Maharashtra Marathi Breaking News Live | निवडणूक झाल्यावर काहीजण प्रेक्षक गॅलरीत दिसतील, मोदींचा विरोधकांना टोला

| Updated on: Feb 06, 2024 | 7:03 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 5 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live | निवडणूक झाल्यावर काहीजण प्रेक्षक गॅलरीत दिसतील, मोदींचा विरोधकांना टोला

मुंबई, दि. 5 फेब्रुवारी 2024 | राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ९४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जळगावच्या अमळनेरमध्ये 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनाचा 4 फेब्रुवारी रोजी समारोप झाला. पुढचं संमेलन कुठे व कधी होणार त्याचा अध्यक्ष कोण असणार याबाबत मार्चपर्यंत निर्णय होणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग  फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Feb 2024 06:52 PM (IST)

    दिल्ली सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्नः आपचे प्रवक्ते

    भाजपाने सुरुवातीपासूनच दिल्लीत नकारात्मक राजकारण केले आहे, असे आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी म्हटले आहे. असे असूनही अरविंद केजरीवाल हे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. आमचे मंत्री आणि आमदारांना भाजपमध्ये सामील करून निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे.

  • 05 Feb 2024 06:35 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन फ्लोर टेस्टनंतर ईडी कार्यालयात परतले

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांना राज्य विधानसभेतील फ्लोर टेस्टनंतर पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर हेमंत सोरेन यांनी आज चंपाई सोरेनच्या फ्लोर टेस्टमध्ये भाग घेतला होता.

  • 05 Feb 2024 06:20 PM (IST)

    सीमेवरील शेवटचे गाव आम्ही पहिले गाव म्हणून विकसित केले : पंतप्रधान

    सीमेवरील शेवटचे गाव शेवटचे गाव म्हणून सोडले होते. पहिले गाव म्हणून आम्ही या गावाचा विकास केला. गावात यापूर्वीच अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत.

  • 05 Feb 2024 06:14 PM (IST)

    एनडीएला 400 जागा मिळतील, तर भाजपाला 370 पेक्षा जास्त जागांवर पसंती असेल

    देशातील जनता एनडीएला 400 जागांचा आकडा पार करेल आणि भाजपा 370 जागांचा आकडा पार करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितले. आमची तिसरी टर्म हा खूप महत्त्वाची असेल.

  • 05 Feb 2024 06:13 PM (IST)

    आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 1000 वर्षांचा पाया रचला जाईल : पंतप्रधान

    तिसरा कार्यकाळ 1000 वर्षांची भक्कम पायाभरणी करणारं ठरेल. मला पूर्ण विश्वास आहे की 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे. गरिबांना स्वाभिमान मिळाला तर गरिबीवर मात करण्याची ताकद त्यांच्यात आहे.

  • 05 Feb 2024 06:09 PM (IST)

    ज्या लोकांना कोणी विचारत नव्हतं अशा लोकांना मोदींनी विचारलं : पंतप्रधान

    पीएम मोदी लोकसभेत म्हणाले की, आज चार कोटी गरिबांकडे कायमस्वरूपी घरे आहेत. त्याच्या स्वाभिमानाला एक नवीन बळ देते. 11 कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळत आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांना यापूर्वी कोणी विचारलेही नव्हते, त्यांना मोदींनी विचारले आहे.

  • 05 Feb 2024 05:36 PM (IST)

    Narendra Modi | कधीपर्यंत समाजाला विखरणार आहात, मोदींचा विरोधकांवर संताप

    नवी दिल्ली | विरोधक खूप प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल, पण त्यांच्यात निवडणुक लढवण्याची हिंमत नाहीय. अनेक जण मतदारसंघ बदलणार आहेत. निवडणूक झाल्यावर काहीजण प्रेक्षक गॅलरीत दिसतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. महिला, तरुण अल्पसंख्यांक नाहीत का? कधीपर्यंत समाजाला विखरणार आहात? अशा शब्दात मोदींनी विरोधकांना सुनावलं. आज विरोधकांची जी अवस्था आहे त्याला काँगेस जबाबदार आहे, 10 वर्षात मजबूत विरोधी पक्ष होण्याची संधी काँगेसला होती, ती त्यांनी गमावली, असंही मोदी म्हणाले.

  • 05 Feb 2024 05:26 PM (IST)

    Narendra Modi | विरोधकांच्या अवस्थेला काँग्रेस जबाबदार : नरेंद्र मोदी

    नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांच्या भाषणातून ते विरोधकच राहितील असंच दिसतंय. विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहणार. तसेच जनता देखील विरोधी पक्षाला विरोधी पक्षातच बसवेल. काँग्रेसला गेल्या 10 वर्षात सर्वोत्तम विरोधक होण्याची संधी होती. तसेच विरोधकांच्या अवस्थेला काँग्रेस जबाबदार असल्याचं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला.

  • 05 Feb 2024 05:15 PM (IST)

    तेरणा कारखान्यावर पक्ष मेळाव्याचं आयोजन

    धाराशिव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 फेब्रुवारीला धाराशिवमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री तेरणा कारखान्यावर पक्ष मेळावा घेणार आहेत. तसेच जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे.

  • 05 Feb 2024 05:00 PM (IST)

    जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातच अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन

    इस्लामपूर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते इस्लामपूर येथील अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित दादा पवार पहिल्यांदाच येत आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे भव्य दिव्य कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत.

  • 05 Feb 2024 04:49 PM (IST)

    रस्त्याच्या कामासाठी आजी - माजी आमदार यांनी केले रास्ता रोको आंदोलन

    अहमदनगर : जिल्ह्यातील कोल्हार घोटी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. अनेकदा अपघात होऊन यात अनेकांचे जीव गेले आहेत. या विरोधात अकोले तालुक्यातील राजूर येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • 05 Feb 2024 04:32 PM (IST)

    जुन्नर येथे जंगल सफारी सुरु करणार; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई : राज्यात हजारो पथसंस्था आहेत यातील ठेवीदारांच्या हितसरंक्षणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. ⁠MSIDC ची निर्मिती करुन पहिल्या टप्प्यात २८५०० कोटी रुपयांचे प्रकल्प केले जातील. तसेच, ८० कोटी रुपये खर्च करुन जुन्नर येथे जंगल सफारी सुरु करणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

  • 05 Feb 2024 04:18 PM (IST)

    शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

    मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी केली. मी ठाण्याचा पालकमंत्री आहे. यापूर्वी एकदाही गणपत गायकवाड यांनी त्यांचा विषय कधीच मांडला नाही. समन्वय समिती समोरही मांडला नाही. फडणवीस आमच्या मागणीची योग्य दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

  • 05 Feb 2024 04:13 PM (IST)

    विठ्ठलाला साकडे घालत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

    पंढरपूर : अजित पवार यांनी बारामती येथील मेळाव्यात केलेल्या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. मात्र, त्यांच्या यांच्या विधानाचा विपर्यास करून आव्हाड हे अजित पवार यांना टार्गेट करीत आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड याना विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी यासाठी पंढरपुरात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक केला. भाविकांना बदाम वाटप करीत 'बा विठ्ठला. या जितेंद्र आव्हाड यांना लवकर चांगली बुद्धी दे' असे साकडे घालत आंदोलन केले.

  • 05 Feb 2024 04:05 PM (IST)

    मेहबूब शेख यांची अजित पवार यांच्यावर टीका, म्हणाले बापाने जन्म देऊनही...

    पाटण : बापाने जन्म देऊनही तुम्ही आमचे बाप होत नाही अशी म्हणण्याची संस्कृती आली आहे. ज्यांनी तुमची ओळख राज्याला करून दिली त्यांच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही वाट पाहत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

  • 05 Feb 2024 03:45 PM (IST)

    भाजप पवार कुटुंबातील एक व्यक्ती सुप्रिया सुळेंविरोधात उतरवून वाद निर्माण करणार- रोहित पवार

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, तेव्हा दोन गट पडले. भाजप ल जे हवं होते तेच होत गेले. ठाकरे गट आणि शिंदे गट आपसा आपसात भांडायला लागले. भाजप एसीत बसून तमाशा बघत राहिला. भाजपकडून पवार कुटुंबातील एक व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेला निवडणुकीत उतरवून पवारामध्ये आणखीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

  • 05 Feb 2024 03:30 PM (IST)

    रामराज्य नावाखाली ईडी, सीबीआयचं राज्य चालवलं जात आहे- अरविंद सावंत

    महाराष्ट्रातील सारे प्रकल्प हे गुजरात मध्ये गेले आहे. महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प प्रलंबित ठेवले जाते. प्रकल्पातून भाजपचा प्रचार केला जात आहे. रामराज्य नावाखाली ईडी, सीबीआयचं राज्य चालवलं जात आहे, असं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष खा. अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

  • 05 Feb 2024 03:16 PM (IST)

    ठाणे क्राईम ब्रॅंचचे अधिकारी आणि कर्मचारी यांची टीम उल्हासनगर मध्ये दाखल

    ठाणे क्राईम ब्रॅंचचे अधिकारी आणि कर्मचारी यांची टीम उल्हासनगर मध्ये दाखल झाले आहेत. द्वारली गावातील जागेची पहाणी केल्यानंतर हे पथक हिललाईन पोलीस ठाण्यात आलं आहे. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, , उल्हासनगर क्राईम युनिट 4 चे वरिष्ठ अधिकारी राजू सोनवणे कल्याण क्राईम ब्रँच टीम ठाणे क्राईम ब्रँच अधिकारी उपस्थित होते.

  • 05 Feb 2024 03:03 PM (IST)

    आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेले आरोप बिनबुडाचे- शंंभूराज देसाई

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. गायकवाड यांनी दीड वर्षात एकही आरोप केला नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ती कारवाई करतील. आमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल अशी आशा आहे.

  • 05 Feb 2024 02:50 PM (IST)

    गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बालने घेतली अजित पवार यांची भेट

    पिंपरी चिंचवड - गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडालीये. असिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून शस्त्रास्त्रांसह त्याला पोलीसांनी त्याला अटकही केली होती. अजित पवारांची त्याने भेट का घेतली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

  • 05 Feb 2024 02:49 PM (IST)

    पुणे NSUI काँग्रेस मधील वादाची वरिष्ठांकडून दखल

    पुणे - NSUI काँग्रेस मधील वादाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रभारिणीने मागवला कालच्या घटनेचा अहवाल. पुण्यात काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. ४ ते ५ कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही घटना घडली कशी याचा वरिष्ठांनी अहवाल मागवला आहे. NSUI काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

  • 05 Feb 2024 02:44 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेमलेल्या सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेमलेल्या सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध. समितीत नागराज मंजुळे, अतुल पेठे आणि श्रीरंग गोडबोले यांना घेण्याची मागणी. या संदर्भात अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचे कुलगुरूंना पत्र. विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभागाच्या वादग्रस्त नाटक प्रकरणी सत्यशोधक समितीची स्थापना.

  • 05 Feb 2024 02:37 PM (IST)

    आता फिरून काय उपयोग, नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका

    ज्या वेळी फिरायला पाहिजे होता, बाहेर पडयला पाहिजे होते तेव्हा स्वतःला 4 भिंतीच्या आत अडकून घेतले होते. आता फिरून काय उपयोग. शिवसेना प्रमुखांनी लाखोच्या लोकांची सभा घेतली आणि आज आपण 100 लोकांमध्ये सभा घेता हे वाईट वाटतं.

  • 05 Feb 2024 02:26 PM (IST)

    आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, क्राईम ब्रांचे पथक द्वारली गावात दाखल

    कल्याण - आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, क्राईम ब्रांचे पथक द्वारली गावात दाखल. जागेची पाहणी करत जागेसंबंधीत दस्तावेज गोळा करण्यास केली सुरुवात. नेमकी ही जागा कोणाची नेमका त्यादिवशी काय वाद झाला होता या संदर्भात पाहणी करत माहिती घेण्यास कल्याण क्राईम ब्रँच पथकाने केले सुरुवात.

  • 05 Feb 2024 01:46 PM (IST)

    अक्कलकोट येथे आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा

    कर्नाटकातल्या कोटनुर या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाने सोलापूरातील अक्कलकोट येथे मोर्चाचे आयोजन केले आहे.

  • 05 Feb 2024 01:29 PM (IST)

    अमरावतीत हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन

    पगार वाढीच्या प्रश्नावर गेल्या  22 दिवसांपासून अमरावतीत हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन सुरू असूनही तोडगा न निघाल्याने आशा सेविका आणि गट प्रवर्तक आक्रमक झाले आहेत.

  • 05 Feb 2024 01:15 PM (IST)

    राऊत तुम्हाला कोविड घोट्याळ्याचा हिशोब द्यावाच लागणार - किरीट सोमैय्या

    संजय राऊत तुम्ही किरीट सौमय्याची चेष्टा करा, पण कोविड घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार असा हल्ला बोल भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

  • 05 Feb 2024 12:48 PM (IST)

    कांदिवलीतील शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस

    कांदिवलीतील एका शाळेत मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आल्यानंतर पालकांनी रास्ता रोको केले आहे. शाळेच्या विरोधात घोषणाबाजी केली जातंय. ही घटना उघडकीस आल्यानंतर समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • 05 Feb 2024 12:43 PM (IST)

    लोकसभेत पेपर लीक विधेयक सादर

    लोकसभेत पेपर लीक विधेयक सादर करण्यात आलाय. द पब्लिक एग्जमिनेशन विधेयक 2024 लोकसभेत सादर

  • 05 Feb 2024 12:29 PM (IST)

    जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

    जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटी येथे गोदा पट्टयातील 123 गावातील प्रमुख मराठा नागरिकांची बैठक घेत आहेत. या बैठकीत 10 तारखेच्या आमरण उपोषण संदर्भात चर्चा केली जात आहे.

  • 05 Feb 2024 12:13 PM (IST)

    Mumbai | अंधेरीतील गोखले पूल सुरु होणार

    अंधेरी पूर्व आणि पश्चिम ला जोडणारा गोखले पुलाचा काम 90% पेक्षा जास्त पूर्ण करण्यात आला आहे. गोखले पूल लवकरात मुंबईकरांचा सेवेसाठी सुरू होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यासाठी सातवा मुहूर्त देण्यात आला आहे.

  • 05 Feb 2024 11:50 AM (IST)

    कांदिवली- प्री स्कूलमध्ये ४ वर्षीय मुलीचा विनयभंग

    कांदिवली प्री स्कूलमध्ये ४ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली पूर्व इथल्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल आहे. शाळेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 05 Feb 2024 11:40 AM (IST)

    प्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीने याचिका मेंशन

    नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीने याचिका मेंशन करण्यात आली आहे. सरन्यायाधीश यांनी लवकरच तारीख देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

  • 05 Feb 2024 11:30 AM (IST)

    एसीबीच्या अधिकाऱ्याने शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावली- उद्धव ठाकरे

    एसीबीच्या अधिकाऱ्याने शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावली. बाळासाहेबांच्या खुर्चीची एसीबीच्या अधिकाऱ्याने किंमत लावली. तुमच्या आईवडिलांची कोणी किंमत लावली तर चालेल का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

  • 05 Feb 2024 11:30 AM (IST)

    हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड, साथीदार राहुल पाटीलसह 70 जणांविरोधात गुन्हा

    हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड, साथीदार राहुल पाटीलसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने शिरूर जागेवरील कामगारांना शिवीगाळ करत जागेतील सामानाचा नुकसान करून काम बंद पाडण्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश असून हिललाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे.

  • 05 Feb 2024 11:28 AM (IST)

    देशासाठी लढणारं आमचं हिंदुत्व- उद्धव ठाकरे

    "देशासाठी लढणारं आमचं हिंदुत्व आहे. सत्ताधाऱ्यांकडून मूळ मुद्दे बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. केंद्र, राज्य सरकारच्या कारभाराचे चटके सर्वसामान्यांना बसत आहेत," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 05 Feb 2024 11:20 AM (IST)

    मी केलेलं वक्तव्य तोडून-मोडून दाखवलं- छगन भुजबळ

    मी केलेलं वक्तव्य तोडून-मोडून दाखवलं. सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जातेय, असंही छगन भुजबळ म्हणाले.

  • 05 Feb 2024 11:10 AM (IST)

    मी स्वत:हून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला- छगन भुजबळ

    मी स्वत:हून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्ताधारी आमदार लाथा घालण्याची गोष्ट करतो म्हणून मी बोललो. भूमिका मांडा पण राजीनाम्याबद्दल बोलू नका, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

  • 05 Feb 2024 10:50 AM (IST)

    Live Update : राज्यातील शासकीय कंत्राटदार कामबंद आंदोलनाच्या तयारीत

    सोलापूर : राज्यातील शासकीय कंत्राटदार कामबंद आंदोलनाच्या तयारीत... राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेकडून राज्य सरकारला ईशारा.. राज्यातील कंत्राटदारांना सरकारने संरक्षण कायदा करावा अशी प्रमुख मागणी... राज्य सरकारने 1 लाख कोटींच्या कामाचे टेंडर काढले आहे.

  • 05 Feb 2024 10:35 AM (IST)

    Live Update : 10 फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषणाला बसणार - जरांगे पाटील

    10 फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषणाला बसणार... अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केलं आहे. सोशल मीडियावर लिहिणाऱ्याने माझ्यासारखं आंदोलन करुन दाखवावं.. 75 वर्षात न झालेला कायदा करुन आलो... असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

  • 05 Feb 2024 10:29 AM (IST)

    Live Update : जे 70 वर्षात मिळालं नाही ते आमच्या आंदोलनातून मिळालं - जरांगे पाटील

    जे 70 वर्षात मिळालं नाही ते आमच्या आंदोलनातून मिळालं... असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. 54 लाख मराठा - कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळणार... 39 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे.. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

  • 05 Feb 2024 10:25 AM (IST)

    Live Update : राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वेक्षणाचा डेटा जमा

    राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वेक्षणाचा डेटा जमा... आजपासून जमा झालेल्या डेटाच वर्गीकरण करायला होणार सुरुवात... १५ फेब्रुवारीपर्यत वर्गीकरण करून अहवाल सादर करण्याचं उद्दिष्ट .... आज किती डेटा जमा झाला आणि त्याच वर्गीकरण कसं करायाचं याची आजपासून सुरुवात होणार... मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रक्रियेला वेग !

  • 05 Feb 2024 10:18 AM (IST)

    Live Update : मी कधीही काहीही खोटं केलेलं नाही, करणारही नाही - जरांगे पाटील

    मी कधीही काहीही खोटं केलेलं नाही, करणारही नाही. काहीजण सुपारी घेऊन बोलत असतात. मराठ्यांविरोधातील षडयंत्र यशस्वी झालं नाही... असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  • 05 Feb 2024 10:10 AM (IST)

    Live Update : आज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची बैठक

    आज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची बैठक... 10 तारखेला सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक... आज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद... 10:30 वाजता सुरू होणार पत्रकार परिषद

  • 05 Feb 2024 09:57 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलणार

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार मानणार आहेत.  लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी पाच वाजता बोलणार आहेत.  भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अभिभाषण केलं होतं.

  • 05 Feb 2024 09:45 AM (IST)

    नाशिकमध्ये  पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

    नाशिकच्या उत्तम नगर भागत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हातात कोयते घेऊन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी तोडफोड केली. जोरदार शिवीगाळ करत टोळक्याने रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली.  वाहन तोडफोडीच्या घटनेत 3 ते 4 वाहनांचं नुकसान झालंय.  शुभम पार्क हा नाशिकमधील मध्यवर्ती भाग असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत संशयिताचा शोध सुरू होता.

  • 05 Feb 2024 09:30 AM (IST)

    काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    पुणे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय.  काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाची उपाध्यक्षला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे. काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांसह ४ जणांनी जिल्हा उपाध्यक्षला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मारहाण गुन्हा दाखल झाला आहे. संघटनेतील पद वाटप करण्यावरून भांडण झाल्याची माहिती आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • 05 Feb 2024 09:15 AM (IST)

    श्रीनगर विमानतळावरची सर्व विमानांची उड्डाण रद्द, का?

    जम्मू-काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार बर्फदृष्टी होत आहे.  श्रीनगर विमानतळावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे. श्रीनगर विमानतळावरची सर्व विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.

  • 05 Feb 2024 09:15 AM (IST)

    जयंत पाटील उद्या सोलापुरात

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यामध्ये माढा लोकसभेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जयंत पाटील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत.  त्याचबरोबर शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे.

  • 05 Feb 2024 09:00 AM (IST)

    National news | जम्मू-काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार बर्फवृष्टी

    जम्मू-काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार बर्फवृष्टी. श्रीनगर विमानतळावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला. श्रीनगर विमानतळावरची सर्व विमानांची उड्डाण रद्द

  • 05 Feb 2024 08:46 AM (IST)

    Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी

    गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक कळवा पोलिस ठाण्यात दाखल झालं आहे.

  • 05 Feb 2024 08:32 AM (IST)

    Nashik News | आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधींचे बेहिशेबी व्यवहार उघड

    नाशिकमध्ये झालेल्या आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधींचे बेहिशेबी व्यवहार उघड. नाशिकच्या कंत्राटदारांचे 850 कोटींचे बेहिशोबी व्यवहार आले समोर. सलग 5 दिवस चाललेल्या छाप्यात 8 कोटींची रोकड. जवळपास 3 कोटींचे दागिने हस्तगत, सूत्रांची माहिती. कंत्राटदारांनी आपले कागदपत्र आणि रोख रक्कम नातलगांकडे ठेवल्याचे झालं उघड

  • 05 Feb 2024 08:15 AM (IST)

    Pune news | पुण्यात रेल्वेकडून किती फुकट्या प्रवाशांवर कारवाई?

    पुणे रेल्वे विभागात रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम. जानेवारी महिन्यात 19 हजार 859 फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल. जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास करणाऱ्या 27 हजार 801 प्रवाशांकडून 1 कोटी 72 लाख रुपयांचा दंड वसूल,

  • 05 Feb 2024 08:14 AM (IST)

    Pune news | पुण्यात रेल्वेकडून किती फुकट्या प्रवाशांवर कारवाई?

    पुणे रेल्वे विभागात रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम. जानेवारी महिन्यात 19 हजार 859 फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल. जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास करणाऱ्या 27 हजार 801 प्रवाशांकडून 1 कोटी 72 लाख रुपयांचा दंड वसूल,

  • 05 Feb 2024 07:56 AM (IST)

    Marathi News | शरद पवार वळसे यांच्या मतदार संघात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची तोफ दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार आहे. वळसे पाटलांच्या गावामध्ये मंचरला शरद पवार 21 फेब्रुवारीला जाहीर सभा होणार आहे. मंचर एसटी स्टॅंड समोरील चार एकराच्या मोकळ्या मैदानात दुपारी तीन वाजता सभा होणार आहे.

  • 05 Feb 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | राजन साळवी यांचा पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

    राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा आज हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्यावर गुन्हा दाखल आहे. रायगड एसीबीच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे.

  • 05 Feb 2024 07:31 AM (IST)

    Marathi News | वाशीममध्ये शॉर्ट सर्किटमुळे ट्रक आग

    वाशीमच्या कारंजा तालुक्यातील मोऱ्हळ गावाजवळ ट्रक लाग लागून त्यातील ट्रक जळून खाक झालाय. रात्री साडे वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या टायरणे भरलेला हा ट्रक कारंजावरून अकोला जात होता. तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट होऊन ट्रकला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

  • 05 Feb 2024 07:13 AM (IST)

    Marathi News | भाजपचे गाव चलो अभियान

    आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने भाजपचं ‘गाव चलो’ अभियान सुरु करण्यात आले आहे. यासाठी नितीन गडकरी स्वतःच्या गाव असलेल्या प्रसिद्ध तीर्थस्थळ धापेवाडाची येथे मुक्कामाने जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ अनुसया मातेचं पारडसिंगा येथे मुक्कामाने जाणार आहे.

Published On - Feb 05,2024 7:09 AM

Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.