AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर-आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले

| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 3:48 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर-आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले
फाईल फोटो

उठाव नसल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. कांदा दहा किलोला 180 रुपये या भावाने विकला गेलाय. बाजार समितीमध्ये एकूण 5 हजार 479 पिशवी कांद्याची आवक झाली. मागील काही दिवसांपूर्वी हाच बाजारभाव दहा किलोला दोनशे रुपयांपर्यंत गेला होता. मात्र उठाव कमी असल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा बराखीत साठवून ठेवला आहे. चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. आगामी काळात 2025 ते 30 या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया बदनापूर येथील तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी आणि भावी सरपंचांची उपस्थिती होती. काही ठिकाणी मागच्या आरक्षणात बदल न झाल्याने तर काही ठिकाणी मात्र अनपेक्षित पने बदल झाल्यामुळे अनेकाना बसलाय. दरम्यान आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रत्येक गावात इच्छुक आपापल्या पद्धतीने आणि ताकदीने कामाला लागले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jul 2025 07:11 PM (IST)

    पडळकर, आव्हाडांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा, विधानभवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी

    राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली आहे. 

  • 17 Jul 2025 06:57 PM (IST)

    मनरेगा निधीवरून ममतांनी केंद्रावर निशाणा साधला

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, मनरेगा आणि ग्रामीण रस्ते प्रकल्पांमध्ये आम्ही भारतात नंबर 1 होतो. आमची देणी वर्षानुवर्षे अडकली असली तरी, आम्ही अजूनही राज्याच्या तिजोरीतून 12 लाख कुटुंबांना बांगला बारीसाठी निधी दिला आहे. त्या म्हणाल्या की, 16 लाखांहून अधिक कुटुंबांना या वर्षी डिसेंबर आणि मे महिन्यात दुसरा हप्ता मिळेल. जे शिल्लक आहेत ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जातील.

  • 17 Jul 2025 06:34 PM (IST)

    मोदी शुक्रवारी बंगालला भेट देणार, दुर्गापूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालला भेट देतील आणि दुर्गापूरमध्ये भाजपने आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतील. या प्रसंगी ते राज्यासाठी 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन देखील करतील.

  • 17 Jul 2025 06:18 PM (IST)

    ठाणे महापालिकेकडून झाडांच्या छाटण्यात येणाऱ्या फांद्यांमुळे 25 पक्षांचा मृत्यू

    पावसाळ्या दरम्यान ठाणे महापालिकेकडून मोठं मोठ्या झाडांच्या छाटण्यात येणाऱ्या फांद्यांमुळे 25 पक्षांचा मृत्यू, तर 15 पक्षी जखमी झाले आहे. घोडबंदर येथील ऋतू इंक्लीव येथील घटना आहे.  ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे घटना घडली.  मोठमोठ्या झाडांच्या फांद्या छाटत असताना झाडांवरील पक्षांची घरटे खाली पडून मृत्यू झाला. यामुळे पक्षी मित्रांमध्ये संतापाची लाट आहे.

  • 17 Jul 2025 06:04 PM (IST)

    सीवूड्स मध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत

    नवी मुंबई, सीवूड्स, सेक्टर-42 मध्ये भाजप च्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत आहे. गुजरात मधील आमदार विरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांचे कार्यालय आहे. या संदर्भात माहिती मिळताच संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी मनसे शहर सचिव सचिन कदम हे विभागसचिव अप्पासाहेब जाधव, उपविभागअध्यक्ष संतोष टेकवडे व इतर सहकाऱ्यांसह गेले. त्यावेळी कार्यालयातील लोकांनी दरवाजा आतून बंद केला. आज संध्याकाळपर्यंत पाटी मराठीत होईल अशी अपेक्षा आहे, असं मनसे नेत्यांनी सांगितलं. तसे न झाल्यास मनसे आक्रमक रूप धारण करेल असा इशारा दिला आहे.

  • 17 Jul 2025 05:57 PM (IST)

    विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर-आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले

    विधानभवनाच्या लॉबीमध्ये आमदार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले आहेत. दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. मात्र वेळीच सुरक्षा रक्षकांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दरम्यान या सर्व प्रकरणामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

  • 17 Jul 2025 05:53 PM (IST)

    राज ठाकरेंविरुद्ध उत्तर भारतीय विकास सेनेकडून तक्रार दाखल

    राज ठाकरेंविरुद्ध उत्तर भारतीय विकास सेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे 18 जुलै रोजी मिरा रोड दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी उत्तर भारतीय विकास सेनेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राज ठाकरे यांना कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत पूर्वसूचना द्यावी. तसेच त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनाही कोणताही गैरकायदेशीर कृत्य टाळण्यास सक्त सूचना द्याव्यात, अशी तक्रार उत्तर भारतीय विकास सेनेकडून पोलिसांत देण्यात आली आहे.

  • 17 Jul 2025 05:38 PM (IST)

    आमदार जितेंद्र आव्हाड यांना Whatsapp वर धमकी, गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी SP गटाची मागणी

    राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांना Whatsapp वरुन शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे. आव्हाडांनी हा धमकीचा मेसेज ट्विट केले आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदन दिलं. यावेळेस जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे सहकारी अमर कोळी याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली.

  • 17 Jul 2025 05:12 PM (IST)

    शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळेची दुरावस्था

    शालेय शिक्षण मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आली आहे. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत एकूण ३८ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या इमारतीतील दोन खोल्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिकावं लागत आहे.

    तसेच एका खोलीचे छत कोसळले असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेल्या बेंच तसेच इतर वस्तूंचे मोठे नुकसान झालं आहे. याबाबत शाळा आणि ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद-वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. मात्र याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे भविष्यात नको तसं घडलं तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

  • 17 Jul 2025 04:48 PM (IST)

    रेल्वे प्रशासना विरोधात सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांचे रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन

    रेल्वे प्रशासना विरोधात सांगलीच्या वसगडे मध्ये शेतकऱ्यांचे रेल्वे रुळावर झोपून आंदोलन सुरु आहे. रात्रीपासून शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुणे-मिरज रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. संतप्त शेतकरयांनी पुणे-लोंढा दुहेरी मार्गावरील एका रुळावर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. वसगडे येथे वीस तासापासून हे आंदोलन सुरू आहे.

  • 17 Jul 2025 04:30 PM (IST)

    दिव्यामध्ये फेरीवाल्यांविरुद्ध भाजपचे जनआंदोलन

    दिव्यामध्ये फेरीवाल्यांविरुद्ध भाजपचे जनआंदोलन करण्यात आले. दिवा चौकात भाजपने रास्ता रोको केला. भाजप पदाधिकारी दिवा-आगसन रोड आणि दिवा-खार्डी रोड रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार प्रशासनाकडे फेरीवाल्यांचा बंदबोस्त करण्याबाबत मागणी केली होती. मात्र कोणताही ठोस कारवाई होत नसल्याने समस्त दिवेकरांच्यावतीने प्रशासनाविरोधात दिवा भाजप मंडळचे रास्ता रोको आंदोनल

  • 17 Jul 2025 04:07 PM (IST)

    अवैध गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत चर्चा

    अवैध गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत चर्चा करण्यात आली. एवढंच नाही अंबादास दानवेंकडून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांची नावं सभागृहात सादर करण्यात आली. गुटखा येतो कुठून, गुटखा कोण आणतं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

  • 17 Jul 2025 03:55 PM (IST)

    दिवा : फेरीवाल्यांविरुद्ध भाजपचे जनआंदोलन….

    दिवा चौकात भाजपने रास्ता रोको आंदोलन केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी दिवा-आगसन रोड आणि दिवा-खार्डी रोड रस्ता रोखला आहे.

  • 17 Jul 2025 03:37 PM (IST)

    शाई फेक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

    संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड  शाई फेक प्रकरणातील आरोपी दीपक काटे सह दोघा आरोपींना अक्कलकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वीस हजाराच्या जात-मचुलक्यावर तसेच वेगवेगळ्या अटी आणि शर्तीवर हा जामीन मंजूर केलेला आहे.

  • 17 Jul 2025 03:20 PM (IST)

    सांगलीत रेल्वे रुळांवर झोपून शेतकऱ्यांचे आंदोलन

    रेल्वे प्रशासना विरोधात सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपुन आंदोलन केले आहे.रात्रीपासून रेल्वे बाधित शेतकरयांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुणे-मिरज रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.

  • 17 Jul 2025 03:11 PM (IST)

    ओला उबेर कार चालकांचा संप, संपात सहभागी न झालेल्या चालकांना अडवले

    ओला, उबर कंपनीचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर कारचालकांनी राज्यात संप पुकारला आहे. संपात सहभागी न झालेल्या चालकांना संपकऱ्यांनी अडवले देखील आहे.

  • 17 Jul 2025 03:01 PM (IST)

    ओला उबेर कार चालकांचा संप

    ओला, उबर कंपनीचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर कारचालकांनी राज्यात संप पुकारलाय. या संपाची झळ आज नवी मुंबईत देखील बसली. ओला उबेर चालकांनी कोपरखैरणे येथे रस्त्यावर उतरत ओला उबेरची सेवा सुरु ठेवणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या अडवल्या ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

  • 17 Jul 2025 02:50 PM (IST)

    उद्या राज ठाकरे मीरा-भाईंदरमध्ये येणार

    उद्याचा दिवस हा आमच्या साठी फार आनंदाचा दिवस आहे. जवळ जवळ 8 वर्षांनी राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदर मध्ये येत आहेत.

    मागच्या काही दिवसापासून मराठीचे आंदोलन झालं त्या संदर्भात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी साहेब येत आहेत, असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

  • 17 Jul 2025 02:35 PM (IST)

    ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’ उच्च स्थानावर

    स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. नवी दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान.

  • 17 Jul 2025 02:10 PM (IST)

    20 तारखेनंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथला महाराष्ट्र दौऱ्यावर

    20 तारखेनंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून काँग्रेस नेत्यांची महाराष्ट्रात बैठक घेणार आहेत.

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार असून, जन सुरक्षा विधेयकाला विरोध न केल्याने हायकमांडने खुलासा मागितला आहे त्यावरही चर्चा होणार आहे.

  • 17 Jul 2025 01:58 PM (IST)

    आरे पोलिसांनी गँगस्टर शिवा शेट्टीला केली अटक

    मुंबईतील आरे पोलिसांनी गैंगस्टर शिवा शेट्टीला अटक केली आहे. मुंबईच्या आरे पोलिसांनी शिवा शेट्टीला अटक करून लातूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नांदेड आणि लातूरमध्ये गुंडावर दरोड्याच्या घटना दाखल आहेत.

  • 17 Jul 2025 01:50 PM (IST)

    जन सुरक्षा कायदा विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे आंदोलन

    जन सुरक्षा कायदा विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली. महायुती सरकार विरोधात काँग्रेसची घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

  • 17 Jul 2025 01:40 PM (IST)

    गे ग्राइंडर अ‍ॅपवरून ओळख, अश्लील व्हिडीओचा सापळा रचून जबरी चोरी

    पुण्यात गे डेटिंग अ‍ॅप ‘ग्राइंडर’वरून ओळख करून तरुणाला सापळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडिताला भेटीस बोलावून कारमध्ये नेले आणि त्याच्यावर अश्लील व्हिडीओ शूट करत त्याच्या कुटुंबीयांना तो पाठवण्याची धमकी देत १० हजारांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने मोबाईल हिसकावून गुगलपे व फोनपेवरून रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. नांदेडसिटी पोलिसांनी कारवाई करत रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. त्याचा साथीदार ओंकार मंडलिक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

  • 17 Jul 2025 01:30 PM (IST)

    विश्व हिंदू परिषदची बैठक

    जळगावात एम.आय.डी.सी येथील बालाणी लॉन्स येथे आजपासून 5 दिवसीय विश्व हिंदू परिषदची आंतरराष्ट्रीयस्तराची अखिल भारतीय बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी जवळपास देशभरातून ३०० प्रतिनिधी उपस्थितीत असणार असून यामध्ये पाच इतर देशांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी होणार आहे. बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोक कुमार, राष्ट्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा, संघटन महामंत्री मिलिंद परांडे, श्रीराम मंदिर न्यास अयोध्या येथील सचिव चंपतराय प्रमुख उपस्थिती आहे.

  • 17 Jul 2025 01:20 PM (IST)

    विधानसभेत शिंदे संतापले

    विधानसभेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भडकले. मुंबईतील रस्त्यांविषयी विरोधकांच्या आरोपानंतर ते संतापले. आमचे काम बोलते म्हणून लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिल्याचे ते म्हणाले.

  • 17 Jul 2025 01:10 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन

    मीरा-भाईंदर शहरातील महानगरपालिका रुग्णालय टेंभा येथील आजपासून परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. विविध मागण्या प्रलंबित असल्याने या परिचारिकांनी रुग्णसेवा थांबवत निषेध नोंदवला आहे. वेतनवाढ, कामाच्या तासांमध्ये सुधारणा आणि अधिक सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली असून रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • 17 Jul 2025 01:00 PM (IST)

    हिंजवडीच्या एन्ट्री पॉइंटचं अतिक्रमण हटवलं

    आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. हिंजवडीत प्रवेश करताना अन घरी परतताना भूमकर चौकात ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरु केलीये. डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग 45 मीटर आहे. मात्र काळाखडक झोपडपट्टीतील 96 कुटुंबाचं तिथं अतिक्रमण होतं, ज्यावर हातोडा चालवला जातोय. आता इथं सहा पदरी रोड होईल खरा पण भूमकर चौक ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा सबवे हा फक्त दोन पदरी आहे आणि त्यामुळंच इथं मोठी वाहतूक कोंडी होते, तिथं पूल उभारण्याची गरज आहे.

  • 17 Jul 2025 12:50 PM (IST)

    नाशिकमध्ये काँग्रेसकडून निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी

    नाशिकमध्ये काँग्रेसकडून निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घेण्याचं काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली आहे.

  • 17 Jul 2025 12:40 PM (IST)

    प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणातील आरोपी दिपक काटेला न्यायालयात करणार हजर

    संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणातील आरोपी दिपक काटेला थोड्या वेळात न्यायालयात सुनावणीसाठी हजर करणार आहेत. न्यायालयासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली आहे. अक्कलकोट तालुका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम. एम. कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी पार पडणार आहे.

  • 17 Jul 2025 12:30 PM (IST)

    आजपासून राज्यातील रिक्षा संघटना संपावर जाणार

    मंत्रिमंडळात पाच मंत्री माजी रिक्षा चालक आहेत, तरीदेखील रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रिक्षा चालक संघटनेचे केशव क्षीरसागर यांनी केली. राज्यभर सुरू असलेल्या कॅब चालकांच्या आंदोलनात आता रिक्षा संघटनाही उतरली आहे. आजपासून राज्यातील रिक्षा संघटना संपावर जाणार आहे. सरकारी दरानुसार दर मिळावं यासाठी आणि ओला, उबेर, रॅपिडो बाईकच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

  • 17 Jul 2025 12:20 PM (IST)

    जनसुरक्षा कायद्याविरोधात अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन

    नुकताच पारित झालेल्या जनसुरक्षा कायदा विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने आंदोलन केलंय. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली. यावेळी महायुती सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.

  • 17 Jul 2025 12:10 PM (IST)

    मालाडमधील वादादरम्यान तलवार काढण्याचा प्रकार समोर, गुन्हा दाखल

    बुधवारी मालाडमध्ये एका वादादरम्यान तलवार काढण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत. तलवार काढलेल्या ठिकाणी बेकायदेशीर दुकानं पाडण्यासाठी महापालिकेचं पथक दाखल झालं आहे.

  • 17 Jul 2025 11:57 AM (IST)

    मीरा-भाईंदर शहरातील महानगरपालिका रुग्णालय टेंभा येथील आजपासून परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू

    विविध मागण्या प्रलंबित असल्याने या परिचारिकांनी रुग्णसेवा थांबवत निषेध नोंदवला आहे. वेतनवाढ, कामाच्या तासांमध्ये सुधारणा आणि अधिक सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली असून रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळाली नसून, परिचारिकांचा संघर्ष सुरुच आहे.

  • 17 Jul 2025 11:47 AM (IST)

    दिंडोरी येथील अपघातावर खासदार भास्कर भगरे यांचं मोठं विधान..

    बांधकाम विभागावर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करा… या ठिकाणी अनेक वेळेला अपघात मात्र तरी देखील बांधकाम विभागाचे दुर्लक्ष… रस्ता चौपदरीकरण करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे मागणी… अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय नाही… पुन्हा पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार… अपघाताला कारणीभूत असणाऱ्या बांधकाम विभागा च्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा… रस्त्याचं काम करताना इथे खड्डे पडतात मात्र नंतर ते बुजवले जात नसल्याने अपघात घडतात

  • 17 Jul 2025 11:37 AM (IST)

    राज्यभरातील महिला राज्यभरातील परिचारिका आज आझाद मैदानावर

    एक दिवसाच्या काम बंद आंदोलनातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यभरातील परिचारिका आक्रमक… राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयातील तब्बल 35 हजार परिचारिका या काम बंद आंदोलनात सहभागी होणार… हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्याने कामबंद आंदोलन

  • 17 Jul 2025 11:15 AM (IST)

    कृत्रिम फुलांवर बंदी घालावी शेतकऱ्यांच आझाद मैदानात आंदोलन

    कृत्रिम फुलांवर बंदी घालावी शेतकऱ्यांच आझाद मैदानात आंदोलन…. दादर कट फ्लॉवर असोसिएशनच्या वतीने आंदोलन सुरू… फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आझाद मैदानात दाखल… या आंदोलनात थोड्याच वेळात मंत्री भरतशेठ गोगावले राहणार उपस्थित… कृत्रिम फुलांवर बंदी घातलेला जीआर आमच्या हाती देण्यात यावा तरच आम्ही आंदोलन सोडू…  कृत्रिम फुलांमध्ये वापरण्यात येणारे रंग मानवी शरीरास अत्यंत घातक असल्याचे संशोधनामध्ये आढळले

  • 17 Jul 2025 10:43 AM (IST)

    मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांचे आंदोलन, कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी

    मुंबईतील आझाद मैदानात आज दादर फ्लॉवर असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात थोड्याच वेळात मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की, कृत्रिम फुलांवर बंदी घातलेला शासन निर्णय (जीआर) त्यांच्या हाती दिल्याशिवाय ते आंदोलन मागे घेणार नाहीत. कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे रंग मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

  • 17 Jul 2025 10:35 AM (IST)

    चाकण-शिक्रापूर मार्गावर मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात

    चाकण-शिक्रापूर मार्गावरील रासे गावाजवळ आज सकाळी एक मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातावेळी रस्ता ओलांडणाऱ्या तीन शालेय विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्या. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • 17 Jul 2025 10:16 AM (IST)

    बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ऑगस्टपासून धावणार वनराणी ट्रेन

    बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बच्चेकंपनीसह मोठ्या लोकांची आकर्षित असलेली वनराणी मिनी टॉय ट्रेन ही ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. यानंतर ४ वर्षांपासून ती सुरु होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता तिचे काम पूर्ण झाले असून तिचे प्रात्यक्षिक झाले आहे. यामुळे ती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 17 Jul 2025 10:05 AM (IST)

    RSS सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर, मोठा बंदोबस्त तैनात

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर असून, त्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य विरोधाची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी खबरदारी म्हणून मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यात प्रमुख मराठा कार्यकर्ते महेश पवार यांचा समावेश आहे. सध्या कार्यक्रमस्थळी, सोलापूर शहरातील उद्योगवर्धिनी संस्थेच्या हुतात्मा स्मृती भवन येथील परिवार उत्सव कार्यक्रमात पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

  • 17 Jul 2025 09:51 AM (IST)

    मद्यधुंद डॉक्टरने तिघांना उडवले

    कराड शहरातील ढेबेवाडी फाट्यावर रात्री ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा थरार पाहायला मिळाला. एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव ईरटीगा चारचाकी गाडीने दोन दुचाकी आणि तीन नागरिकांना उडवले. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.

  • 17 Jul 2025 09:47 AM (IST)

    क्लासमध्ये मुलीचा लैंगिक छळ, एसआयटीकडून तपास

    बीडच्या नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये मुलीचा वर्षभर लैंगिक छळ केला जात होता. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांना अटक करण्यात आली. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्यासह दहा जणांची एसआयटी गेल्या सात दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून तपास करत आहे.

  • 17 Jul 2025 09:34 AM (IST)

    जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या- राहुल गांधी

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.

  • 17 Jul 2025 09:15 AM (IST)

    लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक

    जळगावच्या धरणगाव येथील तरुणाने नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर सांगून तसेच लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केल्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनाद विनोद कापुरे असे त्या तरुणाचे नाव आहे.

  • 17 Jul 2025 08:57 AM (IST)

    पुण्यात मदारी बाबाला अटक

    विद्येच्या माहेरघरात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी मदारी बाबाने जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार. पीडित महिलेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जादू करून सोन्याचा हंडा देतो म्हणत फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी घेतलं ताब्यात. महंमद खान साहेब जानमदारी असे ताब्यात घेतलेल्या जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव.

  • 17 Jul 2025 08:51 AM (IST)

    राज्यातील काँग्रेस नेत्यांना हायकमांडची नोटीस

    काँग्रेस हायकमांडच्या आदेशावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षाची नोटीस. जनसुरक्षा विधेयकाच्यावेळी सभागृहात भूमिका का घेतली नाही यावर मागितला खुलासा. त्यावर स्पष्टीकरण देण्याचे काँग्रेस हायकमांडच्या सूचना. जन सुरक्षा विधेयक सभागृहात मांडल्यावर भूमिका घ्यायला हवी होती काँग्रेस हाय कमांडच मत.

  • 17 Jul 2025 08:46 AM (IST)

    अमरावती जिल्हा रुग्णालयात जमिनीवर गाद्या टाकून उपचार

    अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढल्याने रुग्णांवर खाली गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ. एकीकडे अत्याधुनिक रुग्णालय धुळखात तर दुसरीकडे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पसरली आहे दुर्गंधी. रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही बंद असल्याची रुग्णांची माहिती. बदलत्या वातावरणाने वाढले आजार, त्यामुळे वाढली रुग्णांची गर्दी.

  • 17 Jul 2025 08:39 AM (IST)

    नाशिक जिल्हापरिषद लैंगिक शोषण प्रकरण

    जिल्हापरिषद लैंगिक शोषण प्रकरण. जिल्हा परिषदेतील तिसऱ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू असताना हा अधिकारी गेला रजेवर. महिलांशी गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हापरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशाखा समिती मार्फत चौकशी आहे सुरू. जिल्हापरिषद प्रशासनाने एका खातेप्रमुखाचे निलंबन, तर दुसऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले. तिसरा अधिकारी मात्र चौकशी सुरू असताना रजेवर गेल्याने आश्चर्य. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे का? असा देखील सवाल.

Published On - Jul 17,2025 8:38 AM

Follow us
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.