288 पैकी हा माझ्या अत्यंत जवळचा आमदार; शरद पवारांनी कुणाचं नाव घेतलं?
Sharad Pawar in Solapur : शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हा दौरा करत आहेत. यावेळी स्थानिकांशी शरद पवार यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी काही जुन्या आठवणींनी उजाळा दिला. ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवांराच्या मनात नेमकं काय आहे? याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शरद पवारांच्या जवळचा नेमका कोण? हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण आज सोलापुरात बोलताना शरद पवारांनी त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या दौऱ्यात त्यांनी एक महत्वाचं विधान केलंय. 288 पैकी जवळच्या आमदाराचं नाव सांगताना शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्याचं नाव घेतलं आहे. पक्ष मेळावा व खासदारांच्या सत्कार कार्यक्रमाला शरद पवार हजर होते. तेव्हा शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
हे माझ्या जवळचे आहेत- शरद पवार
जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलोय. विधानसभेत माझ्यासोबत दिलीप सोपल यांनी काम केलं आहे. 288 आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे जवळचे आमदार आहेत. बार्शी आणि सोलापूरचे नाव दिलीप सोपल यांनी केलं. बार्शी तालुका हा ज्वारी, सोयाबीन, त्याचबरोबर टेक्स्टाईल मीलसाठी प्रसिद्ध होता. बार्शीची उणीव दिलीप सोपल यांनी भरून काढली. मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम सोपल यांनी केलं. सरकारने जे काम दिले ते चांगले करण्याचे काम त्यांनी केलं. प्रामाणिकपण कामं करणार नेतृत्व म्हणून सोपल माहिती आहेत, असं शरद पवार म्हणाले.
बार्शीकरांना काय आवाहन?
देशात आणि राज्यात वेगळे वातावरण आहे. मात्र राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस झटत आहेत. आघाडीच्या सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचे आहे. बार्शीकर आणि सोलापूर जिल्हा हा महाविकास आघाडीसोबत राहील याची पूर्ण खात्री मला आहे. सामूहिकपणे प्रयत्न करू आणि यश मिळवू, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार हे बार्शीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांची भेट घेतली. दिलीप सोपल यांनी शरद पवारांचं सत्कार केलं. दिलीप सोपल हे शरद पवार यांचे जुने सहकारी आहेत. आता ते शिवसेना ठाकरे गटात आहेत.दिलीप सोपल यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या स्वागत केलं.
