Maharashtra News LIVE : रात्री उशिरा बच्चू कडू-एकनाथ शिंदे यांच्यात भेट काय ठरलं?
Maharashtra News LIVE Updates : भोंदू अशोक खरात आज आठव्या गुन्ह्यात न्यायालयात VC द्वारे हजर होणार. एसआयटी पोलिस कोठडीसाठी करणार जोरदार युक्तिवाद. सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेतले.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईत पुढील चार दिवस तापमान कसं असेल?
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह क्वीन नेकलेसवर पादचाऱ्यांची वर्दळ झाली कमी. मुंबईत पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मंगळवार आणि बुधवारीही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
-
निलम गोरे आणि शितल म्हात्रे या दोघांपैकी विधान परिषदेवर कोण जाणार?
विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बच्चू कडू यांचं नाव निश्चित सूत्रांची माहिती. तर निलम गोरे आणि शितल म्हात्रे या दोघांपैकी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता.
-
-
उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित
जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून उष्णतेशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 159 रुग्ण आढळले आहेत.’हीट रॅश’ (पुरळ) आणि ‘हीट कॅम्प्स’ या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
-
विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 वा उमेदवार उभा करणार का?
राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 वा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात काल रात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची सुत्रांची माहीती. काँग्रेसने उमेदवार दिल्यास महायुतीही उमेदवार देणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
एनसीपी नेता आनंद परांजपे यांना नंदनवन इथे घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. खाजगी कामासाठी भेट घेतल्याची माहीती. मात्र बंगल्यावर भेट घेतल्याने चर्चेला उधाण. येणाऱ्या काळात शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण.
-
-
रात्री उशिरा बच्चू कडू-एकनाथ शिंदे यांच्यात भेट काय ठरलं?
बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात नंदनवन या शिंदेंच्या निवासस्थानी रात्री उशिरा भेट. पक्ष विलीनीकरण आणि उमेदवारीबद्दल चर्चा झाल्याची माहिती. आज सकाळी पुन्हा 10 वाजता कडू घेणार शिंदेंची भेट. कडू यांच्या रूपाने शिंदेंच्या सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता.
शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच्या संवादाचा मनसेने निषेध केला. संजय निरुपम आज मुंबईतील ओशिवरा येथे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांशी संवाद साधणार होते, ज्याला वर्सोवा विधानसभा मनसे अध्यक्ष संदेश देसाई यांनी विरोध केला आहे. आता मनसेच्या विरोधानंतर संजय निरुपम आज ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधणार की नाही, हे पाहावे लागेल. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या बनावट सहीने मिळवले 70 कोटी रुपयांचे कंत्राट. कुंभमेळा कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी अज्ञाताने केली कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही. नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. अज्ञाताने बनावट सही द्वारे 35 कोटी रुपयांचे दोन वर्क ऑर्डर तयार केले. मात्र कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांना आपली सही नसल्याचे लक्षात आल्यानंतर उघडकीस आला प्रकार.
Published On - Apr 30,2026 8:10 AM
