Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 03, 2023 | 7:41 AM

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली असून त्याच्या चौकशीचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. राज्यात शिंदे गट आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याचे संकेत मिळत आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Jan 2023 07:52 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

    मुंबई :

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

    क्रांतिज्योती सावित्री बाई फुलेंच्या जयंत्ती निमित्त मुख्यमंत्री सातारा येथील सावित्री बाईंच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट देणार

    त्याचप्रमाणे नागपूर येथे इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ऑनलाईन उपस्थित असणार

  • 02 Jan 2023 05:16 PM (IST)

    भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुणे दौरा

    20 जानेवारी रोजी जेपी नड्डा पुण्यात येणार,

    पुण्यातील शिरूर मतदार संघात जे पी नड्डा यांची होणार जाहीर सभा,

    भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच अनुषंगाने नड्डा यांची भोसरी येथे सभा होणार आहे,

    चंद्रकांत पाटील यांची माहिती.

  • 02 Jan 2023 05:15 PM (IST)

    पंतप्रधान मोदी मंगळवारी नागपुरात

    108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसची नागपुरात जोरदार तयारी

    नागपूर विद्यापीठाला मिळाली आयोजनाची जबाबदारी

    48 वर्षानंतर मिळाला नागपूरला आयोजनाचा मान

    3 ते 7 जानेवारीपर्यंत चालणार परिषद

    मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन करणार उद्घाटन

  • 02 Jan 2023 04:46 PM (IST)

    कलावंतांना मानधन मिळत नसल्यानं कलावतांनी सुरेखा पुणेकरांची घेतली भेट

    राज्य शासनाकडून मानधन मिळत नाही स्थानिक अधिकारी ऐकत नाहीत,

    सांगली, सातारा , वाई ,सोलापूर या भागातील कलावंतांनी पुण्यात येऊन भेट घेत,

    सरकारकडे कलावंतांचे प्रश्न मांडण्याची केली विनंती,

    राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्याची केली विनंती.

  • 02 Jan 2023 04:39 PM (IST)

    बार्शीतील पांगरी-शिराळे येथील फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

    सोलापूर :

    - बार्शीतील पांगरी-शिराळे येथील फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

    - फटाका फॅक्टरीचा मालक युसुफ मणियार याच्यावर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल

    - फॅक्टरी मालक युसुफ मनियार आणि नाना पाटेकर यांच्यावर गुन्हा दाखल

    - बार्शीतील पांगरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला गुन्हा

    - संबंधित फॅक्टरीने कोणताही परवाना न घेता चालवत असल्याची बाबही गुन्ह्यामध्ये नोंद

    - फटाका फॅक्टरीचा चालक आणि त्याचा साथीदार परागंदा

    - 304, 337, 338, 285, 286, 34 भारतीय विस्फोटक अधिनियम कलम 5 आणि 9 (ब)

    - सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला गुन्हा

  • 02 Jan 2023 04:22 PM (IST)

    कलावंतांना मानधन मिळत नसल्यानं कलावतांनी सुरेखा पुणेकरांची घेतली भेट

    पुणे :

    कलावंतांना मानधन मिळत नसल्यानं कलावतांनी सुरेखा पुणेकरांची घेतली भेट

    राज्य शासनाकडून मानधन मिळत नाही स्थानिक अधिकारी ऐकत नाहीत

    सांगली, सातारा, वाई,सोलापूर या भागातील कलावंतांनी पुण्यात येऊन भेट घेतली

    सरकारकडे कलावंतांचे प्रश्न मांडण्याची केली विनंती

    राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्याची केली विनंती

  • 02 Jan 2023 02:05 PM (IST)

    नामांतरापेक्षा जिल्ह्याचे विभाजन करा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची मागणी

    अहमदनगर : त्यामुळे आता नामांतराच्या प्रश्ना बरोबर जिल्हा विभाजनाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे,

    विभाजनानंतर काय नाव द्यायचं राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून विचारविनिमय करून निर्णय घ्यावा,

    उत्तर नगर जिल्ह्यापेक्षा दक्षिण नगर जिल्हा दुष्काळी,

    विभाजन झालं तर दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल संग्राम जगताप.

  • 02 Jan 2023 01:57 PM (IST)

    पुण्यात चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी कार धरणात बुडाली

    खेड तालुक्यातील चासकमान धरणात कार बुडाली

    रात्रीच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना

    कारमधून 4 जण करत होते प्रवास

    गाडीच्या काचा खाली आसल्याने चार जणांचे वाचले प्राण

    वेळीच मदत मिळाल्याने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश

  • 02 Jan 2023 12:43 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची शक्यता

    जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दाैरा

    शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी राहणार सामील

    शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार असल्याची माहिती

  • 02 Jan 2023 11:01 AM (IST)

    नाशिक ग्रामीण पोलीस दलात 179 जागांसाठी भरती

    21 हजार 49 उमेदवारांनी केले अर्ज

    आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू

    चालकांची 15 पदे देखील भरली जाणार

    जवळपास 2 हजार महिला उमेदवारांचे अर्ज

    तीन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील केले अर्ज

  • 02 Jan 2023 10:45 AM (IST)

    तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात आरोपी शिझान खान जामिनासाठी करणार अर्ज

    तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात आरोपी शिझान खान जामिनासाठी करणार अर्ज

    31 डिसेंबर रोजी शिजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

    शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा करणार जामिनसाठी अर्ज

  • 02 Jan 2023 10:44 AM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे शहरातील रस्त्याच्या कामाचा घेणार आढावा

    सर्किट हाऊस येथे बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

    चंद्रकांत पाटलांच्या बैठकीच्या ठिकाणी पोलीस विभाग अलर्टवर

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    काल चंद्रकांत पाटील भीमा कोरेगावला गेले नव्हते, घरूनच चंद्रकांत पाटलांनी केलं होतं अभिवादन

  • 02 Jan 2023 09:50 AM (IST)

    विरोधीपक्ष नेते अजित पवारांच्या विरोधात भाजप आक्रमक

    पुणे : अजित पवारांच्या विरोधात शहर भाजप करणार आज आंदोलन,

    भाजप शहराध्यक्ष जगदीश यांच्या नेतृत्वात 11 वाजता आंदोलन,

    संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापले,

    भाजपसह शिंदे गटाने केली अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

  • 02 Jan 2023 09:32 AM (IST)

    आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    अहमदनगरच्या पोलीस मुख्यालय मैदानात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    129 जागेसाठी 14 हजारहुन अधिक अर्ज प्राप्त

    तर आरंगाव येथील बायपासला धावण्याची चाचणी

    अनेक वर्षापासून भारतीय प्रक्रिया रखडल्याने तरुणांमध्ये नाराजी होती

    अखेर भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्याने तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण आहे

    मात्र 129 जागेसाठी 14 हजार अर्ज आल्याने तरुणांमध्ये धाकधूकीच वातावरण

  • 02 Jan 2023 08:41 AM (IST)

    फुलवाडी टोल नाक्यावरील टोल वसुली काल दुपारपासून बंद

    सोलापूर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी टोल नाक्यावरील टोल वसुली काल दुपारपासून बंद

    शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आक्रमक आंदोलननंतर टोल वसुली बंद

    31 डिसेंबर 2022 पुर्वी टोल रस्त्याची कामे पुर्ण करा अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला होता

    अनेक उड्डान पूल, रस्ते कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरु असल्याने केले होते आंदोलन

    शिवसेना खासदार ओमराजे यांनी टोल बंद करण्याच्या आवाहनानंतर शिवसैनिकांचे केले होते आक्रमक आंदोलन

  • 02 Jan 2023 08:23 AM (IST)

     वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले

    ही घटना पाली येथील राजकीय वासाजवळ घडली.

    अपघातात सुमारे दहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

    कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलं नाही.

    बचाव पथक घटनास्थळी दाखल. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं

  • 02 Jan 2023 08:04 AM (IST)

    जिंदाल कंपनीला लागलेली आग अजूनही धूमसतीच

    नाशिक : आतापर्यंत आगीत दोघांचा मृत्यू ,तर 17 जखमी,

    तिघांची प्रकृती चिंताजनक,

    आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच,

    22 तासानंतर देखील आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच,

    अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरूच,

    मुख्यमंत्र्यांकडून काल मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर,

    आगीच्या घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

  • 02 Jan 2023 07:47 AM (IST)

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार सभा

    भव्य सभेला राज्यातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती

    मैदाना जवळील पाच महत्त्वाचे रस्ते उद्या सभेमुळे बंद

    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची ही महत्त्वाची सभा

  • 02 Jan 2023 07:45 AM (IST)

    औरंगाबादेत नवीन वर्षात धावणार 3580 नवीन बसगाड्या

    औरंगाबादेत नवीन वर्षात धावणार 3580 नवीन बसगाड्या

    3580 नवीन बस गाड्यांपैकी 180 बस गाड्या असणार इलेक्ट्रिक

    राज्यातील 50% एसटी बसचे आयुष्यमान संपल्याची माहिती

    2026 पर्यंत 5000 इलेक्ट्रिक बस येणार असल्याची महामंडळाकडून माहिती

    2023 या सालात प्रवाशांच्या सेवेत पाहायला मिळणार नवीन बस गाड्या

  • 02 Jan 2023 07:39 AM (IST)

    कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात सापडला सिमकार्ड नसलेला मोबाईल

    तुरुंगाच्या भिंतीत दुधाच्या पिशवीत लपवला होता सिम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल

    तुरुंग अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडती दरम्यान आला प्रकार समोर

    मोबाईल सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

    कळंबा कारागृहात या आधीही सापडलेत मोबाईल आणि गांजा

  • 02 Jan 2023 06:12 AM (IST)

    मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ भीषण अपघात

    एक महिला ठार तर लहान मुलासह तीन जण जखमी

    मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हॉल जवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला

    अपघातातील एकाची प्रकृती चितांजनक आहे

    मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो गाडी, रिक्षा व स्कुटी अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून स्कुटी व रिक्षाचा चक्काचूर झाला आहे

  • 02 Jan 2023 06:09 AM (IST)

    रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार

    गुहागर येथून नवी मुंबईला जाणाऱ्या धावत्या मारुती स्वीफ्ट डिजायर कारने अचानक घेतला पेट

    मुंबई-गोवा महामार्गावर खेड मोरवंडे गावानजीक घडली घटना

    धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून गाडीतील चार प्रवासी बाहेर पडले

    सुदैवाने जीवितहानी टळली मात्र गाडीतील बॅगा आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या

  • 02 Jan 2023 06:07 AM (IST)

    सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्याचा मालक युसुफ मणियार घटनेनंतर बेपत्ता

    पोलिसांकडून मणियार याचा शोध सुरू आहे

    बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे गावात त्यांचा फटाका कारखाना होता

    कारखान्यातील स्फोटात चार कर्मचारी ठार झाले असून तीन कर्मचारी गंभीर जखमी आहेत

    अद्यापही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाचे शोध कार्य सुरू

  • 02 Jan 2023 06:02 AM (IST)

    आंध्रप्रदेश येथील तिरूपती बालाजीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

    मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान घेतले तिरूमाला बालाजीचे दर्शन

    यावेळी सर्व शिंदे कुटुंब उपस्थित होते

    श्रीकांत शिंदे यांच्या मुलाचे केस देखील तिरुमालाला देण्यात आले

  • 02 Jan 2023 06:00 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील फटाका कारखाना स्फोट प्रकरणी शोधकार्य सुरूच

    बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे गावात असलेल्या फटाका कारखान्यातील स्फोटात चार कर्मचारी ठार

    तीन कर्मचारी गंभीर जखमी

    प्रशासनाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू

    अद्यापही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाचे शोध कार्य सुरू

Published On - Jan 02,2023 5:54 AM

Follow us
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.