Maharashtra Live Updates : रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: Feb 13, 2023 | 6:10 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या फेजचं उद्घाटन. महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दरम्यान लढत होणार आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Feb 2023 09:11 PM (IST)

    कन्नड घाटात डिझेलने भरलेल्या ट्रकचे ब्रेक फेल

    कन्नड घाटातील वळणावर ट्रक आडवा झाला

    ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर डिझेलची गळती

    कन्नड घाटात वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा

    जीव मुठीत घेऊन वाहनधारकांचा घाटातून प्रवास

  • 12 Feb 2023 05:35 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    बुलढाणा पोलिसांनी केले होते न्यायालयात हजर

    अमानुष मारहाणीचे व्हिडीओ शूट न्यायालयात सादर

    पोलिसांची दडपशाही असल्याचा न्यायालयाचा संशय

    आरोपींची करण्यात आली मेडिकल चाचणी

  • 12 Feb 2023 05:02 PM (IST)

    पुणे : निवडणूक काळात बंदोबस्त

    कसबा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या जाणार

    जवळपास 300 केंद्रीय पोलीस निवडणूक काळात करणार बंदोबस्त

    सीएस एफ, आयटीबीपी, रेल्वे पोलीस अशा विभागाचे कर्मचारी असणार तैनात

    उद्यापर्यंत सगळे कर्मचारी पुण्यात दाखल होणार

    अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून केंद्रीय पोलिसांची असणार गस्त

  • 12 Feb 2023 04:55 PM (IST)

    नाना पटोले यांचा पोलीस अधिकाऱ्यांना फोन

    नाना पटोले यांचा कसब्याच्या निवडणुकीवरून पोलीस अधिकाऱ्यांना फोन

    झेंडे, पोस्टर्सच्या वादावरून पटोले यांनी डीसीपी गिल यांना फोन केला

    तुमच्या इन्सपेक्टर्सना सांगा त्रास देवू नका - नाना पटोले

    मला आडव्या हाताने घेता येत असल्याचंही सुनावलं

  • 12 Feb 2023 03:51 PM (IST)

    वाशिम : पोहरादेवी येथे १५ मंत्र्यांची उपस्थिती

    वाशिम : पोहरादेवी येथे १५ मंत्र्यांची उपस्थिती

    संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

    शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते सेवा ध्वजाचे अनावरण

    वाशिम येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वाजवला नगारा

  • 12 Feb 2023 02:21 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा

    18 आणि 19 ला करणार अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार

    18 तारखेला 'मोदी @20' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार

    भाजपकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी

    19 तारखेला शिवसृष्टी प्रकल्पाचं उद्घाटन

    भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

  • 12 Feb 2023 02:14 PM (IST)

    धनंजय मुंडे परळीत परतले

    धनंजय मुंडे हे आपल्या मतदार संघ परळी येथे दाखल

    अपघातानंतर तब्बल 40 दिवसांनंतर धनंजय मुंडे परतले परळी येथे

    मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी कार्यकर्ते उपस्थित

    परळी येथे आज संध्याकाळी धनंजय मुंडे यांची होणार भव्य स्वागत यात्रा

  • 12 Feb 2023 02:08 PM (IST)

    कसबा आणि चिंचवडच्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत

    पुणे :  त्यासाठी सर्वांनी ताकत लावा,

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना आदेश,

    मुख्यमंत्र्यांनी कालच्या पुणे दौऱ्यात शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा,

    कसब्यातील सेनेची मतं भाजपला कशी वळतील यासाठी प्रयन्त करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना,

    मुख्यमंत्री स्वतः कसब्यात, चिंचवडमध्ये रोड शो आणि जाहीर सभा घेणार.

  • 12 Feb 2023 02:07 PM (IST)

    जळगाव : राज्यपालांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत जल्लोष

    जळगावमध्ये राज्यपालांच्या राजीनामाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेढे वाटून जल्लोष

    भगतसिंग कोश्यारी यांची वेशभूषा धारण करून काढण्यात आली जल्लोष यात्रा

    प्रतिकात्मक वेशभूषा धारण केलेल्या राज्यपालांना गुलाब पुष्प देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला निरोप

  • 12 Feb 2023 02:05 PM (IST)

    बदलापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग

    बदलापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग

    बदलापूर, अंबरनाथ, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

    १० किमी लांब असलेल्या अंबरनाथ शहरातून दिसतायत धुराचे लोट

    आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

  • 12 Feb 2023 01:45 PM (IST)

    कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

    पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत जाहीर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मदत जाहीर

    पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

  • 12 Feb 2023 12:48 PM (IST)

    मोदीनंतर आता शाह महाराष्ट्रात, पुणे निवडणुकीत करणार एन्ट्री

    अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आगामी महापालिका निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आहे. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत...सविस्तर वाचा

  • 12 Feb 2023 12:28 PM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे गहिनीनाथ गडावर जंगी स्वागत होणार

    क्रेनच्या सहाय्याने हार घालत जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार

    त्याचबरोबर गहिनीनाथ गडावर आमदार धनंजय मुंडे यांची पेढ्याने तुला करण्यात येणार

    धनंजय मुंडे हे सहकुटुंब मुंबईहून गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी येणार

    गहिनीनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते परळीच्या दिशेने रवाना होणार

  • 12 Feb 2023 11:15 AM (IST)

    गुलाबराव पाटील यांची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रतिक्रिया

    जळगाव : राज्यपालांची मानसिकता राजीनामा देण्याची होती,

    त्यांची वेळ पण संपलेली होती,

    लोकांचा रोष ओढून घेण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला,

    त्यांच्याकडून ती चांगले कामे झाली त्याबद्दल त्यांचे आभार,

    त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील , पण पुढच्या काळामध्ये असं होऊ नये,

    कोणीही महाराजांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नये एवढीच अपेक्षा.

  • 12 Feb 2023 11:07 AM (IST)

    रविकांत तुपकरांच्या आंदोलनांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

    जळगाव  : लाठी चार्ज करणे चुकीचे पण अतिरेक पण कठीण आहे,

    आंदोलन करायला बरेच मार्ग पण नोटंकी आंदोलन पसंत नाही,

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव चढ-उतार असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षेचा भंग,

    मात्र तरीसुद्धा हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.

  • 12 Feb 2023 11:05 AM (IST)

    अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    उद्या भाजपने दिली सिल्लोड बंदची हाक

    शिंदे गट भाजपच्या संघर्षाला सिल्लोडमधून सुरुवात

    नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपकडून सिल्लोड बंद

    उद्या सकाळपासून सिल्लोड बंद

  • 12 Feb 2023 10:46 AM (IST)

    महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

    महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

    'झारखंड वित्त विधेयक-2022' दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले.

    तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले.

    नगरसेवक ते राज्यपाल प्रवास...वाचा सविस्तर

  • 12 Feb 2023 09:25 AM (IST)

    भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

    भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

    कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते

    रमेश बैंस नवे राज्यापाल

  • 12 Feb 2023 09:23 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

    वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता

    आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे

    रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल असतील

  • 12 Feb 2023 08:07 AM (IST)

    आज अजित पवारांची पुण्यात जाहीर सभा

    आज अजित पवारांची पुण्यात जाहीर सभा

    महाविकास आघाडी उद्या पुण्यात घेणार प्रचारसभा

    नातूबाग ग्राऊंडवर होणार जाहीर सभा

    संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचारसभा

    नाना पटोले, निलम गोरे, आणि अजित पवार करणार संबोधित

    आज कसब्यातील उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा

  • 12 Feb 2023 08:00 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध वाढला

    कोल्हापूर : ठाकरे गटानंतर आता सर्वपक्षीय कृती समितीचाही राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या दौऱ्याला विरोध,

    सर्व पक्ष कृती समिती उद्या कुलगुरूंना जाब विचारणार,

    राज्यपाल दीक्षांत समारंभाला आल्यास गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय,

    16 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना करण्यात आलय निमंत्रित.

  • 12 Feb 2023 07:57 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवारांची आज पुण्यात जाहीर सभा

    महाविकास आघाडी पुण्यात घेणार प्रचार सभा

    नातूबाग ग्राऊंडवर होणार जाहीर सभा

    संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचारसभा

    नाना पटोले, निलम गोरे, आणि अजित पवार करणार संबोधित

    कसब्यातील उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा

  • 12 Feb 2023 07:50 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध वाढला

    ठाकरे गटानंतर आता सर्वपक्षीय कृती समितीचाही राज्यपाल कोश्यारींच्या दौऱ्याला विरोध

    सर्व पक्ष कृती समिती उद्या कुलगुरूंना जाब विचारणार

    राज्यपाल दीक्षांत समारंभाला आल्यास गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय

    16 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपालांना करण्यात आलय निमंत्रित

  • 12 Feb 2023 06:30 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू

    पोलीस कस्टडीत रविकांत तुपकर यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू

    काल दुपारी 12 वाजल्यापासून सुरू आहे आंदोलन

    बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरूच

    काल दुपारी तुपकर यांनी केला होता आत्मदहनाचा प्रयत्न

  • 12 Feb 2023 06:26 AM (IST)

    चिंचवडमधील महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचितला पाठिंबा मागितला

    वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पत्र लिहून कलाटे यांनी पाठिंबा देण्याची केली मागणी

    2019च्या विधानसभेला वंचितने कलाटे यांना दिला होता पाठिंबा

    वंचितचा आधीच महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोननंतरही राहुल कलाटे यांची उमेदवारी कायम

  • 12 Feb 2023 06:22 AM (IST)

    मुंबईत कांदिवली पूर्वेच्या लोखंडवाला येथील नेबरहुड इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

    घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाच्या मदतीने आग आटोक्यात आणली

    काल सायंकाली 7:44 वाजता लागली आगे

    आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही

  • 12 Feb 2023 06:20 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्रिपुराच्या दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिपुरात आज दोन सभा

    मोदी मतदारांना काय आवाहन करणार याकडे सर्वांचं लक्ष

    त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर त्रिपुरात निवडणुकीचं रण माजलं आहे

  • 12 Feb 2023 06:18 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पोहरदादेवीत

    पोहरादेवी दौऱ्याच्या पूर्व संध्येलाच गावातील रस्त्यांची डागडुजी

    पोहरादेवीं मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची झाली होती चाळण

    मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामूळे डागडुजी

Published On - Feb 12,2023 6:11 AM

Follow us
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.