राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक; तर सरकारकडूनही कडक कारवाई, 3 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन

आंदोलन मागे घेतले नाही तर आम्हाला पगारवाढीच्या निर्णयावर विचार करावा लागेल, असा सूचक इशारा राज्य सरकारने दिलाय. यानंतर राज्यात काही आगारातून बसेस धावल्या आहेत. तर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी बसेसवर हल्ला तसेच दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत

राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक; तर सरकारकडूनही कडक कारवाई, 3 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन
bus update
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 9:42 PM

मुंबई : राज्य सरकारने पगारवाढ दिल्यानंतरदेखील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे विलगीकण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे आंदोलन मागे घेतले नाही तर आम्हाला पगारवाढीच्या निर्णयावर विचार करावा लागेल, असा सूचक इशारा राज्य सरकारने दिलाय. यानंतर राज्यात काही आगारातून बसेस धावल्या आहेत. तर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी बसेसवर हल्ला तसेच दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत

राज्यात एकूण 11 ते 13 बसेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाने गुन्हा दाखल केलाय. स्थानिक पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक

नाशिक 1 आगाराची बस मालेगाव ते नाशिक मार्गाने येत असताना उमराणेजवळ हल्ला करण्यात आला. या बसवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने पुढील दर्शनी काच फुटली. तसेच चालकाच्या हाताला दुखापत झाली. धुळे ते नाशिक या मार्गाने दुसरी बस येत असताना उमराणे येथे देवळा फाट्याजवळ बसवर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात बसची दर्शनी काच फुटली. तिसरी घटना एक बस नाशिक ते मालेगावकडे जात असताना सौंदाणे गावाजवळ घडली. या हल्ल्यात चाकलाच्या हाताला दुखापत झाली.

बीड :

बीड आगारात अंबाजोगाई ते बीड अशा मार्गावर जात असताना मांजरसुम्बा चौकात उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीने बसवर दगडफेक केली. दगड मारून बसच्या काचा फोडण्यात आल्या. पोलीस स्टेशन नेकनूर येथे यासंदर्भात तक्रार देण्यात आलीय. चालक, वाहक आणि प्रवासी असे कोणीही जखमी नाहीत.

जळगाव :

जळगाव आगारातील एका बसवर अमळनेर ते जळगाव अशा मार्गावरुन जात असताना चांदणी कुऱ्हे येथे अचानकपणे हल्ला करण्यात आला. या हल्यात बसच्या काचा फोडण्यात आल्या असून चाकलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर अशाच प्रकारे जळगाव-रावेर मार्गावर एका बसची काच फोडण्यात आली. भुसावळ आगाराच्या बसवर दिपनगरजवळ एका अज्ञात व्यक्तीने दगड मारला. यात बसचा काच फुटला.

दिवसभरात 3010 कर्मचारी निलंबित 

सोलापूर विभागातदेखील दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने कडक पवित्रा धारण केला आहे. एसटी महामंडळाने आज 3010 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. हा आकाडा आता 6277 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 270 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत 1496 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या :

राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल; भुजबळांनी उडवली खिल्ली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.