Maharashtra Breaking News Live : शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या मंत्रालयात बैठकीसाठी पोहोचणार, दोन मंत्र्यांसोबतच्या सकारात्मक चर्चा

| Updated on: Mar 16, 2023 | 6:05 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या मंत्रालयात बैठकीसाठी पोहोचणार, दोन मंत्र्यांसोबतच्या सकारात्मक चर्चा
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : सोलापुरात भव्य बैलगाडी मोर्चाचं आयोजन. जमिनीच्या सातबाऱ्यावरून एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खडाजंगी होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा लाँगमार्च नाशिकच्या खंबाळे येथे पोहोचला. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Mar 2023 10:42 PM (IST)

    माझं असं म्हणणं नाही की, सगळ्याच मागण्या मान्य होतील : दादा भुसे

    शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया :

    या मोर्चाच्या एकूण 14 मागण्या आहे

    यावर कमी-अधिक प्रमाणात चर्चा झाली

    सर्व विषय मार्गी लागणार नाही, पण अनेक योजना याबाबत निर्णय झाले आहेत

    40 ते 50 टक्के मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली

    माझं असं म्हणणं नाही की, सगळ्याच मागण्या मान्य होतील

    उद्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा होईल

    विश्वास आहे की, सरकार सकारात्मक चर्चा होईल

    उद्या 3 वाजता बैठक होणार

    त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, लाँगमार्च पुढे जाईल

    त्यांना जर उद्याच्या बैठकीत सकारात्मक वाटले, तर ते मोर्चा थांबवण्याचा निर्णय घेतील

  • 15 Mar 2023 10:38 PM (IST)

    बऱ्याच विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, शेतकऱ्यांचा लाँगमार्च थांबणार?

    शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर माजी आमदार जिवा पांडू गावित यांची प्रतिक्रिया :

    आज जी बैठक झाली, त्यात दोन मंत्री होते, दादा भुसे आणि अतुल सावे, आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित होते.

    बऱ्याच विषयांवर सकारात्मक चर्चा झाली

    उद्या तीन वाजता बैठक होईल

    आम्ही बैठकीला जाणार

    आम्ही मंत्रालयात जाण्याचे मान्य केले

    मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली

    अंतिम निर्णय मंत्रालयात होईल

    CM, DCM, संबंधित मंत्री यांच्यात व्यवस्थित चर्चा झाली तर, आम्ही लाँगमार्च थांबवू

    पण जर समाधान झाले नाही तर, लाँगमार्च चालूच राहील

    कळंब नावाच्या गावी आमचा मुक्काम आहे

    उद्या मोर्चा चालूच राहील

    जर सकारात्मक चर्चा झाली नाही,  तर विधान भवनावर मोर्चा जाईल.

    40 टक्के उत्तरं मिळाली आहेत

    उरलेल्या उत्तर CM, DCM सोबत मिळतील

    वन जमिनी या विषयावर दोन्ही मंत्र्यांनी फारशी चर्चा केली नाही

    वन जमिनी यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील

  • 15 Mar 2023 10:36 PM (IST)

    शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच बैठक घेण्यावर ठाम

    - शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच बैठक घेण्यावर ठाम

    - बैठकीला संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक (शिष्टमंडळाने सरकारच्या प्रतिनिधींसमोर घातली अट)

    - लाँगमार्च दरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लेखी टाईमबाँड करावा (शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठकीत भूमिका)

    - शहापूर तहसील कार्यालयात बंद दाराआड सुरू असलेल्या चर्चेची सूत्रांनी दिली माहिती

  • 15 Mar 2023 09:07 PM (IST)

    दर्या किनारी एक बंगलो गं..

    मुंबईत सर्वाधिक महागड्या घराचा अजून एक सौदा

    उद्योगपतीने खरेदी केले समुद्रकिनारी पेंटहाऊस

    किंमत एवढी की एखादं शहर वसेल, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 08:18 PM (IST)

    धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

    धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा भागात अवकाळी पावसाची हजेरी

    वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस.

    रब्बी पिके, फळबागांचं प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल

  • 15 Mar 2023 08:16 PM (IST)

    या मल्टिबॅगर शेअरचा अजूनही धुमाकूळ

    गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी

    पॉवर, इन्फ्रा या क्षेत्रात मिळाल्या मोठ्या ऑर्डर

    आता लवकरच मोठे प्रकल्प येणार हाती

    दीर्घकालीन गुंतवणूकदार अगोदरच झाले करोडपती, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 08:11 PM (IST)

    पुण्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पाऊस

    पुणे : 

    पुण्यातील काही भागात पाऊस,

    धायरी, पौड रोड, वडगाव मावळ भागात विजांचा कडकडाटासह पाऊस

  • 15 Mar 2023 07:24 PM (IST)

    अवघ्या 13 रुपयांचा शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष

    आताच 11 टक्क्यांची तेजी, वर्षभरात मात्र निगेटिव्ह परतावा

    रिलायन्सची टेक्साटाईल क्षेत्रात वाढली गुंतवणूक

    हा Penny Share ठरु शकतो लंबी रेस का घोडा

    गुंतवणूकदार काही वर्षात होऊ शकतात मालामाल, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 06:45 PM (IST)

    जाणता राजाच्या प्रयोगाला राज ठाकरेंची हजेरी

    मुंबई :

    मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून 'जाणता राजा' महानाट्याचं आयोजन.

    मनसे अध्यक्ष  राज ठाकरे आणि त्यांच्या  पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित

  • 15 Mar 2023 06:36 PM (IST)

    कोण आहेत सौरभ अग्रवाल

    14 लाख कोटींच्या कंपनीची सूत्रे यांच्या हातात

    पगाराचा आकडा ऐकून तोंडात जाईल बोट

    या पगारात दर महिन्याला खरेदी करता येतील महागड्या वस्तू

    उच्च शिक्षणासह कॉर्पोरेट जगताचा आहे दीर्घ अनुभव, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 05:26 PM (IST)

    H3N2 बाबत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरोग्य विभागाची बैठक

    मुंबई :

    H3N2 बाबत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरोग्य विभागाची बैठक

    नवीन गाईडलाईन्स लावावी का? मास्क वापरावा का? याबाबत उद्याच्या बैठकीत होणार चर्चा

    आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती

    'काही लक्षणे आढळली तर ती अंगावर न काढता वेळीच उपचार घ्या'

    आरोग्य मंत्र्यांचे लोकांना आवाहन

  • 15 Mar 2023 04:49 PM (IST)

    मुकेश अंबानी कुकला देतात एवढा पगार

    जेवणात आवडतात हे पदार्थ

    आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की

    ॲंटिलियातील इतर कर्मचाऱ्यांना देण्यात येते इतकी सॅलरी

    ड्रायव्हरचे वेतन तर झाले आहे जगजाहीर, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 04:29 PM (IST)

    मुंबईच्या दिशेने निघालेले शेतकरी सोलापूर शहरात पोहोचले

    मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढत 100 हून अधिक शेतकरी कुटुंबासह मुंबईकडे रवाना

    आमच्या शेतावरील सातबाऱ्यावर MIDC ची नोंद झालेली आहे. ती निघावी यासाठी आम्ही आमच्या लहान पोरांना घेऊन निघालोय

    चार वर्षे झाले आम्हाला शेतीवर कर्ज मिळत नाही त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न आहे

    आमच्या मुलांना सांभाळायची आम्हाला ताकत नाही, गुरे सांभाळणे आम्हाला मुश्किल झाले

    MIDC चा शेरा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

    मागील सहा महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतोय. मात्र सरकारकडून केवळ आश्वासने दिले जातात

    आमदार, उद्योग मंत्री, सचिव सर्वच लोक आम्हाला सांगताहेत की तुमच्या शेतीवर MIDC होणार नाही. मात्र जोपर्यंत सातबारा उताऱ्यावर आमचे नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही

    आम्ही आता मुंबईला वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार

    जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही

    बँक लोन न मिळाल्यामुळे यंदाच्या वर्षी उत्पादन घेता आले नाही. शेती तशीच पडीक आहे.

    मग आम्हाला MIDC साठी शेती द्यायचीच नाही. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. शेतीवरच आमची गुजराण आहे

    मुळात आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला विश्वासातच घेतले नाही.

    आधी उताऱ्यावर नाव चढवले नंतर नोटीस पाठवली त्यामुळे आमचा सातबारा उताऱ्यावर आमचे नाव लावा ही एकच मागणी

  • 15 Mar 2023 04:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राज्य सरकारवर घणाघात

    मुंबई : 

    उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राज्य सरकारवर घणाघात

    'घरी बसून मला जे जमलं ते त्यांना गुवाहाटी, दिल्लीला जावून जमलं नाही', उद्धव ठाकरे यांची टीका

    मला विकाऊ माणसं नको, लढाऊ माणसं हवे आहेत - उद्धव ठाकरे

    एकतर भाजपात, नाहीतर तुरुंगात अशी परिस्थिती आहे - उद्धव ठाकरे

    कुणाच्या म्हणण्यानुसार भूमिका घेणं ही लाचारी - उद्धव ठाकरे

  • 15 Mar 2023 02:58 PM (IST)

    नागपूरात विज दरवाढी विरोधात आंदोलन

    वीज दरवाढीविरोधात जय विदर्भ पार्टी आक्रमक, वीज बिल जाळून आंदोलन

    आंदोलकांकडून मोदी सरकार आणि शिंदे सरकार विरोधात नारेबाजी

    कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न

    नागपूरच्या व्हेरायटी चौकात करण्यात येत आहे आंदोलन

  • 15 Mar 2023 02:50 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या मोर्चाकडे सरकारचं लक्ष नाही, उद्धव ठाकरे यांची टीका

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही

    शेतकऱ्यांशी बोलून राज्य सरकारने त्यांचा प्रश्न सोडवावा

    जुन्या पेन्शन योजनेला आमचा पाठिंबा

    उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

  • 15 Mar 2023 02:28 PM (IST)

    पिंपरी महापालिकेचे संपावर असणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश

    पिंपरी चिंचवड : संपावर असणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत,

    त्यानुसार नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आलेत,

    संबंधित विभाग प्रमुखांकडून तशा नोटिसा धाडण्यास सुरुवात झालीये,

    त्यामुळं हे अधिकारी-कर्मचारी आजचं रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

  • 15 Mar 2023 01:17 PM (IST)

    "तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी"- फडणवीस

    शिंदे गटाच्या बंडावरून देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

    रामदास आठवलेंच्या स्टाइलमध्ये फडणवीसांचा अजित पवारांना टोला

  • 15 Mar 2023 01:10 PM (IST)

    ENG vs BAN : 'हॅलो, मायकल वॉन....' Wasim Jaffer यांनी आपल्या स्टाइलमध्ये झोडलं, ते टि्वट व्हायरल

    ENG vs BAN : गमतीने मायकल वॉनच्या जखमेवर मीठ चोळलं. जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर आता वॉन काय उत्तर देणार? वाचा सविस्तर.....

    wasim jaffer

  • 15 Mar 2023 01:06 PM (IST)

    पुण्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरीचे संवर्धन करणार

    मालोजी राजे भोसले यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणखी एक निर्णय

    मालोजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा

    जुनी कचेरी म्हणजे मालोजी राजे यांची गढी

    गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींची तरतूद

    या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

    पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

  • 15 Mar 2023 01:04 PM (IST)

    बायोगॅस टाकीत गुदमरुन चौघांचा मृत्यू

    बारामती : शेतातील बायोगॅस टाकीची स्वच्छता करताना अडकला होता एकजण,

    एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य तिघांचाही मृत्यू,

    बारामती तालुक्यातील खांडज येथील दुर्दैवी घटना,

    टाकीत गुदमरल्याने गमवावे लागले चौघांना प्राण.

  • 15 Mar 2023 01:01 PM (IST)

    pune : चांदणी चौक पुलाचे 86 टक्के काम पूर्ण झाले आहे

    - चांदणी चौक पुलाचे 86 टक्के काम पूर्ण झाले आहे

    - येत्या मेपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार आहे

    - 1 मेला उदघाटन होणार असल्यामुळे आज मी या कामाचा आढावा घेतलाय

    - सध्या चांदणी चौकात 6 लेन सुरू आहेत, पुलाचे उदघाटन झाल्यावर अजून 2 लेन सुरू होणार

    - त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूककोंडी 100 टक्के मिटणार अहव

  • 15 Mar 2023 12:31 PM (IST)

    अहमदनगरला H3N2  इन्फ्लुएन्झाचा पहिला मृत्यू, पुढील उपयोजनांसाठी बैठक

    अहमदनगरला H3N2  इन्फ्लुएन्झाचा पहिला मृत्यू नगरमध्ये झाल्याने प्रशासन अलर्टमोड वर

    सध्या यासंदर्भात तातडीने बोलावली बैठक

    तर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक सुरुये

    MBBS चे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता

    या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून पुढील उपयोजनांसाठी बैठक सुरू

  • 15 Mar 2023 12:29 PM (IST)

    Harbjan Singh : आध ढकललं, मग पाडलं, अरे हरभजन सिंग वाळवंटात हे काय करतोय? VIDEO व्हायरल

    Legends league cricket : हरभजन सिंगच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल. समोरच्याला हरभजनने खाली पाडून लोळवलं. वाचा सविस्तर.....

    harbhajan singh

  • 15 Mar 2023 12:05 PM (IST)

    Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणी बंद लिफाफ्यात पुरावे पोलिसांच्या हातात

    Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांची नावे समोर, पोलिसांच्या हातात बंद लिफाफ्यात कोणी दिले पुरावे?

    सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ... वाचा सविस्तर

  • 15 Mar 2023 11:57 AM (IST)

    प्रसिद्ध गायकाच्या टिळक समारंभात फायरिंग; 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ

    बक्सरमधील हेठुआ गावात भोजपुरी गायक ब्रजेश सिंहचा टिळक समारोह

    टिळक समारोहाचा जल्लोष सुरू असताना त्याठिकाणी अचानक गोळीबार

    जमावात उपस्थित असलेल्या 13 वर्षीय मुलाला लागली गोळी

    उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू, वाचा सविस्तर..

  • 15 Mar 2023 11:52 AM (IST)

    Entertainment News Live : दिग्गज अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

    'नुक्कड' फेम अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

    मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास घेतला अखेरचा श्वास, वाचा सविस्तर..

  • 15 Mar 2023 11:51 AM (IST)

    विरोधी पक्षातील खासदारांचा आज ईडी कार्यालयावर मोर्चा

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत होणार मोर्चात सहभागी,

    संसद भवन परिसराला पोलिसांचा घेराव,

    बाहेर येणारे मार्ग बँरीकेटींग करून केले बंद,

    विरोधी खासदारांना विजय चौकातचं अडवलं जाण्याची शक्यता,

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 15 Mar 2023 11:50 AM (IST)

    IPL 2023 सुरु होण्याआधी किती खेळाडूंना दुखापती? दोन टीम्सना सर्वात जास्त फटका, यादी एका क्लिकवर

    IPL 2023 सुरु होण्याआधी किती खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर. वाचा सविस्तर....

    IPL 2023

  • 15 Mar 2023 11:48 AM (IST)

    National News Live : 60 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाला सुखरूप काढलं बाहेर

    मध्य प्रदेशातील विदिशामध्ये घडली घटना

    SDRF च्या 3 आणि NDRF च्या टीमने केले शर्थीचे प्रयत्न

  • 15 Mar 2023 11:40 AM (IST)

    विरोधी पक्षातील खासदारांचा आज ईडी कार्यालयावर मोर्चा

    विरोधी पक्षातील खासदारांचा आज ईडी कार्यालयावर मोर्चा

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत होणार मोर्चात सहभागी

    संसद भवन परिसराला पोलिसांचा घेराव

    बाहेर येणारे मार्ग बँरीकेटींग करून केले बंद

    विरोधी खासदारांना विजय चौकातचं अडवलं जाण्याची शक्यता

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

  • 15 Mar 2023 11:26 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये परिचारिकांच्या संपामुळे 15 शस्त्रक्रिया रद्द

    दोन हजार आरोग्य कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णांना भोगावे लागतात परिणाम

    रुग्णांचे हाल होत असून कचरा आणि अस्वच्छतेने घाटी परिसरात पसरली दुर्गंधी

    घाटी रुग्णालयात दररोज 1200 रुग्ण दाखल होतात मात्र संपामुळे फक्त 956 दाखल

    जुन्या पेन्शन साठी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या रुग्णांचे हाल

  • 15 Mar 2023 11:13 AM (IST)

    आमदार खासदारांनी पेंशन घेऊ नये म्हणजे कोणतेच कर्मचारी पेंशन मागणार नाही - बच्चू कडू

    अमरावती : 75 आमदार खासदारांना पेन्शनची गरज नाही पगार वाढीची गरज नाही,

    जास्त काम करणाऱ्याला कमी पगार आणि कमी काम करणाऱ्याला जास्त पगार दिला जातो,

    पेंशन जर 30 हजार जात असेल तर काय काम आहे..पगारात मोठी विषमता आहे,

    आरोग्य आणि शिक्षण विभागातील संपकऱ्यावर बंधन घातले पाहिजे - बच्चू कडू

  • 15 Mar 2023 11:05 AM (IST)

    Smriti Mandhana च्या नशिबात काय लिहिलय? आज होणार फैसला

    स्मृती मांधना भारतीय महिला क्रिकेटमधील यशस्वी खेळाडू, पण नशिबाची साथ नाहीय. वाचा सविस्तर.....

  • 15 Mar 2023 11:04 AM (IST)

    केंद्रीय यंत्रणांकडून फक्त विरोधकांवर कारवाई होतेय- संजय राऊत

    ठाकरे परिवाराला टार्गेट करण्याचं राजकारण सुरू - संजय राऊत

    गौरी भिडेंमागचा सुत्रधार कोण? - संजय राऊत यांचा सवाल

    हिशोब खोकेवाल्यांना मागायला पाहिजे होता - संजय राऊत

  • 15 Mar 2023 11:02 AM (IST)

    तुमच्या पीएफ खात्यात जमा झाले का व्याज?

    यावेळी व्याजदर कमी होणार का

    खातेदारांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता

    व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात निच्चांकी स्तरावर

    घर बसल्या तपासा शिल्लक रक्कम, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 10:13 AM (IST)

    रशियाच्या स्वस्त कच्चा तेलावर कोण भाजतंय पोळी

    या कंपन्यांना होत आहे मोठा फायदा

    इकडे जनता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने हैराण

    कंपन्यांना स्वस्त इंधनामुळे कमाईचा चान्स

    पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होणार केव्हा

    जनतेला मिळणार दिलासा केव्हा, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 09:51 AM (IST)

    VIDEO : 6,6,6,4,4,4, Robin Uthappa चा पाकिस्तानच्या प्रोफेसवर हल्लाबोल, जाम धुतलं

    पाकिस्तानचा प्रोफेसर रॉबिन उथाप्पाच्या बॅटचा तडाखा कधी विसरणार नाही. वाचा सविस्तर.....

  • 15 Mar 2023 09:50 AM (IST)

    फक्त KL Rahul ला खेळवण्यासाठी टीम इंडिया आता 'या' खेळाडूचा बळी देणार?

    सुनील गावस्करांची इच्छा आहे की, केएल राहुलला खेळवाव, म्हणून ते म्हणतात, की....वाचा सविस्तर.....

  • 15 Mar 2023 09:49 AM (IST)

    Team India : रोहितच्या नेतृत्वात बुमराहसारखाच दुसरा घातक बॉलर 2 वर्षापासून फक्त सिलेक्शनची वाट पाहतोय

    Team India : टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा या गुणी गोलंदाजाने आपला दबदबा निर्माण केला होता. पण आता त्याच नाव कोणाच्याही लक्षात नाहीय. वाचा सविस्तर....

  • 15 Mar 2023 09:23 AM (IST)

    सोन्याने उभारली महागाईची गुढी

    भावात मारली जोरदार मुसंडी

    यापूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता

    एक तोळ्यासाठी आता होणार एवढा खर्च

    सोन्याच्या भाववाढीने अनेकांना फुटला घाम

    चांदीच्या दरात किलोमागे भरमसाठ वाढ, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 08:51 AM (IST)

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतमालाची खरेदी विक्री होणार

    ढगाळ वातावरणामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ते 18 मार्च पर्यत राहणार होती बंद

    पण आज अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जाणार

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसचिवांची माहिती

  • 15 Mar 2023 08:37 AM (IST)

    वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या इंधनाचा भाव

    तेल कंपन्यांची अनेक दिवसांपासून चंगळ

    सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा कधी

    किरकोळ महागाई दर कमी, इंधनाचे दर कधी होतील कमी

    सरकार कधी भरणार स्वस्ताईची हमी, वाचा बातमी 

  • 15 Mar 2023 08:33 AM (IST)

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतमालाची खरेदी विक्री होणार....

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतमालाची खरेदी विक्री होणार....

    ढगाळ वातावरणामुळे मूळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ते 18 मार्च पर्यत राहणार होती बंद...

    पण आज अमरावती मध्ये ढगाळ वातावरण नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जाणार...

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसचिवांची माहिती.

  • 15 Mar 2023 08:10 AM (IST)

    Russia Ukraine युद्धात USA ची एंट्री? रशियाने अमेरिकेच शक्तीशाली फायटर विमान पाडलं

    Russian Fighters shoot down American Reaper Drone : कुठे झाली ही कारवाई? अमेरिका-रशियाच सैन्य अलर्टवर. दरम्यान आता या युद्धाला एक वेगळं वळणं लागू शकतं. वाचा सविस्तर....

  • 15 Mar 2023 08:09 AM (IST)

    लॉंग मार्च स्थगित होणार ही मुंबईत धडकणार?

    मुंबईत आज मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक

    बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ करणार चर्चा

    10 जणांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

    काल नियोजित असलेली बैठक झाली होती रद्द

    आज तोडगा निघाल्यास आंदोलन स्थगित होणार

    अन्यथा लाल वादळ मुंबईत धडकणार

  • 15 Mar 2023 07:22 AM (IST)

    पुढील पाच दिवस राज्याच्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

    पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

    भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

    पावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे

    हा अंदाज शनिवारपर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे

    मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यापासून प्रतिबंधासाठी तयारीत राहण्याचे आवाहन

  • 15 Mar 2023 07:14 AM (IST)

    31 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द

    भंडारा : MBBS डॉक्टर मिळयाल्याने BAMS डॉक्टराना काढले,

    कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांत असंतोष,

    अल्पकाळ सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांमध्ये असंतोषाची भावना व्यक्त होत आहे,

    11 डॉक्टर 15 दिवसांपूर्वीच झाले होते नियुक्त.

  • 15 Mar 2023 06:29 AM (IST)

    तडीपारीची कारवाई नावापुरतीच,तडीपार आरोपीचा शहरातच वावर

    कल्याण बाजारपेठ परिसरातील धक्कादायक घटना

    तडीपार आरोपीने ट्रक ड्रायव्हरला मारहाण करत केला लुटण्याचा प्रयत्न

    नागरिकांनी पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन

    तडीपार आरोपी पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात

  • 15 Mar 2023 06:28 AM (IST)

    पुण्यात कोयते, कुऱ्हाड अन् पालघनसह दहशत माजवणारे 10 गुंड जेरबंद

    पुण्याच्या स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या माने टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

    टोळी प्रमुख सचिन माने मैत्रिणीला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

    घोरपडी पेठेत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फिल्मी स्टाईलने त्याला अटक करण्यात आली

    स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत

    या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी यासारखे 11 गंभीर गुन्हे दाखल

    त्यांच्या ताब्यातून कोयते, कुऱ्हाड, पालघन यासारखी घातक शस्त्र हस्तगत

  • 15 Mar 2023 06:25 AM (IST)

    सोलापूरच्या मंद्रूपहुन मुंबईकडे निघालेला शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा सोलापूर शहरात पोहोचला

    मंद्रूप येथील शेतकरी मागण्यांसाठी मंद्रूप ते मुंबईपर्यंत बैलगाडीने प्रवास करत मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत

    नियोजित मंद्रूप एमआयडीसीच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरून एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले

    मागील 174 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने केवळ आश्वासन दिले

    त्यामुळे आता आर या पारची भूमिका घेत मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास सुरु केलाय

    दरम्यानहे शेतकरी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत

  • 15 Mar 2023 06:21 AM (IST)

    नक्षली हल्ल्यात घट, देशात 12 वर्षात नक्षलवादी हल्ले घटले

    12 वर्षात 77% नी देशभरातील नक्षलवादी हल्ले घटल्याचा केंद्र सरकारचा दावा

    नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मृत्यूचा दर 90 टक्क्यांनी कमी आला, केंद्र सरकारचा दावा

    2022 सालात देशातील 45 जिल्ह्यांमध्ये 176 पोलीस ठाण्यांना नक्षलवादी हिंसेची वर्दी प्राप्त झाली

    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण माहिती

Published On - Mar 15,2023 6:19 AM

Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.