Thane | ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Thane | ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

| Updated on: Jan 31, 2022 | 3:49 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागा(Excise Department Maharashtra)च्या ठाणे (Thane)शाखेमार्फत गेल्या 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती. विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री, वाहतूक यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं.

राज्य उत्पादन शुल्क विभागा(Excise Department Maharashtra)च्या ठाणे (Thane)शाखेमार्फत गेल्या 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती. विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री, वाहतूक यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं. या धाडसत्राच्या दरम्यान साधारणपणे 103 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 60 गुन्हे वारस आणि 43 गुन्हे बेवारस अशा स्वरुपातील आहेत. याप्रकरणी 60 आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. 5 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. 50 लाख 22 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि त्याची वाहतूक होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नाकाबंदी केली जातेय. वाहनांची तपासणी यासह रात्रीची गस्तही घातली जात आहे.