राऊत

  • 06 May 2023 11:15 AM (IST)

    शिवसेना कोकणातल्या लोकांसोबत - उद्धव ठाकरे

    राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला असे राख रांगोळी करणारे प्रकल्प नको- उद्धव ठाकरे

    हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू- उद्धव ठाकरे

  • 06 May 2023 11:09 AM (IST)

    शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख- उद्धव ठाकरे

    लोकांचा रिफायनरीला विरोध असल्यास ती होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

    हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही- उद्धव ठाकरे

  • 06 May 2023 11:04 AM (IST)

    उद्धव ठाकरे रत्नागिरीच्या सोलगावमध्ये

    उद्धव ठाकरे ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत

    ग्रामस्थांकडून रिफायनरी हटवा कोकण वाचवाचे नारे

    कोकणातील राजकीय वातावरण तापले

  • 06 May 2023 10:52 AM (IST)

    Petrol-Diesel Income : केंद्र सरकार मालामाल

    एका लिटर पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकारला इतका फायदा

    मोदी सरकार करते एका लिटरवर इतकी कमाई

    तुम्हाला मात्र पेट्रोल-डिझेल खरेदी करताना रोज बसते झळ, वाचा सविस्तर 

  • 06 May 2023 10:49 AM (IST)

    भास्कर जाधव बारसूमध्ये दाखल, झाला पोलिसांशी झाला वाद

    भास्कर जाधवांचा पोलिसांशी झाला वाद

    रस्ता तुमच्या मालकीचा आहे का ? जाधवांचा पोलिसांना सवाल

    पोलिसांनी अडवल्याने भास्कर जाधव झाले आक्रमक

  • 06 May 2023 10:41 AM (IST)

    पुणे - आळंदी मध्ये अनोख्या ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली

    - दि ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थान यांच्या वतीने बांधवांसाठी पारायणाचा आयोजन करण्यात आलं

    - येत्या सात मे पर्यंत चालणाऱ्या या पारायणात शंभरहून अधिक दृष्टिहीन बांधवांनी सहभाग नोंदवला

    - महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या पारायणाचे आयोजन करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे

  • 06 May 2023 10:20 AM (IST)

    उद्धव ठाकरे साखरकुंभे गावात दाखल

    रिफायनरी विरोधकांची आज उद्धव ठाकरे घेणार भेट

    बारसूसह इतर गावातील स्थानिकांशी साधणार संवाद

  • 06 May 2023 10:13 AM (IST)

    चंद्रपूर - सचिन पुन्हा एकदा ताडोबात ,मागच्या खेपेस दिलेले आश्वासन केले पूर्ण 

    आपल्या राहत्या रिसॉर्ट शेजारी असलेल्या अलीझंझा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या स्कूल बॅग,

    ताडोबाच्या या भागातील जुनाबाई वाघिणीच्या दर्शनासाठी सचिन सपत्नीक ताडोबात झाला दाखल,

    जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांत रमला सचिन

  • 06 May 2023 10:10 AM (IST)

    बारसूतील स्थानिकांवर सरकारकडून अत्याचार सुरू - संजय राऊत

    येऊ देणार नाही म्हणजे काय, अशा धमक्या देणाऱ्यांना फडणवीसांनी अटक करावी

    संजय राऊत यांचा राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

  • 06 May 2023 10:09 AM (IST)

    अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते

    पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या. या आगीवर अग्नीशमन दलाच्या जवानांनी वेळीच यश मिळवले. अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे....सविस्तर वाचा

  • 06 May 2023 10:08 AM (IST)

    शरद पवार थोडयाच वेळात बारामतीकडे रवाना होणार

    - निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार उद्यापासून सोलापूर दौऱ्यावर,

    - शरद पवार आज बारामतीत मुक्काम करणार

    - उद्या सकाळी सोलापूरकडे रवाना होणार,

  • 06 May 2023 10:04 AM (IST)

    Gold Demand : भारतीयांना सोन्याचा तोरा सोसवेना!

    गेल्या 6 वर्षांत खरेदीदारांनी दाखवली पाठ

    सोन्याच्या दागिन्यात भर घालणाऱ्यांची संख्या वाढली

    सोन्याच्या मागणीत मोठी घसरण, वाढत्या भावाचा परिणाम

    गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 10 टक्के वाढ, वाचा सविस्तर 

  • 06 May 2023 09:57 AM (IST)

    उद्धव ठाकरे बारसूतील स्थानिक लोकांशी चर्चा करणार- संजय राऊत

    उद्धव ठाकरे बारसूतील स्थानिक लोकांशी चर्चा करणार- संजय राऊत

    शिवसेना ही भांडवलदालाची दलाल नाही

    शिवसेना शेतकरी, कष्टकरी यांच्यांबरोबर

    धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे

    भांडवलदारांचे दलाल पोकळ धमक्या देत आहेत

  • 06 May 2023 09:52 AM (IST)

    जळगावात बालकाची आदलाबदली

    जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीएनए किट्स उपलब्ध नसल्याने अदलाबदली झालेल्या बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत जाण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी दोन महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या त्यातल्या एकीला मुलगा तर दुसरीला मुलगी झाली. परंतु परीचारिकांच्या भोंगळ कारभारामुळे कोणतं बाळ कुणाचं याविषयी घोळ निर्माण झाला.

  • 06 May 2023 09:44 AM (IST)

    शरद पवार सोलापूरला जाणार

    शरद पवार थोडयाच वेळात बारामतीकडे रवाना होणार

    निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार उद्यापासून सोलापूर दौऱ्यावर

    शरद पवार आज बारामतीत मुक्काम करणार

    उद्या सकाळी सोलापूरकडे रवाना होणार

  • 06 May 2023 09:36 AM (IST)

    धरणात दहा वर्षांचा मुलगा बुडाला

    मावळ तालुक्यातील कुसगाव धरणात दहा वर्षांचा मुलगा बुडाला. त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    आदर्श संतोष गायकवाड असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

    आदर्श हा मावशीसोबत फिरण्यासाठी कुसगाव धरण येथे आला होता. मावशी आणि आदर्श हे धरणाच्या पाण्यात खेळत होते. अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने आदर्श हा पाण्यात बुडाला.

  • 06 May 2023 09:30 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या मार्गावरील रस्ते बंद

    उद्धव ठाकरे यांच्या गाड्या ज्या मार्गाने जाणार आहेत ते रस्ते पोलिसांकडून दगड टाकून बंद करण्यात आले

    बारसूमध्ये चोख पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला

    या मार्गावरील जाणाऱ्या सर्व वाटा पोलिसांनी केल्या बंद

  • 06 May 2023 09:27 AM (IST)

    रिफायनरी समर्थकांच्या मोर्चा

    रिफायनरी समर्थकांचा मोर्चा ज्या जवाहर चौकातून निघणार आहे तिथे स्टेज बांधण्याचे काम सुरू आहे.

    चौकात भाजपचे झेंडे सजले.

    पोलीस बंदोबस्त ही तैनात.

  • 06 May 2023 09:14 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदीत पुन्हा उसळी

    चार दिवसांत किंमतीत 1500 रुपयांची दरवाढ

    अमेरिकन डॉलरचा बाजारावर दबाव

    3 मेपासून सोने-चांदीच्या किंमती सुसाट

    चांदीमध्ये किलोमागे 2200 रुपयांची वाढ

    आज सकाळच्या सत्रात इतका वाढला भाव, वाचा सविस्तर 

  • 06 May 2023 09:06 AM (IST)

    वाघोली आगीत तिघांचा मृत्यू

    वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग

    अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

    आगीमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

    अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

  • 06 May 2023 09:03 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये बँकेला आग

    पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली

    अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली

    या आगीमध्ये कागदपत्रे जळून खाक झाली असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • 06 May 2023 08:59 AM (IST)

    रिफायनरी समर्थकांचा मोर्चा

    राजापूर जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र जमणार आहेत. या मोर्चाला केंद्रीयमंत्री नारायण राणे,उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, निलेश राणे या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत हे सहभागी होणार नाहीत. निलेश, नितेश राणे ,प्रमोद जठार मोर्चाचे नेतृत्व करतील.सिंधुदुर्गातून राणे समर्थक मोठया संख्येने सहभागी होतील.

  • 06 May 2023 08:36 AM (IST)

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल महागले की झाले स्वस्त

    कच्चा तेलाची जोरदार मुसंडी

    अमेरिकन डॉलरच्या खेळीची मोठी कमाल

    जागतिक बाजारात क्रूड ऑईलमध्ये दरवाढ

    राज्यातील सर्वच शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावात तफावत

    तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा सविस्तर 

  • 06 May 2023 08:00 AM (IST)

    पावसाळ्यापूर्वी नाशिक शहरातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

    रस्त्यांच्या डागडूजीसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडला महापालिकेला 140 कोटी रुपये प्राप्त

    गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खोदण्यात आले रस्ते, त्यामुळे वाहनधारकांची होते कसरत

    महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडला शहरात रस्ते खोदण्यासाठी देण्यात आली होती 30 एप्रिलची मुदत

    आता रस्ते खोदण्याची मुदत संपल्यानंतर महापालिका करणार रस्त्यांची दुरुस्ती

  • 06 May 2023 07:48 AM (IST)

    कर्नाटकात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा, वातावरण तापणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळूरूमध्ये रोडशो

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेळगाव जिल्ह्यात चार जाहीर सभा

    राहुल गांधी आज बेळगाव दौऱ्यावर, राहुल गांधी यांच्याही बेळगाव जिल्ह्यात तीन सभा

    काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही हुबळीमध्ये जाहीर सभा

  • 06 May 2023 07:18 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात अवकाळीने 702 घरांची पडझड

    3 दिवसांतील कहर, 390.2 हेक्टर शेतीचे नुकसान

    सततच्या नापिकीला तोंड देत शेतकरी थकला, सरकारने सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत

    अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने उन्हाळी धान, मक्याचे पीक उद्ध्वस्त झाले

    यंदा उन्हाळ्यात मार्चपासून अधून-मधून पाऊस सुरू आहे

    खरीपनंतर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे

    अवकाळी पावसाचा मुक्काम आता 7 मे पर्यंत लांबणार आहे

  • 06 May 2023 07:16 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला बसला तब्बल 750 कोटींचा फटका

    वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे संत्रा उत्पादनावर होणार थेट परिणाम

    अमरावती जिल्ह्यातील वरुड,मोर्शी, चांदूर बाजार,अचलपूरसह अनेक भागात संत्राचे मोठे नुकसान

    जिल्ह्यातील 25 ते 30 हजार हेक्टर वरील संत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

    उत्पादनात 50 ते 60 टक्के घट झाल्याची शेतकऱ्यांची माहिती

  • 06 May 2023 07:15 AM (IST)

    पुणे कॅन्टोन्मेंट आता महापालिकेत येणार?

    पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होण्याची शक्यता

    पुणे शहराची हद्द आणखीन वाढणार

    देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डमधील निवासी भाग लगतच्या महापालिकांमध्ये विलिन करण्याचं केंद्र सरकारचे नियोजन

    पुणे शहराची हद्द 1.65 चौरस किलोमीटरने वाढणार

  • 06 May 2023 07:14 AM (IST)

    राज ठाकरे यांची तोफ रत्नागिरीत धडाडणार; रडारवर कोण?

    राज ठाकरे रत्नागिरीतील रेस्ट हाऊसमध्ये दाखल, रत्नागिरीत सभेला संबोधित करणार

    राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

    राजकीय घडामोडींवर राज ठाकरे भाष्य करणार

  • 06 May 2023 07:07 AM (IST)

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसूत, आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा करणार

    आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे बारसू-सोलगावला येणार

    उद्धव ठाकरे बारसूत कातळशिल्पाची पाहणी करणार, नंतर 11.30 वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार

    त्यानंतर बारसूत सभेला संबोधित करणार आहेत.

Published On - May 06,2023 7:04 AM

Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.