Maharashtra News Live Update : नागपूरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

| Updated on: Jul 24, 2022 | 6:37 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : नागपूरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
मोठी बातमी

मुंबई : आज शनिवार 23 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते. दोघांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुकानंतर पंतप्रधान यांनी डीनरचे आयोजन केले होते त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे दिल्लीहून मुंबईत परत्यावर आता मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jul 2022 09:07 PM (IST)

    नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

    – शशिकुमार शेंडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव

    – शशिकुमार गेल्या तीन वर्षांपासून होते पोलीस मुख्यालयात तैनात

    – त्यांच्या पत्नीही आहेत पोलीस विभागात तैनात

    – आज दुपारी मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून केली आत्महत्या

    – आत्महत्तेचं कारण अस्पष्ट, पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

    – आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

  • 23 Jul 2022 08:10 PM (IST)

    नाशिकमध्ये एका उद्योजकाने राहत्या घरी केली आत्महत्या

    नाशिकच्या एका उद्योजकानी राहत्या घरी केली आत्महत्या

    – स्वतःला गोळी मारून केली आत्महत्या

    – रोशन गोयल असे आत्महत्या करणा-या उद्योजकाचे नाव

    – नाशिकच्या आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल तपास सुरू

    – गोयल टोमॅटो व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती

  • 23 Jul 2022 07:27 PM (IST)

    मुंबईला दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य - एकनाथ शिंदे

    संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करण्याची योजना येत्या काळात सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होतील शोषमुक्त खड्डे करण्याची योजना जमिनीमध्ये पाणी मुरेल त्यासाठी उपाययोजना

  • 23 Jul 2022 07:00 PM (IST)

    धुळ्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा मृत्यू

    धुळे - पोहायला गेलेल्या 3 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपळानेर येतील नावापाडा गावाजवळ असलेल्या पाटामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. 6 मित्र पोहण्यासाठी गेले असताना 3 जण बुडाले आहेत.  हुजैफ हुसैन पिंजरी वय 10 वर्ष, नोमान शैख मुख्तार वय वर्ष 12 आणि अयान शाह शफी शाह वय वर्ष 11,  अशी या मुलांची नावे आहेत

  • 23 Jul 2022 05:45 PM (IST)

    विचारांची भूमिका घेणाऱ्यांना त्याग करावाच लागेल, फडणवीसांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान

    हे सरकार शिवसेना-भाजपा सरकार आहे. सगळ्यांच्याच सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील, असे म्हणता येणार नाही. अडीच वर्ष किमान अपेक्षा ठेवून भव्य बहुमताचं सरकार कसं आणणार, याकडे लक्ष दिले पाहिजे. १२ आमदारांसाठी राज्यपालांचं समाधान करुन नावं द्यावी लागतील. काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. त्यामुळे नाराजी नको, असे आवाहन. कोणी नाराज होण्याचं कारण नाही. नाराजी दूर करुन मोठ्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी आपण एकत्र आहोत. विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो. विचार बाजूला ठेवले, घराणेशाही केली तर असे पक्ष सत्तेतून, पक्षातून संपतात. विचाराने भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला त्यागाला सामोरे जावंच लागेल. त्याग सगळ्यांनाच करावा लागेल. अडीच वर्षांत जे जे होऊ शकतं, ते सर्व आपण करु. एकनाथ शिंदे हे २४ बाय ७ काम करणारे नेते आहेत. सरकार उपलब्ध असलेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच आहे. त्यात पण अनेक जण पात्र आहेत. तेवढी संख्या सामावून घेणं अवघड आहे. पक्ष जे सांगेल त्याप्रमाणे होईल. राज्याला क्रमांक एक नंबरवर नेऊ इतकेच विश्वासाने सांगतो.

  • 23 Jul 2022 05:35 PM (IST)

    ओबीसी आरक्षणानंतर आता मराठा आरक्षणासाठीही प्रयत्न- फडणवीस

    ओबीसी आरक्षणाला काही मंत्र्यांचा विरोध होता. दीड वर्ष इम्पेरिकल डेटासाठी केंद्राकडे बोटं दाखवली. अडीच वर्ष राज्यातील सरकारनं भजन केलं. तीन महिन्यांत मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी आरक्षण मिळवलं. राज्यात इच्छाशक्तीच नव्हती. सत्तेत आल्यानंतर आपण तातडीने याबाबत पावलं उचलली. शिंदे सरकार आल्यानंतर तातडीनं आरक्षण लागू झालं आहे. येत्या काळात सर्व निवडणुका आरक्षणासह होतील. मराठा आरक्षणाबाबत गेल्या सरकारने झीरोवर आणलं. लढाई पुन्हा करु, पण आरक्षणासाठीच्या सगळ्या योजना पुन्हा सुरु करु.

  • 23 Jul 2022 05:30 PM (IST)

    होय आम्ही हिंदुत्ववादी, मराठी माणसांसाठी लढणारे- फडणवीस

    मुंबई - आता यांचा पहिला डायलॉग असतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. कुणाची हिंमत आहे. हे जेव्हाही हरले तेव्हा यांचा हाच दावा असतो. यांच्यावर काही कारवाई झाली की महाराष्ट्रद्रोह अशी भूमिका आहे. होय आम्हीच हिंदूत्ववादी, आम्हीच महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी लढणारे आहोत. मोदीसैनिक आणि शिवसैनिक यांचं एकत्र सरकार आहे. सरकार येण्यात संजय राऊत यांचा मोठा हात आहे. आपलं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण आपण बहाल करु शकलो.

  • 23 Jul 2022 05:25 PM (IST)

    आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदेच, उपमुख्यमंत्रीपद हा सन्मान - देवेंद्र फडणवीस

    मुंबई- बाहेर राहून पक्षाचं काम करावं अशी तयारी केली होती. ज्येष्ठांनी सांगितलं, त्यानंतर मी शपथ घेतली. हा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं असतं तर घरी गेलो असतो. सरकार बाहेरुन चालवता येत नाही. त्यामुळे त्यांनी मला सन्मान दिला. नड्डा यांनी सांगितले की विनंती केली आणि आदेश दिलाय, शाहा आणि मोदींनी ज्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे कृतकृत्य वाटलं. आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदेच आहेत. चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले.

  • 23 Jul 2022 05:09 PM (IST)

    सत्तेसाठी नाही विचारांसाठी सत्ता परिवर्तन - देवेंद्र फडणवीस

    या महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. सत्तेत एक ताकद असतं, लोहचुंबक असतं. राज्यात पहिल्यांदा ५० आमदारांनी, त्यात ९ मंत्री यांनी सरकार सोडून विरोधकांसोबत येण्याचा निर्णय केला. ज्या प्रकारे वागणूक मिळत होती, सरकार सुरु होतं. त्यांना माहित होतं की सरकार असचं चालवलं तर पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही. मनापासून अभिनंद करीन एकनाथ शिंदे यांचं. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. ते बाहेर पडले तेव्हा ठरलं नव्हतं की सरकार येईलच. असं घडलं नसतं तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं, बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांशी जर फारकत घेतली जात असेल, ज्यांच्याशी लढा केला त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत असेल. ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जावं लागत असेल. सावरकरांचा अपमान रोज सहन करायचा. दाऊदशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्याविरोधात बोलता येत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक हे सहन करु शकत नव्हता. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. राज्यासाठी हे आवश्यक होतं म्हणून ते केलं.

  • 23 Jul 2022 04:59 PM (IST)

    हे सरकार यावं ही तर श्रींची इच्छा - देवेंद्र फडणवीस

    गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्या नेतृत्वात संघर्ष करतोय, ते सर्व नेते उपस्थित आहेत. कार्यकारिणी भरगच्च झाली. विविध विषयांवर चर्चा, मंथन केलं. राज्यात रयतेचं राज्य आल्यानंतर, पहिली कार्यकारिणी छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात होतेय, ही आनंदाची बाब आहे. शिवाजी महाराज गड जिंकल्यावंर थांबायचे नाहीत, त्यानंतर ते पुढच्या गडाकडे आगेकूच करायचे. आपल्याला हेच करायचे आहे. सत्ता हे साधन आहे, साध्य नाहीय. सत्तेचा गड जिंकलो असलो तरी मोदींनी जी विकासाची जी यात्रा सुरु केली आहे. गेल्या अडीच वर्षांत ती यात्रा राज्यात मागे पडली आहे. तिथे पुन्हा नंबर एकवर यायचं आहे. हे सरकार यावं ही तर श्रींची इच्छा. राज्यातील १२ कोटींच्या जनतेची इच्छा होती, त्यांच्या मनात परिवर्तन हवं होतं, ती इच्छा पूर्ण केली आहे. एक प्रकारे मोकळा श्वास घेतो आहे. गेली अडीच वर्ष संघर्षात गेली.  या राज्यात अघोषित आणीबाणी होती. 

  • 23 Jul 2022 04:02 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांचे कार्यकारिणीतील भाषण सोशल मीडियावरुन काढले

    मुंबई- मनावर दगड ठेवून राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, याचे दु:ख झाले पण राज्याचा गाडा आपण पुढे नेला, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत केले होते. नंतर यावर भाजपाने सारवासारव केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आली, असे आशिष शेलार यांनी सांगितले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना असे म्हणायचे नव्हते, असेही त्यांनी सांगितले आहे. हे भाषण बाहेर कसे आले याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच हे भाषण सोशल मीडियावरुन काढण्यात आले आहे.

  • 23 Jul 2022 03:04 PM (IST)

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार महाराष्ट्र दौरा

    मुंबई- मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. हा त्यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल.  आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत, त्यानंतर ऑगस्टमध्ये  उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.  तसेच एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातील समस्या आणि आगामी निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

  • 23 Jul 2022 03:00 PM (IST)

    चंद्रपुरात संततधार पावसामुळे इरई धरणाची सात दारे सव्वा मीटरने उघडली

    चंद्रपूर:-- संततधार पावसामुळे शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे सव्वा मीटरने उघडली आहेत. इरई नदीपात्रात 616 क्यूमेक्स एवढा जलविसर्ग होतो आहे.  नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने शहरालगतचे नदीकाठचे भाग जलमय होण्याची शक्यता आहे. पाऊस सातत्याने सुरूच असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरूच आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 23 Jul 2022 02:44 PM (IST)

    शिवसेना सोडल्यानंतर राणेंना संपवण्याची सुपारी दिली होती- नितेश राणे

    मु्ंबई- शिवसेना सोडल्यानंतर राणेंना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांनी दिली होती, असा आरोप भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला आहे. सध्या आदित्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत आहेत, त्यात उद्धव ठाकरेंची प्रतिमा कशी चांगली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रत्यक्षात मात्र हे कपटी आहेत, हे पुराव्यानिशी दाखवून देवू असे आव्हानही राणे यांनी दिले आहे. आदित्य यांचा राज्याचा दौरा झाल्यानंतर त्यांचे वस्त्रहरण करणार असल्याचे राणे यांनी सांगितले आहे.

  • 23 Jul 2022 02:16 PM (IST)

    सिंधुदुर्ग- कपडे वाळत घालत असताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

    सिंधुदुर्ग- कपडे वाळत घालत असताना शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोडामार्ग मोर्ले येथे हा प्रकार घडलाय. शुभांगी सुतार(50) या रात्री कपडे वाळत घालत असताना बाजूला असलेल्या विजेच्या तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना धक्का बसला. त्यांना तातडीने दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

  • 23 Jul 2022 02:07 PM (IST)

    राज्यात मध्यावधी निवडणुका होणारच - आदित्य ठाकरे

    औरंगाबादमधील पाच बंडखोर आमदार पडणार, नवे आमदार निवडून येतील, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. पुढील निवडणुकीत बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बंडखोर आमदारांच्या पोटात नेमकं काय दुखलं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. या 40 बंडखोरांनी केलेली गद्दारी ही माणुसकीशी आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली ते इतरांसोबत काय राहतील असे त्यांनी सांगितले. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे पडणारच आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

  • 23 Jul 2022 02:05 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 54 सिंचन प्रकल्पात 66.43 टक्के जलसाठा

    अमरावती जिल्ह्यात 1 मोठा , 7 मध्यम तर 46 लघु सिंचन प्रकल्प आहेत. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 78 टक्के जलसाठा सध्या आहे.अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.  दमदार पाऊस झाल्याने पिण्याचे व शेतीला पाणी मिळणार. मागील वर्षी याच प्रकल्पात होता 41 टक्के जलसाठा, यंदा झालेल्या दमदार पावसामुळे  23 टक्के जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण प्रकल्पापैकी पाच प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

  • 23 Jul 2022 02:02 PM (IST)

    ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये महापलिकेची पाण्याची टाकी फुटल्याने घरांचे नुकसान

    ठाणे: पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील वागळे इस्टेट मधील रुपादेवी पाडा येथे ठाणे महानगरपालिकेची 75,000 लिटर पाण्याची टाकी फुटली.  ही रीनोटँक टाकी २००९ साली बांधण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन बनावटीची रीनोटँक टाकी फुटल्याने जवळ असलेल्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना स्थळी
    आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी (RDMC Team), ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान (TDRF Team), NDRF चे अधिकारी व जवान पोहचून त्यांनी स्थानिक नागरिकांना मदत केली .या घटनेमध्ये एका वृध्द महिलेला दुखापत झाली असून, तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी ६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून  इतर १५ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
  • 23 Jul 2022 01:57 PM (IST)

    कल्याण खडकपाडा परिसरातील धक्कादायक घटना

    कल्याण खडकपाडा परिसरातील धक्कादायक घटना

    दारूसाठी चखना आणून दिला नाही म्हणून बहिण भावाला बेदम मारहाण

    मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

  • 23 Jul 2022 01:49 PM (IST)

    मुख्यमंत्री यांच्या दालनात एक तासांपासून आमदारांसोबत चाय पे चर्चा…

    मुख्यमंत्री यांच्या दालनात एक तासांपासून आमदारांसोबत चाय पे चर्चा…

    - मंत्री पद मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांकडून शर्थिचे प्रयत्न सुरू असल्याची सुत्रांची माहीती…

    - चहापाणाच्या कार्यकर्मात पुन्हा अकदा रंगला शहाजी बापू पाटलांचा किस्सा…काय झाडी काय डोंगर काय हाटीलवर पिकला एकच हशा…

  • 23 Jul 2022 01:43 PM (IST)

    पुण्यातील जोग शाळेत पालकांचा गोंधळ

    पुण्यातील जोग शाळेत पालकांचा गोंधळ

    शाळेने दहावीचा निकाल खोटा लावल्याचा आरोप

    पहिल्या सेमीस्टरचा पेपर झाला नसल्याचा पालकांचा आरोप

    शाळा उत्तर देतच नसल्याचा पालकांचा आरोप

  • 23 Jul 2022 01:34 PM (IST)

    परभणीत रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे

    परभणीत रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे,

    रात्रीपासून केवळ 5 मिलिमीटर पावसाची नोंद,

    चार दिवसापासून पावसाने परभणीत घेतली होती विश्रांती,

    पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला

  • 23 Jul 2022 01:06 PM (IST)

    संजय राऊत उद्धव ठाकरे ग्रँड हयात मध्ये दाखल,

    संजय राऊत उद्धव ठाकरे ग्रँड हयात मध्ये दाखल

    आज सामना मधून देखील राऊत यांनी सांगितले होते घणाघाती मुलाखत उद्धव ठाकरे यांची घेणार..

    मुलाखत होईल आणि ती सामनामध्ये प्रकाशित होईल .सर्व वृत्त वाहिनीना त्याची प्रत दिली जाईल.महाराष्ट्रातले जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याला उत्तर दिलं जाईल.धनुष्यबानाचे जे टोक आहे त्या टोकदार पणे....

    असे देखील आज राऊत बोलले होते....

  • 23 Jul 2022 12:56 PM (IST)

    चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग 930 झाला ठप्प,

    चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग 930 झाला ठप्प,

    अंधारी नदीच्या पुरामुळे चिचपल्ली गावाजवळ महमार्गावर पुराचे पाणी,

    पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा,

    जिल्ह्यातील पावसाची संततधार सुरूच,

    मागील 24 तासात सरासरी जिल्ह्यात सरासरी 35 मिमी पावसाची नोंद

  • 23 Jul 2022 12:55 PM (IST)

    कोकणातील काही एजंटांकडुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न

    कोकणातील काही एजंटांकडुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न

    जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा गंभीर आरोप

    आता पर्यंत 17 जणांना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न झाला

    असा एखादा एजंट उघडकीस आल्यास शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देणार

    संजय पवार यांचा इशारा

  • 23 Jul 2022 12:54 PM (IST)

    १६६ व्या टिळक जयंतीनिमित्त राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

    १६६ व्या टिळक जयंतीनिमित्त राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

    लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. २३ जुलै) लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली तसेच स्मृतीस्थळाजवळच्या जागेत वृक्षारोपण केले.

    लोकमान्य टिळक यांचे वृत्तपत्र बंद केले गेले. त्यांना भारतापासून हजारो मैल दूर मंडाले येथे तुरुंगवासात ठेवले गेले. तेथे त्यांनी 'गीता रहस्य' हा गीतेतील  कर्मयोगावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. गीता केवळ सन्यास वा भक्तीसाठी नाही, तर कर्माचा पुरस्कार करते असे सांगणारा  टिळकांचा कर्मयोग अतुलनीय आहे. त्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच' हा स्वराज्याचा मंत्र देणारे टिळक हे पहिले नेते होते. महात्मा गांधींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा दिला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे सांगताना  लोकमान्यांचे जीवन कार्य नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश  सिलम, समितीचे पदाधिकारी तसेच मुंबई महानगर पालिका व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    **

  • 23 Jul 2022 12:54 PM (IST)

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रातवर दुसरा कोणी केला नाही - शरद पवार

    1. बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रातवर दुसरा कोणी केला नाही
    2. दादाजी कोंडदेव, समर्थ रामदास यांच योगदान काय याच्या खोलात जायचं नाही
    3. शिवछत्रपती यांची समाधी शोधून काढण्याची जबाबदारी महात्मा फुले यांनी काढली, हे महत्वाचे काम महात्मा फुले यांनी केलं
    4. हे करत असताना शिवछत्रपतींचा उल्लेख फारसा कधी छत्रपती म्हणून केला नाही, तर कुळवाडीकुलभूषण असा केला
    5. काही घटकांनी शिवछत्रपती यांच चरित्र लिहताना धर्मांधता कशी वाढेल या पद्धतीने लिहिलाॉ
    6. महाराष्ट्रात काही पुस्तक ही खुप लोकप्रिय ठरली, लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तकं
    7. छत्रपती शिवाजी महाराज यांच राज्य कधी भोसल्यांच राज्य झालं नाही, ते रयतेचे राज्य राहिलेलं आहे
    8. हा ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांचा असा समज होईल हे शिवचरित्र आहे
    9. मात्र हे शिवचरित्र नाही
    10. गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र लिहिली, त्यात काहींनी  वस्तुस्थिती मांडली, काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली
  • 23 Jul 2022 12:44 PM (IST)

    मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली - गिते

    मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली - गिते

    शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी - गिते

    शिवसेनेचा वर्ग करता येणार नाही - गिते

    निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल - गिते

    गद्दार शब्द लागत असेल तर शिवसैनिक आहोत का हे सांगावे - गिते

    शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नाही - गिते

    गद्दारी माझ्या रक्तात नाही - गिते

    आजचे बंड भाजप पुरस्कृत - गिते

    रत्नागिरी विधानसभा मतदार संघात नवीन उमेदवाराचा उदय होणार, अनंत गिते याचे विधान

    गिते यांच्या विधाणामुळे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांच्या नावाची चर्चा

    आठवन्द्यातून एक दिवस सेना भावनात बसणार - गिते

    कदम यांना आव्हान देण्याच्या लायकीचे बनवले कुणी, गिते यांचा रामदास कदम

    सेनेने स्वबळावर आगामी निवडणुका लढवाव्यात - गिते

    कोर्टच्या निकालानंतर सरकार कोसळेल - गिते

    शिंदे गटात गेलेले कोकणातील पाचही आमदार पडणार - गिते

  • 23 Jul 2022 12:44 PM (IST)

    शिंदे यांच्याकडे चांगली सुरक्षा होती.

    शिंदे यांच्याकडे चांगली सुरक्षा होती. त्यामुळे त्या विषयावर अधिक चर्चा कऱण्याची गरज नाही. दोघांनी मिळून सत्ता चालवायचं ठरलं आहे. त्यामुळे जे काही करतील ते स्विकारायला हवं. त्यावेळी त्यांना झे प्लस सुरक्षा देण्यात आली होती. आत्ता सुध्दा त्यांना ती सुरक्षा आहे.

  • 23 Jul 2022 12:25 PM (IST)

    साखर कारखान्यात आढळला बिबट्याचा मृतदेह

    - साखर कारखाण्यात आढळला बिबट्याचा मृतदेह.

    - जिल्हातील लाखांदूर येथील घटना.

    - कारखान्यात गस्त करीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कारखान्यात मृत प्राण्याची दुर्गंधी आल्यावर शोध घेतले असता मिलिंग सेक्टरच्या खालच्या भागात बिबट्याचा मृतदेह आढळला.

    - बिबट्याचा मृत्युने वन्यजीव प्रेमी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    - मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन केले आहे. वन विभाग पुढील तपास करीत आहे.

  • 23 Jul 2022 12:15 PM (IST)

    जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी भावना आहे

    जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी भावना आहे

    मी ही मेसेज करताना करून जातो मुख्यमंत्री महोदय

    पण त्याला आता उप लागलेलं आहे जनतेच्या मनातली भावना कोणी काढू शकत नाही

    मात्र राज्यात एककलमी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसचं आहेत

    संजय राऊतांनी अजून बोलत राहावं

    संजय राऊत मोठे नेते आहेत ते कोणाचं ऐकतील असं वाटत नाही

    त्यांना तब्येतीचा काळजी घेण्याचा सल्ला मी दिला

    त्यांना दुसरं काय देणार कारण ते कोणाचं ऐकणार

    संजय राऊत बेताल वक्तव्य करतायेत

    अशी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करता येते मात्र कोर्टाची आणि निवडणूक आयोगाची नाही

    त्यांनी बोलत राहावं त्यांनी अजून शिवसेनेच नुकसान होतंय

    शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोग ठरवेल

    आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेतली भेटून आनंद झाला

  • 23 Jul 2022 12:08 PM (IST)

    जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल प्रेम आहे

    - जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल प्रेम आहे, जे म्हणत होते आमची निष्ठा आहे त्यांची व्याख्या आता समजून घेतली पाहिजे

    - कायदेशीर प्रक्रियेबद्दल मी बोलणार नाही मात्र आमचे नेते, प्रवक्ते त्यासनादर्भात काम करतायत,

    - एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेबद्दल मी भाष्य करणार नाही,गृहमंत्र्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे,मात्र सरकार सर्वांना सुरक्षा देत असते,

    - आदित्य ठाकरे आता मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर देत आहेत, आणि येणाऱ्या काळात जनताच ठरवणार काय ते

    - उद्धव ठाकरेंनी कायम साथ घातली आहे, सर्वांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत हे आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे, मात्र त्यांच्या अंतकरणापर्यंत जात नाहीय त्याला आम्ही काय करणार

  • 23 Jul 2022 11:59 AM (IST)

    आदित्य ठाकरे औंरगाबादमध्ये दाखल, शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

    आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये शिवसंवाद यात्रा

  • 23 Jul 2022 11:50 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याची वीज गूल…

    ब्रेक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याची वीज गूल…

    - २०० मिटर लांबून तात्पूरत्या स्वरूपाची दिली लाईट…

    - बेस्टची केबल जळाल्याने बंगल्याची बत्ती झाली होती गूल…

    - बेस्टच्या कार्मचार्यांकडून युद्ध पालळीवर काम सुरू… बंगल्यासमोरच खोदला ५ फुटाचा खड्डा…

    - काम पुर्ण व्हायला लागणार आणखी २ ते ३ दिवस… बेस्ट

  • 23 Jul 2022 11:50 AM (IST)

    8 ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करा

    8 ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करा

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला सुचना

    8 ऑगस्टनंतर शिवसेना कोणाची होणार फैसला

    शिवसेनेचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात

    शिवसेना कोणाची यावर होणार फैसला - सूत्रांची माहिती

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी

  • 23 Jul 2022 11:29 AM (IST)

    लोणवळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांसाठी खुला

    अतिवृष्टीमुळे पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती

    मात्र ही बंदी उठल्यामुळं लोणवळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी झालीय

    गेल्या आठवड्यात हवामान विभागाने अतिवृष्टी चा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी खबदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव घातला होता

    आज मात्र विकेंडच औचित्य साधून शेकडो पर्यटक भुशी धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेतायत

  • 23 Jul 2022 11:08 AM (IST)

    अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी

    कल्याण डोंबिवलीमध्ये चौका चौकात बॅनर झळकले

    अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी

    "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय कारण पेराल तेच उगवणार" शिवसेनेवर बोचरी टीका

  • 23 Jul 2022 10:53 AM (IST)

    शिवाजी महाराज यांचा इतिहास हा वैश्विक आहे - श्रीमंत कोकाटे

    श्रीमंत कोकाटे

    शिवाजी महाराज यांचा इतिहास हा वैश्विक आहे

    शिवचरित्र हे डोक्यावर ठेवण्यासाठी नाही, तर डोक्यात घेऊन समाज परिवर्तन करण्यासाठी आहे

    उजव्या विचारधारेचे, डाव्या विचारधारेचे लोक जय भवानी, जय शिवाजी घोषणा देतात

    ही घोषणा सर्वात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलीये

    भोसले हे मूळ राजपूत नाहीत तर त्याचे मूळ हे महाराष्ट्रच आहे

    इथल्या बहुजनांना शिवाजी महाराजांपासून तोडण्यासाठी त्यांचे कुळ जे राजपुतांशी जोडण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जातोय

  • 23 Jul 2022 10:46 AM (IST)

    केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण

    केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण

    संयुक्त अरब अमिरातवरून आलेल्या 35 वर्षांच्या आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण

    आतापर्यंत केरळमध्ये तीन रुग्ण सापडले

    आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांची माहिती

    हा रुग्ण मल्लापुरम येथे राहणारा असून 6 जुलैला तो परतला होता.

  • 23 Jul 2022 10:25 AM (IST)

    विशाल कडुनिंबाचे झाड़ चक़्क़ कोसळले कारवर

    विशाल कडुनिंबाचे झाड़ चक़्क़ कोसळले कारवर.

    कार झाली चकनाचूर.कार चालक डॉक्टर जखमी.

    जिल्हाधिकारी कार्यालय समोरिल घटना.झाड़ मधोमध कोसळल्याने राष्ट्रीय महमार्गा 6 वरील वाहतूक खोलंबली.

  • 23 Jul 2022 10:25 AM (IST)

    कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत चारचाकी वाहनांची तोडफोड

    कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत चारचाकी वाहनांची तोडफोड

    एकाच रात्री अज्ञातांनी 14 वाहनांची केली तोडफोड

    परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

  • 23 Jul 2022 10:16 AM (IST)

    राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतला मिळाला

    जळगाव ब्रेकिंग

    एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतला मिळाला असून कुसुंबा ग्रामपंचायत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

  • 23 Jul 2022 10:15 AM (IST)

    मी स्वताला नेता नाही मानत कार्यकर्ता मानतो - रोहित पवार

    - लहानपणीपासून मी असाच राहिलो आहे, जगलो आहे, युवासोबत राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत काम करायला मला आवडत

    - मी स्वताला नेता नाही मानत कार्यकर्ता मानतो

    - लोकांच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं असत, जे महाराष्ट्रात जे घडलं काही तरी कारण सांगितलं जातात, जे कारण दिली जातायत ते मतदारणसंघातील लोकांना शांत करण्याचं काम आहे

    - राज्यात सुद्धा बदल करण्याची गरज आहे, युवकांना संधी देण्याची गरज आहे , ताकत युवकांना ताकत देण्याची गरज आहे, पवारसाहेबानी का असा निर्णय घेतला माहीत नाही

    - ज्या जिल्ह्यात जस समीकरण अस तशा निवडणुका लढवल्या जातील, जिकडे सेनेची ताकत जास्त आहे तिकडे मदत घेतली जाईल,

    - महाविकास आघाडीच ऍग्रिमेंट झालं होतं ते आता अस्तित्वात नाही

    - न्यायालयाचा विषय मार्गी लागेल, काही लोकांची काम स्थगित झाली ती करू नये, आज मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही त्यामुळे कुणाशी बोलायचं ते समजत नाही, सरसकट स्थगिती देऊ नये

    - रामदास कदम सक्रिय राजकारणात किती होते हे आपल्याला माहिती आहे, ते मोठे नेते आहेत, मतदासंघातील शिवसैनिकाना शांत करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली जाते,

    - एकनाथ शिंदेनी सभागृहात जे भाषण केले त्यामध्ये यामागचा कलाकार कोण हे सांगितलं होतं, सेनेला भाजप ने फोडलं होत हे जगजाहीर आहे

  • 23 Jul 2022 10:15 AM (IST)

    डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

    डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार ग्रंथ प्रकाशन सोहळा

    जेष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे उपस्थित

  • 23 Jul 2022 10:15 AM (IST)

    अमरावती येथील आदर्श कोगे विद्यार्थी मृत्यू प्रकरण

    अमरावती येथील आदर्श कोगे विद्यार्थी मृत्यू प्रकरण...

    वस्तीगृह अधीक्षक रवींद्र तिघाडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.रवींद्र तिघाडे याला घेतले ताब्यात.

    नाक, तोंड दाबल्याने श्वास अडकला म्हणून आदर्शचा मृत्यू.

    शवविच्छेदन अहवालानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा..

    १३वर्षीय आदर्श कोगे या विद्यार्थ्यांचा अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक महाविद्यालयाच्या मागासवर्गीय वसतिगृहात झाला होता संशयास्पद मृत्यु.

  • 23 Jul 2022 10:14 AM (IST)

    नाव न घेता उदय सामंतांची शिवसेना नेत्यांवरती टीका

  • 23 Jul 2022 10:12 AM (IST)

    गडचिरोली राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार स्वतः पूरग्रस्त भागात मदत

    गडचिरोली राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार स्वतः पूरग्रस्त भागात मदत

    पूरग्रस्त नागरिकांची मागणी सुरक्षित ठिकाणी आम्हाला स्थलांतर करण्यात यावा

    आमदार धर्मराव बाबा आत्राम विधानसभेत मांडणार स्थलांतराच्या मुद्दा

    सिरोंचा तालुक्यातील चाळीस गावांना अहेरी तालुक्यातील सात गावांना बसला होता महापुराच्या वेढा

    पूरग्रस्त नागरिक स्थलांतर बाबत आमदार सोबत चर्चा करताना आढावा घेतला आमचा प्रतिनिधी

  • 23 Jul 2022 10:06 AM (IST)

    शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंचीच- संजय राऊत

    संजय राऊत म्हणतात...

    शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंचीच

    दिल्लीश्वरांना जे हवं तेच शिंदे गट करतोय

    शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुर्देव काय?

  • 23 Jul 2022 10:00 AM (IST)

    गडचिरोली राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार स्वतः पूरग्रस्त भागात मदत

    गडचिरोली राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार स्वतः पूरग्रस्त भागात मदत

    पूरग्रस्त नागरिकांची मागणी सुरक्षित ठिकाणी आम्हाला स्थलांतर करण्यात यावा

    आमदार धर्मराव बाबा आत्राम विधानसभेत मांडणार स्थलांतराच्या मुद्दा

    सिरोंचा तालुक्यातील चाळीस गावांना अहेरी तालुक्यातील सात गावांना बसला होता महापुराच्या वेढा

    पूरग्रस्त नागरिक स्थलांतर बाबत आमदार सोबत चर्चा करताना आढावा घेतला आमचा प्रतिनिधी

  • 23 Jul 2022 09:57 AM (IST)

    पाऊस आला, पिकं गेली वाहून गेली...

    पाऊस आला, पिकं गेली वाहून गेली...

    गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी

    कृषी विभागाचे धोरण काय?

    गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने 208 हेक्टरमधील पिकांचे नुकसान

    कृषी विभागाकडून पंचनामे सुरू

    नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • 23 Jul 2022 09:55 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

    काल दिवसभरात 131 कोरोना रुग्ण दाखल

    यात मनपा हद्दीतील 75, ग्रामीण भागातील 53, मालेगाव मनपा हद्दीतील 1, तर जिल्हाबाह्य 2 रुग्णांचा समावेश

    तर दिवसभरात 125 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली

    जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे

  • 23 Jul 2022 09:54 AM (IST)

    जायकवाडी धरण सलग पाचव्या वर्षी 100% भरण्याच्या मार्गावर

    जायकवाडी धरण सलग पाचव्या वर्षी 100% भरण्याच्या मार्गावर

    जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली

    जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 87 टक्क्यांवर

    14 दिवसात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 32 टक्यांवरून गेला 87 टक्क्यांच्या पुढे

    आवक कमी झाल्याने मागील तीन दिवसात एक ते दोन टक्क्यांनी जायकवाडी धरनाच्या पाण्याच्या पातळीत वाढ

  • 23 Jul 2022 09:51 AM (IST)

    अमरावतीतील आदर्श कोगे मृत्यू प्रकरण, गाडगेनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा

    अमरावतीतील आदर्श कोगे विद्यार्थी मृत्यू प्रकरण...

    वस्तीगृह अधीक्षक रवींद्र तिघाडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

    रवींद्र तिघाडे याला घेतले ताब्यात

    नाक, तोंड दाबल्याने श्वास अडकला म्हणून आदर्शचा मृत्यू

    शवविच्छेदन अहवालानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा

    13 वर्षीय आदर्श कोगे या विद्यार्थ्यांचा अमरावतीतील विद्याभारती माध्यमिक महाविद्यालयाच्या मागासवर्गीय वसतिगृहात संशयास्पद मृत्यू

  • 23 Jul 2022 09:49 AM (IST)

    भविष्य निर्वाह निधी नियमांचे पालन न करणाऱ्या 8000 कंपन्यांना नोटीसा

    भविष्य निर्वाह निधी नियमांचे पालन न करणाऱ्या 8000 कंपन्यांना नोटीसा

    सहा वर्षापासून 8000 कंपन्यांनी पीएफ जमा न केल्याने पीएफ कार्यालयाने पाठवल्या नोटीसा

    17400 कंपन्यांपैकी फक्त 3700 कंपन्यांनी पीएफ भरत नियमांचे केले पालन

    सहा वर्षांपासून पीएफ जमा न करणाऱ्या हजारो कंपन्या रडारवर

    सर्व कंपन्यांनी वेळेवर निधी जमा करावा असे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी केले आवाहन

  • 23 Jul 2022 09:48 AM (IST)

    डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

    डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते

    छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार ग्रंथ प्रकाशन सोहळा

    जेष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे उपस्थित

  • 23 Jul 2022 09:35 AM (IST)

    नाशिक -पेठ, हरसूलमध्ये भूकंपाचे धक्के

    नाशिक -पेठ, हरसूलला बसले भूकंपाचे धक्के

    पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैरपल्ली या गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

    21 जुलैच्या रात्री 11 वाजता 64 सेकंदात 2.4 रिश्टर स्केल चे तर रात्री साडे बारा वाजता 145 सेकंदात 3 रिश्टर स्केल क्षमतेचे दोन धक्के जाणवल्याची नोंद

    नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले

  • 23 Jul 2022 09:33 AM (IST)

    द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने गडचिरोलीत जल्लोष

    द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने आदिवासी जिल्हा असलेला गडचिरोली भागातील अतिसंवेदनशील अतिदुर्गम लाहेरी गावात आदिवासी विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला

    गडचिरोली जिल्हा आणि भामरागड तालुका आहे आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो ज्या भागात दूरध्वनी किंवा मोबाईल सेवा नाही अशा दुर्गम भागात आदिवासी यांनी जल्लोष केला

    राष्ट्रपती च्या निवडणुकीनंतर गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच असा जल्लोष पाहायला मिळाला

  • 23 Jul 2022 09:28 AM (IST)

    रामदास कदम राज्याचा दौरा करणार

    रत्नागिरी- शिवसेना नेते पदाचा राजिनामा दिलेले रामदास कदम लवकरच पुन्हा सक्रीय होणार

    रामदास कदम राज्याचा दौरा करणार

    दौऱ्याची सुरवात औरंगाबादपासून केली जाणार

    रामदास कदमांची तोफ राज्यात पुन्हा धडाडणार

    रामदास कदम यांच्या संपर्कात असलेल्यांच्या गाठी भेटी घेतल्या जाणार- सुत्रांची माहिती

  • 23 Jul 2022 09:22 AM (IST)

    सोयाबीन आणि पामतेल 50 रुपयांनी स्वस्त

    सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी

    सोयाबीन आणि पामतेल 50 रुपयांनी स्वस्त

    इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आवक वाढल्याने किमत तब्बल 50 रुपयांनी झाली कमी

    देशातच तेलावर प्रक्रिया झाल्यास पामतेल जाऊ शकते 100 रुपयांवर

  • 23 Jul 2022 09:04 AM (IST)

    औरंगाबाद की संभाजीनगर?, विरोधानंतर गुगलची माघार

    गुगलने शहराचे नाव संभाजीनगर केले,विरोधानंतर आता पुन्हा केले औरंगाबाद

    बदल करून गुगल मॅप वर शहराचे नाव केले होते संभाजीनगर

    शहराच्या नावावरून वाद निर्माण होताच गुगलने शहराचे नाव संभाजीनगर ऐवजी केले औरंगाबाद

    शहराच्या नावावरून विरोध होताच,मागील 24 तासात केला शहराच्या नावात बदल

    गुगल मॅप वर पुन्हा दिसू लागले संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद

  • 23 Jul 2022 08:43 AM (IST)

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेलमध्ये राज्य कार्यकारणीची बैठक

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेलमध्ये राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    काही राजकीय,सामाजिक ठराव घेतली जाणार असून राज्यातील आत्ताची राजकीय परिस्थिती आणि पुढील परिस्थिती यावर चर्चा होणार आहे

    राज्यभरातून आमदार,खासदार आणि इतर मुख्य पदाधिकाऱ्यांसह जवळपास 800 पदाधिकारी या कार्यकारणी सभेला उपस्थित राहणार

    पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये ही कार्यकारणी सभा पार पाडणार असून दहा वाजता सभेचे कामकाज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाने होणार

  • 23 Jul 2022 08:39 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत

    शिवसेनेअंतर्गत आमदार-खासदारांचे बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्ष प्रमुख- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत

    अवघ्या महाराष्ट्राचे मुलाखतीत व्यक्त होणाऱ्या भूमिकांकडे लक्ष

    वाढदिवसाचे औचित्य साधत पक्षाचे मुखपत्र 'सामना'त लवकरच प्रसिद्ध होणार मुलाखत

    'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत घेणार मुलाखत

    मुलाखतीचे चित्रीकरण आज पार पडणार

  • 23 Jul 2022 08:38 AM (IST)

    उत्तर भारतीयांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली

    मुख्यमंत्री निवास नंदनवन वर मोठे संख्येत उत्तर भारतीय समाज मिरा भाईंदर शिवसेना नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांच्या नेतत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भेट घेतली.

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा सत्कार उत्तर भारतीय समाजने केला.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर भारतीय समाजला धन्यवाद दिले.

    यावेळी मुख्यमंत्री एक नाथ शिंदे यांनी सांगितले की मी राम ललाच्या दर्शनसाठी अयोध्या जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांनी दिली.

  • 23 Jul 2022 08:31 AM (IST)

    ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात 24जुलै ते ७ ऑगस्ट पर्यत मनाई आदेश जारी

    ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात 24जुलै ते ७ ऑगस्ट पर्यत मनाई आदेश जारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी   ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दि. २४ जुलै २०२२ ते  दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

    या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही, दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद केले आहे.

    लग्न कार्यासाठी जमलेले नागरिक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेन्या येथे जमलेले नागरिक सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका. सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, आदींना हे आदेश लागू राहणार नाही.

  • 23 Jul 2022 08:30 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट,

    चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट,

    राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्याशी साधला संवाद,

    धानोरा , चिंचोली , कविठपेठ, विरुर स्टेशन या गावांना भेटी देत शेती- घरे- अंतर्गत पुलं यांच्या नुकसानी संदर्भात घेतली माहिती,

    50 हजार रुपये हेक्‍टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत,

    राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्याचे केले आवाहन,

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याचे केले आवाहन

  • 23 Jul 2022 08:30 AM (IST)

    चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार,

    चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार,

    जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसाने शेतकरी व नदीकाठच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना धास्ती,

    सतत बरसणाऱ्या पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची 2 दारे 0.25 मीटरने उघडली

  • 23 Jul 2022 08:19 AM (IST)

    अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या

    ब्रेक - बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वांद्रे – कुर्ला संकुलातील स्थानकाचा आराखडा, बांधकाम, तसेच २१ किलोमीटरच्या भुयारी मार्गासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या दोन्ही कामांच्या निविदा रद्द केल्या होत्या.

    वांद्रे – कुर्ला संकुलातून भुयारी मार्ग जाणार आहे. परंतु येथील जागा एमएमआरडीए आणि अन्य यंत्रणांकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता स्थानक तसेच भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्याने दिली.

  • 23 Jul 2022 08:19 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन,

    - विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन,

    - पुणे ते बारामती पर्यंत 135 किलोमीटरची सायकल स्पर्धा असणार,

    - माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सायकल स्पर्धेचे उदघाटन होणार,

    - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन,

    - शनिवारवाडा याठिकाणी स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा,

  • 23 Jul 2022 08:18 AM (IST)

    कोयना धरणात 61.75tmc पाणीसाठा

    कोयना धरणात 61.75tmc पाणीसाठा

    धरणात 5215 कयुसेक पाणी आवक सुरु

    धरणाच्या पायथा वीज गृहातुन कोयना नदीपात्रात 2100 कयुसेक पाणी विसर्ग सुरु

    धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर 15मिलिमीटर नवजा 28मिलीमिटर महाबलेश्वर 38 मिलीमीटर पाऊसाची नोंद

  • 23 Jul 2022 08:18 AM (IST)

    अमरावती तालुक्यामध्येही आज सकाळी व दूपारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    आज सकाळी ९ वाजतानंतर अमरावती जिल्ह्यामधील. धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, अचलपुर, चांदुरबाजार, तिवसा तालुक्यामध्ये जबरदस्त अतिवृष्टी होवू शकते. नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, अमरावती तालुक्यामध्येही आज सकाळी व दूपारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • 23 Jul 2022 08:17 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ...

    नंदुरबार फ्लेझ :- नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ...

    - रात्री उशिरा आलेला अहवालामध्ये आणखीन आठ रुग्णांची भर

    - जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात

    - सक्रिय रुग्णांची संख्या आता आता ४६ वर गेली

    - नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे प्रशासनाकडून आव्हान.....

  • 23 Jul 2022 08:17 AM (IST)

    एका क्लिकवर जाणून घ्या, उद्याच्या मेगा ब्लॉकची माहिती

    ब्रेक - तांत्रिक कामांसाठी रविवारी, २४ जुलैला हार्बर मार्गावर पनवेल – वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

    मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा – माटुंगादरम्यान जलद मार्गावर शनिवार, २३ जुलैच्या रात्री ११.३० पासून ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकल भायखळा ते माटुंगादरम्यान धिम्या मार्गावर धावतील.

    पनवेल – वाशीदरम्यान रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    त्यामुळे सकाळी १०.३३ पासून दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेल, बेलापूरला सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    तसेच ठाणे – पनवेल या ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

  • 23 Jul 2022 08:00 AM (IST)

    सेनेला दिलेली रुग्णवाहिका शिंदे गटाने घेतली परत

    सेनेला दिलेली रुग्णवाहिका शिंदे गटाने घेतली परत

    जळगाव : कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवेच्या विचाराने महानगर शिवसेनेला डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरापूर्वी रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता त्याचे पडसाद उंटू लागले असून महानगर शिवसेनेला देण्यात आलेली ही रुग्णवाहिका शिंदे गटाने घेतली परत

  • 23 Jul 2022 07:53 AM (IST)

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील वादाचा नवीन अंक

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील वादाचा नवीन अंक

    तीन बँकांनी गोठवले मराठी चित्रपट महामंडळाचे व्यवहार

    माझी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि खजिनदार संजय ठुबे यांनी बँकांनी दिलेल्या पत्रानंतर गोठवले व्यवहार

    बँकांनी व्यवहार गोठवल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वृद्ध कलाकारांचे मानधन आणि दैनंदिन खर्च थकले

    विरोधी गट मेघराज राजे भोसले आणि संजय ठुबे यांचं सभासद रद्द करण्याच्या तयारीत

    22 जून रोजी झालेल्या सभेत अध्यक्ष राजे भोसले यांची हकालपट्टी करत सुशांत शेलार यांची केली होती अध्यक्ष पदी निवड

    नवीन अध्यक्ष निवड बेकायदेशीर असल्याचा दावा करत मेघराज राजे भोसले यांनी बँकांना दिला होत पत्र

  • 23 Jul 2022 07:52 AM (IST)

    नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत यांना राज्य सरकारचा झटका

    - नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत यांना राज्य सरकारचा झटका

    - नितीन राऊत यांनी सुचवलेल्या जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती

    - राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीतीच्या साधारण ३८ कोटींच्या कामांना स्थगिती

    - राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे डीपीसीतील कामं थांबले

    - डीपीसीतून झालेल्या जुन्या कामांची सरकार समिक्षा करणार असल्याची माहिती

  • 23 Jul 2022 07:52 AM (IST)

    नागपूर ग्रामीणमधील गावा गावांमध्ये शिवसेनेला पडतेय खिंडार

    - नागपूर ग्रामीणमधील गावा गावांमध्ये शिवसेनेला पडतेय खिंडार

    - ग्रामीणमधील अनेक गावांचे सरपंच, नगरसेवक शिंदे गटात

    - आ. आशिष जैसवाल शिंदे गटात गेल्याने सरपंचांचा शिंदे गटात सहभाग

    - गावा गावात मजबूत असलेल्या शिवसेनेला पडलं खिंडार

    - हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाल्याची सरपंचांची भावना

  • 23 Jul 2022 07:52 AM (IST)

    परभणीत शिवसेनेतून एक्झिट सुरूच

    परभणीत शिवसेनेतून एक्झिट सुरूच,

    जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समितीचे उपसभापती तथा गटनेते माधव कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल,

    कदम जुने निष्ठावंत शिवसैनिक,

    कदम यांच्या निर्णयाचे पूर्णेत स्वागत होत आहे . तर समर्थकांकडून अभिनंदन ही केले जात आहे.

  • 23 Jul 2022 07:36 AM (IST)

    कोळसा टंचाईमुळे अनेक औष्णीक विजनिर्मिती केंद्र बंद पडत आहेत

    - कोळसा टंचाईमुळे अनेक औष्णीक विजनिर्मिती केंद्र बंद पडत आहेत

    - अतिवृष्टीमुळे कोळसा खानीत पाणी साचल्याने कोळसा संकट

    - भुसावळ वीज केंद्राचं युनीट तीन कोळशाअभावी बंद

    - ओला कोळसा आल्याने नाशिकचं युनीट ४ आणि ५ बंद

    - तिरोडा येथील खाजगी वीजनिर्मिती केंद्रातील दोन युनीट बंद

    - काही कंपण्यांकडून महाजेनकोला निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा होतेय पुरवठा

  • 23 Jul 2022 07:33 AM (IST)

    पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची मागणी

    - पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची मागणी,

    - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे खासदार गिरीश बापट यांनी केली मागणी,

    - सध्या पुण्यातून फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमान सुरु आहे,

    - पुण्यातून परदेशात व परदेशातून पुण्यात प्रवास करणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे.

  • 23 Jul 2022 07:32 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 54 सिंचन प्रकल्पात 66.43 टक्के जलसाठा...

    अमरावती जिल्ह्यातील 54 सिंचन प्रकल्पात 66.43 टक्के जलसाठा...

    अमरावती जिल्ह्यातील 1 मोठा,7 मध्यम तर 46 लघु सिंचन प्रकल्प...

    सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 78 टक्के जलसाठा.अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडे...

    दमदार पाऊस झाल्याने पिण्याचे व शेतीला पाणी मिळणार....

    मागील वर्षी याच प्रकल्पात होता 41 टक्के जलसाठा.. यंदा 23 टक्के जलसाठा वाढला...

    जिल्ह्यातील एकूण प्रकल्पापैकी पाच प्रकल्पाचे 14 दरवाजे आहेत उघडे....

  • 23 Jul 2022 07:32 AM (IST)

    नागपूरातील अजनी चौकातील क्लॉक टॉवर सुरू

    - नागपूरातील अजनी चौकातील क्लॉक टॉवर सुरू

    - नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे क्लॉक टॉवर पुन्हा सुरू

    - २०१४ पासून बंद असलेली ही घडी सुरू करण्याचे कार्य विक्रमी वेळेत पूर्ण

    - अजनी चौकात २०१२ पासून मनपाद्वारे क्लॉक टॉवर उभारण्यात आले

    - २१ मीटर पॅराबोलिक स्टेनलेस स्टील स्ट्रक्चर वर २ मीटर उंचीची प्रिझम शेप सॅटेलाईट वॉच लावण्यात आली होती

    - पिरॅमिड आकारातील एचएमटी चे हे देशातील एकमेव मॉडेल असून ही यूनिक घड्याळ आहे

  • 23 Jul 2022 07:32 AM (IST)

    उद्या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक

    ऊद्या 24 जुलै रोजी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक…

    भाजप मुख्यालयात होणार बैठक...

    भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष घेणार बैठक.

    पंतप्रधान मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता…

    बैठकित राज्यातील राजकिय परिस्थिती, सत्ता संघर्ष आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार… सुत्रांची माहीती…

  • 23 Jul 2022 07:17 AM (IST)

    प्रफुल्ल पटेल यांच्या वर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली आहे

    - राजू कारेमोरे, (आमदार ) राष्ट्रवादी कांग्रेस

    - ईडी ची कारवाई केवळ महाराष्ट्रातच राष्ट्रवादीचे खच्चीकरनाचे काम ईडी करतेय.

    - येणारा काळ सर्व उलगड़ा करतोय,मात्र ज्यावर अशी कारवाई होते त्याला त्रास होतोच

    - प्रफुल्ल पटेल यांच्या वर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली आहे.

    - राजू कारमोरे यांची ही यापूर्वी स्वता ईडीची चौकशी झाली आहे हे विशेष.

    - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांचा आरोप.

  • 23 Jul 2022 07:14 AM (IST)

    अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान

    अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान....

    अमरावती जिल्ह्यातील 826 गावे बाधित;कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर...

    सर्वाधिक 25 हजार हेक्टर नुकसान एकट्या चांदुर बाजार तालुक्यात...

    पावसामुळे सोयाबीन, तूर,कपाशीचे मोठे नुकसान; पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव....

  • 23 Jul 2022 07:13 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु

    -गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने 208 हेक्टरमधील पिकांचे नुकसान....

    -कृषी विभागाकडून पंचनामे सुरू.....

    -शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी......

  • 23 Jul 2022 07:12 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज तीर्थक्षेत्र येथील वर्धा नदीचा धबधबा प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज तीर्थक्षेत्र येथील वर्धा नदीचा धबधबा प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित...

    मागील वर्षी पावसाळ्यात नाव उलटुन झुंज येथे झाला होता अकरा जणांचा मृत्यू...

    धबधब्यावर नौकाविहार आणि पोहण्यास बंदी...

    नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून पर्यटकांवर केली जाणार कारवाई...

  • 23 Jul 2022 07:12 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम (शनिवार, दि. 23 जुलै 2022)

    सकाळी 10 वाजता : भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठक, विरुपक्ष मंगल कार्यालय, पनवेल

    सकाळी 11 वाजता : भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठक, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

  • 23 Jul 2022 06:36 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले.

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते दोघांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

    राष्ट्रपती निवडणुका नंतर पंतप्रधान यांनी डीनरचे आयोजन केले होते त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे दिल्लीहून मुंबईत परत्यावर आता मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Published On - Jul 23,2022 6:26 AM

Follow us
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.