Marathi News » Maharashtra » Pune Delhi Flight: Pune to Delhi journey with Pilot MP Rajiv Pratap Rudy
Pune-Delhi Flight : खासदारचं जेव्हा पायलट असतो, खासदार राजीव प्रताप रुडीसोबत पुणे ते दिल्ली हवाई प्रवास
अक्षय कुडकेलवार | Edited By: VN
Updated on: Jul 19, 2021 | 11:19 AM
18 जुलैला पुणे ते दिल्ली या प्रवासी विमानाचे पायलट चक्क लोकसभेचे खासदार राजीव प्रताप रुडी होते. (Pune-Delhi Flight: Pune to Delhi journey with Pilot MP Rajiv Pratap Rudy)
Jul 19, 2021 | 11:19 AM
लोकसभेचे खासदार चक्क पायलट.. हो काल 18 जुलैला पुणे ते दिल्ली या प्रवासी विमानाचे पायलट चक्क लोकसभेचे खासदार राजीव प्रताप रुडी होते.
1 / 5
या विमानातून दिल्लीला प्रवास करणाऱ्या एका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांच्यासह विमानातील सर्वच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.
2 / 5
हे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
3 / 5
पुण्याहून ‘इंडिगोचे 6E6673’ हे विमान हवेत झेपावण्यापूर्वी पायलटनं माईकवरून सर्व प्रवाशांचं स्वागत करत आपला परिचय करुन दिला, तेव्हा ही बाब सगळ्यांच्या लक्षात आली.
4 / 5
याच विमानातून किसान सभेचे प्रतिनिधी संदीप गिड्डे प्रवास करत होते. पायलटनं ‘मी राजीव प्रताप रुडी, मुख्य वैमानिक’ असा परिचय करुन देताच त्यांना आपले वैमानिक हे खासदार असल्याची शंका आली. त्यांनी विमानातील सहाय्यकांकडून याबाबत खात्री करुन घेतली आणि विमान उतरताच कॉकपीट बाहेर जाऊन रुडी यांचं कौतूक केलं.