मोठी बातमी! उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप, शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; नेता आक्रमक

राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप, शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; नेता आक्रमक
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 4:26 PM

राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजी आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यातच रविवारी भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यादी जाहीर होताच ज्या इच्छूकांनी तिकीट मिळालं नाही, त्यांच्यामध्ये असंतोष असल्याचं दिसून येत आहे.

कल्याण पूर्वमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व विधानसभेसाठी भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळताच शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

कोळसेवाडी परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार  शक्तिप्रदर्शन केलं आहे. थोड्यावेळात महेश गायकवाड यांच्यासह 17 माजी नगरसेवक पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. उमेदवारी गायकवाड कुटुंबीयांच्या घरात राहिली तर सर्व नगरसेवक उठाव करतील, अपक्ष उमेदवार देतील असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना महेश गायकवाड यांनी म्हटलं की, कल्याणसाठी आजचा दिवस काळा आहे. ज्याने विकास तर केला नाही उलट शोषण केलं. आम्ही वारंवार सुचना केल्या. निधी आला त्यांनी घर भरले. अशा व्यक्तीच्या घरात पुन्हा उमेदवारी दिली जात आहे. आम्ही त्यांचं काम करणार नाही, उलट सडेतोड जवाब देणारआम्ही आमचा विरोध दर्शवला आहे. लवकरच भूमिका मांडू, शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे.  आम्ही अनेकवेळा विरोध केला आहे, कल्याण पूर्व विस्कळीत झाला आहे, लोकांना बदल हवा आहे, असं महेश गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.