AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा, महावितरणाकडून ग्राहकांसाठी खास सोय

महावितरणाने मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे मीटर रिडींग पाठवण्याची सोय करुन दिली होती. (MSEDCL Electricity consumers meter readings)

आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा, महावितरणाकडून ग्राहकांसाठी खास सोय
| Updated on: May 01, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक भाग आणि सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही. यामुळे महावितरणाने मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आता SMS द्वारेही मीटर रिडींग ग्राहकांना मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे. (MSEDCL Electricity consumers will now send the meter readings themselves)

कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणाला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही. यामुळे महावितरणाने मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे मीटर रिडींग पाठवण्याची सोय करुन दिली होती. त्यापाठोपाठ आता मोबाईल एसएमएसद्वारे ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे. यामुळे ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही, अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मीटर रिडींग कसे पाठवाल? 

  • प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येते.
  • महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे.
  • रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येईल.
  • हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल.
  • तसेच मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविता येणार आहे.

SMS द्वारे मीटर रिडींग कसे पाठवाल? 

  • ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे.
  • या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त होईल.
  • यानंतर पुढे चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविणे आवश्यक आहे.
  • वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.
  • उदा. 12 अंकी ग्राहक क्रमांक 123456789012 हा असल्यास आणि मीटरचे KWH रिडींग 8950 असे असल्यास MREAD  123456789012  8950 या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे.
  • चुकीचे किंवा मुदतीनंतर पाठविलेले मीटर रिडींग स्वीकारण्यात येणार नाही.
  • ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचे फायदे काय?

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे आणि रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. यांसह इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

(MSEDCL Electricity consumers will now send the meter readings themselves)

संबंधित बातम्या : 

Mohammad Shahabuddin | तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.