AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविआमध्ये पडणार फूट? पडद्यामागे घडामोडींना वेग

गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवेसना ठाकरे गटाची युती होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविआमध्ये पडणार फूट? पडद्यामागे घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 8:10 PM
Share

मनसे प्रमुख राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.  महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार मुळात हर्षवर्धन सपकाळांना आहेत का?, असा थेट सवाल आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.

राज ठाकरेंना सोबत न घेण्याचा हा काँग्रेसचा विचार असेल.‌ परंतु, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का झाल्याचंही यावेळी खासदार सावंत यांनी म्हटले आहे.‌ दरम्यान युती संदर्भात बोलताना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की आम्ही सोबत आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची देखील सावंत यांनी यावेळी आठवण करू दिली. दरम्यान  राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडणार का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. मात्र राज ठाकरेंसोबत जाण्याचा शिवसेनेचा  निर्णय पक्का झाला आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. प्रबोधनकारांचे पुस्तक फेकणारी आणि सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणारी प्रवृत्ती एकच आहे,  या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

उद्या शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या अंतिम सुनावणीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले आहे. मुळात या विषयावर अंतिम सुनावणी ही माजी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कार्यकाळातच होणं अपेक्षित होतं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीला भेट दिली होती, त्यानंतर आता युती होणार असल्याच्या चर्चेचा जोर आणखी वाढला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...