Maharashtra Live Updates : पुण्यात भाजपच्या प्रचाराचं नारळ फुटलं, घडामोडींना वेग

| Updated on: Feb 10, 2023 | 2:20 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : पुण्यात भाजपच्या प्रचाराचं नारळ फुटलं, घडामोडींना वेग
MaharashtraImage Credit source: tv9 marathi

मुंबई: तुर्कीत झालेल्या भूकंपात आतापर्यंत 11 हजार लोक दगावले आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेला आजपासून सुरुवात. राष्ट्रवादीच्या कर्जत-जामखेड मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. नाना पटोले यांच्याकडे तसं पत्रं देण्यात आलं आहे. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Feb 2023 09:26 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त वाळूशिल्प साकारून अनोख्या शुभेच्छा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त वाळूशिल्प साकारून अनोख्या शुभेच्छा

    सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यातील सागरतीर्थ किनाऱ्यावर साकारले वाळूशिल्प

    वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं वाळूशिल्प

    वाळूशिल्प वाळू आणि रंगांचा वापर

  • 09 Feb 2023 08:31 PM (IST)

    कसब्यात भाजपासाठी मोठ्या नेत्यांची फौज मैदानात उतरणार

    पुणे : 

    कसब्यात भाजपासाठी मोठ्या नेत्यांची फौज मैदानात उतरणार

    नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस घेणार प्रचासभा

    तर पंकजा मुंडेंही कसब्यात असणार प्रचारक

    भाजककडून मोठ्या नेत्यांना निमंत्रण द्यायला सुरुवात

    भाजपचे मोठे नेते करणार कसब्यात प्रचार

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाहाही प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता

  • 09 Feb 2023 08:30 PM (IST)

    गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ

    फ्रांसच्या कंपनीने घेतला आखडता हात

    अदानी समूहावरील आरोपांची शहानिशा होईपर्यंत थांबविला प्रकल्प

    फ्रांसची कंपनी करणार होती 25 टक्के गुंतवणूक, वाचा सविस्तर

  • 09 Feb 2023 07:57 PM (IST)

    सातारा : बैलगाडी शर्यतीत युवकाचा मृत्यू

    सातारा : बैलगाडी शर्यतीत युवकाचा मृत्यू

    बोरखड येथे दोन बैलगाडींची धडक

    पुष्कर पवार या तरुणाचा अपघाती मृत्यू

    शर्यतीसाठी परवानगी घेतली नसल्याची माहिती

  • 09 Feb 2023 07:31 PM (IST)

    भारतीय राजकारणात मफलरचे महाभारत

    अदानी समूहावर विरोधक तुटून पडले

    सत्ताधाऱ्यांनी शोधून काढला मफलरचा विषय

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मफलरचा काय आहे मुद्या

    या मफलरच्या किंमतीवरुन सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, वाचा बातमी 

  • 09 Feb 2023 06:51 PM (IST)

    पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक पेटला

    कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ भरस्त्यात घेतला ट्रकने पेट

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय

    अचानक घडलेल्या घटनेमुळे महामार्गावरील इतर वाहनधारकांची उडाली तारांबळ

  • 09 Feb 2023 06:41 PM (IST)

    चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज केलेल्या 33 उमेदवारांपैकी एकानेही माघार घेतली नाही

    पुणे : 

    - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये वैध ठरलेल्या 33 नामनिर्देशित उमेदवारांपैकी आज कोणत्याही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र माघार घेतलेले नाही

    - उद्या 10 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत आहे

  • 09 Feb 2023 05:57 PM (IST)

    बुलेट ट्रेन विरोधातील याचिका फेटाळली

    बुलेट ट्रेन विरोधातील याचिका फेटाळली

    प्रकल्प देशासाठी महत्वाचा

    मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य

    प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार

  • 09 Feb 2023 05:56 PM (IST)

    कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा

    टीम इंडियाची पहिल्या कसोटीवर मजबूत पकड पहिल्या दिवसाचा खेळ-

    ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिला डाव सर्वबाद - 177 भारत -  77-1 रोहित शर्मा नाबाद 56 धावा के एल राहुल 20 धावा आर. आश्विन नाबाद 0 धावा

  • 09 Feb 2023 05:40 PM (IST)

    महारत्न कंपनीचा गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न

    दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने झाले मालामाल

    सरकारी कंपनीने गुंतवणुकीवर 200 पट दिला परतावा

    लाभांश ही दिला, चारवेळा दिला बोनस, झाला मोठा फायदा, वाचा बातमी

  • 09 Feb 2023 05:23 PM (IST)

    सात लाखांची बॅग चोरली

    नांदेड विमानतळावर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने केली चोरट्यास अटक

    चोरीला गेलेली बॅग शोधण्यात पोलिसांना यश

    एका लग्न सोहळ्यातून सात लाख रुपये रोकड लंपास

  • 09 Feb 2023 05:09 PM (IST)

    चिमणराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर केली आगपाखड

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला खूप अडचणी होत्या

    कामं होत नव्हते, संवाद नव्हता, म्हणून आम्ही कंटाळलो होतो

    शिंदे यांच्या आमदाराने उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

  • 09 Feb 2023 05:04 PM (IST)

    पुण्यात भाजपच्या प्रचाराचं नारळ फुटलं

    पुण्यात पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचं नारळ फुटलं

    भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन

    कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा प्रचार सुरु

  • 09 Feb 2023 04:45 PM (IST)

    हिटमॅन रोहित शर्माचं अर्धशतक

    कॅप्टन रोहित शर्मा यांचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक

    रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील 15 वं अर्धशतक

    टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 100 धावांनी पिछाडीवर

    ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 177 धावांवर ऑलआऊट

  • 09 Feb 2023 04:44 PM (IST)

    आज सोने-चांदीचा भाव वधारला

    वायदे बाजारात सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या पुढे

    चांदीचा भाव 67,700 रुपयांच्या जवळपास

    सराफा बाजारात ही सोन्या-चांदीची उसळी, वाचा बातमी

  • 09 Feb 2023 04:39 PM (IST)

    IND vs AUS | टीम इंडियाला पहिला झटका, केएल राहुल आऊट

    भारताला 76 धावांवर पहिला धक्का

    केएल राहुल 20 धावा करुन तंबूत

    टीम इंडिया अजून 101 धावांनी पिछाडीवर

    ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 177 धावांवर खुर्दा

  • 09 Feb 2023 04:25 PM (IST)

    रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 विकेट्स

    रवींद्र जाडेजाचं ग्रॅंड कमबॅक, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 5 विकेट्स

    जाडेजाने कांगारुंना फिरकीवर नाचवलं

    ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 177 धावांवर खुर्दा

    सविस्तर बातमी

    Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याचा 'पंच', ऑस्ट्रेलियाला फिरकीवर नाचवलं

  • 09 Feb 2023 04:20 PM (IST)

    राहुल कलाटे आणि सचिन अहिर यांच्यात उद्या भेट होणार

    पिंपरी चिंचवड : महाविकासआघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांना उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर उद्या भेटणार आहेत,

    उद्धव ठाकरेंनी त्यांना माझ्याकडं पाठवलं असेल, असं मला वाटतं. असं राहुल कलाटे म्हणाले.

    काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही. जन भावनेचा मी अनादर करू शकत नाही.

  • 09 Feb 2023 04:14 PM (IST)

    अभिनेता प्रभास याची प्रकृती खराब

    अभिनेता प्रभास यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळतंय.

    प्रभासची प्रकृती खराब झाल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबवले

    आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबवले

  • 09 Feb 2023 04:12 PM (IST)

    'चिंचवडची जबाबदारी ही सुनील शेळके यांना देण्यात आलीय', अजित पवार यांची माहिती

    अजित पवार  यांची प्रतिक्रिया :

    - चिंचवडची जबाबदारी ही सुनील शेळके यांना देण्यात आली आहे

    - चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि सेनेची बैठक घेऊन आलोय

    - निवडणूक काळात 15 तास काम करावे

    - आज परिस्थिती वेगळी आज राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना एकत्र आहेत

    - संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराबद्दल उद्धव ठाकरे बोलणार आहेत

    - मतांची विभागणी होणार नाही याची काळजी घ्या

    - रविवारी महाविकास आघाडीची बैठक लावली आहे

  • 09 Feb 2023 03:31 PM (IST)

    आता गाढवांनाही महत्व आले, चोरट्यांनी चोरली १२ गाढवे

    चोरीच्या वेगवेगळ्या घटना आपण ऐकल्या आहेत. परंतु आता काही पठ्ठ्यांनी चक्क गाढवांची चोरी केली आहे. पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिसांना गाढवांचा शोध घ्यावा लागणार आहे....वाचा सविस्तर

  • 09 Feb 2023 02:23 PM (IST)

    मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

    राज्यसभेतून मोदी लाईव्ह

    मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ

    पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना आखल्या

  • 09 Feb 2023 02:16 PM (IST)

    राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू

    मोदी, अदानी भाई भाई विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

    बंद करो, बंद करो, भाषणबाजी बंद करोचा नारा

    विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू

  • 09 Feb 2023 02:12 PM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बिबट्या जेरबंद

    पिंपरखेड येथे दहशत माजविणाऱ्या बिबट्या बंधिस्त

    वन विभागाला मिळाले मोठे यश

    पाच दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद

  • 09 Feb 2023 12:37 PM (IST)

    उल्हासनगर महापालिकेत 550 कोटी टॅक्स थकबाकी

    यंदा मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा आयुक्तांचा इशारा

    10 महिन्यात फक्त 35 कोटींची झाली वसुली

    अभय योजनेलाही करबुडव्यांचा प्रतिसाद नाही

  • 09 Feb 2023 12:24 PM (IST)

    मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर सिक्युरीटी चेकींगसाठी लांबलचक रांगा

    मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर सिक्युरीटी चेकींगसाठी लांबलचक रांगा

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - 2 वर प्रवाशांच्या रांगा

    टर्मिनल - 2 वर गुरूवारी पहाटे मोठ्या रांगा पहायला मिळाल्या आहेत

    एका प्रवाशाने  टर्मिनल - 2 चा व्हिडीओ शेअर केला आहे

  • 09 Feb 2023 12:21 PM (IST)

    हजारोंच्या गर्दीत वळू उधळला, 14 जण जखमी

    स्मानाबाद शहरामधून (Osmanabad) धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम सुरु असताना वळू (Bull) उधळला....वाचा सविस्तर

  • 09 Feb 2023 11:38 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : रोहित-द्रविडची ही कुठली चाल? एका महिन्यात 5 सेंच्युरी झळकवणाऱ्याला बसवलं बाहेर

    नागपूर टेस्टमध्ये रोहितने एका मोठ्या मॅचविनरला बाहेर बसवलं. वाचा सविस्तर....

  • 09 Feb 2023 11:19 AM (IST)

    प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

    पुणे : आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना,

    हिंगोली पोलीस अधीक्षकांकडून मागवला अहवाल,

    अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घटनेचा केला निषेध.

  • 09 Feb 2023 11:10 AM (IST)

    आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरला जवानाची लाकडी दांडक्याने मारहाण, कारण...

    आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरला जवानाची लाकडी दांडक्याने मारहाण, कारण...

    kalyan : आरपीएफच्या जवानाची सब इन्स्पेक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण, कारण समजताच...

  • 09 Feb 2023 11:02 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन गावात होतेय आदित्य ठाकरे यांची सभा

    सभेसाठी 200 पोलीस आणि 25 अधिकाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त

    औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनीष कलवानिया सकाळपासून बिडकीन गावात तळ ठोकून

    अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि डीवायसपी सभास्थळावर तळ ठोकून

    आदित्य ठाकरे यांच्या सभेला चारही बाजूने कडक पोलीस बंदोबस्त

  • 09 Feb 2023 10:42 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : Mohammed Shami चा घातक चेंडू, वॉर्नरची दांडी गुल, अरे बापरे किती लांब उडाला स्टम्प VIDEO

    Mohammed Shami समोर वॉर्नर काहीच करु शकला नाही, स्टम्प किती लांब उडाला ते एकदा इथे क्लिक करुन या VIDEO मध्ये बघा.

  • 09 Feb 2023 10:28 AM (IST)

    ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता मोजा पैसे

    ट्विटरने सुरु केली सशुल्क सेवा

    भारतातील युझर्सलाही मोजावे लागतील पैसे

    दरमहा युझर्सच्या खिशाला मोठा दंडम, वाचा बातमी

  • 09 Feb 2023 09:59 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात

    पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली आहे. 5 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाची 20/2 स्थिती आहे. भरवशाचे ओपनर डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात बाद झाले. वॉर्नरला (1) रन्सवर मोहम्मद शमीने बोल्ड केलं. ख्वाजाला (1) रन्सवर मोहम्मद सिराजने LBW केलं.

  • 09 Feb 2023 09:52 AM (IST)

    थोड्या वेळात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार

    थोड्या वेळात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार

    मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत सुरुवात

    ओंकारेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात

    कार्यकर्ते जमायला सुरुवात

    ओंकारेश्वर मंदिरापासून निघणार पदयात्रा

  • 09 Feb 2023 09:50 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा!

    त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

  • 09 Feb 2023 09:36 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : पहिल्या कसोटीत टीम इंडियाकडून आज 'या' दोन खेळाडूंनी केला डेब्यु

    Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियाकडून एका खेळाडूचा डेब्यु, एकूण तीन प्लेयर्सचं पदापर्ण. कोण आहेत ते तिघे? वाचा सविस्तर....

  • 09 Feb 2023 09:35 AM (IST)

    आता डिजिटल लवकरच तुमच्या शहरात

    डिजिटल रुपयाची लोकप्रियता वाढली

    दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरांचा समावेश

    पहिल्याच दिवशी 1.71 कोटी रुपयांचे डिजिटल चलन

    वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांची संख्या वाढली, वाचा सविस्तर

  • 09 Feb 2023 09:19 AM (IST)

    भाजपच्या पदयात्रेत आजपासून शैलेश टिळक आणि कुणाल टिळक सहभागी होणार

    शैलेश टिळक उमेदवारी अर्ज भरताना गैरहजर राहिल्यानं नाराज असल्याच्या होत्या चर्चा

    मात्र आजपासून भाजपच्या प्रचारात सहभागी होणार ..

    सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार

  • 09 Feb 2023 09:10 AM (IST)

    कसबा पोटनिवडणूक : आजपासून भाजपच्या पदयात्रेत शैलेश टिळक आणि कुणाल टिळक सहभागी होणार

    शैलेश टिळक उमेदवारी अर्ज भरताना गैरहजर राहिल्यानं नाराज असल्याच्या होत्या चर्चा

    मात्र आजपासून भाजपच्या प्रचारात सहभागी होणार

    सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार

  • 09 Feb 2023 09:10 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : कोणी जिंकला टॉस ?

    कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11 वाचा सविस्तर.....

  • 09 Feb 2023 08:39 AM (IST)

    पश्चिमी राष्ट्रांसह अमेरिकेला तेल कंपन्यांचा गुंगारा

    स्वस्तात कच्चे तेल खरेदीसाठी UAE Plan

    रुपया-रुबलाच्या माध्यमातून तेल खरेदी

    पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईला आणखी किती दिवस? वाचा सविस्तर

  • 09 Feb 2023 08:32 AM (IST)

    भाजप प्रदेश कार्यकारिणीची उद्यापासून दोन दिवस नाशिकमध्ये बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन राहणार उपस्थित

    अमित शाह यांची सभा मात्र रद्द

    अमित शाह बैठकीला राहणार अनुपस्थित

    राज्यातील आमदार, खासदार, मंत्र्यांची असणार उपस्थिती

    प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत 150 ठराव मांडले जाणार

  • 09 Feb 2023 08:25 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : David Warner च्या मैदानातील एका कृतीने टीम इंडियाला बसेल मोठा झटका, त्याने प्लानिंगच केलय तसं, VIDEO

    Ind vs Aus 1st Test : त्यावेळी David Warner ची मैदानातील बॅटिंग पाहून सगळेच चक्रावतील. स्वत: वॉर्नरनेच याची कल्पना दिलीय. वाचा सविस्तर....

  • 09 Feb 2023 08:06 AM (IST)

    उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबी चौकशी प्रकरण

    रत्नागिरी : आज आमदार राजन साळवी यांना अ्लिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना,

    राजन साळवी यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एसीबी कार्यालयाकडे मागितला वेळ,

    वाढीव वेळ देण्यास रायगडच्या अलिबाग एसीबी कार्यालयाकडून मंजूरी,

    चौकशीसाठी एसीबी कार्यालयाने साळवी यांना तिसऱ्यांदा १५ फेब्रुवारीला हजर राहण्याची दिली सुचना.

  • 09 Feb 2023 07:45 AM (IST)

    Ind vs Aus 1st Test : 2 प्लेयर, 1 जागा, कोणाला खेळवायच? त्यावरुन रोहित-राहुलमध्ये मतभेद ?

    Ind vs Aus 1st Test : आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना. 2 प्लेयरवरुन कॅप्टन-कोचमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा. वाचा सविस्तर.....

  • 09 Feb 2023 07:11 AM (IST)

    कसबा मतदारसंघात आज काँग्रेसच्या प्रचाराला होणार सुरुवात

    तांबडी जोगेश्वरी मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ केला जाणार

    महाविकास आघाडीचे पदाधिकारी होणार पदयात्रेत सहभागी

    कसब्याचे काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटेंच्या नेतृत्वात होणार शुभारंभ

  • 09 Feb 2023 07:04 AM (IST)

    अजित पवारांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष घालायला केली सुरुवात

    पुणे : आज चिंचवड आणि कसब्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेणार स्वतंत्र बैठक,

    अजित पवार आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या देणार सूचना,

    अजित पवार कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन करणार.

    अजित पवारांचा आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा.

  • 09 Feb 2023 06:28 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी पुलाचं होणार लोकार्पण

    लोकार्पणानंतर कोपरी पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार

    गेल्या अनेक दिवसापासून काम होतं सुरू

    ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका

    मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा कोपरी उड्डाणपूल हा वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा

  • 09 Feb 2023 06:26 AM (IST)

    निविदा न काढता, विना परवानगी केडीएमसीच्या मैदानात बांधकाम सुरू

    मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली कारवाईची मागणी

    पालिका प्रशासनाच्या लक्षात येताच महापालिकेने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दिली लेखी तक्रार

    केडीएमसी परिसरात मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामाची 75 लाखांची निविदा प्रस्तावित असतानाही सुरू होते काम

  • 09 Feb 2023 06:24 AM (IST)

    गोंदियात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला दामिनी पथकाने पकडले

    दोन महिन्यांपासून देत होता त्रास

    तरुणीला अश्लील मेसेज पाठवायचा

    डार्क वेबचा वापर करून करत होता मेसेज

  • 09 Feb 2023 06:22 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज भंडाऱ्यात महाआरोग्य शिबीर

    रक्तदानासह विविध रोगांवर होणार उपचार

    बाळासाहेबांची शिवसेनाद्वारे रक्तदान शिबिराचं आयोजन

    आरोग्य शिबीरात थॅलेसिमीया, थॉयरॉईड, हृदयरोग, दंतचिकित्सा, अस्थिरोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आदी तपासण्या

    दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेच ई-कार्ड वाटप होणार

    तसेच दिव्यांग व्यक्तींना बॅटरी ट्रायसिकल, माता आणि बाल कीट तथा नेत्र तपासणी करून गरजूंना चष्मे वाटप करण्यात येणार

Published On - Feb 09,2023 6:12 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.