Santosh Dhuri : मनसेचे जय-वीरु वेगळे झाले, 22 वर्षांची घट्ट मैत्री, एकत्र चहाचं पुढे काय होणार? संतोष धुरी म्हणाले…
Santosh Dhuri : "22 वर्षानंतर जर मी पक्ष सोडत असेल तर काही विचार करून मी पक्ष सोडत आहे. देवेंद्र फडणवीस मला योग्य न्याय देतील त्यांचं माझ्यावरती लक्ष आहे. पश्चाताप नक्की कोणाला होईल? हे येत्या पंधरा तारखेनंतर कळेल" असं संतोष धुरी म्हणाले.

“या ठिकाणी कुठलाही सर्वे झालेला नाहीये. ज्या देतायेत त्या सीट घ्यायच्या असे या ठिकाणी ठरवलेलं आणि त्यासोबतच एकदा आपला पक्ष सरेंडर करायचं ठरवल्यावरती त्यावर काही आता बोलायचं नाही” असं संतोष धुरी राज ठाकरे यांना उद्देशून बोलले. “भावनिक करण्यामध्ये उद्धव ठाकरे पहिल्या नंबर वरती आहेत. इमोशनल ब्लॅकमेलिंग ते करत असतात आणि प्रत्येक निवडणुकीला ते तसंच करत असतात. आता दोघांनी मिळून इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे. मराठी माणसाला इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत” असं संतोष धुरी म्हणाले.
“विधानसभेच्या आधी एकमेकांवरती बोलत होते. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसेला संपलेला पक्ष बोलत होते. काल पक्ष प्रवेश केल्यानंतर अनेक फोन मला आले. यामधून नक्की लोकांची भावना काय आहे हे मला समजलं” असं संतोष धुरी म्हणाले. “मी देखील ती फेसबुक पोस्ट पाहिली. त्याबद्दल मला आधार वाटला. नक्कीच त्यांना माझ्याबद्दल कुठेतरी वाटत असेल म्हणून त्यांनी ती पोस्ट केली असावी” असं संतोष धुरी म्हणाले.
चहा पिण्यासाठी आम्ही एकत्र असतो
“संदीप देशपांडे आणि माझी मैत्री आधीपासून आहे. आमची नेहमी चर्चा होत असते. परंतु आता त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे राजकीय चर्चा बंद कराव्या लागतील. परंतु चहा पिण्यासाठी आम्ही एकत्र असतो. संदीप देशपांडे माझा नेता होता. त्यांनी पहिलं जाण्याच्या आधी मी बाहेर निघालेलो आहे. परंतु राजकीय धडे आहेत. आम्ही घेत राहणार. चहा प्यायला आल्यानंतर आमच्याकडचं संभाषण तुम्हाला माहित असतं” असं संतोष धुरी म्हणाले.
हे येत्या पंधरा तारखेनंतर कळेल
“22 वर्षानंतर जर मी पक्ष सोडत असेल तर काही विचार करून मी पक्ष सोडत आहे. देवेंद्र फडणवीस मला योग्य न्याय देतील त्यांचं माझ्यावरती लक्ष आहे. पश्चाताप नक्की कोणाला होईल? हे येत्या पंधरा तारखेनंतर कळेल” असं धुरी म्हणाले. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये आले आहेत. त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा मुंबईत मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
