Corona Cases and Lockdown News LIVE: संगमनेर शहरातील तीन दुकाने सील, कोरोना प्रतिबंधक नियम न पाळल्यामुळे कारवाई

| Updated on: Mar 21, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE: संगमनेर शहरातील तीन दुकाने सील, कोरोना प्रतिबंधक नियम न पाळल्यामुळे कारवाई

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Mar 2021 07:49 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 330 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तीन जणांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट

    आज दिवसभरात 330 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत

    2183 अहवाला पैकी 1853 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत

    ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 23866 वर पोहोचला आहे.

    आज दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

    कोरोनामुळे आतापर्यंत 424 जणांचा मृत्यू  झाला आहे.

    आज दिवसभरात 84 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे

    तर आतापर्यंत 17667 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    सध्या 5775 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • 20 Mar 2021 06:18 PM (IST)

    संगमनेर शहरातील तीन दुकाने सील, कोरोना प्रतिबंधक नियम न पाळल्यामुळे कारवाई

    शिर्डी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू

    पहिल्याच दिवशी संगमनेर शहरातील तीन दुकाने सील

    महिना भर दुकाने केली सील

    विना मास्क व गर्दी केल्यानंतर प्रशासनाची कारवाई

    शहरातील मेडिकल, सोनारासह एका हॉटेल व्यवसायिकावर कारवाई

    संगमनेर प्रांतधिकारी आणि तहसीलदार यांची सयूंक्त कारवाई

  • 20 Mar 2021 06:09 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, सध्या 390 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण - 53 आज झालेले मृत्यू - 00 आज बरे झालेले - 26

    तालुक्यानुसार कोरोना रुग्णांचीसंख्या

    गोंदिया--------------37 आमगाव-------------04 तिरोडा---------------03 अर्जुनी मोरगाव-------00 देवरी-----------------02 सडक अर्जुनी ----------01 गोरेगाव---------------02 सालेकसा-------------02 इतर राज्य-------------02

    पूर्ण जिल्ह्यात एकूण रुग्ण - 14995

    पूर्ण जिल्ह्यात एकूण मृत्यू - 187

    पूर्ण जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण - 14418

    पूर्ण जिल्ह्यात एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 390

  • 20 Mar 2021 05:54 PM (IST)

    येवला तालुक्यात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळले, आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू

    येवला : तालुक्यात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळले.

    तालुक्यात आतापर्यंत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    येवल्यात कोरोनाबधितांची एकूण संख्या पोहचली 1554 वर

    येवला तालुक्या आतापर्यंत 1310 जण कोरोना मुक्त

    सध्या 130 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु

  • 20 Mar 2021 03:29 PM (IST)

    कोरोना वाढतोय, नागपुरात 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम- नितीन राऊत

    नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही जे सॅम्पल टेस्टसाठी पाठवले. मात्र दिल्लीहून अजूनतरी कोणतेही रिपोर्ट आलेले नाहीत. त्यामुळे नागपुरातील कोरोना विषाणू नेमका कसा आहे? याविषयी मी काही सांगू शकत नाही. मी नितीन गडकरी यांना विनंती करतो, की त्यांनी नागपूरहून पाठवलेले कोरोना विषयक सॅम्पलचे निष्कर्ष लवकर काढून त्याचे रिपोर्ट देण्यासाठी संबंधितांना सांगावे. नागपुरात सध्या लागू असलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत कायम असतील.

  • 20 Mar 2021 02:08 PM (IST)

    अकोल्यात 247 रुग्ण पॉझिटिव्ह

    आज (शनिवार) सकाळच्या अहवालात 247 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत...

    ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 23783 झाला आहे....

    कोरोनामुळे आतापर्यंत 421 जणांचा मृत्यू ...

    तर 17583 जणांनी कोरोनावर मात केली आहे....

    उपचार घेत असलेले रुग्ण 5779 आहेत......

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती

  • 20 Mar 2021 01:06 PM (IST)

    RSS च्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची निवड..

    बंगळुरू मध्ये सुरू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत झाली निवड

  • 20 Mar 2021 12:47 PM (IST)

    गर्दी कमी करा, नाहीतर बाजार समिती पूर्ण बंद करावी लागेल, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    गर्दी कमी करा, नाहीतर बाजार समिती पूर्ण बंद करावी लागेल ..

    जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा इशारा..

    बाजार समितीतील वाढत्या गर्दी बाबत संचालकांशी बोलणार

    नियम न पाळता गर्दी कायम राहिल्यास कारवाईला तयार रहा

    कोरोना काळात बाजार समितीमध्ये होणाऱ्या गर्दी बाबत जिल्हाधिकारी संतप्त

  • 20 Mar 2021 11:56 AM (IST)

    नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले

    जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत

    24 तासात वाढले 660 नवीन रुग्ण

    अहमदनगर शहरात 19 मायक्रो कंटेन्मेंट झोन

    तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या प्रत्येक तालुक्यात दौरा

    आगामी काळात विनामास्क, दुकानातील गर्दी, वाहनात गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

  • 20 Mar 2021 10:22 AM (IST)

    भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांना रॅपिड अँटिजन बंधनकारक

    सोलापूर-  शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी यांना रॅपिड अँटिजण टेस्ट करून घेणे केले बंधनकारक

    सात दिवसांच्या आत तपासण्या करून घेण्याचे आदेश

    अन्यथा मंडईत बसता येणार नसल्याचा पालिका आयुक्तांचा आदेश

    तर जिल्ह्याच्या सीमावर आठ तालुक्यात नव्याने तपासणी नाके करण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी आदेश

  • 20 Mar 2021 09:56 AM (IST)

    नागपुरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत आज घेणार कोरोना संदर्भात आढावा बैठक

    आधी सगळ्या जन प्रतिनिधी सोबत बैठक

    नंतर व्यापाऱ्यांशी विडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून बैठक

    त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक

    नागपुरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या बघता घेतली जाणार आहे आढावा बैठक

    नागपुरात 21 मार्च पर्यंत असलेलं लॉक डाऊन वाढणार का याकडे सगळ्यांच लक्ष

  • 20 Mar 2021 08:50 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीचा पुरेसा साठा

    रत्नागिरी- कोरोना लसीचा जिल्ह्यात पुरेसा साठा जिल्ह्यात १६ हजार २०० डोस उपलब्घ येत्या सोमवारी आणखी डोस मिळणार जिल्ह्यात ४१ हजाराहून अधिक लोकांचे लसीकरण

  • 20 Mar 2021 08:50 AM (IST)

    नंदुरबारमध्ये कोरोनाची काय परिस्थिती?

    नंदुरबार कोरोना अपडेट

    नंदुरबार- जिल्ह्यात आज 281 नवीन रुग्णांची भर- एकही रुग्णांचा मृत्यू नाही

    दिवसभरात 101 रुग्ण बरा झाला नाही

    सध्या एकूण 506 रुग्णांवर उपचार सुरू

    एकूण मृत्यू 240

  • 20 Mar 2021 08:41 AM (IST)

    देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात

    देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात,

    - देशातील १३ टक्के कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत.

    - गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे,

    - त्यातील पुण्यातील आतापर्यंतचा सर्वांत कमी मृत्युदर असल्याचे आशादायक चित्र,

    - देशात सद्यःस्थितीत दोन लाख ६८ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    - त्यापैकी ६२ टक्के म्हणजे एक लाख ६६ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

    - त्या खालोखाल केरळमध्ये ९.४ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.

    - महाराष्ट्रातही सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.

    - देशाच्या तुलनेत १३ टक्के आणि राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत २१ टक्के (३५ हजार ५३९) रुग्ण पुणे जिल्ह्यात,

    - सार्वजनिक आरोग्य खात्याकडून माहिती प्रसिद्ध

  • 20 Mar 2021 08:41 AM (IST)

    पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार

    - पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार,

    - कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याने धास्तावलेल्या पालिकेने आता पुन्हा आपली यंत्रणा बाजारपेठांमध्ये उतरवून तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    - त्यात दुकाने, हॉटेल, मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे.

    - ज्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्यापासून मास्क नसलेल्यांवर कारवाई होणार आहे.

    - क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करीत आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ताकीद,

    - यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून त्यांच्याकडील आरोग्य खात्याची टीम पूर्णवेळ काम करेल.

  • 20 Mar 2021 08:24 AM (IST)

    औरंगाबादेत शनिवार आणि रविवार लॉकडाऊन, जीवनावश्यक व्यवहार वगळता शहरात कडकडीत बंद

    औरंगाबादेत आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन

    शनिवार आणि रविवार दोन दिवस राहणार कडक लॉकडाऊन

    आठवड्यातून दोन दिवस औरंगाबाद शहरात पळाला जातोय लॉक डाऊन

    बाजारपेठेसह सर्वच व्यवहार आज आणि उद्या राहणार बंद

    जीवनावश्यक व्यवहार वगळता औरंगाबाद शहर कडकडीत बंद

  • 20 Mar 2021 08:23 AM (IST)

    सांगलीत 100 बेडचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरु होणार

    सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता सांगली महापालिकेचे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले असून मिरज पॉलिटेक्निक येथे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारणीचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे.

  • 20 Mar 2021 08:17 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाचा कहर, जनजागृतीसाठी एस.पी. मोक्षदा पाटील रस्त्यावर

    कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर उतरल्या होत्या. मोक्षदा पाटील यांनी गंगापूर शहरात रस्त्याने पायी फिरून लोकांमध्ये जागृती केली. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. यावेळी मोक्षदा पाटील यांच्यासोबत पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • 20 Mar 2021 08:13 AM (IST)

    नाशकात कोव्हीशिल्ड चे 12 हजार डोस दाखल

    नाशिक - कोव्हीशिल्ड चे 12 हजार डोस दाखल

    आज पासून शहरात पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात

    गेल्या तीन दिवसात शहरात तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण

    ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन घेता येणार लस

    लसच नसल्याने,काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेला लागला होता ब्रेक

    आता मात्र पुन्हा सुरू होणार मोहिम

  • 20 Mar 2021 08:12 AM (IST)

    राज्यातील कोरोना संकट दूर व्हावं यासाठी पंढरपुरात चतुर्वेदी पारायण

    राज्यातील कोरोना संकट दूर व्हावं यासाठी पंढरपुरात चतुर्वेदी पारायण

    नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने झाक5 पारायण

    राज्यातील चारही वेदांचे पंडित होते उपस्थित

    कोरोना पासून मुक्तीसाठी पांडुरंगाला घातलं साकडं

  • 20 Mar 2021 08:00 AM (IST)

    नागपुरात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर

    नागपुरात लॉक डाऊन च्या अंमलबजावणी वर आता द्रोण कॅमेऱ्याची नजर

    किती प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहे आणि कुठे नियमांचे उल्लंघन होत आहे यावर ठेवली जाणार नजर

    मोमीनपुरा आणि भीड भाड असणाऱ्या वस्त्यांवर त्याच प्रमाणे बाजार पेठ असलेल्या वस्त्यांवर राहणार खास नजर

    रस्त्यावर पोलिसांची कारवाई सुरूच

    मात्र रुग्ण संख्या सतत वाढत असल्याने पोलीस आणखी कडक करणार पहारा

    दिवसाला रुग्ण संख्या 3 हजार पार झाली त्यामुळे चिंता वाढली आहे

    येणाऱ्या दिवसात होळी आहे , त्यामुळे होळी वर सुद्धा राहणार द्रोण कॅमेऱ्याची नजर

    त्यासाठी घेतली जात आहे द्रोण कॅमेऱ्याची मदत

    गर्दी असलेल्या वस्त्यात नजर ठेवण्यासाठी होणार मोठा फायदा

  • 20 Mar 2021 07:58 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी

    पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी,

    - एकाच महिन्यात आठ पटीने वाढ,

    - जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी पुन्हा ३२ हजार ९५९ झाली आहे,

    - जानेवारी महिन्यात हीच संख्या ४ हजार ३०० पर्यंत खाली आली होती.

    - मात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

    - यानुसार गेल्या महिनाभरात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे आठ पट्टींनी वाढ,

    - गेल्या २४ तासांत पुणे शहरात २ हजार ८३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत,

    - जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाच हजारांच्या वर गेली आहे.

    - जिल्ह्यात काल दिवसभरात ५ हजार ६५ नवे कोरोना सापडले आहेत.

  • 20 Mar 2021 07:57 AM (IST)

    नाशकात एका दिवसात 2508 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा उच्चांक

    नाशिक- सलग तिसऱ्या दिवशी शहरात कोरोना बाधितांचा आकडा उच्चांकी

    काल एक दिवसात शहरात 2508 जण पॉझिटिव्ह

    तर काल एका दिवसात 5 जणांचा मृत्यू

  • 20 Mar 2021 07:20 AM (IST)

    नागपुरात 24 तासांत 35 मृत्यू, गेल्या वर्षाभरातील मृत्यूचा उच्चांक

    नागपुरात कोरोनाची धडकी भरविणारी स्थिती

    गेल्या 24 तास 35 मृत्यू झाल्याने आणखी वाढली चिंता

    या वर्षातील मृत्यूचा हा उच्चांक आहे

    तर 3235 नवीन रुग्णांची नोंद झाली

    काल दिवसभरात नागपुरात 16 हजार 66 चाचण्या करण्यात आल्या

    बरे होणाऱ्यांची 83.78 एवढी टक्के वारी

    नागपुरात अॅक्टिव्ह रुग्ण 25हजार 569 एवढे आहे

  • 20 Mar 2021 07:07 AM (IST)

    वाशिमच्या शेलुबाजार येथे 48 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून चारही सीमा सील, पाच दिवस कडक लॉकडाऊन

    वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे... मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार इथं 48 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत शेलुबाजार येथे कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव नियंत्रणाबाहेर जात आहे. .या पार्श्वभूमीवर मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावच्या चारही सीमा सील करून आजपासून पाच दिवस लॉकडाऊन लावण्यात आला आहे...गावातील जनतेला या गावातून येजा करण्यास बंदी लावली आहे.....शेलूबाजार गावच्या चारही सीमा, सर्व रस्ते परिसरात जनतेला फिरण्यास बंदी असून याच दरम्यान नागपूर-औरंगाबाद आणि अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक सुरू राहणार आहे

  • 20 Mar 2021 06:35 AM (IST)

    वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

    वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना रुग्णात वाढ...

    मागच्या 24 तासात 91 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची वाढ..तर 38 जण कोरोना मुक्त झाले आहेत.. आज दिवसभरात 1 मृत्यू ..

    नवे 91 रुग्ण पकडून वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 31,171

    कोरोना ने मृत्यू झालेल्या रुगणाची संख्या 902

    वसई विरार क्षेत्रात कोरोना मुक्त झालेल्या रुगणाची संख्या 29,695

    उपचार घेत असलेल्या रुगणाची संख्या 574...

Published On - Mar 20,2021 7:49 PM

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.