AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ…मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?

Devendra Fadnavis on Rahul Gandhi: चंद्रपूर येथील कोळसा खाणी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. महाजेनकोला छत्तीसगड राज्यातील गरे पाल्मा ही खाण प्राप्त झाली, त्यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ...मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?
देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 12, 2026 | 12:21 PM
Share

Devendra Fadnavis on Rahul Gandhi: राहुल गांधीची लढाई ही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांची लढाई ही फक्त त्यांना लगातार हार मिळत आहे त्यातून आपलं नेतृत्वाला कसं वाचवायचं, आणि आज काँग्रेस पक्षात आतमधून मोठ्या प्रमाणात हे आम्हाला जिंकून आणू शकत नाही यांना हटवलं जावं असा माहोल आहे त्यापासून भटकवण्यासाठी ते असे बोलत असतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चंद्रपूर येथील कार्यक्रमानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

कोळसा खाणीनिमित्ती नवीन पर्व

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहे त्यांना त्यांच्या मालकीची खान देण्याचा निर्णय हा त्या काळात झाला. त्यातून आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यातील गरे पाल्मा ही खान प्राप्त झाली आपण त्याचा एमडीओ केला आणि सगळे अडथळे पार करून बॉक्स कटिंग झालं आणि आज पहिला रेघ या ठिकाणी आलेला आहे.यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपलं कोळसा करिताच अवलंबित्व कमी होणार आहे दुसरं या दुसर्‍याचा कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. 4300 जेसीव्हीचा हा कोळसा असल्याने आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोळसा मिळतो आहे, आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल

ज्यावेळी बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आम्ही याची सुरुवात केली, याला सहा सात वर्ष लागले पण आज आता हा कोळसा मिळाल्यानंतर या खणीची आयुष्य पुढचं 77 वर्ष आहे, त्यामुळे कोळशाची कुठलीही कमतरता आपल्याला पडणार नाही. पुढच्या काळात या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज कोळसा मिळतो तो 2800,2900 किंवा 3200 जेसीव्ही चा कोळसा आहे, थेट 4300 जेसीव्हीचा कोळसा मिळाला तर याचा परिणाम खूप मोठा होणार आहे त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचा त्यापेक्षा जेसीव्ही वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात लोडशेडिंग नाही

आता तीन महत्त्वाचे कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात सुरू झाले आहेत देशात सात सुरू झाल्या आहेत आता त्याचं काम चाललेला आहे. हे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर त्यातून आपल्याला काही लर्निंग मिळतील, त्या लर्निंगच्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आले नाही तिथे याच पद्धतीने करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल. लोड शेडिंग कुठेही नाहीये लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केला आहे आणि आपण आता 70% शेतकऱ्यांना दिवसा पावर देणे सुरू केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणावरील आंदोलनकांवरील गुन्हे मागे

अशी कुठलीही बैठक झाली नाही. आणि कुठलेही गुन्हे परत घेण्याकरिता कुठलाही नकार दिलेला नाही, पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे ज्यामध्ये शासकीय संपत्तीचा लॉस झालेला आहे ते गुन्हे परत घेता येत नाही हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, त्या व्यतिरिक्त संपूर्ण गुन्हे मागे घेत आहोत किंबहुना मागच्या काळात अधिवेशनात आकडेवारी दिली आहे की किती गुन्हे परत घेतले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...