AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा हल्ला, शिंदेंना अटक कशी होणार सांगितले ?

Sanjay Raut | भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे या प्रकरणात मनी लॅन्ड्रींग कायद्यानुसार ईडीने कारवाई करायला हवी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा हल्ला, शिंदेंना अटक कशी होणार सांगितले ?
| Updated on: Feb 05, 2024 | 11:57 AM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि. 5 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. मनी लॅन्ड्रींग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा केला. देशात या पद्धतीने आतापर्यंत विरोधकांना ईडीने अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्विकारला आहे. यासंदर्भात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

गुन्ह्यात पुरावा लागत नाही

मनी लॅन्ड्रींग कायद्यानुसार या गुन्ह्यात पुरावा लागत नाही. या प्रकरणात स्टेटमेंट आले आहे. हे स्टेटमेंट हाच पुरावा असतो. त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार आता किरीट्ट सोमय्या यांनी या प्रकरणात करवाईची मागणी करायला हवी. या कायद्याचा गैरवापर होत आहे. आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली तर ईडीची भूमिका भ्रष्टचारविरोधी असल्याची स्पष्ट होईल.

हे गुंड कोण आहेत

बाळराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला. ते हाडवैद्य आहे. त्या हाडवैद्यांना आम्ही खासदार केले. त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदार गोळीबार करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती. त्यासंदर्भातील एक फोटो मी ट्विट केला आहे. यासंदर्भात अनेक गुंडाचे फोटो आहे. हे गुंड कोण आहेत, त्याची पोलिसांनी चौकशी करावी.

गुंडांचे संघटन बनवण्याची पोलिसांवर जबाबदारी

गुंडाचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाढ असेल तर ते कायद्याने काम करतील. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहे का? हे त्यांनी सांगावे.

त्या व्हिडिओमध्ये काय

शिंदे गटाचे खासदार परदेशात गेले होते. त्यांचा व्हिडिओ मला मिळाला आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र काय आहे, हे समोर येईल. त्यासाठी वेट अँड वॉच करा.

अजित पवार इतके निर्दयी कसे

अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार इतके निर्दयी होतील, असे मला वाटले नाही. ज्या पवार साहेबांनी आपणास खाऊ, पिऊ घातले. त्यांना ओळख दिली. त्यांना धडे दिले. त्यांच्याबाबत इतके कृतघ्न असू नये. अजित पवार यांनी नवीन भूमिका घेतल्यापासून ते लांडग्यांच्या भूमिकेत गेले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.