वडील म्हणून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार, व्हायरल व्हिडीओतील ‘तो’ जिवंत रुग्ण कुठे गेला? मुलीचा संतप्त सवाल

अंत्यसंस्कारासाठी आणलेला कोव्हिड रुग्ण जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. (patient died who Appearing in hospital viral video)

वडील म्हणून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार, व्हायरल व्हिडीओतील 'तो' जिवंत रुग्ण कुठे गेला? मुलीचा संतप्त सवाल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 7:52 AM

मुंबई : अंत्यसंस्कारासाठी आणलेला कोव्हिड रुग्ण जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर आता या रुग्णाचे नातेवाईकही समोर आले आहे. जर तो रुग्ण जिवंत होता तर मग तो कुठे गेला? असा सवाल व्हायरल व्हिडीओतील रुग्णाचा नातेवाईकांनी केला आहे. (Mumbai patient died 9 month before who Appearing in a hospital viral video)

नेमका प्रकार काय? 

मुंबईत राहणाऱ्या गुप्ता कुटुंबियांसोबत हा प्रकार घडला आहे. रामसरण  गुप्ता हे मुंबईच्या चेंबूर परिसरात राहत होते. रामसरण गुप्ता यांना 24 जूनला कोरोनाची लागण झाली. त्यांना वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र 29 जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. त्यानंतर गुप्ता कुटुंबियांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

यानंतर काही दिवसांपूर्वी भाभा रुग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत काही रुग्ण दिसत आहेत. त्यात दिसणारा एक रुग्ण हे दुसरे तिसरे कुणी नसून रामसरण गुप्ता असल्याचे दावा त्यांच्या मुलीने केला आहे. तसेच जर ते जिवंत होते, तर मग ते आता कुठे आहेत? आणि मग आम्ही वडील समजून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, ते कोण होते? असा सवाल गुप्ता कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांपुढे आव्हान

या रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गुप्ता कुटुंबाने केले आहे. याबाबत कुटुंबियांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता रामसरण गुप्ता कुठे आहेत? त्यांना पोलीस शोधून काढतात का? हे पाहावं लागणार आहे. यामुळे आता पोलिसांसमोर रामसरण गुप्ता यांना शोधण्याचे मोठे आव्हान समोर आले आहे.  (Mumbai patient died 9 month before who Appearing in a hospital viral video)

संबंधित बातम्या : 

पनवेल मनपासोबत MGM हॉस्पिटलचा करार; 200 ICU बेडसह 300 RT-PCR टेस्टची सुविधा!

ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार

VIDEO | अहमदनगरमध्ये तहसीलदार ज्योती देवरेंकडून कोरोनाबाधित वृद्धावर अंत्यसंस्कार

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.