AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीत, केंद्र सरकारचा दिलासा काय?

Relief on Onion And Sugarcane Crisis: कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. काल परवा नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी मोठे आंदोलन केले. काल झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

कांद्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीत, केंद्र सरकारचा दिलासा काय?
अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 28, 2026 | 8:35 AM
Share

Sugarcane MSP, Onion Purchase: राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार काल दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार खात्याचे प्रमुख अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत ऊसाचा हमीभाव वाढवणे, इथेनॉल कोट्यात वाढ, कांद्याची थेट खरेदी आणि 10 लाख काद्यांच्या खरेदीवर सहमती झाल्याचे समोर येत आहे. कांदा बियाणे निर्यातीवरील सरचार्ज आणि इतर बाबत शेतकऱ्यांना न्याय मिळेल. हापूस आंब्याच्या विमा नियमातही बदल होण्याची शक्यता आहे.

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार हे अनुकूल असल्याचे समजते. काल झालेल्या बैठकीत शेतकरी आणि सहकारी क्षेत्रातील काही प्रमुख मागण्या आणि मुद्यांबाबत केंद्र सरकार अनुकूल होते. लवकरच सरकार याविषयीचा निर्णय जाहीर करेल. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीविषयी सहकार मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ग्राहक आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रह्लाद जोशी, यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखर उद्योगांना दिलासा

केंद्र सरकारच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या मागण्या विषयी चर्चा झाली. आजच्या बैठकीत नाफेड आणि एनसीसीएफद्वारे थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीच्या मागणीला मंजूरी देण्यात आली. सध्या व्यापाऱ्यांकडून खरेदी होते, ती थेट शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

याशिवाय 2 लाख टन ऐवजी 10 लाख टन कांदा खरेदीच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. कांदा बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने स्थानिक बाजार प्रभावित झाला आहे. त्यामुळे कांदा बियाणे निर्यातीवर अतिरिक्त कर लावण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार अनुकूल आहे. लवकरच याविषयीचा निर्णय जाहीर होईल. कांदा खरेदी मूल्य 15.80 रुपये प्रति किलो केल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट केले.

हापूस आंब्याच्या विमावर सकारात्मक चर्चा झाली

नाफेड आणि एनसीसीएफ ग्रेडिंगच्या नावाखाली मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत खरेदीला नकार देत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे आता मशीनद्वारे ग्रेडिंग करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तर हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवरही चर्चा झाली. विमा कंपन्यांनी लादलेल्या काही नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीत समाधान काढण्याचे आश्वासन दिले.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना.

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप