Maharashatra News Live : बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्याचं बघायला मिळेल- तटकरे
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची ‘कोअर कमिटी’ जाहीर करण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतरही पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवण्याचे वरिष्ठांचे स्थानिक भाजप नेत्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राज्यात नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षांनी कंबर कसली असली तरी सर्वांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. काही लोकांमुळे कोकणची बदनामी होत असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. तर मालेगाव येथील चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात काल महिलांचा कोर्ट परिसरात संताप दिसून आला. नराधमाला ताब्यात देण्याची महिलांनी मागणी केली.यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
महायुतीत कलगीतुरा! सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना शेलक्या शब्दात सुनावलं
‘त्यांना काय बोलायचे ते बोलुद्या , मी त्याकडे लक्ष देत नाही. 40 वर्षापासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय. रायगडच्या जनतेला माझ्यासारखा कार्यकर्ता भावतो आहे. टीकाकार टीका करताय मात्र त्यांच्या विचाराची संस्कृती तेवढी असेल त्यांचा DNA तेवढ्याच मनोवृत्तीचा असेल त्याला मी काही करू शकत नाही.’, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भरत गोगावलेंवर केली.
-
आरएसएस राजकारण करत नाही आणि कोणावरही नियंत्रण ठेवत नाही: मोहन भागवत
संघ प्रमुख मोहन भागवत यांनी इंफाळमध्ये सांगितले की, संघाची निर्मिती राजकारणासाठी नाही तर समाजाला एकत्र करण्यासाठी झाली आहे. संघ राजकारणात सहभागी होत नाही किंवा कोणावरही नियंत्रण ठेवत नाही. त्याचा एकमेव उद्देश समाजाला एकत्र करणे आहे.
-
-
ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरला 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स
250 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात, मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ओरीलाही बुधवार 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
-
बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्याचं बघायला मिळेल- तटकरे
‘आमच्या सर्वांचा प्रयत्न होता की सर्व ठिकाणी महायुती म्हणून लढावं. परंतु मधल्या कालावधीत निवडणुका न झाल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक होते. विधानसभेला आम्ही सर्वांनी एकता दाखवली. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही खूप ठिकाणी परस्पर विरोधी लढत आहोत ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. परंतु आमच्यात कटुता येणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. निकालाच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्याचं बघायला मिळेल.’ असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
-
पंतप्रधान मोदींचे जोहान्सबर्गमध्ये जल्लोषात स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका हॉटेलमध्ये पोहोचल्यावर भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले. जिथे 20 व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
-
-
धक्कादायक बापाचाच मुलीवर अत्याचार, गोंदिया हादरलं
बापानेच केला स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, 14 वर्षीय मुलगी गर्भवती
गोंदिया जिल्ह्यातील धक्कादायक घटना
POCSO अंतर्गत बापावर गुन्हा दाखल, बापाला अटक
घटनेनं गोंदिया जिल्ह्यात खळबळ
-
नांदेडच्या लोहा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा
नांदेडच्या लोहा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला शरद पवार गटाचा पाठिंबा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पवार यांनी दिले पाठिंब्याचे पत्र
नांदेड जिल्ह्यात हदगाव आणि लोहा नगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
हदगाव नगरपालिकेत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा देशमुख यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा
-
सांगोला येथे आजोबा साठी नातवाची नगरपालिका निवडणुकीच्या मैदानातून माघार
सांगोला येथे आजोबा साठी नातवाची नगरपालिका निवडणुकीच्या मैदानातून माघार
बनकर कुटुंबातील आजोबा आणि नातू हे दोघेही सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते
भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी 73 वर्षाचे आजोबा मारुती आबा बनकर तर नगरसेवक पदासाठी 21 वर्षाचा नातू ज्योतिरादित्य सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरले
या निवडणुकीत आजोबांकडून शिकण्यासाठी आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी नातवाने निवडणुकीच्या मैदानातून घेतली माघार
-
ठाण्यामध्ये रिपब्लिक पक्षाच्या वतीनं 11 व्या वर्धापन दिनाचं आयोजन
ठाण्यामध्ये रिपब्लिक पक्षाच्या वतीनं 11 व्या वर्धापन दिनाचं आयोजन
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमन आनंदराज आंबेडकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील इतर नेते राहणार उपस्थित
ठाण्यातील मासूंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या मेळाव्याचे आयोजन
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार .
-
मुंबई : चारकोप गोळीबारातील आरोपींना पुण्यात शेतातून अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने चारकोप गोळीबारातील आरोपीला पुण्याजवळील शेतातून धावत फिल्मी शैलीत अटक केली. या घटनेतील चारही जणांना आता अटक करण्यात आली आहे. फ्रेडी नावाच्या इस्टेट एजंटवर गोळीबार करून हे चारही आरोपी पळून गेले होते. गुन्हे शाखेने चारही आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.
-
नाशिक : भगूर नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माघार
नाशिकमधील भगूर नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री देशमुख यांनी माघार घेतली आहे. देशमुख यांनी अजित पवार गट आणि भाजप युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आता भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अनिता करंजकर आणि अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे आमने-सामने असणार आहेत.
-
मालेगाव – नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, दादा भुसेंची मागणी
मालेगावात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मालेगावमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, मालेगावातील घटना निंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध होत आहे. पीडितीचे नातेवाईक आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे.
-
मतभेद होणार नाहीत याची काळजी घेणार – बावनकुळे
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील भेदभावाबाबत भाष्य केले आहे. आमच्यात मतभेद मतभेद नाहीत होणार नाही याची काळजी सर्वच उमेदवार घेतील. काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं पण आम्ही सांभाळून घेऊ. मतभेद होऊ देणार नाही त्याचा समन्वय आम्ही साधू.
-
कॉलेजात नमाज पढल्याने गोंधळ
कल्याण मलंगरोड भालरोडवरील आयडियल कॉलेजमध्ये तरुण नमाज पढत असल्याने गावकरी , विद्यार्थी, बजरंगदल आणि हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये गोंधळ घातला आहे.नमाज पडणाऱ्या तरुणांना उठाबशा काढायला लावत संतप्त कार्यकर्त्यांनी माफी मागायला लावली आहे.
-
चारकोप गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेची तिघांना अटक
चारकोप गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना अटक केली आहे.बुधवारी दुपारी कांदिवली पश्चिम चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या दोन गोळ्या झाडून आरोपी पळून गेले होते.गुन्हे शाखेने तिघा आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.
-
पालघर नगरपरिषदेत भाजपाचे चार बंडोबा अखेर थंडोबा झाले
पालघर नगरपरिषदेत भाजपाच्या ४ बंडखोर उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाजपाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांना यश आले आहे. नगराध्यक्ष पदाचे बंडखोर उमेदवार प्रशांत पाटील, नगरसेवक पदाचे बंडखोर उमेदवार हजारी लक्ष्मीदेवी धनराज, हजारी तेजराजसिंह धनराजसिंह, चंद दिपक दुबे या चार उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
-
वैजापूर नगर परिषदेत आता भाजप आणि शिवसेना असा सामना
वैजापूर नगर परिषदेत आता भाजप आणि शिवसेना असा सामना बघायला मिळणार आहे, आज अर्ज परत घेण्याची आजशेवटच्या तारखेला भाजपचे दिनेश परदेशी आणि शिंदे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे हे दोघे आता समोरा समोर निवडणूक लढवणार आहेत. आता गंगापूर नगरपरिषदमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना बघायला भेटणार आहे
-
गंगाखेड निवडणुकीत मोठा उलटफेर, रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची मोठी खेळी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने गुट्टे यांच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात अधिकृत उमेदवार दिला असतानाही, अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात गुट्टे यांनी बाजी मारली आहे. रासप पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना अधिकृत ‘एबी फॉर्म’ देण्यात आला होता, त्या शरीफा मुनीरा यांनी ऐनवेळी निवडणुकीतून आपला अर्ज माघारी घेतला आहे. यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात पक्षाने उभा केलेला उमेदवार अखेर निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे गंगाखेडच्या राजकीय गणितात मोठा बदल झाला आहे.
-
शेवटच्या क्षणी राजेंद्र पठारेंनी नगराध्यक्ष पदाचे अर्ज घेतले मागे
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम क्षणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे गटातून निलंबित करण्यात आलेले राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले दोन्ही अर्ज माघारी घेतले आहेत. राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला असला तरी, नगरसेवक पदासाठी त्यांचे, सागर लुटे आणि उज्वला होले यांचे पक्षचिन्हावरील उमेदवारी अर्ज मात्र कायम आहेत.
-
पुणे हिंजवडीत थरार, रेडीमिक्स वाहनाखाली चिरडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यातील हिंजवडी परिसरात पुन्हा एकदा अपघाताची गंभीर घटना घडली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारे रेडीमिक्स (RMC) वाहनाखाली चिरडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलीचे नाव रिदा खान असे आहे. रिदा आपल्या पाच मित्र-मैत्रिणींसोबत कासारसाई धरणावर फिरण्यासाठी गेली होती. हिंजवडी जवळील शिंदे वस्ती परिसरातील उताराच्या ठिकाणी रिदा आणि तिचा एक मित्र रेडीमिक्स वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करत होते. याच वेळी त्यांची गाडी स्लीप झाली आणि रिदा खान रेडीमिक्स वाहनाच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सलग घडलेल्या या घटनांमुळे हिंजवडी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-
साताऱ्यात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार? बड्या नेत्याच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आगामी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपला स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या शिंदे गटासोबत येणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही भेट अत्यंत गोपनीय असल्याने, या भेटीतून नेमके कोणते समीकरण जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
दख्खनचा राजा श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी रथोत्सव: म्हसवड नगरीत गुलाल-खोबऱ्याची उधळण
सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरीत आज श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीच्या रथोत्सव सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. गुलाल-खोबऱ्याची उधळण करत या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
दुबई एअर शोदरम्यान तेजस विमानाचा मोठा अपघात
दुबई येथे सुरू असलेल्या एअर शो दरम्यान उड्डाण करत असताना भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले. या अपघातानंतर काळ्या धुराचे लोट पाहायला मिळाले. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत वैमानिकांबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
-
दोंडाईचा नगरपालिकेत सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड
दोंडाईचा नगरपालिकेत इतिहास घडला आहे. या नगरपालिकेत सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. विरोधातल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्वे 26 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
-
मनसे दिंडोशी विधानसभा उपविभाग अध्यक्ष केतन नाईक यांच्याकडून ऍम्ब्युलन्स सेवा
मनसे दिंडोशी विधानसभा उपविभाग अध्यक्ष केतन नाईक यांच्याकडून ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करुन देणयात येणार आहे. या ऍम्ब्युलन्सचं उदघाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. ही रुग्णवाहिका दिंडोशी विधानसभेतील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.
-
IND vs BAN : टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी, बांगलादेशला पहिला धक्का
एसीसी आशिया कप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु आहे. भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली असून बांगलादेशची पहिली विकेट 43 धावांवर पडली.
-
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, नक्की काय?
अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख ,सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश झाला आहे. कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रवादी प्रवेश पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा झटका समजला जात आहे.
-
बिलोलीत मराठवाडा जनहित पार्टी-दादांच्या राष्ट्रवादीत राडा
बिलोलीत मराठवाडा जनहित पार्टी-दादांच्या राष्ट्रवादीत राडा झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराला पतीसह डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. जनहित पार्टीच्या संतोष कुलकर्णी यांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुटका करताना पोलिसांसमोर हा राडा झाला.
-
पेण पालिकेत भाजपचे अभिराज कडू, NCPच्या सुशीला ठाकूर यांची बिनविरोध निवड
पेण पालिकेत भाजपचे अभिराज कडू, NCPच्या सुशीला ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राष्ट्रवादी दादा गट आणि ठाकरे सेनेत राडा
नांदेडमधील हिमायतनगर नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून हिमायतनगरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेत राडा पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजचा (21 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. त्यावरुन गोंधळ पाहायला मिळाला.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावीद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झालेली पाहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या वार्ड क्रमांक 9 च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद झाला.
-
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का मिळाला आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळते असा भोईरांनी आरोप केला आहे.
-
जळगावात भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर दबाव?
जळगावात भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर दबाव टाकल्याचा आरोप असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या आरोपाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
मालेगावात आंदोलक गेट तोडून कोर्टात शिरले, आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची मागणी
तीन वर्षांच्या चिमुरडीसोबत अत्याचार अन् हत्याप्रकरणी मालेगावात आक्रोश दिसून येत आहे. कोर्टाबाहेर मालेगावात आंदोलक गेट तोडून कोर्टात शिरले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
-
शौचालयाच्या फ्लशमध्ये शेकडो मतदान ओळखपत्र
व्हायरल व्हिडिओनुसार मुंबईच्या अंधेरी भागात एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही सर्व ओळखपत्र कोरी आहेत.
-
वन विभागाच्या निषेधार्थ प्रहारचे आंदोलन, फेकून मारले खेकडे
अहिल्यानगरमधील जिल्ह्यात वाढते बिबट्याचे हल्ले रोखण्यात वन विभाग अपयशी असल्याचे म्हणत प्रहार संघटने आंदोलन केले आहे. त्यांनी वन विभागाच्या गेटवर खेकडे फेकून मारले आहेत. पोलिसांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशीं आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
-
मालेगाव न्यायालयात नागरिक आक्रमक, फाशीच्या शिक्षेची मागणी
मालेगाव न्यायालयात नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी डोंगराळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकून मारल्या आहेत. नंतर न्यायालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-
अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात
अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर येथील नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात . खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली कामाची पाहणी. पाहणी करतांना अधिकाऱ्यांना देखील दिल्या सूचना.
-
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन
धाराशीव तालुक्यातील ढोकी चौकामध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन. ऊसाला 3500 प्रति टनाप्रमाणे भाव द्यावा तसेच गुळ पावडर कारखान्यांनी ऊसाला तीन हजार रुपये प्रति टन भाव देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. लवकरात लवकर भाव घोषित नाही केला तर कारखाने चालू देणार नाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
-
धाराशिव-मुरूम नगरपालिका निवडणूक, प्रशांत पाटील यांची माघार
धाराशिव-मुरूम नगरपालिका निवडणुकीत शेवटी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील यांच्या पुतण्याने माघार घेतलीय. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार प्रशांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील आणि पुतण्या प्रशांत पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते.
-
संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्ज विकणाऱ्याला घेतलं ताब्यात
बंदी असलेले एमडी ड्रग्ज विकणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई. पहाटेच्या सुमारास सापळा लावून केली कारवाई. आलिशान कारसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त. संगमनेर शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गणेश नगर परिसरात पोलिसांची कारवाई. नाशिक शहरातील आशिष सुनीलदत्त मेहेर या 20 वर्षीय तरुणास पोलिसांनी केली अटक. त्याच्या ताब्यातील फॉरच्युनर कार देखील पोलिसांनी केली जप्त. नशेखोरीचे रॅकेट शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान.
-
खडसेंच्या भूमिकांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा – चंद्रकांत पाटील
“खडसे कुटुंबियांचं तडजोडीच राजकारण असतं. आज याला मदत, उद्या त्याला मदत करण्याचे काम कुटुंबात चालतं. खडसे कुटुंबीयांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मुक्ताईनगर सज्ज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत युती तुटली याची खंत आहे. खडसेंच्या भूमिकांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण झाला” असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
अमरावती – काँग्रेस कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक..
कृषिमंत्री दत्तामामा भरणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर.. काँग्रेस कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांच्या नजर कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना यशोमती ठाकूर यांनी परत आणलं . या सरकारकडून तोडफोडीच राजकारण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
-
मुंब्रा रेल्वे अपघात, अटक टाळण्यासाठी अभियंत्यांची हायकोर्टात धाव
मुंब्रा अपघातामध्ये गुन्हा दाखल असलेल्या रेल्वेच्या अभियंत्यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकपूर्वी जामीन अर्जावर 9 डिसेंबरला सुनावणी पार पडणार आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून यापूर्वीच दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता.
-
माजी भाजप नगरसेवकांनी कोणतीही मारहाण केली नाही – समीर फाटे
माजी भाजप नगरसेवकांनी कोणतीही मारहाण केली नाही असं स्पष्टीकरण समीर फाटे यांनी दिलं आहे. श्रेयवाद कोणीही घेऊ नये असंही ते म्हणाले .
-
राज्यात सर्वात जास्त दुबार मतदारांचे प्रमाण हे सर्वाधिक जळगाव शहरात ?
जळगाव महापालिकेची 4 लाख 38 हजार 523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात 33 हजार 770 दुबार मतदार आढळून आले. राज्यात सर्वात जास्त दुबार मतदारांचे प्रमाण हे सर्वाधिक जळगाव शहरांमध्ये असल्याचे प्रसिद्ध मतदारांच्या प्रारूप यादीवरून समोर आले आहे.
राज्यात दुबार मतदारांचे टक्केवारीत सर्वाधिक 7.7टक्के एवढे प्रमाण जळगाव शहरामध्ये आणि त्या खालोखाल छत्रपती संभाजी नगर येथे 5.1 एवढे असल्याचे समोर आले आहे
महापालिकेच्या सतरा मजलीतील दुसऱ्या मजल्यापरीत सभागृहात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात करण्यात आली
-
चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवड…
फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची पहिली प्रतिक्रिया… चिखलदरा विकासासाठी जनता फडणवीस यांच्यावर विश्वास… विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले… फडणवीस यांची विकासकेंद्रित भूमिका लोकांना मान्य ,बिनविरोध निवड हा चांगला निर्णय कलोतींची प्रतिक्रिया… मी सर्वांगीण विकासासाठी काम करणार आल्हाद कलोती यांची प्रतिक्रिया.
-
पालघर जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि एका नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार – भरत राजपूत
जिल्हाध्यक्ष तथा डहाणू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांचा विश्वास… पालघर जिल्ह्यात 4 नगराध्यक्ष सह नगरसेवक आम्ही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत… 3 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष निवडून येणार… 2014 पासून मोदी यांनी जो नारा दिला आहे ‘सबका साथ सबका विश्वास’ हा नारा घेऊन आम्ही निवडणूक जिंकणार…
-
काँग्रेस पक्षाकडून भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार कल्याण काळे यांच्यासह स्थानिक नेते राहणार उपस्थित… जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद काँग्रेस पक्षासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे… गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेत असलेली सत्ता पुन्हा एकदा टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांसमोर आव्हान…
-
सातारा – दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान…
सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ… दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी भरले आहेत अपक्ष अर्ज… या अपक्षांचे अर्ज आज माघारी घेण्यासाठी दोन्ही राजेंकडून होणार प्रयत्न… आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
-
निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम
-उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेमुळे निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. या थंडीमुळे तालुक्यातील गोंदेगाव, गोळेगाव परिसरातून वाहणाऱ्या गोईनदीच्या पाण्यावर नयनरम्य बाष्पयुक्त धूके..
-
सिल्लोडमध्ये नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराने घेतला वेग
सिल्लोडमध्ये नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून शिवसेना भाजप सह सर्वच पक्ष पायी रॅली काढत मतदारांची भेट घेत आहेत. सिल्लोड मध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर सत्तार हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत.
-
गोळीबाराचे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर
चारकोपमध्ये फ्रेडीवर झालेल्या गोळीबाराचे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये, तुम्ही फ्रेडी आणि त्याचा मित्र एका गेटमधून बाहेर पडून कारकडे जाताना पाहू शकता. मग तिथे आधीच उभा असलेला एक आरोपी फ्रेडीजवळ येतो आणि त्याच्या छातीत आणि पोटात थेट दोन गोळ्या झाडतो आणि पळून जातो.
-
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानेच जमिनीत केले होते अतिक्रमण
– बीडच्या तांदळा गावात 154 शेतकऱ्याच्या लढ्याला तब्बल दहा वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश आले आहे. न्यायालयाने मावेजा देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मावेजापोटी तब्बल 100 कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
-
सिन्नर एसटी बस अपघात प्रकरणी चौघांचं निलंबन
लॉग बुकमध्ये ब्रेक फेल नोंद, तरीही चालकाने काढली बस. लॉग बुकमध्ये प्रेशर नसल्याची नोंद असतांनाही एसटी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अपघात घडल्याची माहिती समोर. सिन्नरच्या एसटी कार्यशाळेतील मुख्य मेकॅनिक, सहाय्यक मेकॅनिक, वाहन परीक्षक आणि बस चालकाचं निलंबन
-
पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या
पुण्यातील गुजरवाडी येथील धक्कादायक घटना. हत्या करत चुलत भावाचा मृतदेह भरला पोत्यात. अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव तर अशोक पंडित असं आरोपीचं नाव. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून केली अटक. भावाची हत्या करत त्याचा मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे दिला होता फेकून
-
बीडच्या आष्टीनंतर आता गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर
बीडच्या आष्टी तालुक्यात रात्री उशिरा पाटण सांगवी गावामध्ये बिबट्या काही नागरिकांना आढळून आला त्यानंतर गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील ट्रॅक्टर मालक राक्षसभुवन शिवारामध्ये शेतीचे काम आटोपून संध्याकाळी 6 वाजे दरम्यान घरी परतत असताना बिबट्या ज्ञानेश्वर नरवड़े यांच्या शेतात दिसुन आला. पांदण रस्त्यामधून ट्रॅक्टर चालकाने व्हिडिओ काढून गावकऱ्यांना व वनाधिकारी यांना बोलावून व्हिडिओ दाखवला यावर वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी परिसरात पाहणी केली. आज वडगाव ढोक शिवारात पालख्या डोंगरावर एक हरीण मृत अवस्थेत आढळून आले आहे. महिला कापूस वेचणीसाठी गेल्या असता मयत हरीण दिसून आले. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
-
सिल्लोडमध्ये प्रचाराला वेग
सिल्लोडमध्ये नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला आहे. शिवसेना भाजप सह सर्वच पक्ष पायी रॅली काढत मतदारांची भेट घेत आहेत. सिल्लोड मध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर सत्तार हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत.याठिकाणी शिंदे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार विरोधात भाजपा अशी पारंपरिक लढत रंगणार आहे
-
महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गट सज्ज
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाने शहरातील संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिका निवडणूक लक्षात घेऊन सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी ही कमिटी मार्गदर्शक भूमिका निभावणार आहे.
अशी आहे कोअर कमिटी
१) डॉ. अमोल कोल्हे – खासदार २) हर्षवर्धन पाटील – प्रभारी ३) आ. रोहितदादा पवार – आमदार व प्रदेश सरचिटणीस ४) आझम पानसरे – माजी महापौर ५) प्रकाश म्हस्के – निरीक्षक ६) तुषार कामठे- जिल्हाध्यक्ष, पिंपरी चिंचवड ७) देवेंद्र तायडे – कार्याध्यक्ष ८) सुलक्षणा शिलवंत – विधानसभा उमेदवार ९) रविकांत वरपे – प्रदेश प्रवक्ता १०) संदीप चव्हाण – प्रदेश संघटक सचिव ११) विक्रांत पाटील – प्रदेश संघटक सचिव १२) सुनिल गव्हाणे – विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष १३) ज्योती निंबाळकर – महिला शहर अध्यक्षा १४) इम्रान शेख – युवक शहर अध्यक्ष १५) काशिनाथ जगताप – शहर उपाध्यक्ष १६) विशाल वाकडकर – युवक प्रदेश उपाध्यक्ष १७) जयंत शिंदे – शहर सरचिटणीस
-
निवडणुकीला वेग; प्रशासनाची कडक सुरक्षा व्यवस्था
भंडारा–गोंदिया जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीला वेग आला आहे. प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी तपासणी नाके उभारले, प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी केली आहे. दारू, रोकड प्रवाह रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली आहे. एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शंका येणाऱ्या सर्व वाहनांना थांबवून सविस्तर तपासणी करण्यात येत आहे.
-
शरद पवार गटाचा अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा
मावळातील लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आले. शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला बिनशर्त पाठिंबा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मावळात अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला शरद पवार गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमची ताकद मोठ्या प्रमाणात लोणावळा आणि वडगाव मध्ये वाढणार आहे असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
-
भरतशेठ गोगावले यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका
मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत पण एक ना एक दिवस दिवस जय महाराष्ट्र करणार.मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथे धावीर महाराज आहे आमच्याकडे तिकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे या दोन्ही माथ्यावरचा पिंडीवरचा फुल उचलायचं भरत शेठ नी जर काही चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित्त भरत शेठ भोगेल लोकसभेला जर आमदारकीला काही चुकीचं काम केलं असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील.जोपर्यंत चुकत नाही तो पर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे, अशी टीका भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.
Published On - Nov 21,2025 8:10 AM
