AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचा अतिरेकी म्हणून उल्लेख, पुस्तकातील त्या पॅऱ्यावरून महाजन यांनी फटकारलं

संजय राऊतांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केल्याचा दावा राऊत करतात. भाजप नेते गिरीश महाजन यांनी या दाव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचा अतिरेकी म्हणून उल्लेख, पुस्तकातील त्या पॅऱ्यावरून महाजन यांनी फटकारलं
गिरीश महाजनांनी संजय राऊतांना फटकारलं Image Credit source: social media
| Updated on: May 16, 2025 | 12:19 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आणि जेलमधील वास्तव्य यांच्या अनुभवावर आधारित असलेले ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. राऊतांनी या पुस्तकातून विविध विषयांवर भाष्य केलं असून एका भागात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलही दावा केला आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती. नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते, शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार असलेल्या अमित शाहांनाही बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पण त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फेटाळून लावले आहेत.

संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही. वाटेल तसे ते फालतू बडबड करत असतात. युद्ध सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. सैनिकांबद्दल काहीही बोलत होते. मला वाटतं आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं असं मला वाटतं, असं गिरीश महाजन म्हणाले. महाजन मीडियाशी संवाद साधत होते.

आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत

बाळासाहेबांनी मोदी आणि शाह यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे. आम्ही आता खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आता सुद्धा खऱ्या शिवसेने आजही सोबत आहोत.

आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही आजही टिकवलेले आहेत. आम्ही खऱ्या शिवसेने सोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेसोबत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही. पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज सकाळी अशी बडबड करावे लागते, अशी टीका महाजन यांनी केली.

की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं?

संजय राऊत यांना किती महत्त्व द्यायचं आणि त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं आणि त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व द्यायचं हे पाहावं लागेल. आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांचं कोणी ऐकत नाही. सकाळपासून त्यांचा भोंगा सुरू होतो. संपूर्ण देश हा मोदींच्या पाठीशी उभा असताना, सैन्याच्या पाठीशी उभा असताना त्यावेळी ते म्हणत होते मोदींनी राजीनामा द्यावा. आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत असलेल्या या अतिरेक्यांशी लढावं? असा सवालही त्यांनी केला. संजय राऊत यांना अतिरेकी म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महत्त्व देण्याची गरज नाही

मला वाटतं या पुस्तकाला आपण किती महत्त्व द्यावं. संजय राऊत कसा माणूस आहे सर्वांना माहीत आहे. ते पुस्तक त्या त्यांनी काय लिहिलं आहे मी वाचलेलं नाही आणि वाचणारही नाही. मला वाटतं त्याला फार महत्त्व देण्याची गरज सुद्धा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...