शक्तीप्रदर्शन नाही, हे तर राठोडांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल

वन मंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. (sudhir mungantiwar slams maha aghadi government over sanjay rathod issue)

शक्तीप्रदर्शन नाही, हे तर राठोडांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:21 PM

मुंबई: वन मंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. (sudhir mungantiwar slams maha aghadi government over sanjay rathod issue)

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आव्हान प्रदर्शन आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

निर्दोषत्वाचा संबंध नाही

संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यांनी शक्ती प्रदर्शन जरूर करावे. पण शक्तीप्रदर्शनाचा आणि निर्दोषत्वाचा काहीही संबंध नाही आणि नसतो, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी मीडियासमोर बोलण्यापेक्षा पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडावी, असा सल्ला देतानाच यापूर्वीच त्यांनी मी निर्दोष आहे. सीबीआय आणि कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करा, मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असं राठोड म्हणाले असते तरी चाललं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

दोन चार वर्षाने कारवाई होणारच ना

राठोड यांना कितीही क्लीन चिट दिली. आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दोन-चार वर्षाने त्यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई होणारच ना, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण कधीही राठोड यांच्या मानगुटीवर बसू शकतं, असे संकेतच मुनगंटीवार यांनी दिले आहेत. (sudhir mungantiwar slams maha aghadi government over sanjay rathod issue)

संबंधित बातम्या:

Photo : 40 किमीपर्यंत भरगच्च ताफा, आर्णीजवळ आणखी एक गाडी वाढली, संजय राठोडांच्या ताफ्यात किती गाड्या?

PHOTO: नॉट रिचेबल संजय राठोड समोर आले तो क्षण

यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

(sudhir mungantiwar slams maha aghadi government over sanjay rathod issue)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.