Maharashtra Breaking News LIVE 19 February 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजपकडून पर्यवेक्षक नियुक्त,कुणाला संधी?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
2023 च्या कायद्यांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सर्वोच्च न्यायालय सुनावणीची तारीख निश्चित करेल. याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने गेल्या सुनावणीत म्हटले होते की, मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. जर नवीन कायदा लवकरच थांबवला नाही, तर सरकार पुन्हा नवीन कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. परंतु न्यायालयाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी करण्यास नकार दिला होता. ही याचिका मध्य प्रदेश काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी दाखल केली आहे.
-
राजस्थानमध्ये मोफत वीज, उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी केली 150 युनिटची घोषणा
राजस्थानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिया कुमारी यांनी 150 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली. मोफत वीज लाभार्थ्यांच्या घरात सोलर प्लेट्स बसवल्या जातील.
-
-
आम्ही सनातन कार्यक्रम भव्यतेने आयोजित करत राहू – मुख्यमंत्री योगी
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, महाकुंभ हा पक्षाचा कार्यक्रम नाही. कुंभमेळ्यावर राजकारण करणे योग्य नाही. आम्ही सनातनचे कार्यक्रम भव्यतेने आयोजित करत राहू. सनातनचा अपमान केला जात आहे.
-
दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजपकडून पर्यवेक्षक नियुक्त, कुणाला संधी?
दिल्लीत अनेक वर्षांनंतर भाजपचं सरकार सत्तेत आलं. आता दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजपकडून पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. रवीशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ७ वाजता बैठक होणार आहे.
-
दिल्ली सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी
मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या या शपथविधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत असणार आहेत. मात्र 3 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी उपस्थित राहणार नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनामध्ये उद्या बजेट मांडले जाणार आहे. गुजरात आणि उत्तराखंड राज्यात विधानसभा अधिवेशनामुळेही त्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.
-
-
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या नवीन पुतळ्याची पायाभरणी
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली आहे. राजकोटवर पहिला बांधलेला पुतळा कोसळल्यानंतर आता त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पायाभरणीचा हा कार्यक्रम पार पडला. राजकोट किल्ल्यावर भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल अशी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
-
डान्सबार सुरू करायचा निर्णय घेतल्यास मैदानात उतरू; रोहित पाटलांचा थेट सरकारला इशारा
राज्यात पुन्हा एकदा सरकार डान्सबार चालू करण्याचा घाट घालत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारकडून डान्सबार कायद्यातील सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यावरून रोहित पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत याला विरोध दर्शवला आहे.
-
-
बीडमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा सळसळता उत्साह
बीडमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
-
नाशिकमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 3000 पोलिसांचा फौजफाटा
नाशिकमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या अति संवेदनशील असलेल्या जुन्या नाशिक परिसरातून मिरवणुकांना सुरुवात झाली असून मुस्लिम बहुल भागात पोलिसांचे विविध पथक तैनात करण्यात आले आहे. नाशिक शहरात आज तब्बल 3000 पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे लोक मिरवणुका काढतायत- संजय राऊत
“या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त झाला. राज्यकर्त्यांकडून या राज्यात छत्रपतींना जी अपेक्षित भूमिका होती, आज त्या दिशेने कोणी जाताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. ज्या पद्धतीने पुतळ्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, आज तोच भ्रष्टाचार करणारे लोक मिरवणुका काढत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
-
महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं
दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील खासदार संसदेच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या मनोहर जोशींनी सुरू केलेल्या परंपरेप्रमाणे महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासमवेत अरविंद सावंत , माजी खासदार हेमंत गोडसे देखील हजर होते.
-
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची रामलीला मैदानावर तयारी
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची रामलीला मैदानावर तयारी सुरू आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या, २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात खून, बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती- संजय राऊत
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात खून, बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती. आज बीडमध्ये आणि परभणीत काय चालू आहे? भ्रष्टाचारी, बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्यात अभय आहे. जनतेचा पैसा खुल्यानं लुटला जातोय,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच बडेजाव केला नाही- संजय राऊत
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच बडेजाव केला नाही. त्यांच्या राज्यातसुद्धा लोकशाही होती. जरी निवडणुका नसल्या, निवडणूक आयोग नसला, गृहमंत्री नसला तरी लोकशाही होती. त्याला आम्ही शिवशाही म्हणतो. आता जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायला रायगडावर गेले आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यांनी असं नाही आपण सर्वांनीच आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.
-
नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह
नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळतोय. छत्रपतींचे पोवाडे, ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमलंय. पंचवटी कारंजावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर थोड्याच वेळात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
-
‘‘छावा’ चित्रपट वादात; प्रदर्शन थांबवण्याची मागणी
संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांचा चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप… संभाजी महाराज व सोयराबाईंबाबत चुकीचे प्रसंग दाखवल्याचा आरोप… सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर; योग्य पडताळणी न करता मंजुरी दिल्याची तक्रार… ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी
-
Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वसईच्या गवराई पाडा येथे स्वच्छता अभियान संपन्न
सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांच्या पुढाकारातून, मंगळ्या पाटील परिवार, श्रीखंडोबा ट्रस्ट व अच्युतम इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे… छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात घेऊन, परिसरातील लहान मुले, महिला, पुरुष, तरुण मुलं या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. गवराई पाडा परिसरातील रस्त्यावर ही स्वच्छता मोहीम रबवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
-
Maharashtra News: कोल्हापुरातील छत्रपती कुटुंबियांच्या वतीने शिवजयंती सोहळा
कोल्हापुरातील छत्रपती कुटुंबियांच्या वतीने शिवजयंती सोहळा… नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात होणार शिवजन्म काळ सोहळा… खासदार शाहू छत्रपती आणि छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत होणार जन्मकाळ सोहळा…. शिवजयंती सोहळ्यासाठी पारंपारिक लवाजमा दाखल
-
सुरेश धस माघार घेतील हे मला माहीत होतं, एक मोठी डील झाली आहे – संजय राऊत यांचा आरोप
सुरेश धस माघार घेतील हे मला माहीत होतं, एक मोठी डील झाली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
-
शिवरायांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. – संजय राऊत
छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो. शिवरायांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. – संजय राऊत
-
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
-
आष्टी – आमदार सुरेश धस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालत शिवजयंती उत्सव साजरा
आष्टी – आमदार सुरेश धस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालत शिवजयंती उत्सव साजरा झाला.
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वसईच्या गवराई पाडा येथे स्वच्छता अभियान संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वसईच्या गवराई पाडा येथे स्वच्छता अभियान संपन्न झालं.
सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांच्या पुढाकारातून, मंगळ्या पाटील परिवार, श्रीखंडोबा ट्रस्ट व अच्युतम इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात घेऊन, परिसरातील लहान मुले, महिला, पुरुष, तरुण मुलं या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
-
नाशिक कपालेश्वर मंदिराच्या दानपेटीत 13 लाख रुपये जमा
गुरव यांच्यात दानपेटीवरून झालेल्या भांडणानंतर पाच दानपेटी सील. या सर्व दानपेट्या भरल्याने त्यांची करण्यात आली मोजदात. धर्मदाय आयोग यांनी मोजणीचे आदेश दिल्यानंतर चार दिवसात मोजणी पूर्ण. 13 लाख 14,091 रुपये इतकी रक्कम दानपेटीत.
-
पुणे येथे “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्रात पुणे येथे “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे नेतृत्व करणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी सुमारे 20,000 माय भारत स्वयंसेवक या पदयात्रेत होणार सहभागी.
-
किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह
जुन्नर येथील शिवाई देवीची शासकीय पूजा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. शिवाई देवीची आरती या वेळी करण्यात आली असून शिवजयंतीचा उत्साह हा किल्ले शिवनेरीवर पाहायला मिळतोय.
-
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दाखल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दाखल. शिवभक्त मोठ्या संख्येने शिवनेरीवर उपस्थित.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त ही फटाक्याची आतषबाजी पाहण्यासाठी उपस्थित होते. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, महापालिकेकडे यासाठी आतापर्यंत 2 हजार 777 जणांनी नोंदणी केली आहे. महापालिका 4173 घरे बांधणार असून बालेवाडी, कोंढवा, धानोरी, वडगाव खुर्द या भागात ही घरे उभारण्यात येणार आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाची अट तीन लाखांवरून सहा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Published On - Feb 19,2025 8:19 AM





