AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: नाना पटोलेंशी गुप्त भेट, रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा, मग पवारांचं उत्तर काय?

Rohit Pawar Congress Nana Patole: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाना पटोले यांची गुप्त भेट घेतली आणि ते लवकरच काँग्रेसवासी होतील असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केला आहे. त्यावर पवारांची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे.

Rohit Pawar: नाना पटोलेंशी गुप्त भेट, रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा, मग पवारांचं उत्तर काय?
रोहित पवारImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 10, 2026 | 12:05 PM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा विदर्भातील भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर रोहित पवार यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांची गुप्त भेट घेतल्याचा दावाही त्यांनी केला. त्यावर पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले फुके आणि त्याला काय दिलं रोहित पवार यांनी उत्तर?

रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि नाना पेटोल यांच्यात गुप्त भेट झाली. पवार हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे रोहित पवार यांना डावललं जात आहेत, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, असा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. पवार आणि सुळे यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळेच ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे फुके म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यावर टीका

मनोज जरांगे पाटील बालहट्ट करत आहेत. जरांगे पाटील यांच्या गिधड धमकीला कोणी घाबरत नाही, असे भाजप आमदार परिणय फुके म्हणाले. संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन हट्ट करणे चुकीचे आहे. जरांगे पाटील यांची लोकप्रियता खालावली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते मंत्र्यांना, आमदारांना शिवीगाळ करत आहेत, असा आरोप फुके यांनी केला.

माझी काळजी करू नका

माझ्याबद्दलची काळजी तुम्ही करू नका. परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. ती जवळीक फुके कशासाठी वापरतात, तर विरोधी कार्यकर्त्यांविरोधात एखादी खोटी केस दाखल करण्यासाठी वापरता असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. या भागात भाजपच्या कार्यकर्त्यांचा वाळूचा व्यवसाय आहे, तो निवांत चालावा यासाठी या पदाचा वापर करता. धानाची खरेदी कशी करावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली होती. त्यासाठी तुम्ही छत्तीसगडला गेला. त्या ठिकाणी तुम्ही झाडाझुडपात फिरून आला का? का भजी खाऊन आलात? तिथे 3500 रुपये धान खरेदी होते, तर इथं 2300 रुपये भाव दिल्या जातो असे रोहित पवार म्हणाले.

Follow Us
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात